* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE RAINMAKER
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788177664352
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO SET - 15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT’S SUMMER IN MEMPHIS. THE SWEAT IS STICKING TO RUDY BAYLOR’S SHIRT AND CREDITORS ARE NIPPING AT HIS HEELS. ONCE HE HAD ASPIRATIONS OF BREEZING THROUGH LAW SCHOOL AND PUNCHING HIS TICKET TO THE GOOD LIFE. NOW HE DOESN’T HAVE A JOB OR A PRAYER—EXCEPT FOR ONE: AN INSURANCE DISPUTE THAT LEAVES A FAMILY DEVASTATED AND OPENS THE DOOR FOR A LAWSUIT, IF RUDY CAN FIND A WAY TO FILE IT. BY THE TIME RUDY GETS TO COURT, A HEAVYWEIGHT CORPORATE DEFENSE TEAM IS THERE TO MEET HIM. AND SUDDENLY HE’S IN OVER HIS HEAD, PLUNGED INTO A NIGHTMARE OF LIES AND LEGAL MANEUVERINGS. A CASE THAT STARTED SMALL IS EXPLODING INTO A THUNDEROUS MILLION-DOLLAR WAR OF NERVES, SKILL, AND OUTRIGHT VIOLENCE—A FIGHT THAT COULD COST ONE YOUNG LAWYER HIS LIFE, OR TURN HIM INTO THE BIGGEST RAINMAKER IN THE LAND.
कायद्याची पदवी नुकतीच मिळवलेला, पोरसवदा रुडी बेलर. अत्यंत हलाखीची परिस्थिती, वाढती देणी. बिचा-याच्या हातात फक्त एक आणि एकच केस आहे... अर्थात, त्यातूनही फारशा कमाईची आशा नाहीच म्हणा, कारण त्याची क्लायंट तरी कुठे फार श्रीमंत आहे? डॉट ब्लॅकनं – रुडी बेलरच्या क्लायंटनं – एका प्रचंड मोठ्या इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलाय. तिच्या मुलाचा ‘मेडिकल इन्शुअरन्स क्लेम’ मान्य करून ही कंपनी, तिच्या मुलाचे प्राण वाचवू शकली असती. पण तो क्लेम कंपनीनं नाकारला आणि तिचा मुलगा मृत्युमुखी पडला. या केसमधून तिला कंपनीकडून लक्षावधी डॉलर मिळू शकतील – पर्यायानं रुडी बेलरलाही. पण एक प्रॉब्लेम आहे – रुडी बेलरनं अजूनपर्यंत कोर्टात केसच लढवलेली नाही, आणि तो मेंफिस शहरातल्या सगळ्यात महागड्या आणि प्रथितयश वकिलासमोर उभा आहे. काय होणार या ‘लीगल बॅटल’चं? रुडी बेलर चमत्कार करून ‘इन्स्टंट रेनमेकर’ होणार का?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarSandeep Bade

    द रेनमेकर By ---जॉन ग्रिशम मेहता पब्लिशिंग हाऊस अनुवादक --अनिल काळे जॉन ग्रिशम यांच्या कादंबऱ्यांच वैशिष्ट्य म्हणजे.. कथानायक एक वकील...जो न्याय व्यवस्थेला जिवंत ठेवण्याच काम करतो...कधी मोठमोठ्या कंपन्यापासून, उद्योगलॉबीपासून, राजकारणी,माफियापासून तर कधी यांच्याशी हातमिळवणी करून सामान्य जनतेला न्यायापासून दूर ठेवणाऱ्या वकीलफ़र्म पासून... यामध्ये.. हालाखीच्या परिस्थितीतुन.. नुकताच वकील झालेला, परंतु कोणत्याच वकीलफ़र्म मध्ये नोकरी न मिळालेला रुडी बेलर.. त्याच्या हातामध्ये फक्त एकच केस... एक बलाढ्य इन्शुरन्स कंपनी.. जी आपल्या विमाधारक डॉट ब्लॅक या महिलेच्या आजारी मुलाचा `मेडिकल इन्शुरन्स क्लेम ` नाकारते... परिणामी त्या मुलाचा मृत्यू होतो... डॉट ब्लॅक.. रुडी बेलर मार्फत... त्या कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा करते... यामध्ये... बलाढ्य इन्शुरन्स कंपन्या कशा नियमबाह्यपणे विमाधारकांचे क्लेम नाकारून गडगंज नफा कमावतात, कदाचित कुणी कोर्टात गेल्यास त्याचबरोबर सेटलमेन्ट करतात, यातूनही कोर्टात केस उभी राहिल्यास...