* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIOLENCE NEVER ENDS, IT GROWS MORE AND MORE, FINDING NEW OPPONENTS, NEW METHODS . VIOLENCE , PERSECUTION , POSSESS THEIR OWN VELOCITY, THEIR OWN RATIONALITY. PERSECUTION, POLITICS, DIPLOMACY , AND SIMILAR TERMS DON’T BELIEVE IN USING THEIR INTELLECTS , BUT ,NOBODY CAN RULE A MIND AND ITS CREATIVITY . AUTHORS, ARTISTS, JOURNALISTS, SOCIAL WORKERS ETC. ARE TARGETED BY THESE KIND OF PEOPLE. AS A RESULT, THE CULTURAL AND FOLKLORIC LOSS IS INTOLERABLE AND AWFUL. THE CIRCLE OF TIME FREEZES FOR THAT CHUNK OF PEOPLE. THE SKY WAS OBSCURED BEFORE THE DECLARENCE OF EMERGENCY CRISIS. POLITICIANS WERE CONTENT WITH THEIR HIDDEN OUTLAW POWERS . “NEITHER YOU’LL STAY ALIVE, NOR DEATH WILL ARRIVE” WAS THE CIRCUMSTANCE THEY CREATED. IN THIS DISTURBING SITUATION , HOW AN INTELLIGENT JOURNALIST ALONG WITH HIS FAMILY SUFFERS FROM AN INTENSE SITUATION, NARRATED ON A NATIONAL BACKGROUND, THAT KNOCK-BACKS OUR MINDS AND BRAINS DREADFULLY IS - TANTU GREAT AND FEARLESS KANNAD IDEALIST AND AUTHOR SHRI S.L.BHAIRAPPA WITH HIS VARIED AND STRANGE FILAMENTS HAVE STITCHED A GIANT FABRIC – TANTU
‘हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते; आणि नवे शत्रू, नवे मार्ग शोधत राहते. हिंसा, जुलूमशाही यांची स्वत:ची अशी एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृत्तींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही. त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्ल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजधुरीण इत्यादींकडे वळवतात. परिणामी होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.’ आणीबाणी घोषित होण्यापूर्वीच बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकत्र्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. ‘न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...’ अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पाश्र्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तं तू! कन्नड साहित्यातील थोर तत्त्वविवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तं तू !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TANTU #TANTU #तंतू #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNilesh Dadgal

    कन्नड साहित्यातील थोर तत्वविवेचक आणि निर्भिड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू सर्व प्रथम आमचे काका स्व. अनंत उर्फ गोटू अभ्यंकर यांचे खुप खुप धन्यवाद ज्यांनी मला हि कादंबरी वाचायला दिली आणि ाही दिवसाच आम्हाला सोडुन गेले. नंतर बरेच दिवस कादंबरी वाचता आली नाही, पण काका खरच तुमचे खुप उपकार आहेत कि भैरप्पा सारख्या महान लेखकाच्या लिखाणासोबत माझी ओळख करुन त्यांच्या लिखाणाच्या वाचनाची मला ओढ लावली. खुप छान कादंबरी, वाचतांना मग्न करणारी व विचार करायला लावणारे लिखाण. `हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते आणि नवे शत्रू , नवे मार्ग शोधत राहते. हिंसा जुलूमशाही यांची स्वत:ची एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृतींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही; त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजसुधारीण इत्यादींनकडे वळतात. परिणामी, होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.` आणिबाणी घोषित होण्यापुर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकर्त्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. `न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...` अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुध्दिप्रामाण्यवादी पत्रकारांची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पार्श्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तंतू! ...Read more

  • Rating StarGovind Kulkarni

    ह्या मध्ये नायिका स्वतः बिझिनेस मध्ये उतरते सगळे अडथळे पार करत स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व मीही पती पेक्षा वेगळं काहींतरी करू शकते ही उर्मी.

  • Rating StarGovind Kulkarni

    तंतूच प्रवाहिपण तसंच पात्रांची व प्रसंगाची रेलचेल पण त्याची सुंदर सुसूत्रता अशी अनेक कारणांनी अंतर्मुख करणारी कादंबरी आहे.मानवी स्वभावाचे अनेक पैलू व कंगोरे जागोजागी वाचायला मिळतात.त्यांत सर्वचजण आले आहेत.

  • Rating StarAkshay Chorage

    Tantu..Mast ch ahe..

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more