* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CONSTABLE NANJUNDEGOUDA GAVE A HALF-SMILE. JAYKUMAR WHO WAS LOCKED BEHIND THE BARS FAILED TO UNDERSTAND THE DIFFERENCE BETWEEN HIS REGULAR POLITE SMILE AND A HEARTY LAUGH. JAYKUMAR, A B. E., WAS AN ESTABLISHED BUSINESSMAN. ‘WHY ARE YOU SMILING?’ HE ASKED. ‘YOU ARE MY COUSIN.” SHE ANSWERED. RAISED IN BANGALORE SHE WAS RIGHT NOW STANDING BENEATH THE ORANGE TREE IN THEIR GARDEN. ‘WHO TAUGHT YOU ENGLISH?’ HE ASKED IN A STRICT TONE. NONE OF HER SCHOOL TEACHERS HAD SUCH STRICT TONE. SHE WAS OFFENDED. WHAT DOES HE THINK OF HIMSELF? IS HE MY TEACHER? ‘MY TEACHER, MY MOTHER. MY MOTHER WORKS AS A READER FOR ENGLISH.’ ‘THEN UNDERSTAND THIS WELL. I AM NOT YOUR COUSIN. I AM YOUR BROTHER, ELDER BROTHER, I AM ANNA.’ ‘BUT MY MUMMY AND DADDY ARE DIFFERENT FROM YOUR AMMA AND APPA.’ SHE HAD THIS NAGGING DOUBT. ‘SO WHAT IF THEY ARE DIFFERENT? MY APPA IS YOUR APPA’S ELDER BROTHER, SO NATURALLY, IT MAKES ME YOUR ELDER BROTHER, JUST REMEMBER THIS. THOSE WHO TEACH YOU ENGLISH HAVE NO SENSE AT ALL.’ HE CONTINUED WITH HIS TEACHINGS. THIS CONTEMPORARY NOVEL REVEALS THE CRACKS THAT INDIAN SOCIETY IS EXPRESSING IN DAY-TO-DAY LIFE. IT WILL TOUCH THE BASE OF OUR HEART.
कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं?’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन!’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश?’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला? ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे!’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा.’’ ‘‘पण माझे डॅडीमम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्माअप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही. ‘‘वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. भारतीय समाजाला जात असलेल्या तड्याचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवनदर्शन घडवणारी कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarSantosh Saknur

    `स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वतःचे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मानसिकतेचे विदारक कहाणी` "तडा" (कादंबरी) लेखक:- एस एल भैरप्पा मराठी अनुवाद:- उमा कुलकर्णी हे पुस्तक संपवताना मनात राग, निराशा, सहानुूती, हतबलता आणि चिंता या सर्व भावना स्व:अनुभवायला मिळतात. स्त्रीवादी विचारांचा (खरं स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचा खरा अर्थ न कळता ते) मिळवण्याचा एकांगी अट्टाहास मनाला विषन्न करतो. अशा वृत्तीमुळे व सदोष कायद्यामुळे आजही समाजात संसाराच्या कितीतरी सुंदर वास्तुला कायमचा तडा बसलेला आहे. या गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसलाय त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसलाय,बसतोय. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर स्त्रीला पश्चातापाच्या चितेत अखंड मृत्यू वेदना देत राहतो. या कादंबरीत स्त्रीवादी भूमिका मिरवणाऱ्या मानसिकतेचं क्रूर चित्र रंगवलेलं आहे. इला, मंगळा, चित्रा,माला या त्या मानसिकतेची काही मूर्त नावे. चळवळीच्या नावाखाली स्वतःचा स्वैराचार व्यभिचार आणि नवऱ्याच्या इस्टेटी मिळवण्यासाठी सोडलेली स्वतःची पातळी तरीही त्याला मुक्ती स्वातंत्र्या अस गोंडस नाव देऊन समाजात विदुषी म्हणून मिरवतात. यांच्या मुळे कित्येक जयकुमार, चिन्मयानंद, नचिकेत, प्रभाकर अगदी मंत्री राजकारणी वकील यांचीही झालेली वाताहत पाहायला मिळते. भारतीयच नाही तर स्वतःला पुढारलेले समजणारे पाश्चात्त्य देश ही अशा तांडवात पुरते भाजत आहेत. घटस्फोटाचे खेळ, अशिलांना फशी पाडून वकिलांची मौजमजा आजही आपणास माहित आहेच, पण यात सर्वात जास्त अन्याय सहन करतात ते ज्यांनी कोणतीही चूक केलेली नसते ते म्हणजे घटस्फोटित दाम्पत्यांची अपत्ये. त्यांच्या वाट्याला आलेलं जिवंत पोरकेपण स्त्रीवादी स्वातंत्र्याची चळवळ कधीच भरून काढू शकत नाही. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये याच आशयाचे ही खूपच प्रभावी पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावे व आपल्या संसाराचे भावविश्व अधिक प्रगल्भ करावे असं आपसूकच मला हे पुस्तक वाचताना वाटून गेलं. स्वतःचा संसार व भावविश्वाला समृद्ध करण्यासाठी अवश्य वाचा संतोष सकनूर दिनांक 18 जुलै 2021 ...Read more

  • Rating StarRajendra Dhole

    स्वातंत्र आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वत:चे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद् ध्वस्त करणार्‍या मानसिकतेची विदारक कहाणी भारतिय समाजाला जात असलेल्या तड्यांच दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी, समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन- दर्शन घडवणारी कादबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more