* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DARK CRUSADER
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788177665677
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A NEW TYPE OF FUEL WAS INVENTED. ENGLAND STARTED MAKING A UNIQUE MISSILE BASED ON IT, BUT ONE BY ONE ALL THE SCIENTISTS WORKING ON IT STARTED DISAPPEARING WITH THEIR WIVES. SOMEWHERE THE SECRET OF THIS PROJECT WAS LEAKING. THE SECRET AGENCY WAS WORRIED ABOUT IT. IT WAS A HUGE PROJECT. THE ENEMIES WANTED TO CONQUER THE WORLD, THEY WANTED THE OWNERSHIP OF THE MISSILE, AND NOW WHEN EVERYTHING WAS ALMOST SET, THERE WAS JUST ONE FLAW, THEY WERE NOT ABLE TO FUSE THE MISSILE. MISSILES, SHIPS, SPYING, FUTURE NUCLEAR WARS, AND THE LUST TO RULE THE WORLD, ALL HAS COME TOGETHER GIVING RISE TO SUSPENSE, ACTION AND HAPPENINGS, YET NOT DEVOID OF A LOVE STORY.
इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती. एका शत्रुराष्ट्राची योजना. त्यांना जगावर वर्चस्व हवे होते. ते त्या क्षेपणास्त्रापर्यंत पोहोचू पाहत होते. सर्व काही जमत आले. परंतु क्षेपणास्त्राला फ्यूज घालता येत नव्हता. एक शास्त्रज्ञ त्याचवेळी दूरवरच्या बेटावर पोहोचला. त्याने छडा लावायचा प्रयत्न केला अन् नंतर जो धमाका उडाला तो थरारक भाग वाचताना अंगावर काटे उभे राहतात...... क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर अ‍ॅक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पाश्र्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते...... अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादर करीत आहोत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarJyoti Jamnerkar

    I have read it khup chan. Ahe n a. Samajayacha prashnach. Nahi jarur wacha

  • Rating StarM.Mandar

    मी वाचले आहे. हे खूप चांगले पुस्तक आहे. कथा देखील मनोरंजक आहे. फक्त कथा समजणे थोडे जटिल आहे.

  • Rating StarDAINIK LOKSATTA 16-10-2005

    साहसाचा रोमांचक अनुभव... वाचकांना आवडणाऱ्या लेखकांमध्ये अ‍ॅलिस्टर मॅक्लीन याचे नाव आवर्जून घ्यावे असे आहे. वाचकांचे पुरेपूर मनोरंजन तर होईल, शिवाय त्यांना वेगळ्याच प्रकारच्या विषयाचा, जीवनाचा परिचयही होईल अशा प्रकारे मॅक्लीनच्या कादंबऱ्यांची घडण असत. मनोरंजनासाठी वाचन करणाऱ्यांना दोन प्रकारच्या कादंबऱ्यांत विशेष रस असतो. रहस्यमय आणि देमार म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना, हाणामाऱ्यांचे प्रसंग, द्वंद्वांची चटकदार, थरारून टाकणारी वर्णने त्यांना पसंत असतात. यातला खलनायक सुरवातीपासूनच वाचकांना माहीत असतो. तरीही कथानायक कशा प्रकारे त्याच्यावर मात करणार याचा अंदाज वाचकाला सहजी येत नाही. जेम्स बाँड या नायकाच्या कादंबऱ्या या प्रकारच्या रहस्यमय कादंबऱ्यात नायकाप्रमाणेच वाचकाही खलनायक वा क्रूरकर्मा, निदर्य पण चतुर आणि अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तीची शोध घेतात. तो लागतो तेव्हा वाचकांना काहीसा धक्का बसतो. कारण त्यांची त्या व्यक्तीबाबतची अपेक्षा वेगळीच असते. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या दोन्ही प्रकारांचे चटकदार मिश्रण तयार करतो. ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ या न्यायाने वाचकांना दुहेरी समाधान मिळते. शिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या कादंबऱ्यातील प्रतिस्पर्धी जास्त करून बुद्धिमत्तेच्या आधारावर डावप्रतिडाव रचत असतात. त्यामुळे त्यातील बारकावे वेळीच लक्षात आले, तर खलनायकाची ओळख थोडी लवकर पटते, असे असले तरी कथानायक त्या खलपुरुषाचे खरे रूप कसे उघड करतो, हे कुतूहल कायम राहतेच. अनुवादकार अशोक पाध्ये यांनी भाषांतर केलेल्या मॅक्लीनच्या ‘द डार्क क्रूसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबऱ्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील मनोगतात पाध्ये यांनीही मॅक्लीनच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ते म्हणतात : सुष्ट आणि दुष्ट हा जो अनादिकाळापासूनचा संघर्ष आहे. तोच त्यांच्या (मॅक्लीनच्या) कादंबऱ्यात दाखविलेला असतो. तसे हे नेहमीचेच आहे. कादंबरीतील दुष्ट खलनायक हा प्रस्थापित यंत्रणेवरती अत्यंत चातुर्याने व हुशारीने कब्जा करतो. सरकार, पोलीस, सुरक्षाव्यवस्था या सर्वांना भारी ठरतो. नीतिवान माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा, शौर्य इ. वर तो अशी काही मात करतो की, प्रस्थापित यंत्रणा हतबल होते, सरकार नमते व हळूहळू त्याच्याकडे विजयश्री माळ घेऊन येते. केवळ एकटा माणूस अक्कलहुशारीने सर्वांचा ताबा घेतो. त्याच्यावर मात करायची, तर तुम्हाला तीच प्रस्थापित यंत्रणा वापरणे भाग आहे. मग ते सरकार असेल, लष्कर असेल, पोलीस दल असेल, नाहीतर सामाजिक व्यवस्था असेल. अन् इथून पुढे मॅक्लीनचे खरे कौशल्य आहे. ज्या यंत्रणेचा ताबा घेतला, त्याच यंत्रणेच्या शस्त्राने त्या खलनायकाशी संघर्ष करायचा ही एक अतिअवघड गोष्ट सच्छिल नायकापुढे असते. मॅक्लीनचे नायक नेहमी आदर्श, सदाचारी असतात. ते लोभाला बळी पडत नाहीत. उराशी बाळगलेल्या नीतितत्त्वांना ते घट्ट धरून असतात. जी माणसे काही नीतिबंधने मानतात, त्यांच्यावर संघर्ष करण्याची पाळी येते, तेव्हा त्यांची खरी कसोटी असते. कारण कसलीही बंधने न पाळणाऱ्या खलनायकाला सर्व शस्त्रे (मार्ग) वापरता येतात, तर नायकाला मात्र ठराविक बंधनाच्या चौकटीत राहून तुटपुंजी शस्त्रे वापरावी लागतात. परंतु अ‍ॅलिस्टरचा नायक हा नेहमीच खलनायकाच्या चातुर्यावरही मात करणारा तीव्र बुद्धिमान असा असतो. बुद्धी हेच त्याचे खरे शस्त्र असते. त्यामुळे या लेखकाच्या कादंबरीत निम्म्या भागापर्यत खलनायकाची चलती असते. त्याच्याविरुद्ध नुकताच कुठे नायक उभा राहत असतो. तराजूचे पारडे पूर्णपणे खलनायकाकडे झुकलेले असते. पण नंतर ते हळूहळू नायकाकडे कलू लागते. या दोघांची खरी बौद्धिक झुंज ही कादंबरीच्या शेवटच्या तीन प्रकरणांत होते. त्या वेळी मात्र दोन्ही पारडी सतत खाली-वर होत असतात. शेवटी विजयश्री नायकाला माळ घालते. तोपर्यंत सततच्या उत्कंठेने वाचकाचा दम उखडत आलेला असतो. ‘नंतर काय झाले असेल’ या उत्सुकतेपोटी तो भराभर पुढे वाचतच जातो आणि पुस्तक संपवून टाकतो. हेच मॅक्लीनचे मोठे यश आहे. कादंबरीत (बहुधा हवी म्हणून) नायिका असते. पण तसे साधे