* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NAMESAKE
  • Availability : Available
  • Translators : ULKA RAUT
  • ISBN : 9788177668483
  • Edition : 3
  • Publishing Year : JUNE 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HIS LIFE WAS FULL OF ACCIDENTS; IT STARTED WITH THE ACCIDENT TO HIS FATHER`S TRAIN. THAT ACCIDENT BESTOWED THE NAME GOGOL UPON HIM. THEY COULD NEVER KNOW THE NAME HIS GREAT GRANDMOTHER HAD SELECTED FOR HIM. HER LETTER WAS LOST DURING THE JOURNEY FROM KOLKATA TO CAMBRIDGE. HE HAD TO SUFFER THE CONSEQUENCES THROUGHOUT HIS LIFE. WHEN IT WAS TIME TO DECIDE ON HIS NAME, HIS FATHER REMEMBERED THE ACCIDENT WHICH WOULD HAVE KILLED HIM, BUT THE BOOK HAD SAVED HIM, GOGOL`S BOOK; HENCE HE WAS GIVEN THE NAME. BUT THIS VERY NAME HARASSED HIM FOR MANY YEARS. WHEN HE WAS QUITE OLD, HE CHANGED HIS NAME BUT STILL THE CONSEQUENCES ALWAYS ACCOMPANIED HIM, THROUGHOUT. WE NEVER KNOW OUR FUTURE. EVERYTHING HAPPENS ALL OF A SUDDEN. WE CANNOT PREPARE OURSELVES FOR THE HAPPENINGS. WE CARRY FORWARD THE BALANCE OF THESE PAST EVENTS AND LEAD OUR LIFE THROUGH THE FUTURE. WHEN WE TRY TO FIND OUT THE HIDDEN MEANINGS OF THE PAST, THEN WE REALIZE THAT LIFE IS FULL OF EVENTS WHICH SHOULD NOT HAVE HAPPENED AT ALL OR WHICH HAVE A MEANING TO THEM OF WHICH WE ARE NEVER AWARE.
...तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनंच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून. ...गोगोल हे नावही अपघातानंच त्याला मिळालं त्याच्या पणजीनं निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात आठवला, ज्याच्या पुस्तकामुळं ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावानं त्याचं नामकरण झालं. या विचित्र नावानं त्याला खूप छळलं. मोठा झाल्यावर त्यानं ती चूक दुरुस्त केली; तरीही `गोगोल` नावानं त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही... ...भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THE NAMESAKE #दनेमसेक #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHIULKARAUT #उल्काराऊत #JHUMPALAHIRI #ASHIMA # GOGOL"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 29-07-2007

    गोगोलची गोष्ट… ‘द नेमसेक’ ही झुंपा लाहिरी यांची मूळ कादंबरी. मेहता प्रकाशनाने ती मराठीत आणली आहे. झुंपा लाहिरी ही इंग्रजीतून लिहिणारी भारतीय वंशाची लेखिका. जन्म इंग्लंडमधला, करियरही तिथलंच. निर्वासित भारतीयांचं जगणं हा तिचा लिखाणचा मुख्य विषय. त्याते वेगवेगळे कंगोरे मांडणाऱ्या तिच्या ‘इंटरप्रिटर ऑफ मेलडीज’ या कथासंग्रहाला तर २००० मध्ये फिक्शनसाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. ‘इंटरप्रिटरचा...’ मराठी अनुवाद केला आहे भारती पांडे यांनी. पर्ल बकच्या ‘द गुड अर्थ’चा ‘काळी हा त्यांनी केलेला अनुवाद जेवढा सकस होता, तेवढाच इंटरप्रिटरचाही आहे. ‘काळी’ मधला शेतकरी केवळ चिनी शेतकरी न उरता तो भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, जपानी, कोरियन असा कुठलाही शेतकरी असू शकतो. तसंच ‘इंटरप्रिटर’मधली स्पंदनं कुठल्याही निर्वासितांची असू शकतात, इतकी ती प्रातिनिधिक आहेत. ‘द नेमसेक’चा उल्का राऊत यांनी चांगला अनुवाद केला आहे. कोलकत्त्यातून अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या एका जोडप्याची ही कथा. या जोडप्याचा मुलगा गोगोल हा कादंबरीचा नायक आहे. त्याचा भारतीय वंश, गोगोल हे नाव, भारतीय संस्कृती आणि तिथली संस्कृती या सगळ्याचा अखंड झगडा गोगोलच्या मनात सुरू आहे. त्याचं चित्रण कादंबरी करते. ‘द नेमसेक’ वर मीरा नायर यांनी चित्रपटही बनवला. तब्बू, इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा स्पेशल फसला असला तरी कादंबरी मात्र नक्कीच वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 24-02-2008

    खिळवून ठेवणारं सहज कथन… झुंपा लाहिरी कादंबरीतली एकेक व्यक्तिरेखा त्यांच्या खास शैलीत नेमकी उभी करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खास लक्षात राहते. साध्या प्रसंगांमधून नाट्य खुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. हे करताना आपण काहीतरी महत्त्वाचं ांगतोय, असा त्यांचा आव नाहीय. साध्यासोप्या शैलीत सहज कथनातून पुढे जाणारी गोष्ट वाचकाला खिळवून ठेवते. जगावेगळी स्वप्नं घेऊन सातासमुद्रापलीकडे गेलेल्यांना तिथलं आभाळ कितीही खुणावत असलं तरी मातीची ओढ अस्वस्थ करतेच. लौकिकार्थाने परक्या देशात आपली ओळख निर्मार झाली तरी खऱ्या अर्थाने आपल्याला ओळखणारी आपली माणसं दूर राहिलेली असतात. परतीच्या वाटेचा विचार कधीच मागच्या वळणावर राहून गेलेला असतो. मग सुरू होतो, ओळख टिकवून ठेवण्याचा अट्टाहास. मुलांमध्ये आपली रूट्स रुजवण्याचे प्रयत्न आणि आपल्यासारख्या समदु;खी लोकांचा कंपू करून आठवणी काढत उसासे टाकणं... अमेरिकेत गेलेल्या पहिल्या पिढीचं हे प्रातिनिधिक चित्र. पण तिथे जन्माला आलेल्या पिढीचे प्रश्न आणखी वेगळे होतात. जन्माने अमेरिकन, अस्तित्वाची सगळी परिमाणं अमेरिकन पण घरात मात्र भारतीय संस्कार टिकवण्याचा आग्रह. सणवारांचे सोपस्कार आणि वर्ष दोन वर्षात भारत नावाच्या देशात जाऊन तिथल्या नातेवाईकांच्या भेटीगाठी. या सगळ्यांमध्ये ही मलं गुदमरून जातात. दोन्ही पिढ्यांचा अमेरिकेच्या भूमीवरचा स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रयास दोन वेगळ्या पातळ्यांवरचा. स्थलांतरित भारतीयांच्या या दोन पिढ्यांचा मनोव्यापार वाचकांसमोर आणणाऱ्या झुंपा लाहिरींच्या ‘द नेमसेक’ या कादंबरीचं जागतिक साहित्य विश्वात जोरदार स्वागत झालं. पुलित्झर मिळवणाऱ्या ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’च्या लेखिकेचं दुसरं पुस्तक् म्हणून या कादंबरीची हवा आधीच झाली होती. न्यूयॉर्क टाइम्स, डेली टेलिग्राफ, ऑब्झव्र्हर यांसारख्या प्रसिद्ध नियतकालिकांनी कादंबरीचं कौतुक करणारी परीक्षणं प्रसिद्ध केल्यावर बेस्टसेलरच्या यादीत ते जाणार हे स्वाभाविक होतं. याच कादंबरीचा उल्का राऊत यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. गोगोल गांगुली हा या कादंबरीचा नायक. अशोक आशि अशिमा गांगुली या बंगाली जोडप्याचा मुलगा. गोगोलच्या जन्मापासून कथा सुरू होते. ‘गोगोल’ नावाभोवतीच्या आयडेण्टिटी क्रायसिसच्या नाटकामध्ये संपूर्ण कादंबरी गुंफली असली, तरी ही गोष्ट केवळ गोगोलची राहत नाही. सगळ्या गांगुली कुटुंबाची आणि स्थलांतरितांच्या दोन पिढ्यांची ती कधी होऊन जाते ते कळतही नाही. गोगोलच्या जन्मापूर्वीच त्याच्या पणजीने निवडलेलं त्याचं नाव असलेलं पत्र कलकत्ता ते केंब्रिज