* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CASE OF THE HAUNTED HUSBAND
  • Availability : Available
  • Translators : JYOTI APHALE
  • ISBN : 9789387789609
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ERLE STANLEY GARDNER COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"ASPIRING ACTRESS STEPHANE OLGER JUST WANTS TO BE IN PICTURES. BUT SHE MAY END UP IN MUG SHOTS INSTEAD WHEN SHE GETS HERSELF CAUGHT UP IN A CRIME. SHORTLY AFTER QUITTING HER JOB AND MOVING TO HOLLYWOOD, SHE IS PICKED UP BY A WELL-DRESSED MAN WHILE HITCHHIKING. THE MAN LOSES CONTROL OF THE CAR AND THEY END UP IN A HORRIBLE ACCIDENT. BOTH STEPHANE AND THE DRIVER ESCAPE UNSCATHED BUT THE STRANGE MAN FLEES THE SCENE LEAVING STEPHANE TO FACE A CHARGE OF MANSLAUGHTER. STEPHANE’S RICH UNCLE HIRES PERRY MASON TO DEFEND HER AND HE AND THE PRIVATE DETECTIVE, PAUL DRAKE, IMMEDIATELY START GATHERING EVIDENCE. IT TURNS OUT THAT THE CAR, OF COURSE, WAS STOLEN, AND BELONGS TO A HOLLYWOOD PRODUCER WHO HAS BEEN IN CONTACT WITH THE MYSTERY MAN WHO IS FROM SAN FRANCISCO. A WOMAN HAS BEEN PROMISED A JOB BY HIM, BUT IS GIVEN ONE MY PERRY MASON INSTEAD. SHE, TOO, DISAPPEARS, AND IN ANOTHER ROOM OF THE HOTEL HER LUGGAGE IS FOUND WITH A MAN WHO HAS BEEN SHOT. IN THE COURTROOM PERRY MASON DISCOVERS MANY OTHER FACTS, BUT IN THE MEANTIME THE FILM PRODUCER’S CHAUFFEUR IS MURDERED, MAKING HIS TASK MUCH HARDER. IT’S UP TO PERRY MASON TO FIND THE TRUTH BEHIND A SUSPICIOUS SCENARIO STARRING A MENACING MOVIE "
"काकांच्या श्रीमंतीला आणि त्यातून आलेल्या अरेरावीला कंटाळलेली स्टीफन क्लेअर घराबाहेर पडते आणि एका हॉटेलमध्ये साधीशी हॅटचेकिंग गर्ल म्हणून काम करू लागते. आई-वडिलांचा आधार बालपणीच हरवलेला. हॉटेलमध्ये टीप चोरल्याचा आळ आल्याने तिथूनही बाहेर पडते. निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या स्टीफनला वेध लागतात हॉलिवूडचे, अभिनेत्री म्हणून नशीब अजमावण्याचे! गाडीभाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने लिफ्ट घेऊन सॅनफ्रान्सिस्कोला जावे हा तिचा विचार पक्का होतो; ती तो अमलातही आणते; पण हाय रे दैवा! लिफ्ट देणारा इसम तिच्याशी अतिप्रसंग करू पाहतो. ती प्रतिकार करू लागते. त्या झटापटीत त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि भयंकर अपघात होतो. त्या ठिकाणाहून तो मागल्या पावली निघून जातो आणि स्टीफनवर गाडी चोरल्याचा, निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आळ येतो. वृत्तपत्रातून मॅक्स अंकलना ही बातमी कळते. बातमीवरून तिचा ठावठिकाणा शोधत ते तिच्या मदतीला धावून येतात. सोबत तिच्याविषयी कळकळ वाटणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडलाही घेऊन येतात. या आरोपातून तिला सोडवायचे वकीलपत्र पेरी मॅसन घेतो. त्या गाडीचा शोध घेत घेत पेरी मॅसन हॉलिवूडपर्यंत पोहोचतो. तिथल्या एका प्रसिद्ध निर्मात्याची, जूल्स होमनची ती गाडी. ग्रिलीच्या पत्नीचे आणि त्याचे प्रेमसंबंध जुळतात. त्याच्या प्रेमात आंधळी झालेली मिसेस ग्रिली जिवावर उदार होऊन काय वाट्टेल ते करायला तयार होते. नवऱ्याच्या अनुपाQस्थतीत होमन तिला पर्वतराईतल्या गुप्त ठिकाणी घेऊन जातो. टॅनरच्या सांगण्याबरहुकूम तिथे पोहोचलेल्या ग्रिलीला होमनची गाडी दिसते. आपण फसले गेल्याचे लक्षात येताच होमन आणि मिसेस ग्रिली गाडी तिथेच टाकून विमानाने आपापले घर गाठतात. होमन आपली गाडी चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवतो. तीच गाडी घेऊन येताना ग्रिली स्टीफन क्लेअरला लिफ्ट देतो. निष्पाप स्टीफन विनाकारण गोवली जाते. यातून स्टीफनला सोडवताना पेरी मॅसनला दोन मृतदेह आढळतात. खरे तर स्टीफन क्लेअर निर्दोष असल्याचे सिद्ध झाले की संपले त्याचे काम; पण स्वस्थ बसेल तो पेरी मॅसन कसला! या खुनांचा छडा लावण्यासाठी तो पोलिसांना मदत करायचे ठरवतो. होमनच्या कीर्तीला धक्का लागू नये म्हणून ते खून करते ती... अखेर पेरी तिला विचित्र सल्ला देतो अन् या धक्कादायक गोष्टीचा शेवट होतो... "

