A BLOOD-RED KISS FOR A DEAD MAN`S BETRAYAL, CHINESE VENGEANCE FROM THE FINGERS OF FONG. THE MAN IN A DOG COLLAR WO GOT BACK HIS COURAGE. A FEARFUL TRAIN RIDE TO OUTWIT A THIEF. A BLACKMAIL-MURDER THAT TOOK CARE OF A TART AND PUT SEVEREAL PEOPLE OUTSIDE THE LAW.
"‘‘तुला सांगतो डेला, इथेच कुठेतरी पुरावा आहे. टेबलवरचा ग्लास, त्याच्या तळाशी असलेली किंचित व्हिस्की आणि सोडा, सगळीकडे फे अॅलिसनच्या बोटांचे ठसे, यातच कुठे तरी! शिवाय या फोटोत त्याच्या कपाळावरचा किरमिजी चुंबनाचा निलाजरा शिक्का बघितलास? यातही पुरावा असणार.’’
पाचूंनी मढवलेल्या हस्तिदंताभोवती विळखा घातलेली फाँगची लांबसडक बोटे – मृदू खडकाभोवती वळवळत्या सर्पांचा विळखा पडावा, त्या खडकाला मैत्र-भावनेने आंजारावे-गोंजारावे, चपळाईने देखणी हालचाल करावी आणि तरीही ते मृत्युदायी भुजंग असल्याचे पाहणाऱ्याला सतत स्मरण व्हावे, असे ते दृश्य होते!
‘भीती’ आणि ‘शंका’ या दोन फक्त सवयी आहेत. माणूस या दोहोंना झटकन आत्मसात करतो.
खात्यात आम्ही याला ‘लबाड वीज’ म्हणूनच ओळखतो. वीज कशी एकाच जागी दुसऱ्यांदा कडाडत नाही, तसंच आहे याचं....
लांबवलेले हात एकमेकांच्या अगदी जवळ येईपर्यंत; दोघे आपापल्या खुर्च्यावरून पुढे झुकले. गोस्तने पत्राचा ताबा घेतला, तर मारने चेकचा.
"