* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE FACEBOOK EFFECT
  • Availability : Available
  • Translators : VARSHA VELANKAR
  • ISBN : 9789386175175
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT WAS CREATED IN A HARVARD DORM ROOM - OVER 500 MILLION PEOPLE USE FACEBOOK REGULARLY, IN JUST ABOUT EVERY COUNTRY ON EARTH. THAT A COMPANY THIS POWERFUL AND INFLUENTIAL WAS STARTED AS A LARK BY A COUPLE OF 19-YEAR-OLDS MAKES IT A FASCINATING AND SURPRISING TALE. THAT ONE OF THEM, THE VISIONARY MARK ZUCKERBERG, HAD THE MATURITY, STRATEGIC SMARTS AND LUCK TO KEEP HIS COMPANY AHEAD OF ITS RIVALS ANCHORS THE TALE. WITH EXCLUSIVE INSIDE ACCESS TO ALL THE COMPANY`S LEADERS DAVID KIRKPATRICK TELLS OF THE VISION, THE TENACITY, THE REFUSAL TO COMPROMISE, AND THE VISION ZUCKERBERG HAS TO REMAKE THE INTERNET. A BRILLIANT AND FASCINATING CAST OF CHARACTERS CREATED FACEBOOK AND KIRKPATRICK HAS INTERVIEWED ALL OF THEM. NEVER BEFORE HAVE ZUCKERBERG AND HIS CLOSEST COLLEAGUES TOLD WHAT REALLY HAPPENED AS THEY BUILT THEIR DYNAMO WHILE EATING FAST FOOD, STAYING UP ALL NIGHT, AND THUMBING THEIR NOSES AT HOW THINGS ARE USUALLY DONE.
N/A

No Records Found
No Records Found
Keywords
MARKZUCKERBERG #FACEBOOK #DAVID #KIRKPATRICK #VARSHAVELANKAR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 26-04-2019

    फेसबुकची सोशल कथा... आजपासून दहाएक वर्षांपूर्वी ‘तुम्ही कुठे भेटून गप्पा मारायचात’ असा प्रश्न एखाद्या तिशी-पस्तीशीतील मंडळींना विचारला तर कदाचित त्यांना ते ठिकाण पटकन आठवणारही नाही किंवा पंधरा वर्षांपूर्वी टाइमपास कसा करायचात, हा प्रश्न त्यांना बुचक्यात पाडेल. स्मार्टफोन आणि इंटरनेट या दोन साधनांनी समृद्ध असलेल्या आपल्या समाजावर फेसबुकने पाडलेला प्रभाव किती, याचं मोजमाप वरील दोन प्रश्नांतून करता येईल. जगभरात २.३ अब्ज इतके मासिक वापरकर्ते असलेल्या फेसबुकने साऱ्यांनाच भारून टाकलं आहे. सोशल नेटवर्किंगचं अफाट जाळं विणणाऱ्या फेसबुकने केवळ संवादाचं नवीन माध्यमच उभं केलं नाही तर, माणसांना एकमेकांना जोडण्याचंही काम केलं. जगाच्या कोणत्याही भागात घडणाऱ्या एखाद्या घटेचा व्हिडिओ पोहोचवण्यापुरतंच ते मर्यादित राहिलेलं नाही तर, अनेक देशांच्या सत्तासंघर्षात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असं असलं तरी, आपल्या अवतीभवती फेसबुकबद्दल तक्रारी करणारेही अनेकजण सापडतील. फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या खासगीपणावर होत असलेलं अतिक्रमण, त्याला आलेलं बाजारीकरणाचं स्वरूप, वापरकर्त्यांच्या माहितीची विक्री आणि तरुण पिढीत वाढत असलेलं फेसबुकचं व्यसन अशा अनेक रास्त तक्रारी या माध्यमाची काळी बाजू उघड करतात. फेसबुकच्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीतल्या या स्थित्यंतराचा मागोवा घ्यायचा असेल तर, ‘फेसबुक इफेक्ट’ हे डेव्हिड कर्कपॉट्रिक लिखित आणि वर्षा वेलणकर