No Records Found
No Records Found
Keywords
"#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE CASE OF HAUNTED HUSBAND# ERLE STANLEY GARDENER# JYOTI APHALE# PERRY MESON#स्टीफन क्लेअर मॅक्स ओल्गर#जॅक्सन स्टर्न# पॉल ड्रेक# पेरी मॅसन# बेव्हर्ली हिल्स# अ‍ॅडलर ग्रिली# डेला स्ट्रीट# अर्नेस्ट टॅनर# डिनर जॅकेट#न्यायाधीश कोर्टराइट# गेट ह्यू हॉटेल# मिसेस वारफिल्ड# जूल्स होमन#ज्योती आफळे# द केस ऑफ द हॉन्टेड हसबन्ड# अर्ल स्टॅनले गार्डनर पेरी मेसन "
Customer Reviews
  • Rating StarANIL UDGIRKAR

    पेरी मेसन नी जिंकलेली अजुन एक केस,वाचनीय !

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-06-2018

    उत्कंठावर्धक पेरी मेसन रहस्यकथा... अमेरिकन कादंबरीकार अर्ल स्टॅन्ले गार्डनर यांच्या ‘द केस ऑफ द हॉन्टेड हजबंड’ या कादंबरीचा मराठी अनुवाद ज्योती आफळे यांनी केला असून, मेहता पब्लिकेशन हाऊसने प्रसिद्ध केला आहे. ही पेरी मेसन रहस्यकथा असून, लेखक अमेरिकेील रोमांचकारी कल्पकतेचे बादशाह आहेत. ते आपल्या रोमांचक साहित्यकृतींना कल्पक, गुंतागुंतीच्या आणि आकर्षक कथानकात गुंफतात. त्यांच्या आव्हानात्मक, बुद्धिमान आणि थक्क करणाऱ्या रहस्यकथांनी साठ वर्षांहून अधिक काळ निस्सीम चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कादंबरी सहजच वाचकांच्या मनाचा ताबा घेते. स्टीफन क्लेअर एका वाहनाला लिफ्ट मागायची चूक करते. आपण केलेली ही साधी चूक पुढे एवढी महागात पडेल याची तिला कल्पना आली नाही. गाडीला अपघात होतो अन् लिफ्ट देणारा सुंबाल्या करतो. गाडी चोरल्याचा आरोप स्टीफनच्या माथी येतो. त्यातून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी उलगडत जाते. प्रेम जपण्यासाठी ही बहाद्दरीण दोन-दोन खून करायलाही मागेपुढे पाहत नाही. पण ते प्रेम मिरवण्यासाठी ती स्वत: तरी जिवंत राहते का हे जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचावी लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more