- Manoj Hase
खुप कमी पुस्तकं असतात, जी हातात घेतल्याक्षणी मनाचा वेध घेतात, आपल्याला जागेवर खिळवुन ठेवतात, आपण त्या पात्रांसोबत जगतो, त्यांच्या आयुष्यात गुंतत जातो, असंच एक पुस्तक आहे, तेलसम्राट! मार्क रीच नावाच्या एका वादळी आयुष्य जगलेल्या, आणि ए टु झेड, म्हणजे एयुमिनिअम ते झिंक, व्हाया तेल, बॉक्साईट, मॅंगेनीज, क्रोम अशा सगळ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व्यवहारांचा अनाभिषिक्त सम्राट, मार्क रीच! डॅनिअल अमान ह्या लेखकानं अत्यंत तटस्थ वृत्तीने हे पुस्तक लिहलयं! मुळ इंग्रजी नाव आहे, ‘द किंग ऑफ ऑईल!’ पुस्तकाच्या पानापानवर, प्रत्येक प्रकरणामध्ये, आपल्याला एक नवा, वेगवेगळा मार्क रीच भेटतो, खरतरं एकोणीसाव्या वर्षी नाखुशीनेच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी विक्रीच्या कंपनीत चाळीस डॉलर्सवर काम करायला मार्क अगदीच नाखुश होता. पण ज्यु असल्याने व्यापार त्याच्या रक्तात भिनला होता. अल्पावधीतच दिर्घकालीन वायदे व्यवहार करण्यात फिलीप ब्रदर्स ह्या बलाढ्य कंपनीमध्ये, मार्क रीचने, स्वतःची प्रतिभा आणि भविष्याचा वेध घेण्याची चुणुक दाखवली. काही साथीदारांना सोबत घेऊन तो स्वतःची नवी कंपनी सुरु करतो. जगभरात स्वतःचं एक जाळं उभा करतो. अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडावा लागलेला हा मुलगा, वीस वर्षात दहा हजार कोटींचा मालक बनतो. (हा काळ १९६५ ते १९८५ पर्यंतचा आहे. तेव्हाचे दहा हजार कोटी रुपयांचे मुल्य आजच्यापेक्षा जास्तच होते.) जिथे संधी मिळेल, तिथे मध्यस्थी करुन पैशाची रास जमवणारा मार्क रीच! इराण आणि इस्त्राईल ह्या दोन कट्टर दुष्मनांमध्ये पाईपलाईन टाकुन तेलाचा व्यवहार करतो. इराणच्या खोमेनीकडुन स्वस्त दराने तेल घेऊन अमेरीकेला थांगपत्ता न लागु देता बाजारभावाने विकतो. वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढुन, साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अफ्रिकेतल्या जमैका, कॉगो अशा अनेक गरीब देशांच्या सरकारांवर आपलं नियंत्रण ठेवतो. वेगवेगळ्या देशांमधल्या ताणलेल्या संबंधांचा, ह्या वीस तीस वर्षात झालेल्या प्रत्येक युद्धाचा तो इतका आर्थिक फायदा घेतो, की काही दिवसात फोर्ब्ज मासिकांच्या श्रीमंताच्या यादीत कव्हरपेजवर झळकु लागतो. बाहेरच्या देशातुन येवुन, अल्पावधीत डोळे दिपावुन टाकणारं, कुबेराला लाजवेल इतकं वैभव कमावणार्या मार्कचे अनेक शत्रु तयार होतात, अनेक बड्या हस्तींच्या डोळ्यात तो आणि त्याचं प्रखर यश खटकु लागतं! इर्षेपोटी आणि स्वतःच्या फायद्यासाठी मार्क रीचला आयुष्यातुन उठवण्याचे, त्याला पुर्णपणे उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचु लागतात. अमेरीकन कोर्ट, एफ बी आय, प्रसारमाध्यमांची फौज, गुप्तहेर, मानव-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचं ढोंग करणारे बहुतांश अमेरीकन्स, हात धुवुन मार्क रिचच्या मागे लागतात. मार्कवर कर