* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE RUNAWAY JURY
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788184980264
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 496
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO SET - 15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JURY; SELECTED BY THE WELL KNOWN, RICH, FAMOUS, SUCCESSFUL ADVOCATES, WITH THE WHOLE AND SOLE INTENTION OF WINNING THE CASE. THESE JURIES ARE NOW INVOLVED IN A CASE AGAINST A MULTI BILLION DOLLARS CIGARETTE COMPANY, THEY ARE IN THE MIDST OF A STRONG PETITION; THEY HAVE AN OPPORTUNITY TO PROVE THE INNOCENCE OF THEIR MINDS. BUT ONLY A FEW KNOW THE SECRET, AND THEIR LEADER HAS THE ABILITY TO CHANGE THEIR DECISION. THE PERSON WHO IS KNOWN AS JURY NUMBER 2 HAS A VERY MYSTERIOUS PAST. HE IS PLAYING EVERY MOVE WITH THE HELP OF HIS BEAUTIFUL, YOUNG GIRL FRIEND.THE FUTURE OF ALL THE CIGARETTE COMPANIES IS IN DARKNESS. A FAMILY IS AWAITING JUSTICE. THE ATTORNEY`S CAREER IS ON THE VERGE OF DESTRUCTION. THERE IS TERRIBLE CORRUPTION, GREED AND BRIBE…. EVERYTHING POINTS TO JUST ONE THING, SURELY THE SECRET ABOUT THE JURY NUMBER 2 IS ABOUT TO BE REVEALED.
ज्यूरी... वाटेल ते करून आपल्याच बाजूनं निकाल लावू बघणा-या महागड्या वकिलांनी खास निवडलेली माणसं... कोट्यवधी डॉलर्सच्या नुकसानभरपाईसाठी एका प्रचंड सिगारेट कंपनीविरुद्धच्या वादळी खटल्याच्या मध्यभागी सापडलेली... एक अत्यंत पथदर्शक निकाल देण्याची संधी मिळालेली... पण अगदी निवडक लोकांनाच एक रहस्य माहिती आहे : या ज्यूरींचा निर्णय पडद्याआडून फिरवण्याची क्षमता आहे त्यांच्या नेत्याकडे... फक्त ज्यूरी नंबर दोन म्हणून ओळखल्या जाणा-या या व्यक्तीचा भूतकाळ अत्यंत रहस्यमय आहे, आणि आपल्या सुंदर, तरुण मैत्रिणीच्या सहकार्यानं तो प्रत्येक चाल खेळतोय... संपूर्ण सिगारेट उद्योगाचं भवितव्य अधांतरी आहे... एक कुटुंब न्यायदानाची वाट बघतंय... वकिलांचं करिअरच बरबाद होण्याची पाळी आली आहे... प्रचंड लाचलुचपत, हाव आणि भ्रष्टाचार होतोय... आणि अशा परिस्थितीत ज्यूरी नंबर दोनबद्दलचं सत्य प्रकाशात येणार असं दिसतंय...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 20-02-2011

    प्रदीर्घ सूडकथा... ‘द रनअवे ज्युरी’ ही जॉन ग्रिशॅम यांची कादंबरी. जॉन ग्रिशॅम हा बांधकाम कामगाराचा मुलगा. ‘व्यावसायिक बेसबॉल खेळाडू’ व्हायची स्वप्ने बघत होता, परंतु त्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याकडे नाहीत हे लक्षात येताच त्यांनी कायद्याची पदवी घेऊन दा वर्ष वकिली केली. १९८३ ते १९९० या काळात विधनसभेवर निवडून येऊन त्यांनी कार्य केले. एक दिवस बारा वर्षांच्या बलात्कारित मुलीची कहाणी ऐकून त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली. काम करून लिखाण करायचं, पण प्रकाशक पटकन स्वीकारायचे नाहीत. नंतर ‘कायदेविषयक रोमांचक वाङ्मय लिहिणारा लेखक’ ही पदवी मिळण्याआधी ते मिसिसिपीमध्ये आठवड्याला साठ ते सत्तर तास काम करणारे वकील होते. त्यातून ते लेखन छंद जोपासत. लवकरच लेखन छंदाचे पूर्ण वेळ व्यवसायात रूपांतर होऊन त्यांनी लोकप्रिय आणि रोमांचक कादंबऱ्यांचा सिलसिला चालू केला. त्यांच्या नऊ कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यांच्या अनेक कादंबऱ्या बेस्ट सेलर ठरल्या. फक्त कायद्याशी संबंधित विषयांवरच कादंबऱ्या लिहिण्यात हातखंडा असलेला हा जगीर नावाजलेला अमेरिकन कादंबरी