* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CASE OF THE CROOKED CANDLE
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9789386888372
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
  • Available in Combos :ERLE STANLEY GARDNER COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AN INSURANCE CLAIM AFTER A TRAFFIC ACCIDENT ALERTS PERRY MASON TO THE POSSIBILITY OF DOUBLE-DEALING CONCERNING A PARCEL OF LAND. HE NEGOTIATES A VERY LARGE SETTLEMENT FOR HIS CLIENT, BUT THEN A WEALTHY BUSINESSMAN IS FOUND DEAD ON HIS YACHT AND PERRY IS ASKED TO DEFEND AGAINST A CHARGE OF MURDER THE MAN WHO PAID THE MONEY TO SETTLE THE INSURANCE CLAIM. BEAUTIFULLY PRESENTED WITH STRIKING ARTWORK AND STYLISH YET EASY-TO-READ TYPE, AVID READERS OF CRIME WILL LOVE READING THIS GRIPPING, WELL-WRITTEN THRILLER.
रस्त्यावर एक अपघात घडतो. हा अपघात दाबून टाकण्याच्या प्रयत्नांत एक खून उघडकीस येतो. स्किनर हिल्स काराकुल या मेंढ्यांपासून फर बनविणाऱ्या कंपनीचा मालक फ्रेड मिलफिल्ड याचा खून होतो. संशयाची सुई त्याची पत्नी डाफनेबरोबरच त्याचा पार्टनर रॉजर बरबॅन्क यांच्याभोवती फिरू लागते. कारण रॉजर बरबॅन्कच्या बोटीवरच फ्रेड मिलफिल्डचे प्रेत सापडते. रॉजर बरबॅन्कची मुलगी कॅरोड आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. चतुर पेरी मेसन आणि त्याची धाडसी सेक्रेटरी डेला स्ट्रीट केसच्या मुळाशी पोहोचतात. छोटे-छोटे धागेदोरे मिळवत असतानाच एक थोडीशी कललेली मेणबत्ती केसला कशी योग्य दिशा दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. वेगवान कथानक, अचानक आलेली वळणे व शेवटपर्यंत ताणलेली उत्सुकता यामुळे कादंबरी मनोरंजक झाली आहे. खुनाचे रहस्य आणि प्रेमकथा अशा या कथेचा शेवट वाचकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल यात शंका नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI# #PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-04-2018