यांनी मराठीतून अनुवादित केलेलं पुस्तक वाचायला हवं. फोर्च्युन या जगप्रसिद्ध अमेरिकी नियतकालिकात तंत्रज्ञान संपादक या पदावर अनेक वर्षे काम केलेले आणि तंत्रज्ञानविषय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणारे म्हणून डेव्हिड कर्कपॉट्रिक प्रसिद्ध आहेत. आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत कर्कपॉट्रिक यांनी फेसबुकच्या निमित्ताने समाजमनावर होत असलेला परिणाम हेरला आणि त्याला पुस्तकाचे स्वरूप दिले.’ जगभरातील लोकांना आणि विशेषत: तरुणाईला एका समान सांस्कृतिक अनुभवाला सामोरं जाण्याचा मार्ग मोकळा करू देणारं हे द्वार आहे’ असं त्यांचं म्हणणं आहे. ‘पण ही (फेसबुकची) वाढ आणि समाजात खोलवर होणाऱ्या त्याचा शिरकाव यामुळे काही सामाजिक, राजकीय, नियमन आणि धोरणासंदर्भात जटिल प्रश्नही निर्माण झाले आहेत’ हेही आवर्जून सांगतात. या दोन वाक्यांच्या दरम्यान कर्कपॉट्रिक यांनी फेसबुकची अवघी सोशलकथा वाचकांसमोर मांडली आहे. या पुस्तकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकच्या जन्माची कथा. मार्क झकरबर्ग यानं हॉवर्डमध्ये शिक्षण घेत असताना एक अवांतर प्रकल्प म्हणून फेसबुकची निर्मिती केली. हॉवर्डमधल्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठीचा तो प्रयोग होता. पण त्याही आधी मार्कनं फेसमॉश नावाचा एक प्रोग्रॉम तयार केला होता. हॉवर्डच्या कॉलेज कॅम्पसमधील सर्वांत हॉट चेहरा शोधण्यासाठी या प्रोग्रॉमचा खटाटोप मार्कनं केला होता. हॉवर्डमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती असलेल्या एका डायरीला फेसबुक असं म्हटलं जाई. फेसमॉशसाठी मार्कनं फेसबुकचाच वापर केला. फेसबुकमधील सगळी माहिती फेसमॉशमध्ये पुरवल्यानंतर मार्कनं केवळ चाचणी म्हणून आपल्या काही मित्रांना त्याची लिंक पाठवली. पण त्याच्या मित्रमंडळींना फेसमॉश इतकं भावलं की काही तासांत ते अवघ्या हॉवर्डच्या चर्चेचा विषय बनलं. पण मार्क तिथंच थांबला नाही. त्यानं फेसमॉश आणि त्याआधीच्या अशाच खटाटोपांना एकत्र करत द फेसबुक डॉट कॉम हे संकेतस्थळ प्रदर्शित केलं. हॉवर्डमधील विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमंडळींच्या संपर्कात ठेवण्यासाठी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं. त्याला अफाट यश मिळालं आणि त्यानंतर वर्ष-दोन वर्षांत झकरबर्गनं विविध महाविद्यालये, हायस्कूल असं करत सर्वसामान्य तरुणाईसाठी फेसबुक सुरू केलं. फेसबुकच्या जन्माची ही कथा या पुस्तकात अतिशय विस्ताराने आली आहे. त्यामुळे अन्यत्र कुठेही न वाचलेले अनेक पैलू यानिमित्ताने उलगडले आहेत. फेसबुक सार्वजनिक होताच त्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, वायकॉम यांसारख्या कंपन्यांनी ते आपल्या ताब्यात घेण्याचे कसे प्रयत्न केले, याचं वर्णनही या पुस्तकात आहे. फेसबुकमधील हिस्सेदारीसाठी बड्या-छोट्या कंपन्यांनी केलेली मोर्चेबांधणी या पुस्तकात अतिशय व्यवस्थितपणे मांडली आहे. पुढे फेसबुकची कंपनी स्थापन करताना झकरबर्गच्या आयुष्यात घडलेला घटनाक्रमही कर्कपॉट्रिक यांनी सखोल संशोधनाद्वारे मांडला आहे. हा सगळा इतिहास केवळ रंजकच