* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE FIRM
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788184981063
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 484
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO- 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN MITCHELL MCDEERE QUALIFIED THIRD IN HIS CLASS AT HARVARD, OFFERS POURED IN FROM EVERY LAW FIRM IN AMERICA. BENDINI, LAMBERT AND LOCKE WERE A SMALL, WELL-RESPECTED FIRM, BUT THEIR OFFER EXCEEDED MITCH S WILDEST EXPECTATIONS: A FANTASTIC SALARY, A NEW HOME, AND THE KEYS TO A BRAND NEW BMW. IT WAS HIS DREAM JOB - BUT IT WAS TO BECOME HIS WORST NIGHTMARE. UNRAVELLING A COMPLEX TRAIL OF SECRET FILES, UNDERCOVER SURVEILLANCE, AND MILLIONS OF DOLLARS OF ILLEGAL MOB MONEY, MITCH STUMBLES ACROSS A SHOCKING CONSPIRACY AND A HORRIFYING TRUTH: NOBODY HAS EVER LEFT BENDINI, LAMBERT AND LOCKE AND ANYBODY WHO HAS EVER TRIED HAS ENDED UP DEAD.
एक माफिया फॅमिली : सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेल्या प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी... त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी... एका वकिलांची फर्म : माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली... फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे ‘शुद्धिकरण’ करणारी... एक वकील : नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला अत्यंत हुशार, चलाख तरुण पोरगा... फर्ममध्ये नोकरी मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटतं, आता फक्त सुंदर भविष्यकाळ, भरपूर पैसा, बीएमडब्ल्यू... प्रत्यक्षात मात्र दोघंही फर्मच्या सोनेरी जाळ्यात अडकतात... आणि एकीकडे माफिया फॅमिली , तर दुसरीकडे एफबीआय, अशा कात्रीत सापडतात... आणि जीव वाचवत पळत सुटतात... कायमचे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    मीच हा अतिशय जोरदार शैक्षणिक पार्श्वभुमी असलेला वकिल.दोन मोठ्या प्रतिष्ठीत संस्थांच्या मुलाखती दिलेला आणि नौकरी ची निश्चिती घेऊन मेंफिस या तुलनेने लहान शहरात व चाळीस वकिल असलेल्या संस्थेत मोठ्या पगाराच्या व काही वर्षानी मीळु शकणा-या भागीदारी च्या मोह मुळे तेथेच रहायचे नक्की करत़ो.घर,गाडी ताबतोब पटकावतो.त्याच्या पत्नी चे नाव आबी.नंतर त्याला कळु लागते कि ही फर्म माफिया च्या मालकिची आहे आणि तेथे बेकायदेशीर धंदे चालतात.सावध होऊन तो डाव उलटावण्याचा निश्चय करतो. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 27-07-2010

    व्यासंग वाढवणाऱ्या साहित्यकृती… सामान्य जीवन जगत असताना असामान्य अनुभवांचे जास्तच कौतुक वाटते. मात्र, असामान्य जीवन जगणाऱ्यांची जीवनवाट जवळून पाहताना आपण कमालीचे अंतर्मुख होतो. कदाचित म्हणूनच बाजारात आलेले काही थरारक आणि चाकोरी बाहेरचे अनुवाद आवर्ुन तपासून पाहण्याजोगे ठरतात. ‘द फर्म’ हा असाच एक थरारक अनुवाद. प्रसिद्ध अमेरिकन लेखक जॉन ग्रिशॅम यांच्या या कादंबरीचा अनिल काळे यांनी केलेला अनुवाद एका वेगळ्या विश्वाची सफर घडवतो. काळा पैसा पांढरा करणे म्हणजे मराठीत मनी लाँडरिंग - टॅक्स हेवन, स्विस बँका, त्यातील ती फक्त नंबरनं ओळखली जाणारी गुप्त खाती या गोष्टी आता आपल्यासाठीही नवीन राहिलेल्या नाहीत. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये, भारतीय स्विस बँकांमध्ये दडवून ठेवलेला कित्येक लाख कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणण्याबाबत बरीच चर्चा झाली. नंतर ती अर्थातच थंडावली. ’द फर्म’ याच विषयावर बेतली आहे. ही जॉन ग्रिशेम यांची पहिली कादंबरी. तिच्यामुळे त्यांना लेखक म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि तोपर्यंत वकिली करत असलेले जॉन ग्रिशेम पुढे पूर्णवेळ लेखक बनले. कादंबरीत सर्व काही आपल्यासमोरच घडत असते. पण असे असूनही आणि पात्रांची गर्दी होऊनही कादंबरी रोचक झाली आहे. नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला एक हुशार मुलगा ‘फर्म’ मध्ये नोकरी मिळाल्यावर सुंदर भविषयकाळाची स्वप्न पाहतो. त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटते आता भरपूर पैसा आणि सुख आपल्यापुढे उभे राहिल. प्रत्यक्षात मात्र दोघंही ‘फर्म’ च्या सोनेरी जाळ्यात अडकतात. एकीकडे माफिया फॅमिली तर दुसरीकडे एफबीआयच्या कात्रीत सापडतात. त्यातून जीव वाचवत पळत सुटतात ते कायमचेच. या थरारक कथानकाला जॉन ग्रिशेम यांनी आकार दिला तर अनिल काळे यांनी त्याचा रंजक अनुवाद केला. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more