* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WELCOME BACK TO THE EXCITING AND SHADOWY WORLD OF ASHWIN SANGHI, WHERE MYTH AND HISTORY BLEND INTO EDGE-OF-THE-SEAT ACTION. A PALLAVA PRINCE TRAVELS TO CAMBODIA TO BE CROWNED KING, CARRYING WITH HIM SECRETS THAT WILL BE THE CAUSE OF GREAT WARS MANY CENTURIES LATER. A BUDDHIST MONK IN ANCIENT CHINA TREKS SOUTH TO INDIA, SEARCHING FOR THE MISSING PIECES OF A PUZZLE THAT COULD MAKE HIS EMPEROR ALL-POWERFUL. A NEOLITHIC TRIBE FIGHTS TO PRESERVE THEIR SACRED KNOWLEDGE, OBLIVIOUS TO THE WAR DRUMS ON THE INDO-CHINA BORDER. MEANWHILE, FAR AWAY IN THE TEMPLE TOWN OF KANCHIPURAM, A RECLUSIVE SCIENTIST DECIPHERS ANCIENT TEXTS EVEN AS A TEAM OF SECRET AGENTS SHADOWS HIS EVERY MOVE. CAUGHT IN THE STORM IS A YOUNG INVESTIGATOR WITH A COMPLEX PAST OF HER OWN, WHO MUST RACE AGAINST TIME TO MAINTAIN THE BALANCE OF POWER IN THE NEW WORLD.
अश्विन संघी यांचे हे नेहमीप्रमाणे गूढ आणि उत्कंठावर्धक कथानक आहे, जिथे इतिहास आणि मिथक यांचा मिलाप होतो. `द व्हॉल्ट ऑफ विष्णू` या कादंबरीमध्ये पल्लवाचा राजकुमार कंबोडियाचा राजा होण्यासाठी जातो. सोबत त्याने जपून नेलेली गुपितेच अनेक शतकांनंतर युद्धाची कारणे बनतात. प्राचीन चीन मधील एक बुद्ध साधू एका कोड्याचे धागे शोधत भारतात येतो. ते कोडे सोडवल्याने त्याचा राजा सर्वशक्तिशाली होणार असतो. भारत - चीन सीमेवरील युद्धामुळे ज्ञानसंवर्धनासाठी आदिवासी जमातींनी चालवलेला लढा दुर्लक्षित राहतो. दरम्यानएक शास्त्रज्ञ कांचीपुरम मधील मंदिरातील प्राचीन लिपीचा अर्थ उलगडण्यात यशस्वी होतो. या प्रवासात सिक्रेट एजंट त्याच्या मागावर असतात. या सगळ्या वादळात एक अन्वेषक सापडते. तिचा स्वतःचाही गुंतागुंतीचा भूतकाळ आहे. जगाचा तोल सांभाळला जाण्यासाठी तिला काळ वेळेविरुद्ध शर्यत करावी लागते.
THE VAULT OF VISHNU BY ASHWIN SANGHI
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #दिव्हॉल्टऑफविष्णू #अश्विनसांघी #संकेतलाड #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #THEVALUTOFVISHNU #ASHWINSANGHI #SANKETLAD "
Customer Reviews
  • Rating Starबाबुराव रामजी.

    आज कित्येक वर्षानंतर ३०० पानी कादंबरी सलग वाचून संपवली! अश्विन सांघी यांनी लिहिलेली `दि व्हॉल्ट ऑफ विष्णू` ही #कादंबरी म्हणजे एक प्राचीन आणि सद्य परिस्थितीशी मेळ घालणारी थरारक #रहस्य कादंबरी आहे. दीड हजार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने ारताला भेट दिली होती. त्याच्या प्रवासाचे चित्रण व त्याला अनुसरणाऱ्या सद्यपरिस्थितीचे कथानक असा मेळ घालणारी ही कादंबरी आहे. #भारत आणि #चीन या २१ व्या शतकामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. शिवाय दोघेही सख्खे शेजारी असल्यामुळे स्पर्धा देखील प्रत्येक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. चार वर्षांपूर्वी चीनने भारताच्या डोकलाम येथे भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर बराच गदारोळ देखील उठला. याच पार्श्वभूमीचा वापर करून लेखकाने भारत आणि चीन प्राचीन संबंधांपासून आज असलेल्या संबंधांपर्यंतचा लेखाजोखा या रहस्य कादंबरीमधून मांडलेला आहे. ह्यूएन त्संगचा प्रवास आणि आजच्या भारत व चीन मधील घडामोडी हे दोन्ही प्रसंग समांतर पद्धतीने या पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत. ह्यूएन त्संगचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी, अवघड आणि विविध साहसं व नशिबाने भरलेला जाणवतो. आपल्या लेखणीने लेखक आपल्याला दीड हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातो. विशेष म्हणजे या प्रवास वर्णनात वापरलेली स्थळांची सर्व नावे तत्कालीन आहेत. यातूनच प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीची घट्ट पकड देखील आपल्याला ध्यानात येते. तत्कालीन बौद्धमय भारत कसा होता, हे देखील अनुभवयास मिळते. सुरुवातीलाच या चिनी प्रवाशाच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग स्थळांसहित नकाशामध्ये दाखविण्यात आलेला आहे. कदाचित तो नकाशा नसता तर कादंबरीतील वर्णन सुरस वाटले नसते. काही वर्षांपूर्वी तमिळ भाषेमध्ये अभिनेत `एल्लम अरीवू` (हिंदी भाषांतरित-चेन्नई टु चायना) हा चित्रपट बनविला होता. बोधिधर्म या बौद्ध भिक्खूच्या चीन प्रवासावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. याच बोधिधर्मचा प्रवास व कर्तुत्व देखील कादंबरीमध्ये वाचायला मिळते. यात अनेक पात्रे आहेत, शेकडो घटना आहेत. परंतु त्यांचा मेळ अतिशय उत्तमरीत्या लेखकाने बसविल्याचा दिसतो. अतिशय शांतपणे व एकाग्र चित्ताने ती वाचल्यास त्याचे थरारकनाट्य व रहस्यभेद हे वाचनाची खरीखुरी अनुभूती देतात. तीन-चार ठिकाणी झालेले रहस्यभेद हे अनपेक्षित वाटून जातात, यातच लेखकाचे यश सामावलेले आहे! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more