चुकवल्याच्या, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस टाकल्या जातात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मार्क अमेरीका सोडुन स्विझर्लॅंडचा आश्रय घेतो, मजबुर होवुन, अमेरीकेचे नागरीकत्व सोडुन इस्राईलचा नागरिक बनतो. अमेरीका खवळते, मार्कची हजारो करोडोची संपत्ती जप्त केली जाते. प्राणाहुन प्रिय असलेली मार्कची मुलगी गॉब्रियल ब्लड कॅंसर झाल्यामुळे अमेरीकेत शेवटचा श्वास घेते, तेव्हा तिला भेटायची मार्कची विनंती अमेरीकन सरकार फेटाळुन लावते. मार्क एक बाप असल्याचे अंत्यसंस्कार सुद्धा पुर्ण करु शकत नाही. पुढे मार्कचा घटस्फोट होतो. त्याचं दुसरं लग्नही मोडतं. मार्क मोडत नाही, चाणाक्ष बुद्धीमता, भविष्याचा अचुक अंदाज आणि थंड डोक्याने विचार करण्याच्या खासीयतमुळे, त्रेसष्ठ वर्षापर्यंत तो मार्क रिच एंड कंपनीचे झेंडे जगभरात फडकवत राहतो. जेव्हा त्याच्याच कंपनीतले लोक असहकार्य आणि दगाबाजी करतात, तेव्हा मात्र मार्क कोसळुन पडतो, स्वतःची कंपनी उध्दस्त होताना पाहण्याआधीच, खिन्न आणि विषण्ण मनाने, कंपनीतल्या इतर लोकांना तो आपला हिस्सा कवडीमोलात विकतो आणि एक वादळ शांत होतं! ह्या पुस्तकात एका माणसाची अनेक रुपं आपल्यासमोर येतात. दुसर्या महायुद्धानंतर, ज्यु असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा हक्काच्या देश सोडावा लागणारा चिमुकला, निरगस मार्के! निर्वासित बनुन जर्मनीमधुन, अमेरीकेमध्ये शरणार्थी म्हणुन, आई वडीलांचं बोट धरुन आलेला, लहानगा स्वप्नाळु मार्के! तेलाच्या मागणीपुरवठ्याचं गणित अचुकपणे ओळखणारा आणि जगभरात असलेल्या तेलाच्या व्यवहारांवर पकड असलेल्या सात कंपन्याची मक्तेदारी मोडुन काढणारा चलाख आणि निधड्या छातीने जोखीम घेऊन, जग जिंकणारा मार्क रीच! प्रचंडा पैसा कमवल्यावर तेल व्यवहाराचा अनाभिषिक्त सम्राट असुनही, प्रसिद्धीच्या झोतात न येता, पडद्याआड राहुन, ज्यु धर्माच्या शिकवणीप्रमाणे, गरीब-गरजु लोकांना प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये दान करणारा, एक उदार अंतःकरणाचा माणुस, मार्क! आरोपांचे शुक्ल काष्ठ मागे लागल्यावर एकेक वार मुकपणे धीराने सहन करणारा, खंबीर कणखर ही विशेषणे कमी पडतील, प्रत्येक संकटात शांत राहणारा, प्रत्येक जीवघेण्या संघर्षात अफलातुन थंडपणा दाखवणारा मार्क! ‘पैसा हेच स्वातंत्र’ हे ब्रीदवाक्य पाळुन अडचणींमध्येही नवनवे रस्ते शोधुन, पैशाच्या पाईपलाईन आपल्या घरापर्यंत आणणारा मार्क! अमेरीकन कोर्टाने, एका रात्रीत, आपली हजारो-कोटी रुपयांची संपत्ती गोठवल्यावर, आभाळ फाटलेलं असताना, शांत आणि गंभीरपणे पुढच्या प्रत्येक अडचणीला थंड डोक्याने सामोरे जाणारा, मार्क रीच! प्राणप्रिय पत्नी जेव्हा उभा दावा मांडते, सार्वजनिक रीत्या बदनाम करते, लाडकी मुलगी जीव सोडते, निष्ठावान अधिकारी कंपनी सोडतात, एकेकदा मांडलेले डाव आणि व्यापारात घेतलेली जोखीम आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करते, तेव्हा प्रत्येक वेळी राखेतुन झेप घेणारा मार्क