* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BRÛLÉE VIVE (FRENCH), BURNED ALIVE (ENGLISH)
  • Availability : Available
  • Translators : GAURI KELKAR
  • ISBN : 9788184985269
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN SOUAD WAS SEVENTEEN SHE FELL IN LOVE. IN HER WEST BANK VILLAGE, AS IN SO MANY OTHERS, SEX BEFORE MARRIAGE IS CONSIDERED A GRAVE DISHONOR TO ONE`S FAMILY AND IS PUNISHABLE BY DEATH. THIS WAS HER CRIME. HER BROTHER-IN-LAW WAS GIVEN THE TASK OF METING OUT HER PUNISHMENT. ONE MORNING WHILE SOUAD WAS WASHING THE FAMILY`S CLOTHES, HE POURED GASOLINE OVER HER AND SET HER ON FIRE. MIRACULOUSLY, SHE SURVIVED, RESCUED BY WOMEN OF HER VILLAGE, WHO PUT OUT THE FLAMES AND TOOK HER TO A LOCAL HOSPITAL. HORRIBLY BURNED OVER SEVENTY PERCENT OF HER BODY AND STILL DENOUNCED BY HER FAMILY, SOUAD WAS ABLE TO RECEIVE THE CARE SHE NEEDED ONLY AFTER THE INTERVENTION OF A EUROPEAN AID WORKER. NOW IN PERMANENT EXILE FROM HER HOMELAND, SHE HAS DECIDED TO TELL HER STORY AND REVEAL THE BARBARITY OF A PRACTICE THAT CONTINUES TO THIS DAY. BURNED ALIVE ...IS THE FIRST TRUE ACCOUNT EVER PUBLISHED BY A VICTIM OF AN "HONOR CRIME." SOUAD`S INSPIRING TESTIMONY IS A SHOCKING, MOVING, AND HARROWING STORY OF CRUELTY AND INCOMPARABLE COURAGE...AND AN INSPIRING CALL TO ACTION TO END A HEINOUS TRADITION.
बन्र्ड अलाइव्ह ही सुआद नावाच्या पॅलोस्टिनी तरुणीची कहाणी आहे. एखाद्या मुलाकडे नुसतं पाहिलं किंवा त्याच्याशी बोललं म्हणून नावं ठेवणा-या संकुचित आणि पुरोगामी पॅलोस्टिनी समाजात एक तरुण सुआदला लग्नाचं वचन देऊन फसवतो. याची कठोर शिक्षा सुआदला मिळते आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळासह तिला जिवंत पेटवून दिलं जातं. ऑनर क्राइमच्या या क्रूर अनुभवातून सुआद वाचते. समाजसेवी संघटनेच्या एका कार्यकर्तीमुळे सुआदला जीवनदान मिळतं आणि युरोपात तिचं नवं आयुष्य सुरू होतं. बालपणी सोसलेला कमालीचा छळ, गुरासारखा खाल्लेला मार, मरेस्तोवर केलेलं काम आणि दुसरीकडे, युरोपातल्या पुढारलेल्या समाजातलं जीवन, आगीच्या खाणाखुणा अंगावर वागवत जिणं, नवरा-मुलांकडून प्रेम, मानसिक आधार मिळालेली सुआद डोंगराएवढं धाडस करून तिची कथा सगळ्या जगासमोर मांडते. तिच्यासारखा प्रसंग ओढवलेल्या मुलींना धीर देण्याचा प्रयत्न करते. हा तिचा प्रवास काळजाला घरं पाडणारा, त्रासदायक आहे पण त्याला धैर्याची, माणुसकीची, इच्छाशक्तीची, सहनशक्तीची प्रेरक झालरही आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SOUAD #GAURIKELKAR #TARIHIJIVANTME #BRÛLÉE VIVE (FRENCH)# BURNED ALIVE (ENGLISH)
Customer Reviews
  • Rating StarDhanesh Dangat

