* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GOD OF ANIMALS
  • Availability : Available
  • Translators : GEETANJALI VAISHAMPAYAN
  • ISBN : 9788184982428
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 288
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN HER STUNNING DEBUT, KYLE PRODUCES AN EMOTIONALLY POWERFUL COMING-OF-AGE STORY THAT DEFTLY AND MOVINGLY CAPTURES NOT ONLY THE COMPLEXITY OF LOVE, LOSS, AND HUMAN RELATIONSHIPS BUT ALSO THE FIERCE AND POWERFUL BOND BETWEEN HORSES AND HUMANS. FROM AN AWARD-WINNING AND TALENTED YOUNG NOVELIST COMES ONE OF THE MOST EXCITING FICTION DEBUTS IN YEARS: A BREATHTAKING AND BEAUTIFUL NOVEL SET ON A HORSE RANCH IN SMALL-TOWN COLORADO. WHEN HER OLDER SISTER RUNS AWAY TO MARRY A RODEO COWBOY, ALICE WINSTON IS LEFT TO BEAR THE BRUNT OF HER FAMILY`S TROUBLES X A DEPRESSED, BEDRIDDEN MOTHER; A RETICENT, OVERWORKED FATHER; AND A RUN-DOWN HORSE RANCH. AS THE HOTTEST SUMMER IN FIFTEEN YEARS UNFOLDS AND BILLS PILE UP, ALICE IS TORN BETWEEN DREAMS OF ESCAPING THE LONELINESS OF HER DUTY-FILLED LIFE AND A LONGING TO HELP HER FATHER MEND THEIR FAMILY AND THE RANCH. TO MAKE ENDS MEET, THE WINSTONS BOARD THE PAMPERED HORSES OF RICH NEIGHBORS, AND FOR THE FIRST TIME ALICE CONFRONTS THE POWER AND SECURITY THAT CLASS AND WEALTH PROVIDE. AS HER FAMILY AND THEIR WELL-BEING BECOME INTERTWINED WITH THE LIVES OF THEIR CLIENTS, ALICE IS DRAWN INTO AN ADULT WORLD OF SECRETS AND HARD TRUTHS, AND SOON DISCOVERS THAT PEOPLE X INCLUDING HERSELF X CAN BE CRUEL, CAN LIE AND CHEAT, AND EVERY ONCE IN A WHILE, CAN DO SOMETHING HEARTBREAKING AND SELFLESS. ULTIMATELY, ALICE AND HER FAMILY MUST WEATHER A DEVASTATING BETRAYAL AND A SHOCKING, VIOLENT SERIES OF EVENTS THAT WILL TEST THEIR LOVE AND PROVE THE POWER OF FORGIVENESS. A WISE AND ASTONISHING NOVEL ABOUT THE DIFFERENT GUISES OF LOVE AND THE OFTEN STEEP TOLLS ON THE ROAD TO ADULTHOOD, "THE GOD OF ANIMALS" IS A HAUNTING, UNFORGETTABLE DEBUT.
ही गोष्ट आहे, बारा वर्षांच्या अ‍ॅलिस विंस्टनची! मोठी बहीण लग्नासाठी घरातून पळून गेलेली, सतत अंथरुणाला खिळलेली मानसिक रुग्ण असलेली आई अन् तापट, घुम्या स्वभावाचे वडील – हे तिचं कुटुंब. जोडीला मोडकळीस आलेला घोड्यांचा तबेला. गुजराण करण्यासाठी विंस्टन कुटुंबीय इतरांच्या घोड्यांची देखभाल करण्याचा निर्णय घेतात. त्या घोड्यांच्या मालकांशी (बहुतेक स्त्रिया!) त्यांच्या आयुष्याशी विलक्षण भावनिक गुंतागुंत होते. लहानगी अ‍ॅलिस शाळेत असतानाच वयाने मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडते. त्यातला आनंद मिळवत असतानाच, कठोर वास्तवाची तिला जाणीव होते. क्रौर्य, खोटेपणा, फसवणूक याबरोबरच कमालीचा चांगुलपणा, हळवेपणा प्रत्येकात असतो, याचीही जाणीव तिला या प्रवासात होते. पौगंडावस्थेतल्या निसरड्या वाटेवरची स्वप्नाळू मुलीची वाटचाल अतिशय सुरेख रीतीने लेखिकेने वर्णन केली आहे. अद्भुत अनुभवांचा प्रत्यय देणारी अविस्मरणीय कादंबरी!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEGODOFANIMALS #THEGODOFANIMALS #दगॉडऑफअ‍ॅनिमल्स #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GEETANJALIVAISHAMPAYAN #ARYNKYLE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more