* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ROAD OF LOST INNOCENCE
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788184981100
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A RIVETING, RAW, AND BEAUTIFUL MEMOIR OF TRAGEDY AND HOPE: THE LIFE OF A CAMBODIAN WOMAN WHO EMERGED FROM YEARS OF SEXUAL SLAVERY TO BECOME A RESCUER OF GIRLS FROM THE HELLISH BROTHELS OF SOUTHEAST ASIA. SOMALY MAM`S LIFE STORY IS AN UNFORGETTABLE AND INSPIRING STORY OF TRIUMPH OVER UNTHINKABLE ADVERSITY. WRITTEN IN EXQUISITE, SPARE, UNFLINCHING PROSE, THE ROAD OF LOST INNOCENCE RECOUNTS THE EXPERIENCES OF SOMALY MAM`S EARLY LIFE, WHEN SHE WAS SOLD INTO SEXUAL SLAVERY AS A GIRL AND SPENT A DECADE BEING SHUTTLED THROUGH THE SOUTHEAST ASIAN SEX TRADE. IT TELLS THE STORY OF HER AWAKENING AS AN ACTIVIST AND HER BRAVE FIGHT AGAINST THE POWERFUL AND CORRUPT FORCES THAT STEAL THE LIVES OF THESE GIRLS. SHE HAS ORCHESTRATED RAIDS ON BROTHELS AND RESCUED SEX WORKERS, SOME AS YOUNG AS FIVE AND SIX YEARS OLD; SHE HAS BUILT SHELTERS, STARTED SCHOOLS, AND FOUNDED AN ORGANISATION THAT HAS SO FAR SAVED OVER 3,400 WOMEN AND CHILDREN IN CAMBODIA, THAILAND, VIETNAM AND LAOS. SOMALY MAM`S MEMOIR - ALREADY AN INTERNATIONAL BESTSELLER - WILL LEAVE YOU AWESTRUCK BY THE TENACITY AND COURAGE OF THIS MODERN-DAY HEROINE AND WILL RENEW YOUR FAITH IN THE POWER OF AN INDIVIDUAL TO BRING ABOUT CHANGE.
स्वत:वर होत असलेला, झालेल्या अन्यायामुळे, अत्याचारामुळे पेटून उठलेल्या निर्भर, निराधार सोमाली. फक्त स्वत:ची सुटका करून थांबली नाही तर भ्रष्टाचारी समाजाच्या विरोधात उभं ठाकून स्वत:सारख्या अनेक जणींची सुटका केली आहे. तिचं आयुष्य चटका लावणारं तर आहेच. पण त्याहून अधिक थक्क करून टाकणारं आहे. मनात आशेचा स्फुल्लिंग जागृत ठेवणारं आहे.
* म.सा.प.- स.ह. परितोषिक २०१० * `द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स,न्यू दिल्ली` तर्फे प्रथम पुरस्कार २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEROADOFLOSTINNOCENCE #THEROADOFLOSTINNOCENCE #दरोडऑफलॉस्टइनोसन्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHARATIPANDE #भारतीपांडे #SOMALYMAM "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 03-09-2010

    प्रवाहाविरोधातला यशस्वी प्रवास… बालपण हरवलेल्या अनेक जणींना देहविक्रयाच्या दुष्टचक्रातून जाताना काय यातना सहन करायला लागतात याचं चित्रण म्हणजे द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स. सोमाली माम हिचं हे आत्मकथन. तिच्यासारख्या अनेक जणींच्या वेदना यामधून व्यक्त होतात. या पुस्तकाचं कव्हरच खूप बोलकं आहे. मुखपृष्ठावरच्या चित्रातील ओठांना घातलेली शिवण या पुस्तकाची प्रस्तावना, मलपृष्ठावरील पुस्तकाची ओळख असं काहीच न वाचताही या आत्मकथनाचं सार सांगते. मुकाटपणे सोसायला लागलेल्या छळाचं हे चित्ररूप आहे... हा छळ आहे बालपण म्हणजे नेमकं काय याचा अर्थ कळत नाही तोच शरीरविक्रयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकींचा. त्यांची वेदना लेखिका सोमाली माम ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स’मधून व्यक्त करते. एका गरीब कंबोडियन कुटुंबामध्ये जन्माला आलेली सोमाली... कंबोडियामध्ये होत असलेल्या उलथापालथीच्या काळात तिचा जन्म झाला. तिच्या आईवडलांबद्दल तिला माहिती नव्हती. ती तिच्या आजोबांसोबत जंगलात राहत होती. या दरम्यान तिची आजीही तिला सोडून निघून गेली आणि ती अनाथ झाली. सोमाली स्वत:च्या अनाथपणाविषयी फार तटस्थपणे सांगते. अनाथ असणं कंबोडियामध्ये खूपच सामान्य आहे. भीती वाटण्याइतकं सामान्य... सोमालीचा हा तटस्थपणा अंगावर येतो. ती सांगते, लहानपणी आपलं दु:ख आणि वेदना मी जंगलातल्या झाडांनो सांगायची. या वातावरणातच तिचं भविष्य रेखाटलं गेलं. तिला नऊ-दहा वर्षांची असताना पन्नास-पंचावन्न वर्षांच्या एका माणसाकडे सोपवण्यात आलं. तिला सांगण्यात आलं की ते आजोबा कदाचित तिचे नातेवाईक शोधायला तिची मदत करतील. तिला विकण्यात आलं होतं का याबद्दल तिला कधीच कळलं नाही. सुरुवातीला आधारभूत वाटलेले ते आजोबा नंतर मात्र तिचा छळ करायला लागले आणि सोमालीला कळलं की तिची स्वप्नं ही केवळ ही केवळ स्वप्नंच राहणार आहेत. ती त्या आजोबांच्या नव्या घरात सगळी कामं करायला लागली. त्यांच्यासाठी पैसेही कमवायला लागली. या काळामध्ये तिला सपाता नावाची गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा मिळाली. तिच्या आयुष्यातल्या या लहान-लहान घटना तिच्या जीवनाचा आलेख अगदी सहज डोळ्यासमोर ठेवतात. म्हणूनच आत्मकथनात आलेल्या या लहान लहान घटनांना मोठं महत्त्व प्राप्त होतं. गावातल्या लोकांची कामं करता करता त्या गावतल्या शाळेच्या शिक्षकांची आणि तिची ओळख झाली. त्यांनी तिच्या आजोबांकडून शाळेमध्ये पाठवण्याची परवानगी मिळवली. त्याच शिक्षकांनी तिचं नाव सोमाली माम असं ठेवलं. हळूहळू सोमाली त्यांच्या कुटुंबाचा एक घटक बनली. लहानशा गावामध्ये सुरू असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्याना सैनिकी शिक्षणही मिळायचं. दहा-बारा वर्षांची मुलं बंदुका साफ करत, चालवतही. एवढंच नाही तर हातबाँबही फेकायचं प्रशिक्षण त्यांना दिलं जायचं असं सोमाली सांगते. तिचा मित्र एका सैनिकाकडून अपघाताने सुटलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये मारला गेला होता. अशा काही गोष्टी सोमाली केवळ जाता जाता म्हणून सांगते, पण त्यामुळे त्या आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जगणाऱ्या लहानग्यांचं तेव्हाचं आयुष्य काय असेल याची सहज कल्पना येते. तिचं वयात येणं, त्यानंतर तिच्या आजोबांनी सुरू केलेले किळसवाणे प्रकार, तिच्या आजोबांची उधारी असलेल्या चिनी वाण्याने तिच्यावर केलेला बलात्कार आणि मग तिचं वयाच्या चौदाव्या वर्षी लावून देण्यात आलेलं लग्न.. अर्थात या सगळ्यामध्ये तिला काही बोलायची संधीच नव्हती. याच वयात वैद्यकीय शिक्षणाचा गंधही नसलेल्या सोमालीने पैसे मिळतात एवढ्याच कारणासाठी दवाखान्यात काम पत्करलं. ती मेलेली माणसं, शरीराचे तुटलेले अवयव यांना स्पर्श करायची. औषधांचा साठा संपत आला की त्यामध्ये पाणी घालून वाढवायची. यामध्ये तिचं बालपण केव्हाच कुस्करलं गेलं. बालपण हरवलेल्या अनेक मुलींना किती त्रास सहन करावा लागतो याचं उदाहरण म्हणजे हे आत्मकथन आहे. दरम्यान, लग्न म्हणजे पूर्णविराम असं वाटलेल्या सोमालीला तिच्या आजोबाने स्वत:ला पैसे मिळावेत म्हणून वेश्याव्यवसायात अडकवलं. तिचा नवरा युद्धभूमीवर