* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SATAN BUG
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184980714
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN SHE WAS FOURTEEN, JASVINDER SANGHERA WAS SHOWN A PHOTO OF THE MAN CHOSEN TO BE HER HUSBAND. SHE WAS TERRIFIED. SHE`D WITNESSED THE TORMENT HER SISTERS ENDURED IN THEIR ARRANGED MARRIAGES, SO SHE RAN AWAY FROM HOME, GRIEF-STRICKEN WHEN HER PARENTS DISOWNED HER.SHAME IS THE HEART-RENDING TRUE STORY OF A YOUNG GIRL`S ATTEMPT TO ESCAPE FROM A CRUEL, CLAUSTROPHOBIC WORLD WHERE FAMILY HONOUR MATTERED MORE THAN ANYTHING - SOMETIMES MORE THAN LIFE ITSELF. JASVINDER`S STORY IS ONE OF TERRIBLE OPPRESSION, A HARROWING STRUGGLE AGAINST A PUNITIVE CODE OF HONOUR - AND, FINALLY, TRIUMPH OVER ADVERSITY.
त्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई` इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता. तिथेच एक नवीन लस संशोधित केली होती. ती लस लक्षावधी माणसांचे बळी घेऊ शकत होती. पण ती नवीन संशोधित लस तिथून गायब झाली.... त्या अति गूढ रहस्याचा छडा लागत नव्हता. ते सैतानी विषाणू अखिल मानवजातीचा बळी घेऊ शकत होते. अंगावर काटा आणणारी रहस्यमय कादंबरी श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादित केली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    "द सटन बग" या अॅलिस्टर मॅक्लीन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा, अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद. (वाचायला साडे सहा तास लागले, 4 टप्प्यात वाचली .) ... प्रतिबंधक लसी, औषधे तयार करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात जैविक अस्त्रे बनवणारी, अत्यंत कडेकोट सरक्षा असलेली सरकारी प्रयोग शाळा. तिकडे अवघ्या अर्ध्या तासात अख्खे शहर बेचिराख करील असा एक विषाणू बनवला जातो. दोन शास्त्रज्ञांचे निर्घृण खून करून ते विषाणू असलेल्या कुप्या पळवल्या जातात. या सगळ्यामागे त्या प्रयोगशाळेतच काम करत असलेल्या एका बुद्धिमान गुन्हेगाराचे डोके असते. हा गुन्हेगाराने तोतयाचे रूप घेवून प्रयोगशाळेत शिरकाव केलेला असतो. आपल्या सहकाऱ्यांना ब्लॅक मेल करून विषाणू कूप्या पळवण्यात तो यशस्वी झालेला असतो. तपास यंत्रणांना बुचकळ्यात पाडण्यासाठी व अधिक वेळ मिळावा म्हणून प्रयोगशाळेतल्या इतर सहकार्यावर संशय जावा अशी चोख व्यवस्था त्याने केलेली असते. पण दुर्दैव अर्पण सुदैवाने त्याची गाठ अत्यंत चलाख अशा नायकाशी पडते. नायक हुशारीने एकेक कोडे सोडवत जातो व शेवटी खलनायका पर्यंत पोचतो. या टप्प्यावर खलनायक हिरोच्या बायकोचे अपहरण करतो ! शहरातल्या सर्व बँकांवर डल्ला मारून एखाद्या अज्ञात ठिकाणी निघून जायचा त्याचा डाव असतो. जर त्याला अडवायचा प्रयत्न झाला तर आपल्याकडील विषाणूंच्या कुप्या फोडून परिसरातली सगळी जीव सृष्टी तो नष्ट करणार असतो ! त्याने स्वतःचा त्या विषाणू पासून बचाव व्हावा म्हणून लस टोचून घेतलेली असते . त्या मूळे तो सेफ असतो ! हीरो आपली बायको वाचवू शकतो का ? विषाणू असलेल्या कुप्या ताब्यात घेवु शकतो का ? खलनायकाचा हेतू साध्य होतो का ? शहराचा विनाश टळतो का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी ! वाचणाऱ्याला खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहे ! अशोक पाध्ये यांनी अनुवाद सुद्धा अगदी ओघवता केला आहे. ...Read more

  • Rating StarKishor H. Kulkarni

    "कोरोना" विषाणु जगभर थैमान घालत आहे आणि त्यावर उपाय म्हणजे सार्वजनिक संपर्क व संसर्ग टाळणे. सन 1962 साली लिहलेली ॲलिस्टर मॅक्लिन या लेखकाची "सटन बग" ही कादंबरी (अनुवाद : अशोक पाध्ये, मेहता प्रकाशन) जणू कोरोना विषाणुंमूळे उद्भवलेली परिस्थितीच दाखवत आे. अत्यंत चित्तथरारक घटना. रहस्यमय, वेगवान व उत्कंठावर्धक कथानक. श्री. अशोक पाध्ये यांचा उत्तम अनुवाद. ही कादंबरी वाचली नसेल जरूर वाचा. वाचली असेल तर पुन्हा तो थरार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुभवा. ...Read more

  • Rating Starतन्मय सावतखेडकर, मुंबई

    तुम्ही अनुवादित केलेले अ‍ॅलिस्टर मॅक्लीनचे `द सटन बग` हे पुस्तक अफलातूनच आहे. खरेच, अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या पुस्तकात एकाच नायकाकडून बलाढ्य शत्रूचा कणा मोडून काढला जात असला तरी ते हिंदी चित्रपटांसारखे नीरस वाटत नाही. तुम्ही सटन बगच्या प्रस्तावनेत केलेल्ा भारतीय वाचकांवरील टिप्पणीमुळे मी व्यथित झालो. अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या पुस्तकात अथपासून इतिपर्यंत रोमांच भरलेला असतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more