LAWRENCE ANTHONY DEVOTED HIS LIFE TO ANIMAL CONSERVATION, PROTECTING THE WORLD`S ENDANGERED SPECIES. THEN HE WAS ASKED TO ACCEPT A HERD OF "ROGUE" WILD ELEPHANTS ON HIS THULA THULA GAME RESERVE IN ZULULAND. HIS COMMON SENSE TOLD HIM TO REFUSE, BUT HE WAS THE HERD`S LAST CHANCE OF SURVIVAL: THEY WOULD BE KILLED IF HE WOULDN`T TAKE THEM.IN ORDER TO SAVE THEIR LIVES, ANTHONY TOOK THEM IN. IN THE YEARS THAT FOLLOWED HE BECAME A PART OF THEIR FAMILY. AND AS HE BATTLED TO CREATE A BOND WITH THE ELEPHANTS, HE CAME TO REALIZE THAT THEY HAD A GREAT DEAL TO TEACH HIM ABOUT LIFE, LOYALTY, AND FREEDOM. THE ELEPHANT WHISPERER IS A HEARTWARMING, EXCITING, FUNNY, AND SOMETIMES SAD MEMOIR OF ANTHONY`S EXPERIENCES WITH THESE HUGE YET SYMPATHETIC CREATURES. SET AGAINST THE BACKGROUND OF LIFE ON AN AFRICAN GAME RESERVE, WITH UNFORGETTABLE CHARACTERS AND EXOTIC WILDLIFE, ANTHONY`S UNRELENTING EFFORTS AT ANIMAL PROTECTION AND HIS REMARKABLE CONNECTION WITH NATURE WILL INSPIRE ANIMAL LOVERS AND ADVENTUROUS SOULS EVERYWHERE.
"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता.
त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे.
आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल.
"