* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DIFFICULTY OF BEING GOOD
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9789353171148
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY SHOULD WE BE GOOD? HOW SHOULD WE BE GOOD? AND HOW MIGHT WE MORE DEEPLY UNDERSTAND THE MORAL AND ETHICAL FAILINGS--SPLASHED ACROSS TODAY`S HEADLINES--THAT HAVE NOT ONLY DESTROYED INDIVIDUAL LIVES BUT CAUSED WIDESPREAD CALAMITY AS WELL, BRINGING COMMUNITIES, NATIONS, AND INDEED THE GLOBAL ECONOMY TO THE BRINK OF COLLAPSE? IN THE DIFFICULTY OF BEING GOOD, GURCHARAN DAS SEEKS ANSWERS TO THESE QUESTIONS IN AN UNLIKELY SOURCE: THE 2,000 YEAR-OLD SANSKRIT EPIC,MAHABHARATA. A SPRAWLING, WITTY, IRONIC, AND DELIGHTFUL POEM, THE MAHABHARATA IS OBSESSED WITH THE ELUSIVE NOTION OF DHARMA--IN ESSENCE, DOING THE RIGHT THING. WHEN A HERO DOES SOMETHING WRONG IN A GREEK EPIC, HE WASTES LITTLE TIME ON SELF-REFLECTION; WHEN A HERO FALTERS IN THE MAHABHARATA, THE ACTION STOPS AND EVERYONE WEIGHS IN WITH A DIFFERENT AND OFTEN CONTRADICTORY TAKE ON DHARMA. EACH MAJOR CHARACTER IN THE EPIC EMBODIES A SIGNIFICANT MORAL FAILING OR VIRTUE, AND THEIR STRUGGLES MIRROR WITH UNCANNY PRECISION OUR OWN FAMILIAR EMOTIONS OF ANXIETY, COURAGE, DESPAIR, REMORSE, ENVY, COMPASSION, VENGEFULNESS, AND DUTY. DAS EXPLORES THEMAHABHARATA FROM MANY PERSPECTIVES AND COMPARES THE SUCCESSES AND FAILURES OF THE POEM`S CHARACTERS TO THOSE OF CONTEMPORARY INDIVIDUALS, MANY OF THEM HIGHLY VISIBLE PLAYERS IN THE WORLD OF ECONOMICS, BUSINESS, AND POLITICS. IN EVERY CASE, HE FINDS STRIKING PARALLELS THAT CARRY LESSONS FOR EVERYONE FACED WITH ETHICAL AND MORAL DILEMMAS IN TODAY`S COMPLEX WORLD. WRITTEN WITH THE FLAIR AND SEEMINGLY EFFORTLESS ERUDITION THAT HAVE MADE GURCHARAN DAS A BESTSELLING AUTHOR AROUND THE WORLD--AND ENLIVENED BY DAS`S FORTHRIGHT DISCUSSION OF HIS OWN PERSONAL SEARCH FOR A MORE MEANINGFUL LIFE--THE DIFFICULTY OF BEING GOOD SHINES THE LIGHT OF AN ANCIENT POEM ON THE MOST CHALLENGING MORAL AMBIGUITIES OF MODERN LIFE.
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#GURCHARANDAS #SUDARSHAN ATHAVALE #RELIGIOUS #THEDIFFICULTYOFBEINGGOOD #द डीफीकल्टी ऑफ बिईंग गुड #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI "
Customer Reviews
  • Rating StarANIL KAVNEKAR

    हा अनुवाद वाचला. आवडला. महाभारत समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच महत्वपूर्ण आहे. व्यावहारिक दाखले देऊन साध्यासोप्या भाषेत महाभारत समजून देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रकाशनाबद्दल धन्यवाद.