निघून गेल्यावर सोमालीला तिच्या आजोबाने कुंटणखान्यात विकलं. त्यानंतर तिच्या आयुष्यातल्या वेदना, अपमान, मानहानी, बीभत्सता, स्वत:बद्दलही वाटलेली किळस याचं प्रमाण खूपच वाढलं. तिच्यावर दहशत बसावी म्हणून कुंटणखान्यातलं आयुष्य जगताना तिच्या अंगावर सापांची वेटोळीही टाकली गेली, असं वर्णन तिने आत्मकथनात केलं आहे. ती सांगते, या लोकांना ठार मारता येत नाही या वैफल्यापोटी ती रडायची. हळूहळू ती परिस्थितीला शरण गेली. आज सोमालीने अनेक मुलींना या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत केली आहे तरी तिच्या त्या भयानक वातावरणाच्या तिच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ती सांगते, एखाद्या मुलीशी तिच्या दुर्दैवी काळातल्या आठवणींबद्दल बोलत असते तेव्हा त्या घाणेरड्या वासाने माझं नाक चोंदून गेलंय असं मला वाटतं. तिला मळमळायला लागतं. तिला वाटतं ती कधीच स्वच्छ होणार नाही. तिने किती सहन केलं असे हे असं स्पष्ट होत जातं. तेव्हाची परिस्थिती इतकी भयानक होती की, घरच्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड लहान मुलींना वेश्या व्यवसायामध्ये गुंतवून केली जायची. मग एक कर्ज फेडलं की नव्या कर्जाची उचल व्हायची. त्या मुलीचं आयुष्य संपलेलंच असायचं. कारण एकदा शरीरविक्रयाच्या व्यवसायामध्ये अडकलेली मुलगी कोणालाच घरी नको असायची. त्यामुळे तिच्या जीवावर घर पोसलं जायचं. सोमालीचे आजोबाही तिला या कुंटणखान्यात विकल्यानंतर अनेकदा तिथे गेल्याचं आणि प्रत्येक वेळी त्याला पैसेही दिल्याचं ती सांगते. अशा मुलींना सोडवण्याचा सोमालीने नंतर वसा घेतला. एकदा सोमालीने त्या कुंटणखान्यातून पळून जायचा प्रयत्नही केला होता. पण तोही फसला. यामध्ये कायद्याचे रक्षक म्हणवल्या जाणाऱ्या पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं ती सांगते. त्यानंतरही ती सुटली नाही. तिला पुन्हा एकदा त्याच रस्त्यावरून जावं लागलं. पळून गेल्यामुळे तिला भयंकर छळाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर सोमालीने पळून जाण्याचा विचार रद्द केला. तिने सपशेल शरणागती पत्करली होती. कुंटणखान्यामध्ये विरोध करणाऱ्या मुलींना ठारही केलं जायचं असंही सोमाली सांगते. एका मुलीला तर तिच्याचसमोर ठार मारण्यात आलं होतं. तरी दोन मुलींना तिने पळून जायला मदत केली. त्याबद्दल तिला इलेक्ट्रोडस्नी जाळण्यातही आलं. तिच्या अंगावर त्या खुणा अजूनही असल्याचं ती सांगते. ती सांगते की वेश्यांना होणाऱ्या या शिक्षा भयंकर होत्या. पण आज ज्या प्रकारच्या शिक्षा त्यांना केल्या जातात त्या तर महाभयंकर आहेत. मुलींच्या डोक्यात खिळे ठोकण्यात आल्याचं, वीजेच्या केबल्सनी मारहाण केल्याचं तिने पाहिल्याचं ती सांगते. अशी वेडी झालेली मुलं तिने आपल्या संस्थेमार्फत सोडवली आहेत, असं या आत्मकथनात पुढे सांगण्यात आलं आहे. ती परिस्थितीला शरण गेल्यानंतर डीट्रीश तिच्या आयुष्यात आला. तो आला एक गिऱ्हाइक म्हणूनच पण इतरांपेक्षा त्याने सोमालीला चांगल्या पद्धतीने वागवलं. डीट्रीश तिच्या आयुष्यात आल्यापासून तिचं राहणीमान बदललं. तो तिला इतरांपेक्षा खूप जास्त आर्थिक मोबदला द्यायचा. त्याच पैशांच्या मदतीने ती इतर सर्वसामान्यांसारखं जगायला, कपडे घालायला शिकली. त्यामुळे तिचं या व्यवसायाशी असलेलं नातं लपत होतं. त्यानंतर तिच्या आयुष्यात पिएर नावाचा एक फ्रेच माणूसही