* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GOD OF SMALL THINGS
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788177662535
  • Edition : 9
  • Publishing Year : NOVEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ARUNDHATI ROY COMBO SET-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK WAS INTERNATIONALLY FELICITATED BY THE `BOOKER AWARD`. THE VOICE AND ECHOES, THE TEARS AND THE SMILES, THE CALLS AND THE ANSWERS COMING OUT OF THE CORE OF THE EARTH ARE THE SOUL OF THIS NOVEL, `GOD OF SMALL THINGS`. IT IS GARNISHED WITH THE INEVITABLE FEAR WHICH A HUMAN MIND EXPERIENCES ALONG WITH THE INEVITABLE DESTINY. THIS STORY IS FULL OF LOVE, HATRED, EGO, JEALOUSY, TREACHERY, FEELING OF GUILT AND VARIOUS SUCH ASPECTS OF LIFE WHICH ARE INEVITABLE IN A HUMAN LIFE. THE AUTHOR HAS WOVEN ALL THESE TOGETHER EXCELLENTLY WELL. SHE HAS CAPTURED US ALL IN IT MAKING IT IMPOSSIBLE TO COME OUT OF IT, TO FREE OURSELVES. THE PICKLE SMELLS OF THE SALTED RAW MANGOES, THE JELLY SMELLS OF THE RIPE BANANAS. WE ALSO COME ACROSS THE CHILDREN SINGING SONGS WHILE TRAVELLING TO THEIR NATIVE PLACES OR ACTUALLY TOWARDS THE UNAVOIDABLE SADNESS. THE STORY IS A WEIRD YET FASCINATING COMBINATION OF LAMENTATION, MYSTERY AND MELANCHOLY. SINCE THE VERY BEGINNING WE GET HYPNOTIZED, MESMERIZED. WE REALIZE THAT WE ARE WITNESSING SOMETHING TOTALLY FRESH AND NEW HAVING THE POWER TO CAPTURE OUR MINDS. THIS IS THE ONLY STORY OF ITS TYPE. NONE OTHER WILL BE EVER AS GOOD AS THIS.
पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीती आणि नियतीच्या पाशामधली अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणा-या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक ताणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्यासारखे धावत राहतात... विणले जातात... त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:ला अलग करता येत नाही. लोणच्यामध्ये खारवलेल्या आंब्यांचा, जॅममधल्या पिकल्या केळ्यांचा वास येत राहातो. मामाच्या गाडीत बसून एका अपरिहार्य शोकांतिकेकडे प्रवास करणा-या मुलांची गाणी ऐकू येतात. कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्नता हे सारेच एक अजब चेटूक आहे. जाणिवांना संमोहन घालणारा प्रारंभ वाचतानाच लक्षात येते, की नवीन काहीतरी सांगणा-या एका ताज्यातवान्या प्रतिभेने आपल्या मनाची पकड घेतली आहे.. श्वास रोखून धरायला लावणारा नवा स्वर! यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितलीच जाणार नाही. हीच पहिली... आणि एकमेव ! (आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ‘बुकर पुरस्कार’ विजेत्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ला मिळालेल्या जागतिक अभिप्रायांमधून)
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स पुरस्कार २००३ / साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २००३
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#THEGODOFSMALLTHINGS #ARUNDHATIROY #APARNAVELANKAR #BOOKERAWARD #
Customer Reviews
  • Rating StarMayur Wagh

    द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स चा मराठी अनुवाद वाचून पूर्ण झाला. खरोखरच अपर्णा वेलणकर यांनी अनुवाद उत्कृष्टपणे केला आहे. मूळ इंग्रजी कादंबरी रटाळ वाटते, परंतु अनुवाद वाचताना खूपच इंटरेस्ट आला, कदाचित मराठी मातृभाषा असल्याने अस वाटत असेल, पण अनुवाद निश्चितपणे ूळ भाषेपेक्षा भारी आहे. ...Read more