    फिनिक्स भरारी… पॅलस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी- सुआद परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते. पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या घरात तिच्या उमलत्या भावनांा अक्षरश: पायदळी तुडवले जाते. तिचा मित्र लग्नाचे वचन देऊन तिला फसवतो. तिच्यामुळे घराण्याची अब्रू चव्हाट्यावर येईल, या भीतीने घरातील कर्त्या पुरुषाकडून तिला जिवंत पेटवून दिले जाते. पोटात चार महिन्यांचा गर्भ असताना, अग्नीच्या ज्वालांच्या लपेट्यात अडकलेली सुआद, तिची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे उन्मळून पडलेली सुआद केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचते. जॅकलिन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्तीमुळे नवे आयुष्य सुरू करते. पण ऑनर किलिंगच्या अशा पेटवून दिल्या गेलेल्या घटनांमधून वाचलेली, जिवंत असलेली एकमेव साक्षीदार म्हणून सुआद तिची कहाणी लिहण्यासाठी प्रवृत्त होते हा पुस्तकाचा गाभा आहे. मात्र जिवंत पेटवून दिल्याने तिच्या शरीरावर असलेल्या जखमा, तिची विद्रुपता, ती कुणालाच नकोशी झाली आहे ही भावना या सगळ्या अनुभवांचे गंभीर, शारीरिक व मानसिक परिणाम तिच्यावर होतात. इतके की तिच्या भूतकाळातील जखमा, त्यांचे व्रण यांच्यात अडकलेली तिची मानसिकता पदोपदी, क्षणोक्षणी तिचा पिच्छा पुरवते, तिचा आत्मविश्वास पार धुळीस मिळवते. भाजलेल्या त्वचेमुळे ती कुरूप दिसायला लागते, पण ही कुरुपता तिच्या मनावर पुटं धारण करू लागते. पण त्यातूनही तग धरणारी, सामान्य स्त्रीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी आसुसलेली सुआद, एक प्रेयसी, एक पत्नी, एक आई ते एक समाजसेवी व्यक्ती अशा विविध भूमिकांमधून वाचकांना भेटते आणि तिच्या आयुष्याचा प्रवास उलगडताना, तिच्यावरच्या अत्याचाराचे- छळाचे वाचक जणू साक्षीदार असल्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानांतून येतो. सुआद तिची शोकांतिका मांडते आहे, अशा प्रथमपुरुषी स्वरातून पुस्तकाची सुरुवात होते आणि अगदी सहज, सोप्या भाषेत तिच्या पॅलेस्टिनी घराचे, गावाचे, तिथल्या समाजाचे चित्र आपल्यापुढे उभे राहते. भूतकाळातील तपशील, घटनांची सुसंगती लावण्यात गोंधळात पडलेली सुआद, तिची ही केविलवाणी मन:स्थिती पाहिल्यावर या आठवणी तिच्यासाठी इतक्या वर्षांनंतरही किती नकोशा, जीवघेण्या आहेत याची खात्री पटते. नूरा, कैनात, सुआद आणि... तिच्या चौथ्या बहिणीने नाव काही केल्या तिला लक्षात येत नाही. काही प्रसंग सोडले तर तिला तिच्याविषयी