* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TAWAIFNAMA
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA KULKARNI
  • ISBN : 9789357201292
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2023
  • Weight : 572.00 gms
  • Pages : 684
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A HISTORY, A MULTI-GENERATIONAL CHRONICLE OF ONE FAMILY OF WELL-KNOWN TAWAIFS WITH ROOTS IN BANARAS AND BHABUA. THROUGH THEIR STORIES AND SELF-HISTORIES, SABA DEWAN EXPLORES THE NUANCES THAT CONVENTIONAL NARRATIVES HAVE ERASED, PAPERED OVER OR WILFULLY REWRITTEN. IN A NOT-SO-DISTANT PAST, TAWAIFS PLAYED A CRUCIAL ROLE IN THE SOCIAL AND CULTURAL LIFE OF NORTHERN INDIA. THEY WERE SKILLED SINGERS AND DANCERS, AND ALSO COMPANIONS AND LOVERS TO MEN FROM THE LOCAL ELITE. IT IS FROM THE ART PRACTICE OF TAWAIFS THAT KATHAK EVOLVED AND THE PURAB ANG THUMRI SINGING OF BANARAS WAS BORN. AT A TIME WHEN WOMEN WERE DENIED ACCESS TO THE LETTERS, TAWAIFS HAD A GROUNDING IN LITERATURE AND POLITICS, AND THEIR KOTHAS WERE CENTRES OF CULTURAL REFINEMENT. YET, AS AFFLUENT AND POWERFUL AS THEY WERE, TAWAIFS WERE MARKED BY THE STIGMA OF BEING WOMEN IN THE PUBLIC GAZE, ACCESSIBLE TO ALL. IN THE COLONIAL AND NATIONALIST DISCOURSE OF THE NINETEENTH AND TWENTIETH CENTURIES, THIS STIGMA DEEPENED INTO CRIMINALISATION AND THE VIOLENT DISMANTLING OF A COMMUNITY. TAWAIFNAMA IS THE STORY OF THAT PROCESS OF CHANGE, A NUANCED AND POWERFUL MICROHISTORY SET AGAINST THE SWEEP OF INDIAN HISTORY.
म्हटलं तर त्या मनस्वी कलाकार. साधनेचा सोस बाळगून कलेवर हुकूमत गाजवणाऱ्या रागरागिणी. पण काळओघात त्यांचं अवमूल्यन होत गेलं. एका समृद्ध परंपरेला नैतिकानैतिकतेच्या संकोची चौकटीत बसवलं गेलं. आणि अभिजात संगीत आणि नृत्यातल्या या सम्राज्ञी काळाच्या उदरात नामशेष होत गेल्या. हा प्रदीर्घ आणि जीवाला चटका लावणारा प्रवास सबा दिवाण लिखित ‘तवायफनामा’ पुस्तकातून वाचकांच्या भेटीस येतो. ज्यात बनारस आणि भभुआतल्या तवायफ कुटुंबाचा तब्बल शतकाहून अधिक काळाचा पट समोर येतो. १८५७च्या उठावात प्राणांची बाजी लावणाऱ्या धरमनबीबीपासून सदाबहार, गुलशन, उमराव, तीमा ते अलीकडच्या काळातील हिंदू-मुस्लिम तिढ्यात हकनाक वेदना सहन करणाऱ्या तवायफांच्या जगण्याचा आलेख पहायला मिळतो. शमादानच्या मंद उजेडासारख्याच यांच्या कथा अस्वस्थ करत राहतात आणि यातल्या पानागणिक ठुमरीचे आर्त स्वर खोल जखम करत राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#मेहतापब्लिशिंगहाऊस#तवायफनामा#चरित्र#मराठीअनुवाद#सबादिवाण#शुभदाकुलकर्णी#MARATHIBOOKS#MEHTAPUBLISHINGHOUSE#TAWAIFNAMA#ONLINEMARATHIBOOKS#MARATHITRANSLATION#BIOGRAPHY#SABADEWAN#SHUBHADAKULKARNI
Customer Reviews
  • Rating Starलोकमत २७.११.२०२३ निर्मिती कोलते

    तवायफ फक्त सिनेमात पाहिलेली आणि बऱ्याचवेळा टाइपकास्ट झालेली संकल्पना, मराठी लोकांना उत्तरेच्या इतिहासाची माहिती फार कमी प्रमाणात आहे. तवायफ समाजाबद्दल कुतूहल असले तरी विस्तृत माहिती असणे जरा कठीणच. महत्त्वाचे म्हणजे ह्या महिलांचे संगीत क्षेत्रातील योदान हे आपल्याला अपरिचित आहे. ह्या पुस्तकाद्वारे १९व्या शतकातील भारतातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज येतो. ह्या कादंबरीमध्ये एका तवायफच्या तोंडूनच अनेक कथा उलगडत जातात. सदाबहार ही तिच्या काळातील एक नावाजलेली तवायफ तिच्या आयुष्यातील चढउतार लेखिका उलगडत जाते. वास्तवात केलेले संशोधन, मुलाखती आणि इतर माहितीच्या आधारे लेखिकेने एक सशक्त कथा गुंफली आहे. समाजात त्यांना न मिळालेली प्रतिष्ठा परंतु तरीही नाकारता न येणारे स्थान, त्यामागची मानसिकता ह्याचे चित्रण यात केले आहे. झाओरन बाई, धर्मन बीबी त्यांचे १८५७ मधील उठावामधील योगदान वगैरे ह्या महिलांची त्या काळातील सशक्त बाजू सांगून जाते. तवायफ संस्कृती, त्यातील इतर घटक, नातेसंबंध ह्यावर प्रकाश टाकला जातो. वेगवेगळ्या पिढ्यांमधील तवायफांच्या जीवनावर प्रकाश टाकताना संबंधित काळाचा इतिहास, तत्कालीन समाजजीवन यांचीही सफर हे पुस्तक घडवतं. देशाच्या समाजजीवनात मुरलेल्या कलासक्त जाणिवा अचंबित करणाऱ्या वाटतात. एकीकडे समाजाने तथाकथित नैतिक निकषांपेक्षा कलेच्या निकषावर केलेला तवायफांचा स्वीकार पुनचिंतन करायला लावणारा आहे. फाळणीनंतर तवायफांची झालेली वाताहत आणि दोन देशांमध्ये बदल गेलेलं तवायफांच्या प्रथेचं रुपडंही अस्वस्थ करणारं आहे. त्या अनुषंगाने हे पुस्तक एका समृद्ध कलापरंपरेचा दीर्घकालीन आलेखच सादर करतं. तवायफ ह्या संकल्पने बद्दलचे समज-गैरसमज चालीरिती, कौटुंबिक माहिती, राजकारणातील स्थान, संगीताची पार्श्वभूमी इ. कथानकाच्या स्वरुपात असल्यामुळे रटाळ होत नाही. लेखिका सबा दिवान यांचा अभ्यास पदोपदी जाणवतो. संगीत, कलाक्षेत्राच्या संदर्भानी भरलेल्या पुस्तकाचा अनुवाद करताना शुभदा कुलकर्णी यांनी नेमक्या शब्दकळांचा वापर केलेला जाणवतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more