विम्यापेक्षा जास्त पैसा मोठमोठ्या वकील खर्च करतात परंतु क्लेम द्यायाच टाळतात... याच वास्तववादी चित्रण लेखक डोळ्यासमोर उभ करतो... सर्व सत्य परिस्थिती माहित असूनही मोठमोठ्या वकीलफ़र्म पैशासाठी, कायद्याच्या नावाखाली, कशी नैतिकता गुंडाळून ठेवतात...हेही लेखक कसलाही आडपडदा न ठेवता स्वछपणे मांडतो.. त्याच बरोबर रुडी बेलरच समांतर आयुष्य, त्यातील चढउतार, स्वतःच्या इच्छा आकांशा याही गोष्टी छानपणे मांडल्या आहेत... तसंच यातील प्रत्येक व्यक्तीरेखेला योग्य न्याय दिल्याने त्याही मनात घर करून बसतात.. मग तो त्याचा मित्र बेकर, कोर्टकेस मध्ये जीव तोडून मदत करणारा डेक, न्यायाधिश हार्वे हेल, किल्पर असोत कि विरोधी वकील ड्रमंड असो... कि प्रेयसी केली रिकर.... खरंतर, इन्शुरन्स, कायदे, कोर्ट केसेस म्हणजे अगदी रटाळवाने विषय... परंतु जॉन ग्रिशम इतक्या रोमांचक पद्धतीने मांडतात की पुस्तक हातातून अर्धवट बाजूला ठेवणं जीवावर येत... इतक हे उत्कंठावर्धक आहे.. तर तर... रुडी बेलर चमत्कार करून, `इन्स्टंट रेनमेकर ` म्हणजे तो ही केस जिंकणार का आणि कशी? त्यासाठी तुम्हाला हे पुस्तकं वाचावं लागणार... --#संदीपबडे#-- ...Read more

  • Rating Starविनोद भालेराव

    वकीली व्यवसायाच्या पार्श्वभूमीवरील आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या अंतर्गत घडामोडीवरील ही कादंबरी अतिशय आवडली. खटल्याच्या वेळचे प्रसंग, दोन्ही बाजूचे वकील, न्यायमूर्ती, ज्यूरी, कोर्ट हॉल इ. सर्व स्पष्टपणे डोळ्यांसमोर उभे राहतात.

  • Rating StarDAINIK LOKMAT 09-05-2004

    अमेरिकन वास्तवाचा अनुभव… इंग्रजी साहित्य वाचणाऱ्यांच्या यादीत जॉन ग्रिशम हे नाव लोकप्रिय आहे. साधी, सरळ, सोपी भाषा, विषयाची अचूक जाण आणि नेमकेपणा, यामुळे जॉन ग्रिशम यांची टेस्टामेंट, पेलिकन ब्रीफ, चेंबर यासारखी पुस्तके वाचताना वाचक नक्कीच त्यात रंगू जातो. ‘द रनमेकर’ हे पुस्तकही याच मालिकेतले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अनिल काळे यांनी केला आहे. मूळ इंग्रजी कादंबरीतील सर्व बारकावे, व्यक्तीचित्रणे त्यांनी अतिशय अचूक शब्दांत शब्दबद्ध केलेली आहेत. ‘द रेनमेकर’चा कथानायक रुडी बेलर हा एक नुकतीच कायद्याची पदवी प्राप्त केलेला तरुण आहे. हातात पदवीचं भेंडोळं आणि मनात काहीतरी वेगळं करून दाखविण्याची, न्याय्य हक्कासाठी लढण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन रूडी बाहेरच्या जगात प्रवेश करतो तेव्हा त्याला माणसांचे विविध नमुने अनुभवायला मिळतात. त्यांची पहिली क्लाएंट असते डॉट ब्लॅक. तिला एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल करायचा असतो. डॉटच्या मुलाचा वैद्यकीय विम्याचा दावा कंपनी मान्य करीत नाही. अपुऱ्या पैशांअभावी मुलावर उपचार होत नाहीत आणि डॉटचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडतो. डॉटला विमा कंपनीला धडा शिकवायचा असतो. तिला नुकसानभरपाईदाखल मिळणाऱ्या पैशांमध्ये जराही रस नसतो. रुढी बेलर हा तरुण वकील कथानायक या कामी सर्व मदत करण्याचे मान्य करतो. या पहिल्याच केसमध्ये त्याच्या विरुद्ध पक्षाकडे असते कसलेल्या, निष्णात वकिलांची फौज! रुडीचा साथीदार ढेक हा कायद्याची बार परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेला, पण