"EVERY DAY WE MAKE CHOICES. COKE OR PEPSI? SAVE OR SPEND? STAY OR GO?
WHETHER MUNDANE OR LIFE-ALTERING, THESE CHOICES DEFINE US AND SHAPE OUR LIVES. SHEENA IYENGAR ASKS THE DIFFICULT QUESTIONS ABOUT HOW AND WHY WE CHOOSE: IS THE DESIRE FOR CHOICE INNATE OR BOUND BY CULTURE? WHY DO WE SOMETIMES CHOOSE AGAINST OUR BEST INTERESTS? HOW MUCH CONTROL DO WE REALLY HAVE OVER WHAT WE CHOOSE? SHEENA IYENGAR`S AWARD-WINNING RESEARCH REVEALS THAT THE ANSWERS ARE SURPRISING AND PROFOUND. IN OUR WORLD OF SHIFTING POLITICAL AND CULTURAL FORCES, TECHNOLOGICAL REVOLUTION, AND INTERCONNECTED COMMERCE, OUR DECISIONS HAVE FAR-REACHING CONSEQUENCES. USE THE ART OF CHOOSING AS YOUR COMPANION AND GUIDE FOR THE MANY CHALLENGES AHEAD."
निवडप्रक्रिया...जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया. निवड करण्याची कला काय काय नाही करत? ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, जीवनाला आकार देते. अगदी दैनंदिन जीवनातील गोष्टींपासून ते जीवनातील महत्त्वाच्या निर्णयापर्यंत हे निवड करण्याचं कौशल्य तुम्हाला उपयुक्त ठरतं आणि तुमच्या जीवनात सुसूत्रता आणून तुम्हाला आनंदही देतं. क्षेत्र कुठलंही असो, निवडीची कला तुम्हाला यशस्वितेच्या मार्गावर नेऊन ठेवते. तर असं सुसूत्र, आनंदी, समतोल, यशस्वी जीवन साध्य करायचं असेल तर ‘द आर्ट ऑफ चूझिंग’ हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल; कारण हे पुस्तक करतं निवडीची कला अंगात कशी बाणवावी याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. शीना अयंगार यांनी अंध असूनही डोळस लोकांच्यात वावरून आपलं ‘निवडप्रक्रिये’चं संशोधन चिकाटीने पूर्णत्वास नेलं व सत्य निष्कर्ष काढून जगासमोर ठेवले. अर्थातच या निष्कर्षांना सुयोग्य अशा उदाहरणांची जोड दिली आहे.