    झुकलेल्या मेणबत्तीची कथा... समुद्रात उभ्या असलेल्या एका शिडाच्या नौकेवर एक खून होतो. मेंढ्या चारण्यासाठी नि त्यांच्या लोकरीपासून महागडे कपडे बनवण्याचा व्यवसाय असणाऱ्या फ्रेड मिलफिल्ड नावाच्या माणसाचा खून होतो. मिलफिल्ड आणि त्याचा व्यावसायिक साथीदार ॅरी व्हॅन न्युई हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातल्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत असतात. कशासाठी? तर मेंढ्या चारण्यासाठी. फौजदारी कायदा कोळून प्यालेला नामवंत वकील पेरी मेसन याच्याकडे हा खटला येतो. पहिल्या सलामीलाच मेसनच्या लक्षात येते की, मेंढ्या चारणे नि लोकरीचे उत्पादन करणे हे बहाणे आहेत. मग इतकी जमीन खरेदी कशासाठी? तर या भागात तेल मिळाले असावे. एकदा हे नक्की झाल्यावर खुनाचा उद्देश स्पष्ट होतो. पण खून केला कुणी? मेसनला खुनाच्या ठिकाणी जवळपास नव्वद अंश झुकलेली. एक विझलेली मेणबत्ती दिसते. त्या बारीकशा धाग्यावरून, समुद्राच्या भरती-ओहोटीचे, नौकेच्या हेलकाव्यांचे आणि प्रेत इकडून तिकडे गडगडल्यामुळे, खालच्या गालिच्यावर पडलेल्या रक्तांच्या डागांचे अफलातून गणित बांधून काढत मेसन खुन्यापर्यंत पोहोचतो. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या जगप्रसिद्ध अमेरिकन डिटेक्टिव्ह कथा लेखकाच्या ‘द केस ऑफ द क्रुकेड कॅण्डल’ या पेरी मेसन कथेचा प्रस्तुत अनुवाद बाळ भागवत यांनी त्याच नावाने मराठीत आणला आहे. सर आर्थर कॉनन डॉयलचा कथानायक जसा शेरलॉक होम्स. अ‍ॅगाथा खिस्तीचा कथानायक जसा हरक्यूल पायरो, तसा अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा हा कथानायक पेरी मेसन, शेरलॉक होम्स आणि हरक्यूल पायरो हे व्यवसायाने डिटेक्टिव्हच आहेत. पेरी मेसन हा कॅलिफोर्नियातला नामवंत वकील आहे. अमेरिकन फौजदारी कायदा त्याने कोळून प्यालेला आहे. पॉल ड्रेक या आपल्या व्यावसायिक डिटेक्टिव्ह मित्राकरवी तो एखाद्या प्रकरणाचा गुप्त तपास करतोच; पण डेला स्ट्रीट या आपल्या चिटणीस तरुणीसोबत तो स्वत:ही गुप्त तपासावर निघत असतो. अवघड प्रकरणात उडी घ्यायची त्याला फार आवड असते. दैव धारिष्टास धार्जिणे. या म्हणीनुसार त्याच्या धाडसाला हमखास यश मिळतेच. गार्डनर हा स्वत:च नामवंत वकील होता. वकिली पेशातल्या आपल्या अनुभवांवर आधारित कथालेखनाला त्याने १९२३ साली सुरुवात केली. लेस्टर लीथ, केन कॉर्निंग आणि अखेर पेरी मेसन या त्याच्या कथानायकांनी अमेरिकन वाचक वेडा झाला. अमेरिकेच्या ‘बेस्ट सेलिंग ऑथर्स लिस्ट’मध्ये गार्डनर वर्षांनुवर्षे जणू मुक्काम ठोकून होता. गार्डनर १९७० साली वारला. प्रस्तुत कथा मुळात १९४४ सालीची आहे, पण संगणकाच्या वेगवान काळातली ती वाचनीय, पकडून ठेवणारी आहे. हे गार्डनरच्या कथाबांधणीचे वैशिष्ट्य. -मल्हार गोखले ...Read more