कायद्याच्या सर्व खाचाखोचा माहीत असलेला माणूस असतो. तो स्वत:ला ‘पॅरालॉयर’ म्हणवून घेत असतो! रुडी आणि डेक मिळून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रेट बेनिफीट इन्शुरन्स कंपनी, त्यांच्यासाठी काम करणारी वकील मंडळी या सर्वांचाच अभ्यास करतात. त्यांची बलस्थाने, मर्मस्थाने शोधून काढताता आणि डॉटला नुकसानभरपाईची घसघशीत रक्कम कोर्टाकडून मंजूर करून घेतात. अर्थात, ही रक्कम प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत दावे-प्रतिदावे चालूच राहणार आणि वर्षानुवर्षे केस कोर्टात राहणार हे अपरिहार्य. पण पहिलीवहिली केस रुडी जिंकतो. याच वळणावर येऊन कादंबरी संपते. या मूळ कथेला उपकथानकही आहेत. पेर्इंग गेस्ट म्हणून रुडी जिच्याकडे राहत असतो ती म्हातारी वृद्ध स्त्री मिस बडी आणि तिचे कुटुंबीय, रूडीला अचानकपणे भेटलेली आणि नंतर त्यांची जीवनसाथी बनलेली केली आणि तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदु:ख या सर्व कथानकांनी मिळून कादंबरी अतिशय रोमांचकारी झालेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या देशातही ठाण मांडलेले आहे. उत्पादनांची विक्री आणि ग्राहक याच दोन गोष्टींनी महत्त्व देणाऱ्या या कंपन्या त्या-त्या देशातील संस्कृती, विचारमूल्य यांचाही कसा बळी घेतात, याचे परिणाम युवापिढीवर कसे होतात हे सर्व आपणही आता अनुभवायला लागलो आहोत. पण या कादंबरीचे कथानक जिथे घडते त्या अमेरिकेतही हीच स्थिती आहे. गरिबांना वाली नाही आणि श्रीमंतांच्या हातात सर्व प्रकारची सत्ता हा भेदभाव तिथेही आहे. लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या देशांमधून आता अशा वृत्तींविरुद्ध आवाज उठायला लागला आहे हे कादंबरी वाचताना पदोपदी जाणवते. रूडी बेलर केस जिंकण्याचा ध्यास घेऊन सतत पाठपुरावा करीत केसच्या गाभ्यापर्यंत जातो, केस जिंकतो आणि मनाशी ठरवितो की, ‘कायदा या विषयाशी संबंधित अशी कुठलीही गोष्ट मी पुन्हा कधी करणार नाही. मतदार म्हणून माझी नोंद करणार नाही. या सर्व प्रवासात वाचक त्याच्याबरोबरच असतो. मूळ इंग्रजी कादंबरी वाचताना जसा परिणाम आपल्यावर होतो, अंतर्मुखता येते तसाच अनुभव मराठी अनुवाद वाचताना मिळतो हेच या पुस्तकाचे यश आहे. अर्थातच याचे श्रेय अनुवादकाला आहे. उत्तम कथानक, ओघवती भाषा असलेल्या या अनुवादाचा प्रत्येक वाचनप्रेमीने जरूर आनंद घ्यावा. -माधुरी नवरे ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    याआधीही या सदरातून काही भाषांतरकारांचा दृष्टिकोन जाणून घेतला आहे. भाषांतरकाराचादेखील भाषांतरमागचा विचार असतो, त्याचीदेखील एक शैली असते. कदाचित एकच पुस्तक दोन भाषांतरकार वेगवेगळ्या पद्धतीने करतील! पण या वेगळेपणादेखील एक समानता असतेच. हा वेगळेपणा भाषाशली मधला असू शकतो तर समानता असते ती विचार मांडण्यातील. `वारसा नॉस्ट्राडेमसचा`, `दुसरा बर्म्युडा ट्रँगल`, `द लास्ट डॉन` यांसारख्या पुस्तकांचे भाषांतर करणारे अनिल काळे भाषांतरमागच्या त्यांच्या विचाराबद्दल बोलताना सांगतात. `भाषांतरापेक्षा रुपांतर` म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत पोहचवताना ते नेहमी त्या भाषेत केलं गेलेलं रुपांतर असतं. मी भाषांतराचीदेखील काम करतो ती कशा स्वरुपाची असतात ते पुढे ओघात येईलच. मी जेव्हा पुस्तकाचं रुपांतर करतो तेव्हा मूळ लेखकाच्या भाषेचा लहेजा कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. जॉन ग्रिशॅमचं `द रेनमेकर` हे वेगळ्या भाषाशैलीतलं, काहीसं वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. इंग्रजीत ही भाषाशैली अभावानेच वाचायला मिळते. त्या भाषेचं वैशिष्ट्य जपत अनिल काळे यांनी खूप रंजक शैलीत हे रुपांतर केलं आहे. या कथेचा नायक आहे, नुकताच कायद्याची पदवी घेऊन बाहेर पडलेला रुडी बेलररी. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत तो शिक्षण पूर्ण करतो. आज शिक्षण पूर्ण झालं की उद्या आपल्याला छोटी-मोठी का होईना नोकरी मिळून आपली परिस्थिती पालटेल याची स्वप्न बघत असतो. त्याच्याकडे एकुलती एक केस असते ती मेडिकल इन्शुअरन्स कंपनीच्या विरुद्ध. रुडी अननुभवी, कुठल्याही मोठ्या फर्मचा आधार नसणारा वकील, तर त्याच्याविरुद्ध असणारी पार्टी एक स्थापित श्रीमंत कंपनी. जी शहरातल्या सर्वोतम लॉ फर्मला आपली केस सोपवते. त्या फर्मच्या वकिलांचा ताफाच्या ताफा केससाठी कोर्टात उभा असतो, ज्यांच्याविरुद्ध एकटा रुडी जास्तच दीनवाणा दिसतो. रुडीकडे असतो तो प्रांजळपणा आणि आपल्या अशिलावर झालेल्या अन्यायाचं निराकारण करण्याची प्रखर इच्छा. फक्त या इच्छाशक्तीच्या जोरावर रुडी नावाजलेल्या मोठ्या कंपनीविरुद्धची केस, ती ही एक नावाजलेल्या वकिलांनी लढलेली केस जिंकेल? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर `द रेनमेकरच` वाचायला हवं. मूळ इंग्रजीतलं पुस्तक जर वाचायला मिळालं वा मिळवून वाचण्याची इच्छा असेल तर फारच उत्तम. नाहीतर अनिल काळे यांचे अनुवादित पुस्तक आहेच. काहीसं कंटाळवाणंही वाटू शकतं. इंग्रजी पुस्तकात जशी पानंच्या पान भरुन वर्णनं असतात तशीच इथेही आहेत. ही वर्णनं वाचण्याचा कंटाळा येणाऱ्यांना पुस्तक कितीतरी पुढे गेलं तरी काही घडतच नाहीये असंही वाटेल, पण खरं तर या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काही तरी घडत असतं. त्यातून आपल्याच रुडीचं आयुष्य. त्याच्या भोवतालची परिस्थिती समजते. कोर्टात घडणारं नाट्य तर फारच छान रंगवलं आहे. `मी नॉस्ट्राडॅमसवरचं फिक्शन पुस्तक वाचत होतो. साधारण १९८३ चा काळ असेल. त्यावेळी कॉम्प्युटर हा प्रकार आपल्याकडे अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांपर्यंत पोहोचलेला होता. या पुस्तकात कॉम्प्युटर महत्त्वाची भूमिका बजावतो.` या पुस्तकाची ते थोडक्यात ओळख करुन देतात. `या नॉस्ट्राडॅमसच्या हाती एक पुस्तक लागतं. ज्यात अमुक एका दिवशी सगळ्या जगाचा संहार होऊन फक्त २०० लोक उरतील असं लिहिलेलं असतं. ते २०० लोक कोण असतील हे कळण्यासाठी तो संपूर्ण जगातल्या कुंडल्या कॉम्प्युटरवर मांडून त्यातून ते २०० लोक शोधून काढतो आणि त्यांना एका बेटावर आणून ठेवतो वगैरे... हा विषय अतिशय इंटरेस्टिंग होता आणि तो मराठीत यावा असं मला वाटलं म्हणून अनुवादाचा प्रसत्न करुन बघितला.` काही काव्याचं इंग्रजीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. कुसुमाग्रजांच्या पाचोळा आणि पृथ्वीचं प्रेमगीत या कवितांवर काम करतोय. अजून हे प्रायोगिक स्वरुपातच आहे. कविता त्या प्रतिमांसह दुसऱ्या भाषेत आणणं खूप कठीण असतं! याशिवाय जॉनी ग्रिशमचीच `फर्म` आणि सिडने शेल्डनची `आर यू अफ्रेड ऑफ डार्क` या दोन कादंबऱ्याच्या अनुवादाचेही काम ते करीत आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more