आला. त्याने तिच्याशी लग्न करायची इच्छाही व्यक्त केली. पण सोमालीच्या स्वप्नातला श्रीमंत माणूस पिएर नव्हता त्यामुळे तिने सुरुवातीला हे मागणी धुडकावून लावली. पण ती त्याच्याबरोबर राहत होती. मुळात तिलाच कळत नव्हतं की तिचं त्याच्यावर प्रेम आहे की नाही, त्यामुळे ती निर्णय घेऊ शकत नव्हती. व्हिसा मिळवण्याच्या एका प्रक्रियेचा भाग म्हणून तिने पिएरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या अनुभवांमुळे लग्न हा प्रकारच तिला नको होता. पण तिने लग्न केलं आणि ती पॅरीसमध्ये गेली. तिथे गेल्यानंतर तिने साफसफाई करण्याची नोकरी पत्करली. त्या माध्यमातून कमावलेले पैसे साठवायलाही ती शिकली. याच काळात ती हळूहळू फ्रेंचही शिकत होती. पिएरमुळे तिच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले पण पिएर मला कधीच आधार देऊ शकला नाही, असं ती स्पष्टपणे आत्मकथनात सांगते. ती फ्रान्समध्ये १८ महिने राहिली. या काळात तिच्यामध्ये मोठे बदल घडून आले. तिचा आत्मविश्वासही वाढला. त्यानंतर कंबोडियामध्ये परत आल्यानंतर तिने दवाखान्यात काम करायला सुरुवात केली. या माध्यमातून तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींवर उपचार करायला सुरुवात केली. ती कुंटणखान्यांमध्येही उपचारासाठी जाऊ लागली. तिने हळूहळू मुलींना कुंटणखान्यातून पळून जायला मदत केली. पण या मुलींना राहायला जागा हवी असल्याचं लक्षात आलं आणि या मुलींना मदत करणारी एनजीओ स्थापन करण्याच्या दिशेने तिने पिएरच्या मदतीने वाटचाल सुरू केली. तोपर्यंत या सगळ्या मुली त्यांच्याच घरामध्ये राहत होत्या. या मुलींना आधार देण्याचं अधिकृत केंद्र सुरू झाल्यावरही सोमालीने वेश्या वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्यासंबंधी मदत करणं सुरूच ठेवलं होतं. कुंटणखान्यावर छापा घालायलाही ती पोलिसांसोबत जायची. त्यामुळेच सोडवलेल्या मुली पोलिसांच्या ताब्यात न जाता एका सुरक्षित वातावरणात आल्या असं ती सांगते. तिला या कामापासून परावृत्त करण्यासाठी तिच्या दत्तक आईवडलांचं घर जाळूनही टाकण्यात आलं. पण सोमालीचे प्रयत्न सुरूच राहिले. तिच्या स्वत:च्या मुलीला मिंगलाही पळवून नेण्यात आलं. अशा अनेक घटनांना तिला सामोरं जावं लागलं. पण ती आजही धीराने उभी आहे. त्यांच्या केंद्राने आत्तापर्यंत तीन हजार मुलींना स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत केली आहे. हा सगळा प्रवास सांगताना सोमालीच्या कथनामध्ये अनेक लहान मुलींनी सहन केलल्या अत्याचाराची वर्णनं येतात. हे सारं अजूनही सुरूच आहे. या सगळ्याबरोबर कंबोडियामधला लैंगिक व्यापार अधिक व्यावसायिक बनायला लागल्याचंही ती सांगते. कंबोडियातून मुली थायलंडमध्ये जातात. हे थांबवण्यासाठी तिच्या परीने ती धडपड करत आहे. तिची ही धडपड कौतुकास्पद तर आहेच पण अनेकांना नवी दिशा देणारीही आहे. सोमालीचा हा प्रवास, तिचं हे आत्मकथन वाचकाच्या मनाला नाही भिडलं तरच नवल. हे वाचल्यानंतर एक नक्की जाणवतं की, हे वाचणाऱ्या पुरुष वाचकाला आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे केवळ एक स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा माणूस म्हणून अधिक आदराने पाहता आलं तरीही खूप झालं. त्यामुळे सोमालीसारख्या अनेकांच्या आयुष्यामध्ये आशेचा एक किरण नक्की निर्माण होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more