* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ACCIDENTAL PRIME MINISTER
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184985498
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN THE ACCIDENTAL PRIME MINISTER WAS PUBLISHED IN 2014, IT CREATED A STORM AND BECAME THE PUBLISHING SENSATION OF THE YEAR. THE PRIME MINISTER’S OFFICE CALLED THE BOOK A WORK OF ‘FICTION’, THE PRESS HAILED IT AS A REVELATORY ACCOUNT OF PRIME MINISTER MANMOHAN SINGH’S FIRST TERM IN UPA. WRITTEN BY SINGH’S MEDIA ADVISER AND TRUSTED AIDE, THE BOOK DESCRIBES SINGH’S OFTEN TROUBLED RELATIONS WITH HIS MINISTERS, HIS CAUTIOUS EQUATION WITH SONIA GANDHI AND HOW HE HANDLED THE BIG CRISES FROM MANAGING THE LEFT TO PUSHING THROUGH THE NUCLEAR DEAL. INSIGHTFUL, ACUTE AND PACKED WITH POLITICAL GOSSIP, THE ACCIDENTAL PRIME MINISTER IS ONE OF THE GREAT INSIDER ACCOUNTS OF INDIAN POLITICAL LIFE.
२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अ‍ॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEACCIDENTALPRIMEMINISTER #THEACCIDENTALPRIMEMINISTER #दअ‍ॅक्सिडेन्टलप्राइममिनिस्टर #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #DR.SANJAYBARU "
Customer Reviews
  • Rating StarSagar Apune

    द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या संजय बारु यांच्या पुस्तकामध्ये, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे चित्रदर्शी आणि ओघवत्या शैलीत त्यांच्या प्रत्येक कामाचे प्रसंगाचे चित्रीकरण केलेले आहे. त्याद्वारे लेखकाने सरकारचा कारभार कसा चालतो? नेत्यांचे जन- माणसासमोरविशिष्ट प्रतिमा कशी उभी केली जाते.? राजकारण्यांच्या कृतीमागे कोणत्या प्रेरणा असतात.? ते प्रसारमाध्यमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेतात.? याचा पट वाचकांसमोर त्यांनी उलगडून दाखवला आहे. दिल्लीच्या घडामोडींकडे नजर लावून बसलेल्यांना रंजक वाटतील असे अनेक छोटे-छोटे किस्से सुद्धा यात आहेत. अणू कराराच्या संदर्भात पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या देशांतर्गत तसेच अमेरिकेतील मुद्द्यांशी ज्या अनेक चर्चा झाल्या. त्याचप्रमाणे डॉक्टर सिंग यांच्या पाकिस्तानशी वेळोवेळी झालेल्या वाटाघाटी, इतिहासकारांना अत्यंत मौल्यवान वाटतील यात शंकाच नाही. अशा प्रकारच्या माहितीचा खजिनाच लेखकाने या पुस्तकातून वाचकांसाठी खुला केला आहे. --- ----- हिंदुस्तान टाइम्स ...Read more

  • Rating StarSandeep Gadhikar‎

    ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटाील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    संजय बारु जून 2004 ते ऑगस्ट 2008 या कालावधीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहत होते . पंतप्रधानांचा अतिशय जवळून अभ्यास केला त्यांनी.सरकारचा कारभार कसा चालतो.त्यांच्यावर दबाव कोण ?? कसे ?? टाकू शकतात.नेत्यांची सर्वसामान्यजनतेत कशी प्रतिमा उभी केली जाते .तर प्रसारमाध्यमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे वर्णन आपल्या ओघवत्या शैलीत केले आहे .मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्वाच्या घटनांचा खजिनाच लेखकाने आपल्या पुढ्यात खुला केला आहे . ...Read more

  • Rating StarAshok Malik

    .. बारू यांचं पुस्तक इतकं महत्वपूर्ण, वाचनीय आणि खिळवून टाकणारं झालं आहे याचं मुख्य कारण असं की पंतप्रधान कार्यालयाच्या आत , तेही इतकं वरचं पद भूषवणा-या एका व्यक्तीचा हा दृष्टीकोन आहे. आजपर्यंत आपण सर्वसामान्य लोकांनी ज्या गोष्टी केवळ अंदाजानं समजून ेण्याचा प्रयत्न केला होता , त्या गोष्टीमागचं सत्य या पुस्तकामुळे आपल्यासमोर उघड होऊ शकलं. आपले काही अंदाज अचूक सुद्धा ठरले. सरकारी कार्यालयात, उच्च राजकीय वर्तुलात कार्यरत असलेल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिका-याने निवृत्तीनंतर इतक्या नजिकच्या भूतकाळात घडलेल्या घटनांविषयी इतक्या तपशीलवार आठवणी लिहिणं हे आपल्या देशात अजून तरी दुर्मीळ आहे/ विरळाच आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more