IN THIS STUNNING FOLLOW-UP TO THE GLOBAL PHENOMENON THE DA VINCI CODE, DAN BROWN DEMONSTRATES ONCE AGAIN WHY HE IS THE WORLD’S MOST POPULAR THRILLER WRITER. THE LOST SYMBOL IS A MASTERSTROKE OF STORYTELLING THAT FINDS FAMED SYMBOLOGIST ROBERT LANGDON IN A DEADLY RACE THROUGH A REAL-WORLD LABYRINTH OF CODES, SECRETS, AND UNSEEN TRUTHS . . . ALL UNDER THE WATCHFUL EYE OF BROWN’S MOST TERRIFYING VILLAIN TO DATE. SET WITHIN THE HIDDEN CHAMBERS, TUNNELS, AND TEMPLES OF WASHINGTON, D.C., THE LOST SYMBOL IS AN INTELLIGENT, LIGHTNING-PACED STORY WITH SURPRISES AT EVERY TURN. THIS IS DAN BROWN’S MOST EXCITING NOVEL YET.
फ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा , छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली.
मग चोवीस तासांत एक थरारक व रोमहर्षक नाट्य सुरू झाले... रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआयएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले... सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचेतरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या... शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का?.... चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंब-यांएवढीच ही एक अगदी अलीकडची उत्कंठावर्धक कादंबरी!