रीच! आपल्या इस्राईली ज्यु लोकांच्या मदतीने, प्रत्येक वेळी, अमेरीकन गुप्तहेर कंपन्याच्या गुप्तहेरांना, गुंडाना आणि पोलिसांना गुंगारा देऊन, त्यांच्या बिंत्तंबातम्या मिळवणारा मार्क रीच! आणि सर्वांवर कळस म्हणजे केवळ आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कल्पनातीत अशा धाडसी खेळींनी जगातला सर्वात श्रीमंत तेल आणि धातु व्यावसायिक बनलेला मार्क रीच! हे चरित्र वाचताना धीरुभाई अंबानींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एक माणूस भ्र्ष्ट राजकारणी आणि बाबुशाही, प्रसिद्धीला वखवखलेली मिडीया, आरोग्याच्या अडचणी आणि कौटुंबिक वाद ह्या प्रत्येक आव्हानाचा हसत हसत सामना करतो, आणि नानाविविध क्लृप्त्या वापरुन, दुसर्या हाताने धन, संपत्ती, पैसा वाढवत राहतो. त्याचा हा संघर्ष वाचला की आपल्यातला मार्क रीच ही जागा होतो, हेच ह्या पुस्तकाचं यश आहे. ...Read more
- LOKPRABHA 26-10-2018
वादग्रस्त तेलसम्राट...
खनिज तेल म्हणजे वसुंधरेच्या उदरातील अमृतच जणू. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात या अमृताच्या जोरावर अनेक देश उभे राहिले, अनेक अर्थव्यवस्था उदयास आल्या. विसाव्या शतकात जगातील अनेक युद्धाचे ते मूळ कारण ठरले. त्याच्याशिवाय आज जगाचे पाही हलणार नाही. अनेक उद्योग चालवण्यासाठी, विमाने उडवण्यासाठी, रस्त्यावर वाहने धावण्यासाठी आज खनिज तेलाची गरज आहे. या तेलाच्या जोरावर अमेरिकेत मार्क रिच हा तेलसम्राट निर्माण झाला. तेल व्यवसायामुळे, ‘रोखीने’ किंमत चुकवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे आणि अमेरिकेच्या शत्रुराष्ट्रांशी केलेल्या गुप्त व्यवहारामुळे तो वादग्रस्त ठरला. त्याची कहाणी म्हणजे ‘किंग ऑफ ऑइल’ हे पुस्तक. स्वित्झर्लंडमधील पत्रकार डॅनियल अमान यांनी मार्क रिचशी थेट संवाद साधून, त्याच्या निकटवर्तीयांना, कुटुंबीयांना बोलते करून लिहिलेले हे पुस्तक. मोहन गोखले यांनी ‘तेलसम्राट’ नावाने त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे.
अमान यांनी २००६ मध्ये मार्कला पत्र लिहून त्याच्या भेटीसाठी विनंती केली. मात्र या पत्राबरोबर त्यांनी अनेक वादग्रस्त प्रश्नांची जंत्री जोडली. या पत्राला मार्क उत्तर देणार नाही, असे त्यांना वाटत होते. मात्र मार्कने त्यांना भेटण्यास होकार दिला आणि पुढे त्याचे हे चरित्रवजा पुस्तक जन्माला आले. मार्क रिचच्या या मुलाखतीतच अमान वाचकांना इतिहासात घेऊन जातात. या इतिहासात मार्कचे बालपण, त्याच्या कुटुंबीयांचा पादत्राणांचा व्यवसाय, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असलेल्या त्याच्या कुटुंबीयांना सहन करावा लागलेला नाही. नाझी अत्याचार याबाबत माहिती मिळते. १९४० मध्ये नाझींनी बेल्जियमवर आक्रमण केल्यानंतर त्यांच्या छळछावणीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी ११ वर्षीय मार्क रिचला त्याच्या कुटुंबीयांसमवेत नेसत्या वस्त्रानिशी पोलंड सोडून अमेरिकेला पळ काढावा लागला.