नव्हे, तर एखाद्या नवउद्यमीला प्रेरित करणाराही आहे. त्याच काळात फेसबुकची संकल्पना ही निव्वळ उचलेगिरी असल्याचा आरोप करून करण्यात आलेल्या याचिकांची माहितीही कर्कपॉट्रिक देतात. मात्र त्यात केवळ फेसबुक आणि झकरबर्ग यांची बाजू झळकते. फेसबुकच्या संकल्पनेवर दावा करणाऱ्यांचं म्हणणं विस्ताराने मांडण्यात कर्कपॉट्रिक यांनी केलेला संकोच अनाकलनीय आहे. फेसबुकच्या जन्मकथेनंतर पुस्तकाची शेवटची दीडेकशे पाने त्याच्या आजच्या (अर्थात २०१० पर्यंतच्या) प्रवासाची आहेत. या दरम्यान फेसबुकचा १५ अब्ज डॉलरची कंपनी म्हणून निर्माण झालेला दबदबा तसंच फेसबुकमुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला असलेला धोका यांचं विवेचन पुस्तकात व्यवस्थित आलं आहे. फेसबुकचा राजकीय व्यासपीठ म्हणून होत असलेला वापर आणि फेसबुकच्या माध्यमातून देशोदेशांतील चळवळींना मिळालेलं व्यासपीठ यांचाही कर्कपॉट्रिक यांनी आढावा घेतला आहे. हे करतानाच लेखकाने फेसबुकच्या भविष्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीसाठी आवश्यक गुण फेसबुकमध्ये पुरेपूर भरलेले आहेत. फेसबुकला ‘वैश्विक खेडं’ बनवण्याच्या झकरबर्गच्या महत्त्वाकांक्षेलाही ते पूरक आहेत. मात्र हे होत असतानाच अनियंत्रित आणि अतिरेकी देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या माहितीचं काय, असा प्रश्नही लेखकाने शेवटी विचारला आहे. सरतेशेवटी अनुवादाविषयी, फेसबुकबद्दल तक्रारी करणाऱ्या पालकांनी आणि त्याच्या नको इतक्या प्रेमात पडलेल्या तरुणवर्गाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या अनुवादाची गरज वर्षा वेलणकर यांनी आपल्या मनोगतात अतिशय स्पष्टपणे विशद केली आहे. ज्या संवादाची, त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी नात्यांची, त्या नात्यांच्या जपणुकीची अपेक्षा मार्क झकरबर्गला आहे, त्यात फेसबुक वापरणाऱ्यांच्या या साधनासंदर्भातील अज्ञानाचा मोठा अडसर निर्माण झाला आहे, असे वेलणकर सांगतात आणि ते योग्यही आहे. पुरेशा माहितीअभावी वापरलेल्या कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर उपयोग तर करता येतच नाही, परंतु त्यातून नुकसान होण्याचाच धोका अधिक असतो. फेसबुकच्या बाबतीत असे धोके आपल्याला वारंवार दिसत आहेत. त्या धोक्यांपासून बचाव करायचा असेल तर ‘द फेसबुक इफेक्ट’ वाचायलाच हवं. –आसिफ बागवान ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    हॉवर्ड मध्ये एका एकोणीस वर्षांच्या विद्यार्थ्यांनी एका कंपनीची निर्मिती केली या कंपनीने केवळ इंटरनेट जगतामध्ये बदल घडून आले नाहीत तर मार्गही बदलले . या पुस्तकात लेखकाने फेसबुक कसे तयार झाले, त्याची वाढ कशी झाली, आणि त्यांचे भविष्य काय असेल याची तपशीलार माहिती संशोधन करून मांडली आहे . यात फेसबुक वाढीच्या प्रवासात त्याला आलेले यश- अपयश झालेल्या चुका यांच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक स्वतः मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुकच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीवर आधारलेले आहे . हे पुस्तक आहे त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीने