`THE CHARACTERS IN THE STORIES `CHINDHI`, `PUTALI`, `DAU`, `VASANA`, `MADHOSINHA`, `EK HASYA ANI EK KHOON` IN THE COLLECTION OF STORIES -`THRILLS` WRITTEN BY MAHADEV MORE BEHAVE IN AN INHUMAN WAY AND INSTIGATE PEOPLE OF THE SOCIETY AS WELL. SOME OF THEM ENDURE SUFFERING AND INJUSTICE, WHILE OTHERS RESORT TO VIOLENCE TO HANDLE THE SITUATION. `PUTALI`, A POOR DANCER, LEADS A LIFE OF STRUGGLE BY CARRYING A GUN, KILLING AND ROBBING. THE LAWYER IN `RAHASYA` IS RIDDLED BY HIS CLIENT-MRS. NEELA DESHPANDE. INSTEAD OF SOLVING HER MYSTERIOUS CONFUSION, MR.LAWYER GETS ENTANGLED IN IT HIMSELF. IN THE STORY `SOOD`, LAKHANSINGH, RAGHUVEER SINGH AND SUBASINGH, DESTROY THEIR LIVES DUE TO MUTUAL DIFFERENCES AND REVENGE. JASPAL SINGH FROM A PUNJABI FAMILY DIES IN ‘NIYATI ANI NYAY’.SO WHO IS THE MURDERER- JASPAL`S BROTHER-IN-LAW-MAHENDRA SINGH OR- PALWINDER KAUR? THIS MYSTERY CONTINUES TO HAUNT. “ AANIBANITIL GOSHTA” IS THE STORY OF FRAUDSTER PREMSHANKAR. HE PRETENDS TO BE A FAKE GOVERNMENT OFFICIAL, SPEAKS ENGLISH AND EVERYONE IS STUNNED TO SEE THE SCAM HE CREATES. THUS, MAHADEV MORE`S STORIES PORTRAY THRILL ANDMYSTERY IN REAL LIFE WITH PASSION.
महादेव मोरे लिखित ‘थ्रिल्स’ या कथासंग्रहातील ‘चिंधी’, ‘पुतळी’,‘दाऊ’, ‘वासना’,‘माधोसिंह’,‘एक हास्य आणि एक खून’ या कथांतील पात्रे मानवतेला हरताळ फासतात आणि मग समाजातील माणसेच पेटून उठतात. त्यांतील काही दु:ख-अन्याय सहन करतात, तर काही स्वत: हत्यारं उचलतात.‘पुतळी’ ही गरीब नर्तकी हाती बंदूक घेऊन खून-लूटमार करत संघर्षमय आयुष्य जगते. ‘रहस्य मधील वकिलाला त्याची अशिल-मिसेस नीला देशपांडे अजब कोड्यातच टाकते. तिचा गुंता सोडवण्याऐवजी वकीलमहाशय स्वत:च त्यात गुरफटत जाऊन फसतात. ‘सूड’मधील लाखनसिंह, रघुवीरसिंह, सुबासिंह यांच्यातल्या आपापसांतील वितुष्टांमुळे-सूड भावनेने त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. ‘नियती आणि न्याय’ मधून पंजाबी कुटुंबातील जसपालसिंहचा मृत्यू होतो. जसपालच्या पत्नीचा चुलतभाऊ-महेंद्रसिंग,हा खून करतो का,की- पलविंदरकौर? हे गूढ सतावत राहते. ‘आणीबाणीतील गोष्ट’ ही तोतया प्रेमशंकरची. इंग्रजी भाषा बोलून, खोटा सरकारी अधिकारी बनून, तो जो धुमाकूळ घालतो, ते पाहून सर्वच थक्क होतात. अशा प्रकारे महादेव मोरे यांच्या कथेतून थ्रील, थरार व रहस्याचे वास्तव दर्शन उत्कटतेने होते.