अमेरिकेत आल्यावर ‘फिलिप्स ब्रदर’ या कंपनीत काम करताना त्याला व्यापाराचे धडे कसे मिळत गेले याचे वर्णन या पुस्तकात आहे. १९६०च्या दशकात तो एका बड्या व्यापारी कंपनीचा व्यवस्थापक झाला. त्याच्या एका साथीदाराने ट्युनिशियाकडून २५ हजार मेट्रिक टन क्रूडतेल विकत घेतले आणि एका इटालियन तेलशुद्धीकरण कारखान्याला विकले. हे पाहून रिचला क्रूडतेलाचा व्यापार खुणावू लागला. पुढे त्याने आपल्या अनेक साथीदारांसह खनिज तेलाचा व्यापार केला. व्यापाराच्या त्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीबाबत हे पुस्तक माहिती देते. हा व्यापार करताना त्याने कोणत्याही नीतिमत्तेचे पालन केले नाही. अनेक कायदे आणि नियम पायदळी तुडवले आणि त्यातूनच हा तेलसम्राट जन्माला आला. तेल व्यवसायामध्ये रोखीने किंमत चुकवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे जगाची आर्थिक गणिते बदलली याची माहिती हे पुस्तक देते. विशेष म्हणजे मार्क रिचच्या नजरेतून ही सारी माहिती समोर येते. मार्कने कोणताही मुलाहिजा न ठेवता, कोणतीही तमा न बाळगता त्याच्या व्यापाराबद्दल बिनधास्त माहिती अमान यांना दिली आहे. इराण, क्युबा, अंगोल आणि दक्षिण आफ्रिका या देशांबरोबर अमेरिकेला न कळवता केलेल्या व्यापाराची त्याने माहिती दिली आहे. इराणशी तेलसंबंध अधिक दृढ करण्यासाठी इस्रायलला त्याने केलेल्या मदतीचे वर्णन पुस्तकात येते.
विविध देशांनी एकमेकांशी तेलसंबंध निर्माण करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका मार्क रिच निभावतो आणि पुढे एका बलाढ्य, अवाढव्य अशा मोठ्या तेल कंपनीचा मालक बनतो. दोन देशांमधील संबंध, राजकारण, शत्र्रूराष्ट्र यांचा विचार न करता व्यक्तिगत पातळीवर अनेक देशांशी खनिज तेलपासून अगदी अॅल्युमिनियम, जस्त या धातूंचा व्यवहार करतो आणि गडगंज श्रीमंत होतो याबाबतची कहाणी अत्यंत भन्नाट होते.
विशेष म्हणजे रिच हा जगातील सर्वात मोठा स्वतंत्रपणे व्यापार करणारा तेल व्यावसायिक असला तरी आणि अमेरिकेतील गडगंज संपत्तीचे मालक असले तरी सर्वसामान्य लोकांना १९८१मध्ये त्याच्याबाबत काहीच माहिती नव्हते. १९८१मध्ये त्याच्यावर गुन्हेगारीचे आरोप झाल्यानंतर आणि त्याच्यावर खटला भरल्यानंतर त्याला सामान्य लोकांत प्रसिद्धी मिळाली. मात्र संकटात सापडलेल्या रिचने सरकारी यंत्रणांना गुंगारा देत स्वित्झर्लंडला पळ काढला. न्यूयॉर्कच्या सर्दन डिस्ट्रिक्टचे सरकारी वकील रुडी गुलियानी यांनी त्याच्यावर करचुकवेगिरीचा आरोप करून हे प्रकरण लावून धरले याबाबतची माहिती रिच यानेच अमान यांना दिली आहे. अमेरिकेच्या पोलीस खात्याने त्याच्या अपहरणाच्या केलेल्या बेकायदा आणि विनोदी प्रयत्नाबद्दलही हे पुस्तक सांगते. मात्र तेल व्यापार करताना मी कधीही कायदा मोडला नाही, असे रिच सांगतो.