जगभरातील करोडो लोकांना अक्षरश: वेड लावले . क्वचितच असा एखादा व्यक्ती सापडेल की ज्यांनी कधीच फेसबुकचा उपयोग केला नाही ,फेसबुकने संपूर्ण जगावर दुरगामी परिणाम केलेले आहेत . २०११ साली इजिप्त टय़ुनिशिया सारख्या अनेक देशात जनक्रांती झाली, हुकूमशाही जाऊन लोकशाहीचा उदय झाला या मागची प्रेरणा फेसबुकच होते हे नंतर उघड झाले. म्हणजेच आज सामजिक माध्यमं सगळया जगाला बदलुन टाकण्याची एखादया देश‍ात सत्तापलट करण्याची ताकद ठेवते. सर्वं सामाजिक माध्यमात फेसबुक हे एक शक्तीशाली माध्यम आहे. त्याच्या जन्मापासुनचा प्रवास या पुस्तकात दिला आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 16-06-2018

    ‘फेसबुक’ हे नाव आजमितीला घराघरांत पोहोचले आहे. आजच्या पिढीत तर फेसबुक वापरत नसेल असा माणूस सापडणे विरळ आहे. संपूर्ण जगाला अल्पावधीत वेड लावणाऱ्या या फेसबुकचा रंजक आहे. छोट्या कॉलेजपासून सुरू झालेल्या ‘फेसबुक’चा शोध नेमका कसा लागला? याची वाढ कशी झाली?फेसबुकच जडणघडण, फेसबुकचे भविष्य अशा अनेक प्रश्नांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 02-04-2017

    फेसबुकचा मुखवटा... फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्क हे आज आपल्या जगण्याचा भाग झाले आहेत. मात्र, हे बदल अनुभवताना आणि पारंपरिक वा नवी माध्यमं वापरताना आपण एक व्यक्ती व समुदाय म्हणून त्यांच्या परिणामांबाबत सजग असतोच असं नाही. माध्यमं अशी आंधळेपणानं वापरणं िती धोक्याचं आहे याची जाणीव आपल्याला अधूनमधून होते; पण ती तेवढ्यापुरतीच. ‘द फेसबुक इफेक्ट’ या नुकत्यच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं वाचन या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं. डेव्हिड कर्कपॅट्रिक यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे. मूळ पुस्तक २०१० मध्ये प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या सहा वर्षांत जग आणि फेसबुक आणखी बदललं आहे. ही मर्यादा ध्यानात घेतली तरीही फेसबुकसारख्या माध्यमाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. कर्कपॅट्रिक हे जगप्रसिद्ध ‘फॉर्च्युन’ नियतकालिकाचे तंत्रज्ञानविषयक लेखक आहेत. मार्क झकरबर्गसह अनेकांच्या मुलाखती घेतल्यानंतर पत्रकारितेच्या शिस्तीनं फेसबुकचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. योग्य ठिकाणी संबंधितांची वक्तव्यं देत स्वत:ची निरीक्षणं आणि मतं ते तत्कालीन संदर्भात नोंदवतात. ‘फेसबुक हे एक सामाजिक साधन आहे!’ यावर मार्कची अढळ श्रद्धा आहे. या माध्यमातून आपण स्वत:ची एक डिजिटल ओळख निर्माण करतो आणि आपण जे काही करतो त्याचा एक डिजिटल ठसा तिथं राहतो. लेखकानं नोंदवल्याप्रमाणे फेसबुक हे आजवरच्या इतिहासात सर्वांत जास्त वापरलं जाणारं माध्यम आहे. ऑनलाइन असलेल्या प्रत्येक व्यक्तीची डिरेक्टरी बनण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. फेसबुक, सोशल नेटवर्क आणि एकूणच माध्यमांच्या परिणामांबाबतचं भान येण्यासाठी ‘द फेसबुक इफेक्ट’ हे पुस्तक जरूर वाचावं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more