* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THINK YOURSELF GORGEOUS:HOW TO FEEL GOOD - INSIDE AND OUT
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA MULAY
  • ISBN : 9789353171179
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
YOUNG GIRLS ENTERING PUBERTY OFTEN EXPERIENCE A CRISIS OF CONFIDENCE WHICH, IF IGNORED, CAN LEAD TO LIFE-LONG ISSUES. IN THINK YOURSELF GORGEOUS, EXPERIENCED AGONY AUNT ANITA NAIK SHOWS THAT LOW SELF-ESTEEM AND BAD BODY IMAGE HAPPENS TO EVERYONE, NO MATTER HOW THEY BEHAVE IN PUBLIC (INCLUDING THE MOST POPULAR GIRLS). AND SHE DEMONSTRATES WHY IT PAYS TO LOVE THE REAL YOU, WARTS AND ALL. FOCUSING ON ISSUES OF WEIGHT, BEAUTY, PEER PRESSURE, STRESS, BODY IMAGE, PUBERTY AND EMOTIONS, THINK YOURSELF GORGEOUS WILL HELP YOUNG GIRLS TO UNDERSTAND WHY THEIR IDEA OF THEMSELVES IS TAKING A DOWNWARD TURN, WHY IT IS NATURAL FOR THEM TO FEEL THAT WAY, AND WHAT THEY CAN DO ABOUT IT. PACKED WITH BODYLICIOUS TIPS, QUOTES FROM OTHER TEENAGERS AND PRACTICAL ADVICE, IT WILL ADDRESS ALL THE TRICKY AREAS THAT CAN DAMAGE A GIRL`S CONFIDENCE AND HELP THEM LEARN TO FEEL GORGEOUS INSIDE AND OUT.
सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा, वयात येणे आणि भावभावना या सर्वच गोष्टी अंतर्भूत असणारे ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे पुस्तक म्हणजे, तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा का वाटतो, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असुरक्षित का वाटते, हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आहे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल विश्वास वाटावा यासाठीचा सल्ला, अर्थपूर्ण माहिती आणि प्रत्यक्षात आणता येतील असे मार्गदर्शक मुद्दे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर वाटावे यासाठीही ते मदत करेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MANJUSHAMULE #ANITANAIK #THINKYOURSELFGORGEOUS #थिंकयुवरसेल्फगाँजींयस #HEALTH&PERSONALDEVELOPMENT"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 30-08-2019

    सुंदर मी होणार!... आपण सुंदर दिसावे असे पौगंडावस्थेतल्या प्रत्येकाला वाटते. या वयामध्ये झपाट्याने होणाऱ्या बदलांनी मुला-मुलींनी गांगरून जाणे स्वाभाविकच आहे, अशा वेळी पालकांची आणि भावंडांची भावनिक मदत प्रत्येकाला मिळतेच असे नाही. पौगंडावस्थेतल्या धड ा लहान, धड ना मोठ्या अशा अवस्थेमधल्या मुलींच्या भावनिक आणि शारीरिक वाढीचा वेग झपाट्याने वाढलेला असतो. पण त्याविषयी खुलेपणाने बोलणे अनेकदा टाळले जाते. बऱ्याचदा पालकांना देखील पूर्ण माहिती नसते. मुलींमध्ये होणाऱ्या या बदलांच्या दरम्यान भावनिक आधार आणि मार्गदर्शनाची गरज असताना पालकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे मुलींचा आत्मविश्वास आणि एकदंर व्यक्तिमत्त्वासाठी देखील धोक्याचे ठरते आणि यातूनच नकारात्मक विचार वाढू शकतात. लहान वयात अर्धवट ज्ञानामुळे चुकीच्या गोष्टी खऱ्या वाटू शकतात. त्यामुळे अशा वयात मार्गदर्शन करणारे एखादे पुस्तक म्हणजे ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’! पुस्तकाच्या नावाप्रमाणेच पुस्तक स्वत:बद्दलच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणणारे आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चात्मक पद्धतीने भाष्य केले आहे. सामान्यत: माहिती असलेल्या गोष्टींचा फापटपसारा टाळत नेमकी माहिती दिली गेली आहे. मुलींच्या अंतर्वस्त्राविषयीच्या योग्य माहितीपासून, ते अगदी मासिक पाळीपर्यंतची सगळी वैद्यकीय माहिती या पुस्तकात योग्य पद्धतीने, अगदी सोप्या भाषेत दिली आहे. रुक्षपणाने केवळ माहिती न देता अगदी मूलभूत प्रश्नांचा आधार घेत विषयाला सहजगत्या हात घातला आहे. या दरम्यान अधूनमधून उदाहरणे देत विषय रंजक केला गेला आहे. शरीर आणि आपल्या दिसण्याविषयीची मनातली प्रतिमा यावर सांगोपांग चर्चा केली आहे. वय वाढत चालले की शरीराचा आकार स्वाभाविकपणे बदलतो, या बदलांबाबत योग्य मार्गदर्शन, आपण जाड आहोत यासारख्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना कसे हाताळायचे, याचे चांगले मार्गदर्शन केले आहे. हल्ली समाजामाध्यमे तसंच टीव्ही वाहिन्यांमुळे जगात सौंदर्यांविषयीच्या