रिचच्या कुटुंबाबद्दलचे भावनिक आणि हळवे कंगोरेही हे पुस्तक टिपते. त्याची पत्नी डेनिस हिच्यापासून घेतलेला महागडा घटस्फोट, त्याची मुलगी गॅब्रिएला हिचा कर्करोगाने झालेला मृत्यू, मुलीला अंतिम समयी भेटता न आल्याच्या दु:खाने भावनिक झालेल्या रिचचे वर्णन लेखकाने केले आहे. पुस्तकाच्या अखेरीस हा तेलसम्राट हळूहळू कसा लयाला जातो याचे विवेचन करण्यात आले आहे. त्याच्यावर झालेली कारवाई आणि अखेर अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांच्या विशेषाधिकारामध्ये त्याला दिलेली माफी याबाबतचे वर्णन करण्यात आलेले आहे.
एका आंतरराष्ट्रीय तेल व्यावसायिकाच्या वादग्रस्त कृत्यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक क्षणोक्षणी खिळवून ठेवते. सर्वसामान्य जनतेला माहिती नसलेली मार्क रिच नावाची व्यक्ती तेल व्यवसायावर निर्विवाद वर्चस्व मिळवून लयाला जाते हे वाचताना वाचकाला एका वेगळ्याच जगाची ओळख करून देते.
-संदीप नलावडे ...Read more
- Pankaj Kotalwar
खुप कमी पुस्तकं असतात, जी हातात घेतल्याक्षणी मनाचा वेध घेतात, आपल्याला जागेवर खिळवुन ठेवतात, आपण त्या पात्रांसोबत जगतो, त्यांच्या आयुष्यात गुंतत जातो, असंच एक पुस्तक आहे, तेलसम्राट! मार्क रीच नावाच्या एका वादळी आयुष्य जगलेल्या, आणि ए टु झेड, म्हणजे ए्युमिनिअम ते झिंक, व्हाया तेल, बॉक्साईट, मॅंगेनीज, क्रोम अशा सगळ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व्यवहारांचा अनाभिषिक्त सम्राट, मार्क रीच!
डॅनिअल अमान ह्या लेखकानं अत्यंत तटस्थ वृत्तीने हे पुस्तक लिहलयं!
मुळ इंग्रजी नाव आहे, ‘द किंग ऑफ ऑईल!’
पुस्तकाच्या पानापानवर, प्रत्येक प्रकरणामध्ये, आपल्याला एक नवा, वेगवेगळा मार्क रीच भेटतो,
खरतरं एकोणीसाव्या वर्षी नाखुशीनेच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी विक्रीच्या कंपनीत चाळीस डॉलर्सवर काम करायला मार्क अगदीच नाखुश होता. पण ज्यु असल्याने व्यापार त्याच्या रक्तात भिनला होता.
अल्पावधीतच दिर्घकालीन वायदे व्यवहार करण्यात फिलीप ब्रदर्स ह्या बलाढ्य कंपनीमध्ये, मार्क रीचने, स्वतःची प्रतिभा आणि भविष्याचा वेध घेण्याची चुणुक दाखवली. काही साथीदारांना सोबत घेऊन तो स्वतःची नवी कंपनी सुरु करतो. जगभरात स्वतःचं एक जाळं उभा करतो.
अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडावा लागलेला हा मुलगा, वीस वर्षात दहा हजार कोटींचा मालक बनतो. (हा काळ १९६५ ते १९८५ पर्यंतचा आहे. तेव्हाचे दहा हजार कोटी रुपयांचे मुल्य आजच्यापेक्षा जास्तच होते.)
जिथे संधी मिळेल, तिथे मध्यस्थी करुन पैशाची रास जमवणारा मार्क रीच! इराण आणि इस्त्राईल ह्या दोन कट्टर दुष्मनांमध्ये पाईपलाईन टाकुन तेलाचा व्यवहार करतो.
इराणच्या खोमेनीकडुन स्वस्त दराने तेल घेऊन अमेरीकेला थांगपत्ता न लागु देता बाजारभावाने विकतो.
वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढुन, साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अफ्रिकेतल्या जमैका, कॉगो अशा अनेक गरीब देशांच्या सरकारांवर आपलं नियंत्रण ठेवतो.
वेगवेगळ्या देशांमधल्या ताणलेल्या संबंधांचा, ह्या वीस तीस वर्षात झालेल्या प्रत्येक युद्धाचा तो इतका आर्थिक फायदा घेतो, की काही दिवसात फोर्ब्ज मासिकांच्या श्रीमंताच्या यादीत कव्हरपेजवर झळकु लागतो.
बाहेरच्या देशातुन येवुन, अल्पावधीत डोळे दिपावुन टाकणारं, कुबेराला लाजवेल इतकं वैभव कमावणार्या मार्कचे अनेक शत्रु तयार होतात, अनेक बड्या हस्तींच्या डोळ्यात तो आणि त्याचं प्रखर यश खटकु लागतं!
इर्षेपोटी आणि स्वतःच्या फायद्यासाठी मार्क रीचला आयुष्यातुन उठवण्याचे, त्याला पुर्णपणे उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचु लागतात.
अमेरीकन कोर्ट, एफ बी आय, प्रसारमाध्यमांची फौज, गुप्तहेर, मानव-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचं ढोंग करणारे बहुतांश अमेरीकन्स, हात धुवुन मार्क रिचच्या मागे लागतात.
मार्कवर कर चुकवल्याच्या, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस टाकल्या जातात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.
मार्क अमेरीका सोडुन स्विझर्लॅंडचा आश्रय घेतो, मजबुर होवुन, अमेरीकेचे नागरीकत्व सोडुन इस्राईलचा नागरिक बनतो.
अमेरीका खवळते, मार्कची हजारो करोडोची संपत्ती जप्त केली जाते. प्राणाहुन प्रिय असलेली मार्कची मुलगी गॉब्रियल ब्लड कॅंसर झाल्यामुळे अमेरीकेत शेवटचा श्वास घेते, तेव्हा तिला भेटायची मार्कची विनंती अमेरीकन सरकार फेटाळुन लावते.
मार्क एक बाप असल्याचे अंत्यसंस्कार सुद्धा पुर्ण करु शकत नाही.
पुढे मार्कचा घटस्फोट होतो. त्याचं दुसरं लग्नही मोडतं.
मार्क मोडत नाही, चाणाक्ष बुद्धीमता, भविष्याचा अचुक अंदाज आणि थंड डोक्याने विचार करण्याच्या खासीयतमुळे, त्रेसष्ठ वर्षापर्यंत तो मार्क रिच एंड कंपनीचे झेंडे जगभरात फडकवत राहतो.
जेव्हा त्याच्याच कंपनीतले लोक असहकार्य आणि दगाबाजी करतात, तेव्हा मात्र मार्क कोसळुन पडतो, स्वतःची कंपनी उध्दस्त होताना पाहण्याआधीच, खिन्न आणि विषण्ण मनाने, कंपनीतल्या इतर लोकांना तो आपला हिस्सा कवडीमोलात विकतो आणि एक वादळ शांत होतं!
ह्या पुस्तकात एका माणसाची अनेक रुपं आपल्यासमोर येतात.
दुसर्या महायुद्धानंतर, ज्यु असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा हक्काच्या देश सोडावा लागणारा चिमुकला, निरगस मार्के!
निर्वासित बनुन जर्मनीमधुन, अमेरीकेमध्ये शरणार्थी म्हणुन, आई वडीलांचं बोट धरुन आलेला, लहानगा स्वप्नाळु मार्के!
तेलाच्या मागणीपुरवठ्याचं गणित अचुकपणे ओळखणारा आणि जगभरात असलेल्या तेलाच्या व्यवहारांवर पकड असलेल्या सात कंपन्याची मक्तेदारी मोडुन काढणारा चलाख आणि निधड्या छातीने जोखीम घेऊन, जग जिंकणारा मार्क रीच!