लेखक. या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे अनिल काळे यांनी. या अगोदरही काळे यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. त्यांची साधीसोपी, रंजक भाषाशैली अभ्यासू वृत्तीची जाणीव करून देते. या कादंबरीमध्ये अमेरिकन न्यायपद्धतीप्रमाणे अगदी ज्युरींच्या निवडीपासून ते पार खटल्याच्या निकालापर्यंत जे काही भयंकर आणि भ्रष्ट प्रकार दाखवले आहेत, ते खरोखर सुज्ञ वाचकांचे मन सुन्न करणारे आहेत. (इथे हिंदुस्थानात तरी यापेक्षा वेगळी परिस्थिती कुठे आहे?) या प्रकारांबरोबरच ‘बिग बिझनेस’मधील सर्व तऱ्हेचे उच्च पातळीवरचे गैरप्रकारही असेच आहेत. मात्र खटल्यातील साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने ‘सिगारेट’, ‘तंबाखू’, ‘निकोटिन’ या विषयांवर झालेल्या आणि होत असलेल्या प्रचंड संशोधनाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती माहिती मात्र शहारे आणणारी आहे. सिगारेट ओढण्याच्या किंवा इतर प्रकारांनी तंबाखू सेवनाच्या ‘स्वत:पुरत्या निर्णयाचा अधिकार प्रत्येकाला आहे खरा, पण प्रचंड जाहिरातबाजी करून आणि निकोटिनसारखे तंबाखूची सवय लावणारे रसायन अजिबात कमी न करता सिगारेट व इतर तंबाखूची उत्पादने सर्रास प्रचंड प्रमाणावर उत्पादित करून ती विकली जातात. तेव्हा हा तथाकथित स्वयंनिर्णयाचा अधिकार केवळ कागदावरच उरत नाही का? हा या कादंबरीत विचारलेला प्रश्न मोठा विचार करायला लावणारा आहे. सिगारेट कंपन्या, न्यायव्यवस्था, राजकीय दबाव गट अशा प्रचंड व्यापक पार्श्वभूमीवर अत्यंत कल्पकपणे रंगवलेली, सत्य आणि कल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेली ही एक प्रदीर्घ सूडकथा आहे. या कादंबरीस योग्य न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या कौशल्यपूर्ण अनुवादाने अनिल काळे यांनी केला आहे. फाल्गुन ग्राफिक्सने तयार केलेलं मुखपृष्ठ साजेसं आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-10-2009

    गुंगवून टाकणारी रहस्यमय कादंबरी… सिगारेट ओढण्याच्या किंवा इतर प्रकारांनी तंबाखू सेवनाच्या स्वत:पुरत्या निर्णयाचा अधिकार प्रत्येकाला आहे खरा, पण प्रचंड जाहिरातबाजी करून आणि निकोटिनसारखे तंबाखूची सवय लावणारे रसायन अजिबात कमी न करता सिगारेट व इतर तंबाखची उत्पादने सर्रास प्रचंड प्रमाणावर उत्पादित करून ते विकली जातात, तेव्हा हा तथाकथित स्वयंनिर्णयाचा अधिकार केवळ कागदावरच उरत नाही का, हा या कादंबरीत विचारलेला प्रश्न मोठा विचार करायला लावणारा आहे. ‘सिगारेट स्मोकिंग इज इन्ज्युरिअर टू हेल्थ’ असा तथाकथित वैधानिक इशारा आपल्याकडेही सिगारेटच्या पाकिटांवर छापलेला असतो. पण तेवढ्याने भागते का? अगदी शाळांपासून पन्नास फुटांवर असलेली आपल्याकडची सिगारेट, तंबाखू व गुटखा विक्रेत्यांची दुकाने, गुटख्याच्या उत्पादनांवर व विक्रीवर घातलेले निर्बंध आणि त्यांची राजरोस होत असलेली तुफान विक्री, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अत्यंत कल्पकतेने बनवलेल्या त्यांच्या जाहिराती हेच नाही का दाखवत, की कायदा आणि त्याची अंमलबजावणी यात प्रचंड मोठी तफावत आहे. सिगारेट कंपन्या, न्याय व्यवस्था, राजकीय दबावगट अशा प्रचंड व्यापक पार्श्वभूमीवर अत्यंत कल्पकपणे रंगवलेली, सत्य आणि कल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेली ही एक प्रदीर्घ अशी सूडकथा आहे. कादंबरीचा लेखक जॉन ग्रिशॅम हा बांधकाम कामगाराचा मुलगा. व्यावसायिक बेसबॉल खेळाडू व्हायची स्वप्ने बघत होता. परंतु त्यासाइी आवश्यक गोष्टी आपल्याकडे नाहीत हे लक्षात आल्यावर त्याने कायद्याची पदवी घेतल्यानंतर दहा वर्षे वकिली केली. १९८३ ते १९९० या