* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAN IN THE WOODEN HAT
  • Availability : Available
  • Translators : MEENA SHETE SAMBHU
  • ISBN : 9788184985474
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NEW YORK TIMES CALLED SIR EDWARD FEATHERS ONE OF THE MOST MEMORABLE CHARACTERS IN MODERN LITERATURE. A LYRICAL NOVEL THAT RECALLS HIS FULLY LIVED LIFE, OLD FILTH HAS BEEN ACCLAIMED AS JANE GARDAM?S MASTERPIECE, A BOOK WHERE LIFE AND ART MERGE. AND NOW THAT BEAUTIFUL, HAUNTING NOVEL HAS BEEN JOINED BY A COMPANION THAT ALSO BURSTS WITH HUMOR AND WISDOM: THE MAN IN THE WOODEN HAT. OLD FILTH WAS EDDIE?S STORY. THE MAN IN THE WOODEN HAT IS THE HISTORY OF HIS MARRIAGE TOLD FROM THE PERSPECTIVE OF HIS WIFE, BETTY, A CHARACTER AS VIVID AND ENCHANTING AS FILTH HIMSELF. THEY MET IN HONG KONG AFTER THE WAR. BETTY HAD SPENT THE DURATION IN A JAPANESE INTERNMENT CAMP. FILTH WAS ALREADY A SUCCESSFUL BARRISTER, HANDSOME, FAST BECOMING RICH, IN NEED OF A WIFE BUT UNACCUSTOMED TO ROMANCE. A PERFECT ENGLISH COUPLE OF THE LATE 1940S. AS A PORTRAIT OF A MARRIAGE, WITH ALL THE BITTERSWEET SECRETS AND SURPRISING FULFILLMENT OF THE 50-YEAR UNION OF TWO REMARKABLE PEOPLE, THE NOVEL IS A TRIUMPH. THE MAN IN THE WOODEN HAT IS FICTION OF A VERY HIGH ORDER FROM A GREAT NOVELIST WORKING AT THE PINNACLE OF HER CONSIDERABLE POWER. IT WILL BE READ AND LOVED AND RECOMMENDED BY ALL THE MANY THOUSANDS OF READERS WHO FOUND ITS PREDECESSOR, OLD FILTH, SO COMPELLING AND SO THOROUGHLY SATISFYING.
एडवर्ड, बेट्टी आणि व्हेनिरिंग या प्रेमाच्या त्रिकोणात, अनेक योगायोगाने भरलेल्या आणि अतक्र्य घटना घडत जातात. विश्वासघात, फसवणूक, सूड आणि प्रेम यांच्या बेमालूम मिश्रणातून तीन आयुष्यांचा प्रवास होतो. अखेर काय होते? दुस-या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर साकारलेली जेन गार्डम यांची रहस्यमय कादंबरी. ‘एक अतुलनीय!’ – गॉर्डियन ‘देदीप्यमान, ठाव घेणारे आणि करुणामय!’ जरूर वाचावे असे. – डेली मेल ‘सुंदर, सुस्पष्ट आणि निश्चितच मनोरंजक!’ – द टाइम्स ‘सहज, सुंदरपणे लिहिलेले आणि अनोख्या पद्धतीने सांगितलेले!’ – स्पेक्टॅटर ‘अलिशान!’ – सन्डे टाइम्स
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEMANINTHEWOODENHAT @THEMANINTHEWOODENHAT #दमॅनइनदवुडनहॅट #FICTION #TRANSLATED #FROMENGLISHTOMARATHI #MEENASHETESAMBHU #JANEGARDAM"
Customer Reviews
  • Rating Starलोकसत्ता, ८ जून २०१८

    प्रेमकथा असलेली कादंबरी हा साहित्यातला लोकप्रिय प्रकार. पण या प्रकारात जर रहस्यमयता आली तर ती कादंबरी आणखीनच रंजक होते. अशीच एक कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने आणली आहे. जेन गार्डम लिखित आणि डॉ. मीना शेटे-संभू अनुवादित ‘द मॅन इ द वुडन हॅट’ या पुस्तकातएका रंजक कादंबरीचा अनुभव घेता येतो. एडवर्ड, बेट्टी आणि व्हेनरिंग ही या कादंबरीची मुख्य तीन पात्रं. या तीन पात्रांनी होतो एक त्रिकोण. या त्रिकोणात योगायोगाने अनेक अतक्र्य घटना घडत जातात. फसवणूक, सूड, प्रेम, मैत्री विश्वासघात या सगळ्यातून त्यांचं आयुष्य पुढे पुढे जात असतं. पण या त्रिकोणाचं शेवटी होतं काय, हे सांगणारी ही मनोरंजक कहाणी आहे. या कादंबरीचे लेखन पाच भागांमधे विभागले आहे. या पाच भागांमध्येही छोटी छोटी प्रकरणं आहेत. त्यामुळे कादंबरी ठराविक भागांमधे वाचता येते. सहज सोप्या भाषेत लिहिलेली ही कादंबरी वाचकांना नक्कीच आवडेल. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA, SATARA 11-01-2015

    रहस्यमय कादंबरी... एडवर्ड, बेट्टी आणि व्हेनिरिंग या प्रेमाच्या त्रिकोणात, अनेक योगायोगाने भरलेल्या आणि अर्तक्य घटना घडत जातात. विध्वासघात फसवणूक, सूड आणि प्रेम यांच्या बेलालूम मिश्रणातून तीन आयुष्यांचा प्रवास होतो. अखेर काय होते? दुसऱ्या महायुद्धाच्ा पार्श्वभूमीवर साकारलेली जेन गार्डम यांची रहस्यमय कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more