प्रचंडा पैसा कमवल्यावर तेल व्यवहाराचा अनाभिषिक्त सम्राट असुनही, प्रसिद्धीच्या झोतात न येता, पडद्याआड राहुन, ज्यु धर्माच्या शिकवणीप्रमाणे, गरीब-गरजु लोकांना प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये दान करणारा, एक उदार अंतःकरणाचा माणुस, मार्क!
आरोपांचे शुक्ल काष्ठ मागे लागल्यावर एकेक वार मुकपणे धीराने सहन करणारा, खंबीर कणखर ही विशेषणे कमी पडतील, प्रत्येक संकटात शांत राहणारा, प्रत्येक जीवघेण्या संघर्षात अफलातुन थंडपणा दाखवणारा मार्क!
‘पैसा हेच स्वातंत्र’ हे ब्रीदवाक्य पाळुन अडचणींमध्येही नवनवे रस्ते शोधुन, पैशाच्या पाईपलाईन आपल्या घरापर्यंत आणणारा मार्क!
अमेरीकन कोर्टाने, एका रात्रीत, आपली हजारो-कोटी रुपयांची संपत्ती गोठवल्यावर, आभाळ फाटलेलं असताना, शांत आणि गंभीरपणे पुढच्या प्रत्येक अडचणीला थंड डोक्याने सामोरे जाणारा, मार्क रीच!
प्राणप्रिय पत्नी जेव्हा उभा दावा मांडते, सार्वजनिक रीत्या बदनाम करते, लाडकी मुलगी जीव सोडते, निष्ठावान अधिकारी कंपनी सोडतात, एकेकदा मांडलेले डाव आणि व्यापारात घेतलेली जोखीम आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करते, तेव्हा प्रत्येक वेळी राखेतुन झेप घेणारा मार्क रीच!
आपल्या इस्राईली ज्यु लोकांच्या मदतीने, प्रत्येक वेळी, अमेरीकन गुप्तहेर कंपन्याच्या गुप्तहेरांना, गुंडाना आणि पोलिसांना गुंगारा देऊन, त्यांच्या बिंत्तंबातम्या मिळवणारा मार्क रीच!
आणि सर्वांवर कळस म्हणजे केवळ आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कल्पनातीत अशा धाडसी खेळींनी जगातला सर्वात श्रीमंत तेल आणि धातु व्यावसायिक बनलेला मार्क रीच!
हे चरित्र वाचताना धीरुभाई अंबानींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
एक माणूस भ्र्ष्ट राजकारणी आणि बाबुशाही, प्रसिद्धीला वखवखलेली मिडीया, आरोग्याच्या अडचणी आणि कौटुंबिक वाद ह्या प्रत्येक आव्हानाचा हसत हसत सामना करतो, आणि नानाविविध क्लृप्त्या वापरुन, दुसर्या हाताने धन, संपत्ती, पैसा वाढवत राहतो.
त्याचा हा संघर्ष वाचला की आपल्यातला मार्क रीच ही जागा होतो, हेच ह्या पुस्तकाचं यश आहे. ...Read more
- SAPTAHIK SAKAL 31-01-2015
तेलाशिवाय आजच्या जगाचा विचारही करता येणार नाही. आजच्या औद्योगिक जगतातला सगळ्यात मोठा घटक तेलच आहे. हे मान्य करावंच लागेल. मार्क रिच हा या तेलजगातील एक सम्राटच. त्यांचं चरित्र स्वित्झर्लंडमधील प्रसिध्द पत्रकार डॅनिएल अमान यांनी `द किंग ऑफ ऑइल` या नावां लिहिलं. तेलविश्वातील अनेक अपरिचित घटनांचा यात समावेश आहे. तसेच परिचित असलेल्या घटनांचाही माहीत नसलेला अर्थ मार्क रिच याचं आयुष्य वाचताना लागून जातो. या मूळ पुस्तकाचा अनुवाद म्हणजे `तेलसम्राट` हे पुस्तक. या पुस्तकाचा अनुवाद मोहन गोखले यांनी केला आहे. तेलविषयक विविध घडामोडींची उत्सुकता असणाऱ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे. ...Read more