काळात विधानसभेवर निवडून येऊन त्यांनी कार्य केले. कायदेविषयक रोमांचक वाड्:मय लिहिणारा लेखक ही पदवी मिळण्याच्या आधी ते मिसिसिपीमध्ये आठवड्याला साठ ते सत्तर तास काम करणारे वकील होते. कधी कामाला जाण्याच्या आधीचा तर कधी मधल्या सुटीचा वेळ ते कादंबरी लेखनाच्या छंदासाठी देत असत. लवकरच छंदाचे पूर्ण वेळ व्यवसायात रुपातंर झाले. त्यांच्या नऊ कादंबऱ्यावर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या ‘बेस्ट सेलर’ ठरल्या. ज्यूरी... वाटेल ते करून आपल्याच बाजूनं निकाल लावू पाहणाऱ्या महागड्या वकिलांनी खास निवडलेली माणसं. कोट्यवधी डॉलर्सच्या नुकसान भरपाईसाठी एका प्रचंड सिगारेट कंपनीविरुद्धच्या वादळी खटल्याच्या मध्यभागी सापडलेली; एक अत्यंत पथदर्शक निकाल देण्याची संधी मिळालेली, पण अगदी मूठभर निवडक लोकांनाच एक रहस्य माहिती आहे. या ज्यूरींचा निर्णय पडद्याआडून फिरवण्याची क्षमता आहे. त्यांच्या नेत्यांकडे. फक्त ज्यूरी नंबर दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तींचा भूतकाळ अत्यंत रहस्यमय आहे आणि आपल्या सुंदर, तरुण मैत्रिणींच्या सहकार्यानं तो प्रत्येक चाल खेळतोय. संपूर्ण सिगारेट उद्योगाचं भवितव्य अधांतरी आहे. एक कुटुंब न्यायदानाची वाट बघंतय. वकिलांचं करिअरच बरबाद होण्याची पाळी आली आहे. प्रचंड लाचलुचपत, हाव आणि भ्रष्टाचार होतोय आणि अशा परिस्थितीत ज्यूरी नंबर दोनबद्दलचं सत्य प्रकाशात येणार असं दिसतंय. अमेरिकेतील ‘बिग फोर’ सिगारेट कंपन्या. त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. धूम्रपानामुळे प्राण गमावलेल्या लोकांची मुलं, बायका त्यांच्यावर एकामागून एक खटले भरत होती. नुकसान भरपाई मागत होती. ते सगळे खटले भरत होती. ते सगळे खटले बिग फोरनीच जिंकलेले होते. आता मात्र त्यांच्यावरचा दबाव वाढत होता. एका जरी विधवेनं खटला जिंकला, तरी खटल्यांचं धरणच फुटणार हे उघड होतं. त्याची सुरुवात झाली होती. कोर्टाच्या वाढत्या हल्ल्यांना तोंड देता यावं म्हणून ‘बिग फोर’ कंपन्यांनी ‘द फंड’ नावानं एक भली मोठी रक्कम गोळा केलेली होती. आताचा खटला ‘वूड विरुद्ध पायनेक्स’ असा होता. पायनेक्स तिसऱ्या नंबरची कंपनी होती व सेलेस्ट वुडने हा खटला भरला होता. ज्यूरर्सनी जर पायनेक्सच्या बाजूनं निकाल दिला, तर पुढची दहा वर्षे तरी सिगारेट उद्योगांविरुद्धां हे आक्रमण थंड पडणार होतं. मुळात कोणताही कायदा करत असताना तो ज्या उद्देशाने केलेला असतो, तो उद्देश त्यांच्या अंमलबजावणीच्यावेळी बऱ्याचदा सफल होत नाही. कारण कायदा राबवणारे लोक त्यातून पळवाटा शोधण्याच्या मागे लागतात. कायद्याचा अर्थ लावणारेही तेच करत असतात. अनेकदा कायदा तयार करतनाच त्यात पळवाटा ठेवलेल्या असतात. त्यामुळे मूळ उद्देशापासून कायदा भरकटत जातो. या कादंबरीमध्ये अमेरिकन न्यायपद्धतींप्रमाणे अगदी ज्यूरींच्या निवडींपासून ते पार खटल्याच्या निकालापर्यंत जे काही भयंकर आणि भ्रष्ट प्रकार दाखवले आहेत, ते खरोखरच सुज्ञ वाचकांचे मन सुन्न करणारे आहेत. या प्रकारांबरोबरच ‘बिग बिझिनेस’ मधले सर्व तऱ्हेचे उच्च पातळीवरचे गैरप्रकारही असेच आहेत. मात्र खटल्यातील साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने सिगारेट, तंबाखू, निकोटिन या विषयावर झालेल्या आणि होत असलेल्या प्रचंड संशोधनाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती माहिती मात्र शहारे आणणारी आहे. सिगारेटच्या व्यसनामध्ये अडकल्यामुळे फार भयंकर यातनामय मृत्यू आलेल्या आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलीने घेतलेल्या सूडाची ही कथा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more