  • Rating StarManasi Lad- Gudhate

    हे पुस्तक वयाच्या आणि परिपक्वतेच्या ज्या पडावावर माझ्या हाती आले ते सारे अत्यंत योग्यरित्या जुळून आलेले योग असावेत. या पुस्तकाने मला काय दिलं ते शब्दांत सांगून समजणं अशक्य आहे. अरुंधती रॉयने जे लिहून ठेवलंय ते अचाट आहेच.... पण अपर्णा वेलणकर ने लिहिेला अनुवाद वाचून मला अनुवाद वाचण्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली. आधी एकदा लहानपणी हे पुस्तक जे मी वाचता वाचता अर्धवट सोडले होते... अर्थातच डोक्यावरून गेल्यामुळे. त्याच सुमारास या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे भविष्यात कधीतरी हे पुस्तक पुन्हा वाचायला घ्यायचे अशी नोंद मेंदूत तेंव्हाच झालेली असावी. आणि पुन्हा हे पुस्तक हाती आलं तेंव्हा असं लक्षात आलं की हे पूर्ण वाचल्याशिवाय मी स्वत: पूर्ण होऊच शकत नाही...! अनेकांना हे पुस्तक दुर्बोध वाटू शकते. काहिंनी तर ’किळसवाणे’ किंवा ’ओंगळ’ अशीही प्रतिक्रीया दिली. पण मला हे पुस्तक एका वेगळ्याच पातळीवर अत्यंत भावले. त्यात ओंगळ असे काहीही नाही! आणि तसेही ओंगळ काही असलेच तर ते आपले माणूस म्हणून दैनंदिन जगणे हेच! त्या जगण्याचेच अस्सल शुद्ध प्रामाणिक स्वरूपात वर्णन असलेली ही कादंबरी खरंतर आपल्याला आपलेच अंतरंग त्यातल्या जाणिवा - उणिवांनिशी उघड करून दाखवते. या पुस्तकाच प्रत्येक वाचकाला अत्यंत मुलभूत आणि प्रामाणिक स्वरूपात स्वत:ला पाहता, ओळखताच नव्हे तर सामोरेही जाता येईल (नव्हे जावेच लागेल) अशी एक विलक्षण सोय नकळतपणे लेखिकेने करून ठेवलेली आहे! हे सामोरे जाणे सुखावह नक्कीच नसते नाही का? मग असल्या वर्मी घाव घालणार्‍या लेखनाला शेवटपर्यंत भिडणे एक असह्य अनुभव होऊन बसतो! असह्य... वेदनामय.... पण प्रामाणिक! आणि खरं सांगायचं तर... आवश्यक! संपूर्ण कादंबरीभर परसलेलं सतत पार्श्वभूमीला भळभळणारं एक दु:ख आहे! बर्फाच्या टणक लादीखालून संथ मूक वाहणार्‍या थंडगार पण जिवंत नदिसारखं ते एकसूरी वाहत राहतं. दिसत नाही तरी जाणवत राहतं. मध्येच प्रकट होतं मध्येच अदृष्य होतं... पण ते असतंच. सतत. कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत ते दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही. ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’! निव्वळ मुर्तिमंत नैराश्याची, माणसाच्या चिरकाळ निरंतर दुःखाची, आणि अस्तित्त्वाच्या अस्वस्थ करून सोडणार्‍या निरुत्तर प्रश्नांची गोष्ट आहे ’गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’. माणूस म्हणून जगताना स्वत:च्या अश्या भक्कम संवेदना बाळगून असण्यार्‍या प्रत्येकाला चिरस्मरणीय अनुभूती देऊन जाणारी ही कादंबरी आहे यात शंकाच नाही! आणि अनुवादही आश्चर्य़ वाटावे इतका सुरेख अप्रतिम केलेला आहे. वाचताना कुठेही रसभंग होत नाही. दुःखाची ठसठशीत जाणिव अनुवादातही व्यवस्थित जपली गेली आहे. उत्कृष्ठ अनुवाद कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण! ...Read more

  • Rating StarNarendra Sonaje

    मराठी भाषेचे वेगळेच अनुवादित सौंदर्य

  • Rating StarD.Nitin

    अपर्णा वेलणकर मॅडमनी मराठीत ट्रान्सलेट करताना सगळे शब्द उत्तम वापरलेत.. अगदी वेलुथा ला शेवट पोलीसांनी दिलेल्या शिव्या सुद्धा शब्द बदल न करता मांडल्यात ! बाकी ह्या गोष्टीची १५० पान काय वाचतोय कळत नाय..पण लेखिकेच अलंकारिक वर्णन पुस्तक खाली ठेवु देत नय.. राहेल -ईस्थापन,अम्मु,बेबी कोचम्मा,चाको,कॉम्रेड पिल्लई ,वेलुथा हिच महत्त्वाची पात्र.. १५० पानानंतर स्टोरीचा एंड जाणुन घ्यायची ईच्छा होते.. पुर्ण पुस्तक वाचल्यानंतर समजेल की ह्या पुस्तकानी अवॉर्ड का जिंकला होता ते.. जोपर्यंत मी अॅना कॅरेनिना आणि नॉट विदाउट माय डॉटर पुर्ण वाचत नाही तोपर्यंत हेच माझ आवडत पुस्तक राहील.. बाकी एक गोष्ट खात्रीनी सांगतो..द.गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचल तर ते नक्कीच तुमच फेवरेट असेल.. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more