प्रेमप्रसंगही नसतात. प्रणय तर दूरच. कारण सारे महत्त्व खलनायकाचा डाव उधळून टाकण्याला असते. ‘द डार्क क्रुसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या दोन्ही कादंबऱ्या बारा प्रकरणांच्या आहेत. मात्र ‘द डार्क क्रुसेडर’ला पूर्वीच्या ‘उपोद्घात’ आणि ‘उपसंहार’ यांच्या धर्तीवर प्रास्ताविक आणि समारोप आहे. आणि तो आवश्यकच आहे असे कादंबरी वाचल्यावर पटते. वाचण्यापूर्वी मध्ये श्री. पाध्ये यांनी कादंबरीच्या नावाबाबत् केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. कारण त्यात त्यांनी कादंबरीच्या नावाबाबत सविस्तर खुलासा केला आहे. धर्मयुद्ध म्हणजे ‘क्रुसेड’ आणि त्यात भाग घेणारे वीर म्हणजे ‘क्रुसेडर’. पण त्याचबरोबर एखादी मोहीम साध्य करण्यासाठी अनेकांनी सर्व बाजूंनी आपली ताकद, बुद्धी, पैसा वगैरे पणाला लावण्यालाही ‘क्रुसेड’ असे म्हटले जाते. हे कादंबरीच्या संदर्भात ध्यानात घ्यायला हवे. ‘डार्क’ म्हणजे काळा, अंधारी, गडद वा सैतानी नसून तो ‘अचानक काहीतरी कामगिरी करून जाणारा’ म्हणजे इंग्रजीतील ‘द डार्क हॉर्स’ या शब्द प्रयोगात जो अर्थ आहे. तो येथे अभिप्रेम आहे. शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्याचा अचूक वेध घेणारे जे क्षेपणास्त्र बनविण्यात आलेले असते त्यालाच हे नाव देण्यात मॅक्लीनने मोठी कल्पकता दाखविली आहे. कारण नेमके तेच क्षेपणास्त्र पळविले गेल्याने निर्माण झालेले पेचप्रसंग आणि त्यांची उकल यातच कादंबरीचे कथानक आहे. एकापाठोपाठ एक असे शास्त्रज्ञ गायब होऊ लागतात. त्यामुळे गुप्तहेरखाते सतर्क होते. हा इंधन प्रकल्प यशस्वी झाल्याची बातमी गुप्त न राहिल्यानेच हे घडते. क्षेपणास्त्र पळविले गेले तरी पळविण्याऱ्याला त्यात फ्यूज घालण्याची माहिती नसते. त्यामुळेच शास्त्रज्ञांना वेठीस धरले जाते. या साऱ्याचा छडा शास्त्रज्ञ म्हणून पळविल्या गेलेल्या नायकाला लागलेला असतो. (म्हणूनच त्याची नेमणूक झालेली असते.) जोडीला नायिका शास्त्रज्ञांबरोबर त्यांच्या बायकांचेही अपहरण झालेले असते. क्षेपणास्त्राला फ्यूज लावून ते कार्यान्वित करण्याची जबाबदारी नायकावर पडते. ती तो पार पाडतो? की वेगळी युक्ती करून खलनायकावर मात करतो? क्षेपणास्त्राचे पुढे काय होते? शास्त्रज्ञांची सहीसलामत सुटका होते का? या साऱ्यांची उत्तरे मिळविण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. कादंबऱ्यांची नीटस मांडणी, आकर्षक भाषा, चपखल भाषांतर याने त्या सहजी वाचून पुऱ्या होतात. आपल्या ज्ञानात, माहितीमध्येही भर पडते. कादंबरी वाचताना कथानक खिळविते. कारण या खऱ्या ‘अ‍ॅक्शन थ्रिलर’ आहेत. मॅक्लीनच्या कादंबऱ्यावर चित्रपट बनविले गेले त्याचे हेही एक कारण आहे. कारण बहुतांश वाचकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असे जागीच खिळून राहायला मनापासून आवडते. तो त्यांना पुरेपूर समाधानही देऊन जातो. हे सारे गुण मान्य करताना हेही लक्षात येते की किशोरवयीन वाचकांच्या हाती या कादंबऱ्या निर्धोकपणे द्यायला हरकत नाही. यातून त्यांची साहसीवृत्ती, वेगळ्या विषयांची बारकाईने माहिती करून घ्यायची वृत्ती वाढेल, बुद्धीचा वापर करूनच अडचणींतून मार्ग काढण्याची सवय त्यांना हवीहवीशी वाटेल हाही एक महत्त्वाचा लाभ आहेच. पण