MOST OF THE LADIES HAVE TO MANAGE THEIR OFFICE, BUSINESS, AND MANY OTHER THINGS ALONG WITH THEIR HOUSEHOLD DUTIES AND COOKING, THE INEVITABLE PART OF A WOMAN`S LIFE. BECAUSE OF SHORTAGE OF TIME, SHE ALWAYS THINKS OF WAYS TO SAVE HER TIME. SHE HAS TO CONSIDER A LOT OF THINGS WHILE PLANNING HER COOKING. THE TIME, THE LIKINGS OF ALL, THE NUTRITIOUS VALUES OF THE FOOD, THE TASTE, THE AGE GROUP ARE MANY SUCH FACTORS ABOUT WHICH SHE HAS TO THINK. MICROWAVE IS THE WONDERFUL DEVICE TO MAKE COOKING EFFORTLESS. IT IS NO WONDER THAT MANY OF THE WOMEN HAVE ADMITTED THAT MICROWAVE SAVES TIME AND HELPS IN COOKING TASTY AND DELICIOUS DISHES, BUT EVEN THE MEN HAVE ACCEPTED THIS AFTER TRYING IT. THIS BOOK INCLUDES MANY VEGETARIAN AND NON-VEGETARIAN DISHES. THERE ARE SIMPLE FOOD ITEMS WHICH WE COOK EVERY DAY AND THERE ARE SPECIAL FOOD ITEMS FOR SPECIAL PEOPLE, FOR SPECIAL OCCASIONS FROM VARIOUS STATES AND COUNTRIES. THE MAIN FEATURE OF THIS BOOK IS THE AUTHOR HERE EXPLAINS US HOW TO CHOOSE A MICROWAVE, HOW TO USE IT, AND WHAT PRECAUTIONS SHOULD WE FOLLOW WHILE USING IT.
आज बहुसंख्य स्त्रियांना आपल्या नोकरी-उद्योग-व्यवसायाचा व्याप सांभाळतच घरादाराकडे बघावं लागतं. त्यामुळे साहजिकच कमीत कमी वेळात सर्वांना आवडणारे, स्वादिष्ट आणि घरातील सर्व वयोमानाच्या व्यक्तींच्या आरोग्याला पोषक असे पदार्थ कसे बनवता येतील, याचा त्यांना विचार करावा लागतो. यासाठी या दशकात ज्या सुखसोयी त्यांना लाभल्या, त्यांतील `मायक्रोवेव्ह ओव्हन` ही एक महत्त्वाची सोय आहे, असं म्हणायला हरकत नाही.
‘झटपट, स्वादिष्ट व आरोग्यास पोषक जेवण म्हणजेच मायक्रोवेव्ह कुकिंग’ असा निर्वाळा आज स्त्रियांनी तर दिला आहेच, पण स्वत: काहीतरी खास `पकवून` घरातल्यांना ‘खिलवणा-या’ चोखंदळ पुरुषांनाही ‘मायक्रोवेव्ह’ हे वरदान ठरले आहे.
या पुस्तकात मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये करायच्या अनेक शाकाहारी व मांसाहारी पाककृती दिलेल्या आहेत. त्यात आपले रोजचे साधे पदार्थ आहेत, तसेच वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या देशातील खास पदार्थही आहेत.
मायक्रोवेव्ह ओव्हन कसा निवडावा, तो वापरताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी लेखिकेनं दिलेल्या सविस्तर सूचना, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं.