* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DEMON IN THE FREEZER
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788190779135
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 288
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ABOUT 25 YEARS AGO, SMALL POX WAS ERADICATED FROM THE EARTH, AFTER THE CONTINUOUS EFFORTS OF THOUSANDS OF DEDICATED SCIENTISTS ALL OVER THE WORLD. THE SUPER POWERS THEN PRESERVED A FEW VIALS FULL OF THE VIRUSES OF CHICKEN POX, FOR ANY FUTURE REFERENCE OR NEED, IN CASE NOW, AFTER ALL THESE YEARS THERE IS A DANGER OF THE INFECTION OF THIS DISEASE. HUMAN LIVES WILL BE WIPED OUT LIKE NOTHING, IF THESE VIRUSES ARE USED BY THE TERRORISTS GROUPS OR ANY NATION. THE MASSACRE WILL BE LIKE NEVER BEFORE. SOMEONE SOMEWHERE IS AWARE OF THESE FACTS YET IS BENT UPON TAKING OUT THE VIALS FROM THEIR COLD STORAGE, OUT OF THEIR SECURED VAULTS, OUT IN THE OPEN, WHAT WILL HAPPEN..?
हजारो समर्पित माणसांच्या जागतिक पातळीवरील अथक परिश्रमांतून सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मानवजातीचा हजारो वर्षं संहार करणा-या देवीच्या रोगाचं उच्चाटन होऊ शकलं, पण गरज पडली तर असाव्यात म्हणून तत्कालीन दोन महासत्तांनी विषाणूंच्या काही कुप्या फ्रिजरमध्ये गोठवून ठेवल्या. आता हा देवीचा विषाणू पुन्हा अवतरण्याचा धोका दिसू लागला आहे. दहशतवादी गटांनी किंवा राष्ट्रांनी तो जैविक अस्त्र म्हणून वापरला तर मानवी इतिहासानं कधीही न पाहिलेला भीषण नरसंहार होईल. हे सगळं कळत असूनही आत्ता या क्षणी कोणीतरी त्या महाभयानक दैत्याला फ्रिजरमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more