प्रवासात गहाळ होतं. त्याचे बाबा निकोलाय गोगोल या आवडत्या लेखकाच्या नावावरून त्याचं नाव गोगोल ठेवतात. ‘डाकनाम’ म्हणून दिलं गेलेलं हे नाव त्याला कायमचं चिकटतं. हेच नाव हवं म्हणून गोगोल बालवर्गात हट्ट करतो. पण शाळकरी वयात लॉसन नावाचे शिक्षक त्याला गोगोल हा आयुष्यभर असमाधानी, दु:खी राहिलेला लेखक होता हे सांगतात. नंतर मात्र तो त्या नावाचा तिरस्कार करू लागतो आणि निखिल हे नाव स्वीकारतो. अठरा वर्षं सोबत राहिलेलं हे नाव कधीच पुसलं जात नाही. आपलं जुनं नाव उघड होऊन आपली नाचक्की होईल ही भावना त्याचा आयुष्यभर पाठलाग करत राहते. गोगोलचं एकटेपण, त्याचं स्वत:च्या कोषात राहणं कादंबरीत सामोरं येत राहतं. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांशीही तो मनाने गुंतत नाही. मॅक्झिनबरोबर तो तिच्या घरी राहायला गेल्यावरही त्यांचं नातं शारीर पातळीवरच समोर येंत. ब्रिजेटसोबतचं नातंही काही दिवसच टिकतं. आईच्या आग्रहाने आयुष्यात आलेल्या मौशुमी मुजुमदारबरोबरचं लग्न टिकवतानाही दोघांचे बंगाली रूट्स फारसे उपयोगी पडत नाहीत आणि वयाच्या चौतिसाव्या वर्षी गोगोल पुन्हा नव्याने ‘स्वत:ची ओळख शोधत’ एकटा उरतो. गांगुली कुटुंबाच्या अमेरिकन होत जाण्याच्या प्रक्रियेत नातेसंबंधांचे आणि मायदेशाशी असलेल्या जवळीकीचे एक एक बंध हळूहळू मिटत जातात. अशोकला अमेरिकेत येण्यापूर्वी झालेला अपघात आयुष्यभर त्याच्या सोबत राहतो. आठवणीतून वेळीअवेळी डोकं वर काढून त्याला छळत राहतो. अशिमा कधीच पूर्णपणे अमेरिकेशी एकरूप झालेली दिसत नाही. तिच्या बंगालमधल्या नातेवाईकांमध्ये ती मनाने गुंतली आहे. तिचं अशोकशी, मुलांशी एकरूप होणं हेच तिचं व्यक्तिमत्त्व आहे. बंगाली कुटुंबांचं गेटटुगेदर एवढंच तिचं सामाजिक आयुष्य आहे. सोनियाचं व्यक्तिमत्त्व इतर पात्रांच्या तुलनेत थोडं धूसर आहे. गोगोलची धाकटी बहीण आरि टिपिकल अमेरिकन मुलगी तिच्यात दिसते. पण गोगोलसारखी ती अंतर्मुख नाही. तिच्या आयुष्यात फारशी वळणंही नाहीत. बॉयफ्रेंडबरोबर असलेल्या तिच्या नात्यामध्ये कुठेही संघर्ष नाही. अमेरिकन जीवनशैलीशी नीट जुळवून घेतलेलं हे कादंबरीतलं एकमेव पात्र आहे. झुंपा लाहिरी कादंबरीतली एकेक व्यक्तिरेखा त्यांच्या खास शैलीत नेमकी उभी करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खास लक्षात राहते. साध्या प्रसंगांमधून नाट्य खुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. हे करताना आपण काहीतरी महत्त्वाचं सांगतोय, असा त्यांचा आव नाहीय. साध्यासोप्या शैलीत सहज कथनातून पुढे जाणारी गोष्ट वाचकाला खिळवून ठेवते. उल्का राऊतांनी मूल कादंबरीची मजा अनुवादात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही वेळा शब्दश: केलेलं भाषांतर वाचनाची मजा खिळखिळी करतं. कादंबरीची सुरुवात होते ते वाक्य असं आहे... ‘ऑगस्ट महिना संध्याकाळ झाली तरीही भरपूर उकडत होतं.’ डोनाल्डचं वर्णन करताना ‘उंच, देखणा आरि राजबिंडा, फिक्या तपकिरी रंगाचे, काहीसे तेलकट केस मागे विंचरलेले असा डोनाल्ड शर्टच्या बाह्या वर सरसावून पास्र्लीची भली मोठी जुडी साफ करत होता.’ ...असं लांबलचक वाक्य येतं. पण अशी उदाहरणं अपवादानेच दिसतात. स्थलांतरित भारतीय वंशाच्या मानसिकतेतून उमटलेली, जगभर गाजलेली एक ‘बेस्टसेलर’ मराठीमध्ये आणण्याचं श्रेय उल्का राऊतांना जातं हे मात्र निश्चित! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more