काहीच आठवत नाही. तिच्या घरातला अंधार, मुलींनी पायघोळ, गळाबंद करड्या वा मळकट रंगाचे झगे घालावे हा वेष, मुलीसाठी शिक्षण निषिद्ध, परक्या पुरुषाशी सोडाच अनोळखी स्त्रीशीसुद्धा संभाषण करायचे नाही हा शिरस्ता, दिवसभर कष्ट करून, राबूनही मुलीपेक्षा घरातील शेळ्या-मेंढ्यांची पत जास्त चांगली अशा मताचे वडील व हिंसक वृत्तीचा तिचा भाऊ या वर्णनामुळे तत्कालीन पुरुषसत्ताक व्यवस्थेचे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होते. सुआदच्या आईला एकूण १४ मुले झाली. मात्र त्यातली ५ जगली, मात्र उरलेल्यांना जन्माला आल्या आल्या आईनेच अंथरुणात लपेटून संपवून टाकले होते. मुली जन्माला अलया तर त्यांचे काय करायचे, हा धडा इथूनच तिच्या मोठ्या बहिणीला मिळाल्याचे सुआद म्हणते. बाहेरख्याली मुलीला ‘चारमुटा’ म्हणत व त्यांच्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांना जिवे मारले जाई, याचीच तर सुआद साक्षीदार होती. जॅकलिन ही कार्यकर्ती, कर्तव्यभावनेपेक्षा माणुसकीच्या दृष्टीने सुआदला व तिच्या बाळाला वाचवते. तिला युरोपात घेऊन जाते. नव्याने आयुष्य जगण्यासाठी सुआदला किती मानसिक व शारीरिक दिव्यातून जावं लागलं. तिच्या मुलाशी तिचे विभक्त होणे, नव्याने प्रेमात पडून संसार थाटणे, दोन कन्या रत्नांच्या प्राप्तीनंतर, आपली कहाणी जगासमोर मांडायला तयार झालेली सुआद इतक्या वळणांवर असहाय, केविलवाणी झालेली दिसते की आता ही संपलीच आहे असे वाटत असताना नवऱ्याच्या, मुलींच्या व आप्तेष्टांच्या प्रेमामुळे पाठिंब्यामुळे ती पुन्हा उभी राहते. मुलगा मारूआनचा तिच्या आयुष्यात झालेला पुनप्रवेश तिला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. मात्र या सगळ्यात सुआदचा एक गुण अधोरेखित करावा असा वाटतो, अन्यायला सामोरी गेल्यावरही तिच्यातील माणुसकी संपत नाही. तिच्या आठ आणि दहा वर्षांच्या मुलींना ती तिच्या भूतकाळाबद्दल अत्यंत संवेदनशीलपणे माहिती देते, त्यांना कळेल, समजेल अशा स्वरूपात तिच्या जखमांची ओळख करून देते. पण मुलींनी, तिच्यावरच्या अन्यायचा सूड उगवावा असा तिचा सूर नाही. मुलींनी सगळ्याच अरबी पुरुषांचा तिरस्कार करावा असे तिला वाटत नाही. हा तिचा समजूतदारपणा कौतुकास्पद आहे. सुआदच्या धैर्याची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जगण्याच्या चिवट महत्त्वाकांक्षेची व पॅलेस्टिनी भूमीतील स्त्रियांच्या जगण्याच्या आलेखाची कल्पना येण्यासाठी ‘...तरीही जिवंत मी’ हे पुस्तक वाचावयास हवे. एकूण ३९ भाषांमध्ये अनुवादित झालेली ही कहाणी अत्यंत प्रेरक आहे. ...Read more