  • Rating Starदैनिक लोकसत्ता लोकरंग - ११ फेब्रुवारी २०१८

    अमेरिकी इंग्रजी रहस्यकथा वाचणाऱ्यांमध्ये ‘पेरी मेसन’ हे पात्र परिचयाचे असेलच. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिली असली, तरी तो मुख्यत: ओळखला जातो ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच. १९३० च्या दशकात गार्डनरने उदयास आणलेले पेरी मेसन हे पात्र मेसन मालिकेतील रहस्यमय कादंबऱ्या आणि त्यांवरील सिनेमांमुळे एके काळी अमेरिकी वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. याच मेसन मालिकेतील ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही बाळ भागवत यांनी अनुवादित केलेली कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच प्रकाशित केली आहे. निष्णात वकील असलेल्या पेरी मेसनची गुन्ह्य़ाचा शोध घेण्याची त्याची अशी खास शैली आहे. एका गुन्ह्य़ाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याशी निगडित दुसऱ्या मोठय़ा गुन्ह्य़ाचे धागे उसवत गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याद्वारे शिक्षेपर्यंत पोहोचवणे ही मेसनची शोधशैली. ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही रहस्यमय चातुर्यकथाही मेसनच्या या शोधशैलीचा प्रत्यय देणारी आहे. या कादंबरीची सुरुवात होते ती एका गृहस्थाच्या गाऱ्हाण्याने. मेसनच्या कार्यालयात सकाळीच एक गृहस्थ आलेला असतो. ट्रकने दिलेल्या धडकेत या गृहस्थाच्या गाडीचे नुकसान झालेले असते. गाडीला धडकलेला ट्रकचालक पळून गेला असला तरी त्याच्या ट्रकवरील काही नोंदी या गृहस्थाने ध्यानात ठेवलेल्या असतात. तो त्या मेसनला सांगतो. मेसन तो ट्रक कोणत्या कंपनीचा आहे हे शोधणार तोच त्याला त्या कंपनीच्या वकिलाकडून फोन येतो. तो वकील हे प्रकरण मिटविण्यासाठी मेसनकडे आलेल्या गृहस्थाला चांगला मोबदला देण्याची तयारी दाखवतो. त्याने सांगितलेली रक्कम मेसन नाकारतो आणि वाढीव रकमेची मागणी करतो. मेसनची मागणी नाकारली जाईल असे वाटत असतानाच कंपनी ती मागणी स्वीकारते आणि तितक्या रकमेचा धनादेश त्या गृहस्थाला देते. कंपनीच्या या तत्परतेमुळे मेसनला यात काही काळेबेरे असल्याचा संशय येतो आणि तो त्या कंपनीचे काम नेमके काय सुरू आहे, कुठे सुरू आहे हे तपासण्यास सुरुवात करतो. नेमके त्याच वेळी मेसनला कळते, की एका असहाय अपघातग्रस्त महिलेला त्याच्या मदतीची गरज आहे. तिला झालेला अपघातही याच कंपनीतील एका व्यक्तीकडून झालेला असतो. त्याचीही भरपाई मिळवायची असे मेसन ठरवतो. त्याच वेळी मेसनचा साहाय्यक आणि खासगी गुप्तहेर पॉल ड्रेक त्याला येऊन भेटतो. ड्रेक मेसनला त्या कंपनीच्या विविध काळ्या कारवायांबद्दल सूचक माहिती देतो. इथून मेसनच्या डोक्यातील विचारचक्र चालू लागते. मेसन त्या कंपनीच्या सर्व भागीदारांची माहिती काढू लागतो. त्यातील एक भागीदार गायब झाला असल्याचे त्याला कळते. हा भागीदार नेमका कुठे गायब झाला आहे, याचा तपास करताना मेसन दुसऱ्याच एका भानगडीत सापडतो. सुरुवातीला झालेला अपघात हा मामुली वाटावा असा वेगळाच प्रकार या कंपनीतील रहस्यमयरीत्या गायब झालेल्या भागीदाराच्या बाबतीत घडलेला असतो. विदेशामध्ये खासगी बोटी घेऊन खासगी तलावांमध्ये सुट्टीच्या दिवशी मासेमारी करण्याचा छंद अनेक जण जोपासतात. मोठय़ा कंपन्यांतील बडी मंडळी हमखास आपले काही खासगी व्यवहार अशा वेळी या बोटींवर करीत असतात. मेसन शोधत असलेल्या कंपनीचा गायब झालेला भागीदारही असाच व्यवहार करायला गेलेला असताना त्याची हत्या झालेली असते. या खुनाचा आळ ज्या व्यक्तीवर आलेला असतो, त्याची मुलगी आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी वेगळे पुरावे उभी करू लागते. मात्र असे करताना त्या शहरातील काही मान्यवरही त्यात अडकण्याची शक्यता निर्माण होतेच, पण तिच्या वडिलांबाबतही संशय निर्माण होतो. आपले वडील निरपराध आहेत, हे दाखविण्यासाठीचा तिचा आटापिटा आणखी गुंता वाढवत जातो. मात्र अखेर त्या कंपनीची कृष्णकृत्ये मेसन उघड करतो. एका क्षुल्लक गोष्टीच्या आधारे मेसन खुनाचा छडा लावतो, एका निरपराध व्यक्तीला त्या खुनाच्या आरोपातून सोडवतो आणि त्या जखमी असहाय महिलेला घसघशीत नुकसानभरपाई मिळवून देतो. मेसनचा हा सारा यशस्वी शोधप्रवास वाचकाला गुंग करून सोडणारा आहे. डॅन ब्राऊन, ली चाइल्ड, फ्रेडरिक फॉर्सिथ, विल्बर स्मिथ यांसारख्या लेखकांच्या कादंबऱ्या अनुवादित करणाऱ्या बाळ भागवत यांनी गार्डनरची ही कादंबरी अनुवादित करून पेरी मेसनच्या सृष्टीचा परिचय करून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. ...Read more

  • Rating Starकिरण माने

    वाचनीय अस काही

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more