कल्पना बदलल्या आहेत. फोनमधील फिल्टरच्या साहाय्याने एडिट केलेल्या फोटोसारखेच आपण कायम दिसावे अशी मुलींची अपेक्षा असते. पण सौंदर्याविषयीच्या या संकल्पनांचा पोकळपणा या पुस्तकातील प्रकरणांमध्ये दाखवला आहे. १३ ते २० या वयात मुलींच्या आयुष्यातदेखील बदल होतात. त्यामुळे बाह्य सौंदर्याच्या या कल्पनांच्या पोकळपणाबरोबरच खरे आंतरिक सौंदर्य काय आहे याविषयी या पुस्तकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने भाष्य केले आहे. कॉलेज जीवनात नवनवीन मैत्रिणी मिळतात, अशा वेळी पालकदेखील खुल्या वातावरणात वाढणाऱ्या आपल्या मुलीच्या सुरक्षेबद्दल आणि तिच्या योग्य संगतीबद्दल चिंतेत असतात, मुलींना काही निर्बंध घातल्यास तणाव येणे साहजिकच आहे, त्यामुळे या पुस्तकात मैत्रिणींची निवड, कॉलेज जीवनातील गट-तट, हेवेदावे याविषयीही चर्चा केली गेली आहे. आई-वडिलांशी मुलीच्या असणाऱ्या नात्यावरदेखील या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला गेला आहे. या सर्व विषयांची ओघवती रचना ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ या पुस्तकात दिसते. वयात येणाऱ्या मुलींनी एखाद्या मैत्रिणीशी बोलावं अशा पद्धतीने पुस्तकातील कथन आहे. यामुळे ते अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. पुस्तकात अधूनमधून दिलेल्या चौकटींमध्ये अनेक मुलींचे वैयक्तिक आयुष्यातले संदेश दिले आहेत. ज्याच्याशी नुकत्याच वयात आलेल्या मुली जोडून घेऊ शकतात. यात वयात आल्यानंतर मुलींना ज्या विषयांची पहिल्यांदा ओळख होते, त्याची फक्त माहितीच दिलेली नाही तर काय योग्य, काय अयोग्य याचेही मार्गदर्शन केले आहे. पुस्तकात अधूनमधून असणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या आणि त्यातून मिळालेल्या गुणसंख्येमुळे स्वत:च्या वागण्या-बोलण्याविषयीची नेमकी माहिती आपल्यालाच मिळते आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या कमी-जास्त गोष्टींना कसे हाताळावे याचेही मार्गदर्शन होते. त्यामुळे या चाचण्या अधिकच उपयोगी ठरतात. पुस्तकात अधूनमधून काही चौकटींमधून दिलेली वेगवेगळी रंजक माहिती वाचनीय आहे. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलींच्या समस्या, अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, पण वयात येताना वाटणारा न्यूनगंड हा वयात येण्याचाच एक भाग आहे, त्यात खचून जाण्यासारखे काहीही नाही. ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’सारख्या पुस्तकांचा त्यासाठी मुलींना आधार नक्कीच वाटू शकतो. –विशाखा कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 02-12-2018

    आत्मविश्वास देणारं पुस्तक... ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे अनिता नायक यांचं मूळ इंग्रजी पुस्तक तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींसाठी खूपच मार्गदर्शक असं आहे. या पुस्तकाचा उत्तम अनुवाद मंजूषा मुळे यांनी केला आहे. तारुण्यात पदार्पण करताना मुलींचं आपल्याशरीराकडे विशेष लक्ष जातं, याच टप्प्यावर त्यांना त्यांच्या शरीराविषयी, शरीरातील मानसिक-भावनिक बदलाविषयी कुणीतरी नीट समजावून सांगण्याची गरज असते. ती गरज हे पुस्तक पुरं करतं. हे पुस्तक म्हणजे केवळ शरीरसौंदर्याविषयी दिलेल्या टीप्स नाहीत, तर हे पुस्तक म्हणजे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींच्या मनात जागवलेला आत्मविश्वास आहे. यामुळे समाजात उभं राहण्यासाठी तरुणींना नक्कीच मदत होऊ शकते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    सौदर्याची आत्मविश्वासी ओळख... आपले स्वत:बद्दल खूप चांगले मत असणे आणि आपण स्वत:ला जसे आहोत तसे आवडणे ही खरंतर फार मोलाची गोष्ट आहे. विशेषत्वाने मुलींबाबत ही खूप सजगतेने घडायला हवी, या विचाराने अनिता नायक यांनी लिहिलेले ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे पु्तक वयात आलेल्या मुलींना खूप मदत करणारे आहे. या पुस्तकातून लेखिकेने सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा आणि वयात आल्यानंतरच्या भावभावना याबाबत अतिशय प्रामाणिक, व्यावहारिक आणि खात्रीलायक असे मार्गदर्शन केले आहे. मुलींच्या दिसण्यापासून व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते. आपल्याच शरीराबद्दल आपल्याला आत्मविश्वास वाटावा आणि त्यातून अंतर्बाह्य सुंदरतेचा प्रत्यय आणून देणारे हे विचारसौंदर्यवर्धक पुस्तक मुलींनी जरूर वाचावे असे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more