  • Rating StarZEE MARATHI DISHA 23 FEB - 1 MAR 2019

    आजच्या काळातही ऑनर किलिंगसारखे क्रूर प्रकार घडतात. जॉर्डन, येमेन, तुर्की, इस्रायल इत्यादी देशांत घडतात. जातपंचायतीचे बळीही होतात. जगातील कितीतरी महिलांचे मानवाधिकार कसे पायदळी तुडवले जातात, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘बर्न्ड अलाइव्ह’ ही सुआदची आत्मकथाआहे. सुआद नावाच्या तरुणीची ही कहाणी आहे. एखाद्या मुलाकडे नुसतं पाहिलं तरी किंवा त्याच्याशी बोललं म्हणून नावं ठेवणाऱ्या संकुचित पॅलेस्टिनी समाजात एक तरुण सुआदला लग्नाचं वचन देऊन फसवतो. याची कठोर शिक्षा सुआदला मिळते आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळासह तिला पेटवून दिलं जातं. ऑनर क्राइमच्या या क्रूर अनुभवातून सुआद वाचते. समाजसेवी संघटनेच्या एका कार्यकर्तीमुळे सुआदला जीवनदान मिळतं आणि युरोपात तिचं नवं आयुष्य सुरू होतं. आजही सुरू आहे. बालपणी सोसलेल्या कमालीचा छळ, गुरासारखा खाल्लेला मार, मरेस्तोवर केलेलं काम आणि दुसरीकडे युरोपातील पुढारलेल्या समाजातलं जीवन, आगीत भाजल्याच्या खाणाखुणा अंगावर वागवत, नवरा व मुलांकडून मिळणारं प्रेम, मानसिक आधार मिळालेली सुआद अफाट धाडस करून तिची कथा सगळ्या जगासमोर मांडते. तिच्यासारखा प्रसंग ओढावलेल्या मुलींना धीर देण्याचा प्रयत्न करते. तिच्या जीवनाचा, काळजाला घरं पाडणारा त्रासदायक प्रवास शब्दबद्ध करते. त्यामुळे तिचं पुस्तक म्हणजे ऑनर क्राइमच्या विरोधातील एक साक्षीदार ठरलं आहे. पॅलेस्टाइनसारख्या धार्मिक पगडा असलेल्या देशात संकुचित विचारांचा समाज असून महिलांवर प्रचंड बंधनं लादलेली आहेत. त्यामुळे त्यांना पशुतुल्य आयुष्य भोगावं लागतं. अशा वातावरणात एका छोट्याशा खेड्यात १९५७-५८ च्या सुमारास जन्मलेल्या सुआद या तरुण, सुंदर, मुस्लीम मुलीची ही विलक्षण कहाणी आहे. ऑनर किलिंगच्या प्रकाराचं उदाहरण म्हणून सुआद जॅकलिनबरोबर सर्वत्र फिरते. लोकांना माहिती देते. हे अत्याचार, या प्रथा बंद व्हाव्यात ही तिची इच्छा आहे. आपल्याला जिवंतपणी जाळणाऱ्यांना अद्याप आपण जिवंत असून आपल्या संसारात मुलांसह सुखात जगत असल्याचं दाखवण्याची तिची इच्छा आहे. पण, तसं झालं तर आपल्याला, आपल्या मुलांनाही धोका असल्याचं ती जाणून आहे. कारण ऑनर किलिंगमधून फार स्त्रिया वाचलेल्या नाहीत. अशा ‘चारमुटा’ मुलीनं मरून जावं असंच घरच्यांना वाटतं. ती मेली नाही तर तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग पुसला जात नाही. या कुटुंबांना वाळीत टाकलं जातं. त्यांच्या नशिबी हलाखीचं, अपमानाचं जिणं येतं म्हणून या क्रूर प्रथा या देशात पाळल्या जातात. त्यामुळे सुआदच्या मनावरही भीतीचं सावट आहेच. तरीही हा धोका पत्करूनही तिनं लिहिलं, कारण ती अशा दुर्दैवी, क्रूर प्रथेची साक्षीदार आहे. या साऱ्याचं गांभीर्य जाणून, ‘मला हे सांगितलंच पाहिजे’ या भावनेतून तिनं लिहिलं आहे. तरीही मनात भीती आहेच. म्हणून स्वत:ची ओळख लपवून, नेमका पत्ता न देता, तिनं लिहिलं आहे, युरोपात कुठेतरी... ‘तरीही जिवंत मी!’ – मंगला गोखले ...Read more

  • Rating StarRahul Gotawale

    खरच वाचण्या सारख अस हे पुस्तक,पुस्तक वाचताना अंगावर अक्षरशः काटे येतात...

  • Rating StarDAINIK SAMANA 16-11-2014

    सुआद ही एक पॅलेस्टिनी तरुणी तिचं उभं जीवन म्हणजे महाकादंबरीच. महिलांच्या हक्कांची पायमल्ली कशी काय करण्यात येते त्याची थरारकथा यात चांगली चित्रीत केलीय. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने वाचावं असे हे पुस्तक मूळ लेखिका सुआद आणि गौरी केळकर यांनी केलेला सहजुंदर अनुवाद. मेहता प्रकाशनने हाती घेतलेल्या अनुवाद प्रकल्पातील ही नोंद घेण्याजोगी आत्मकथा. जगातील कितीतरी देशांत महिलांचे मानवाधिकार कसे चिरडून टाकतात याचे ज्वलंत उदाहरणच यात आहे. पॅलेस्टिनी भागातील गाव. मुस्लिम कुटुंब आणि तरुणीची परवड. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी भोगलेल्या यातनांचे यात प्रभावी चित्रण आहे. ३९ भाषांमध्ये अनुवादित ही सत्यकथा मराठीत आलीय. तरीही जिवंत मी! (आत्मकथा) ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more