त्याबरोबरच कादंबरी वाचताना त्या भरात न जाणवलेली एक गोष्ट नंतर सावकाश विचार केला की जाणवते. नायकावरील संकटे, त्याच्यावर होणारे अत्याचार, त्याला होणारी मारहाण, दुखापती, त्याची जवळपास विकलांग अवस्था आणि त्या अवस्थेतही त्याने दिलेला लढा, केलेली साहसे ही तशी अतिशयोक्तच. खरेच सांगायचे तर केवळ अशक्य. मनाच्या उमेदीवर, जिद्दीवर कधी कधी माणूस अचाट कामे करतो म्हणतात. ते क्षणभर खरे मानले तरी शारीरिक अवस्था अगदी अगतिक असताना अशी साहसे म्हणजे... नायक ‘सुपरमॅन’सारखा ‘सुपर हीरो’च म्हणायला हवा! पण म्हणूनच तो सर्वांना आवडतो. प्रिय होतो. कारण तसे बनणे हेच तर बहुतेकांचे अंतरात दडवून ठेवलेले स्वप्न असते ना... -आ. श्री. केतकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 18-12-2005

    एकाकी गुप्तहेराची चिवट झुंज... साहस कथा, त्यातही संरक्षण दलांवरील कादंबऱ्या लिहिणाऱ्यांत अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांचे नाव फार वर होते. त्यांनी स्वत: दुसऱ्या महायुद्धात नौदलात सेवा बजावली आणि नंतर ते जपान्यांच्या कैदेत सुटका झाल्यावर ते कादंबरी लेखनाकडे वाले आणि नौदलाच्या पार्श्वभुमीवर एकापेक्षा एक अशा सरस सतरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अत्यंत अचूक निरीक्षण व वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या शैलीमुळे अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांचा खास वाचकवर्ग निर्माण झाला. मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नायक अगदी साधेसुधे; पण चिवट असतात. परिस्थिती त्यांना नेहमीच प्रतिकूल असते आणि हे नायक त्यातूनही मार्ग काढून ईप्सित साध्य करतात. मॅक्लीन यांची ‘द डार्क क्रुसेडर’ ही कादंबरी अशीच आहे. ऑस्ट्रेलियात एका कंपनीत कामाला असलेले अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ एकाएकी गूढरीत्या नाहीसे होऊ लागतात. ब्रिटनने एक नवे क्षेपणास्त्र तयार करायला घेतलेले असते आणि अत्यंत गुप्त असलेल्या या प्रकल्पावर हे शास्त्रज्ञ काम करीत असतात. या प्रकल्पाची माहिती कोणाला तरी मिळालेली असते आणि त्यांना ते क्षेपणास्त्र हवे असते, शास्त्रज्ञ गायब व्हायला लागल्यावर साहजिकच गुप्तहेर खात्याचे लक्ष तिकडे जाते आणि लंडनमध्ये धावपळ सुरू होते. शास्त्रज्ञाच्या बुरख्याखाली बेटॉल या गुप्तहेराची या मोहिमेसाठी रवानगी होते. सोबत असते मारी होपमन ही दुसरी हेर. न कळत हे दोघे जवळ येऊ लागतात; पण प्रसंगच असे येतात, की बेंटॉलला प्रेम व्यक्त करायला वेळच मिळत नाही. मुख्य काम असते, ते शत्रू शोधण्याचे. सिडनेला जाताना वाटेत उतरवल्या गेलेल्या या जोडीवर अनेक संकटे येतात आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बेंटॉल त्यातून मार्ग काढत जातो. अखेर तो रहस्याच्या मुळाशी पोहोचता आणि हादरतो. सत्य भलतेच निघते. नेहमीच्या शैलीत मॅक्लीन यांनी कादंबरी लिहिली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा सरस अनुवाद केला आहे. गुप्तहेरांचे कष्टाचे जग या कादंबरीत दिसते. वेगळे काही वाचणाऱ्यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल. -प्रतिनिधी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more