EVERY COMMON MAN IS FOND OF HAPPINESS, HE LONGS FOR THE EXPERIENCE. AT THE PEAK OF ORGASM, HE EXPERIENCES THIS HAPPINESS, ON A VERY MINUTE SCALE. THERE IS NO OTHER WAY FOR A COMMON MAN TO COME ACROSS SUCH HAPPINESS, FOR HIM SEX IS THE ONLY WAY TO GAIN IT. HE TRIES AGAIN AND AGAIN TO GAIN IT. DURING AN INTERCOURSE, WE ARE MOST DEDICATED, AND ECSTATIC. THERE IS A FEELING OF SUPREME ONENESS LIKE NEVER BEFORE. FOR A FEW MOMENTS, WE EXPERIENCE A STAGE WHERE WE FEEL FREE FROM ALL THE WORRIES, THOUGHTS THAT KEEP US BUSY OTHERWISE. EVERY HUMAN BEING IS EAGER TO EXPERIENCE THIS FEELING AGAIN AND AGAIN. HE FINDS IT DURING SEX, THAT IS THE REASON WHY A HUMAN IS SO ATTRACTED TO IT. THE PERSON WITH WHOM HE ENJOYS SEX AND IN TURN GAINS THIS DIVINE EXPERIENCE THEN BECOMES A VERY NEAR AND DEAR TO HIM, BECOMES THE CENTER OF HIS LOVE; NOT ONLY THIS, THE SAME PERSON STARTS RULING HIS MIND, HIS FEELINGS AS WELL. THIS IS A BOLD AUTOGRAPHY OF A LECHEROUS YET VERY SUCCESSFUL INDUSTRIALIST WHO HAD SEX RELATIONSHIPS WITH WOMEN DEVOIDE OF THEIR CASTES, RELIGIONS AND AGES. KHUSHWANT SINGH, THE AUTHOR OF INTERNATIONAL FAME BRINGS THE HOT SCENES INTO REALITY WITH THE AID OF HIS PEN.`THE COMPANY OF THE WOMEN` IS THE FIRST NOVEL FROM KHUSHWANT SINGH SINCE LAST 10 YEARS. FROM START TO END, THIS NOVEL PRESENTS LOVE, SEX AND LUST IN A VERY ENTERTAINING MANNER. IT DOES NOT GIVE A DAMN ABOUT THE SET TRADITIONS AND NORMS OF THE SOCIETY. IT KEEPS THE READER IN ANNEX CITED STATE, FROM THE VERY FIRST PAGE TO THE LAST.
‘सर्वसामान्य माणूस आनंदाच्या अनुभवाचा भुकेला असतो.कामवासनापूर्तीच्या अत्युच्च क्षणी या आनंदाचा त्याला,ओझरता का होईना, पण स्पर्श होतो. सर्वसामान्य माणसाला कामवासनपूर्तीतून मिळण-या आनंदाइतक्या सर्वोच्च आनंदाचा अनुभव अन्य कोणत्याही मार्गाने मिळत नसल्याने माणूस वारंवार त्या आनंदासाठी धडपडत असतो.संभोगात समर्पण तादात्म्य आणि, काही काळ का होईना, पण एक चिंतामुक्त, विचारशून्य अवस्था अनुभवता येते.
या अनुभवाचा माणूस भुकेला असतो. कामवासनेकडे म्हणून तो वारंवार आकर्षित होतो. हा अनुभव देणारे माध्यम असणारी व्यक्ती मग त्याची सर्वाधिक प्रिय व्यक्ती ठरते. त्याचे प्रेम त्या व्यक्तीच्या ठिकाणी केंद्रित होते, त्याच्या भावविश्वावर त्या व्यक्तीचा अंमल चालू शकतो...’
– चैतन्य प्रेम
विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृत्त आहे. खुशवंत सिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखकानं हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं जिवंत केले आहेत.
खुशवंत सिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही गेल्या दहा वर्षांतली पहिली कादंबरी. यात शेवटपर्यंत प्रेम, काम आणि वासना यांचा रिझवणारा आविष्कार आहे. तो आविष्कार कसल्याही रूढ संकेतांना न जुमानणारा आहे. वाचकाला तो चेतवतो आणि शेवटपर्यंत उत्तेजित करतो.