  • Rating StarLOKPRABHA 15-02-2019

    महाभारत आणि आधुनिक जीवनाची सांगड... महाभारत हे एक अजरामर महाकाव्य असून मानवी स्वभावातील सर्व भावभावना आणि प्रवृत्तींचे दर्शन यातून घडते. महाभारत हा पौराणिक ग्रंथ असला तरीही त्याकडे तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र शा विविध कसोट्यांवरही पाहता येते. या कसोट्या लावून महाभारत आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखांकडे नव्या विचाराने आपण पाहू शकतो. हजारो वर्षांपूर्वी असलेल्या मानवी प्रवृत्ती आजच्या काळातही तंतोतंत कशा लागू पडतात याचीही पडताळणी सहज करता येऊ शकते. हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर, संस्कृत आणि तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक, ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुचरण दास यांनी ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या ग्रंथात महाभारत आणि आधुनिक जीवन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी महाभारताची मदत घेण्याचे काम या ग्रंथाने केले असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. महाभारतात नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले असून महाभारत हे कालातील आहे. सध्याच्या अनिश्चित, अमर्याद स्पर्धेच्या जगात नीती-अनितीचा समतोल साधून कसे जगायचे? याचे उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून दास यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. महाभारत हे मानवी बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचे दर्शन घडवणारी सर्वश्रेष्ठ कलाकृती असून त्यातील नीतिमत्तेविषयीच्या कल्पना आणि आजचे तत्त्वज्ञान या दोन्हीचे विश्लेषण दास यांनी या ग्रंथात केले आहे. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न महाभारत या महाकाव्यात करण्यात आला असून माणसाच्या अपयशाची, अध:पतनाची कारणे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. समाजात सुसंवाद आणि सुख नांदण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी धर्मानुसार आचरण करण्याची गरज असते. धर्म हा शब्द जरासा जटिल आहे. आपल्या विहित कर्तव्याची प्रामाणिक पूर्ती म्हणजे धर्म, नीतिनियमांचे कठोर पालन म्हणजे धर्म. धर्माचा मुख्य रोख असतो तो योग्य आणि न्याय्य वागण्यावर. भारतीय संस्कृतीचा पाया असणाऱ्या महाभारत या ग्रंथात आपल्या भोवतालच्या समाजाच्या नीतिमत्तेचा अर्थपूर्ण दंडक पुन्हा शोधता येईल का? असा विचार दास यांच्या मनात रुंजी घालत होता आणि त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘धर्म’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. कर्तव्य, चांगुलपणा, नैतिकता, न्याय, यमनियम हे सर्व यात येते. पण ते पुरेसे नाही. धर्म म्हणजे या विश्वातील नीती-अनितीचा, सृष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा समतोल आहे. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी आणि त्याचा विवेक यांवर त्याच्या मनातील सत् आणि असत् ही पारडी वर-खाली होत असतात आणि तेच धर्माचे परिणाम. धर्माच्या मूळ संकल्पनेविषयीची शंका, त्याच्या पूर्णार्थाविषयीची गुंतागुंत हा महाभारताच्या कथनाचा व्यापक हेतू आहे. महाभारत हे महाकाव्य म्हणजे या जगात चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे? याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा विस्तृत आणि सर्वसमावेशक प्रयत्न असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. ग्रंथाची सुरुवात ‘दुर्योधनाची असूया’ आणि ‘द्रौपदीची निर्भयता’ या प्रकरणांनी होते. या प्रकरणात महाभारतातील कौरव आणि पांडवातील द्यूत खेळ, पांडवांचे द्रौपदीला पणाला लावणे, भर दरबारात होणारे द्रौपदी वस्त्रहरण, समोर अधर्म, अत्याचार होत असतानाही शांत राहणारे दरबारातील धृतराष्ट्र आणि अन्य महारथी याविषयी दास यांनी सविस्तर विवेचन केले आहेच, पण त्यांनी याची सांगड आधुनिक काळातील अंबानी बंधू, त्यांचे साम्राज्य, त्याच्या झालेल्या वाटण्या, त्यांच्यातील भाऊबंदकीशी घातली आहे. महाभारतातील प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे वागणे आणि त्या वर्तनाचे आजच्या काळातील विश्लेषण दास यांनी केले आहे. युद्धिष्ठिराची कर्तव्यबुद्धी, अर्जुनाचा विषाद, भीष्मांचा नि:स्वार्थ, कर्णाची त्याच्या समाजातील स्थानाविषयीची चिंता, श्रीकृष्णाचे कपट, अश्वत्थाम्याचा सूड, युधिष्ठिराचा पश्चात्ताप, महाभारताचा धर्म अशा विविध प्रकरणांमधून हा ग्रंथ उलगडत जातो. डोळ्यांवर कातडे ओढणे, नैतिकतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे ही माणसाची अटळ अशी प्रवृत्ती आहे? की त्यात बदल करणे शक्य आहे? यातील काही गोष्टी आजच्या शासनाच्या कार्यपद्धतीचा परिणाम असतात. त्या शासनाला आपण सर्व संबधित शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या रचना, घटना यात उचित असा बदल करून अधिक काळजीवाहू, जनतेविषयी सहानुभूती बाळगणारे बनवू शकू का? महाभारतात धर्म या गहन संकल्पनेचे जे बहुविध कोनातून दर्शन घडविले आहे त्यातून मी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि आपले आयुष्य आपण कशा पद्धतीने जगले पाहिजे? हे शोधण्याचा प्रयत्न केला तीच या ग्रंथाच्या लेखनामागील स्फूर्ती आहे, असे ग्रंथातील ‘निष्कर्ष’ या प्रकरणात लेखक दास यांनी म्हटले आहे. ग्रंथात संदर्भग्रंथांचा परिचय, टिपा आणि खिस्तपूर्व २५००-१५०० ते इसवी सन १६५०-१६७० या कालखंडातील घटनांचा कालक्रमही देण्यात आला आहे. दास यांनी या ग्रंथातून महाभारत या महाकाव्याचा एक वेगळा पैलू समोर आणला असून त्यांनी धर्माचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने केले आहे. महाभारत हा पौराणिक ग्रंथ आजच्या काळातील आपल्या दैनंदिन जीवनातील नैतिक पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो ते दास यांनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे. महाभारत काळातील आणि आजच्या काळातील नीतिमानतेच्या परिणामातील संदिग्धता, अनिश्चितता यांतील आश्चर्यकारक साम्यही दास यांनी या ग्रंथातून वाचकांसमोर ठेवले असून आजच्या अवघड, संघर्षमय, गुंतागुंतीच्या जीवनाशी सामना कसा करायचा हेही समजावून सांगितले आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    महाभारताचा आधुनिक वेध... एकेकाळी ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ असलेले गुरुचरण दास हे साहित्य प्रांतात ‘इंडिया अनबाउंड’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नुकतेच ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ हे पुस्तक प्रकाशि झाले असून, त्याचा सुदर्शन आठवले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. भारतीयांचा महान ठेवा असलेल्या महाभारताने त्यांनाही वेड लावले. त्याची अनेक पारायणे त्यांनी केली. त्यातून या महाकाव्याचा एक आगळा पैलू या पुस्तकाद्वारे त्यांनी वाचकांसमोर उलगडला आहे. महाभारत आपल्या रोजच्या जीवनातील नैतिक पेचप्रसंगावरही कसा प्रकाश टाकू शकते, हे लेखकाने अत्यंत विद्वत्तापूर्ण दाखवून दिले आहे. कथानकांची सर्वांधिक गुंतवळ असलेल्या या महाकाव्याचा लेखकाने आधुनिक वेध घेतला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more