* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHY MY THIRD HUSBAND WILL BE A DOG
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184985351
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 288
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A HILARIOUS COLLECTION OF STORIES FROM THE LIFE OF THE NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR OF LOOK AGAIN AT LAST, TOGETHER IN ONE COLLECTION, ARE LISA SCOTTOLINE’S WILDLY POPULAR PHILADELPHIA INQUIRER COLUMNS. IN HER COLUMN, LISA LETS HER HAIR DOWN, ROOTS AND ALL, TO SHOW THE HUMOROUS SIDE OF LIFE FROM A WOMAN’S PERSPECTIVE. THE SUNDAY COLUMN DEBUTED IN 2007 AND ON THE DAY IT STARTED, LISA WROTE, “I WRITE NOVELS, SO I USUALLY HAVE 100,000 WORDS TO TELL A STORY. IN A COLUMN THERE’S ONLY 700 WORDS. I CAN BARELY SAY HELLO IN 700 WORDS. I’M ITALIAN.” THE COLUMN GAINED MOMENTUM AND POPULARITY. WORD OF MOUTH SPREAD, AND READERS DEMANDED A COLLECTION. WHY MY THIRD HUSBAND WILL BE A DOG IS THAT COLLECTION. SEVENTY VIGNETTES. VINTAGE SCOTTOLINE. IN THIS COLLECTION, YOU’LL LAUGH ABOUT: • BEING CAUGHT BRALESS IN THE EMERGENCY ROOM • BETTY AND VERONICA’S LIFE LESSONS FOR GIRLS • A MAN’S MOST IMPORTANT BODY PART • INTERRUPTING AS AN ART FORM • A RELIGION MEN AND WOMEN CAN WORSHIP • REAL ESTATE ADS AS PORN • SPANX ARE PUBLIC ENEMY NUMBER ONE • AND SO MUCH MORE ABOUT LIFE, LOVE, FAMILY, PETS, AND THE PURSUIT OF JEANS THAT ACTUALLY FIT!
या पुस्तकात लेखिकेने स्वत:चा घर-परिवार अन् त्यातील जबाबदाऱ्यांसोबतच भारतीय महिला विविध क्षेत्रांत नुसते काम नाहीतर पथदर्शक कामगिरी पार पाडू शकतात, हे सिद्ध करणाऱ्या महिलांशी मनमोकळे हितगुज केलेले आहे. भारतातील आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या या महिलांनी सांगितले की, वादळ-वाऱ्यात, ऊन-पावसात अत्यंत कठीण समयी कोणत्या तत्त्वांच्या आधारे त्या ठाम राहिल्या त्यांना कोठून प्रेरणा मिळाली. या महिलांनी तेव्हा सर्व प्रकारच्या विपरित परिस्थितींचा सामना केला, प्रसंगी हालपेष्टा सोसल्य़ा, लिंगभेदामुळे अपमान गिळले. यामुळेच त्या-त्या क्षेत्रातील कवाडे पुढील पिढीतील महिलांसाठी खुली झाली आहेत. या महिलांनी जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलेले आहे. सर्वच क्षेत्रांतील अग्रणी तुमच्या भेटीला आलेल्या आहेत. धवलक्रांतीत मोलाचा सहभाग असलेल्या अम्रिता पटेल, औषध निर्मीती अन् संशोधन क्षेत्रातील किरण मुझुमदार, बँकिंग क्षेत्रातील कल्पना मोरपारिया, शिखा शर्मा, नैनालाल किडवाई, उद्योग क्षेत्रातील अनु आगा, मेहेर पद्मजी, मल्लिका श्रीनिवासन, प्रिया पॉल, लीला पुनावाला, विनीता बाली, कला क्षेत्रातील मल्लिका साराभाई, शुभा मुद्गल आणि सामाजिक क्षेत्रातील शाहिन मिस्त्री, क्रिडाक्षेत्रातील पी.टी. उषा यांतील प्रत्येक जण आपापल्या कार्यात शिखराला पोहचलेल्या असून प्रत्येकीचे जीवन फारच प्रेरणादायी आहे; पण सर्वांत महत्त्वाचे नमूद करावेसे वाटते, ते म्हणजे प्रत्येकीने आपापली सामाजिक जाणीव जागृत ठेवून त्यानुसार भरीव काम केलेले आहे. यातील प्रत्येकीचाच प्रवास रोलकोस्टर राइडसारखा चित्तथरारक असून तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाचे दर्शन तर होईलच, पण यशस्वी होण्याच्या त्रिकालाबाधीत सत्य असलेले गुपित देखील उमजेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #लिसा स्कॉटोलिन #LISA SCOTTOLINE #SHOBHANA SHIKNIS #तिसरा नवरा नको गं बाई #WHY MY THIRD HUSBAND WILL BE A DOG #TISARA NAVARA NAKO GA BAI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKRANG 07-09-2014

    खुमासदार शैलीतल्या गुजगोष्टी... ‘स्त्री एका टी-बॅगसारखी असते. गरम पाण्यात असल्याशिवाय ती किती कडक आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही.’ या एलेनॉर रुझव्हेल्ट यांच्या सुप्रसिद्ध वाक्याने ‘तिसरा नवरा नको गं बाई!’ या पुस्तकाची सुरुवात होते आणि हे पुस्तक स्तरियांच्या एका आगळ्यावेगळ्या स्वभावपैलूवर प्रकाश टाकणार याची कल्पना येते. लिसा स्कॉट्टोलाइन या अमेरिकन लेखिकेचे हे पुस्तक म्हणजे तिच्या वृत्तपत्रीय स्तंभाचं संकलन आहे. छोट्यामोठ्या निरीक्षणांपासून ते अगदी राष्ट्रीय घडामोडींवर प्रतिक्रिया देणारी लिसा नकळतपणे वाचकांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी देते. समस्त महिलावर्गाशी हितगुज केल्यासारखी बिनधास्तपणे, काहीशा धाडसी विषयांना ती सहज हात घालते. पन्नाशीच्या जवळ असलेली, दोनदा घटस्फोट झालेली स्त्री तिच्या भन्नाट आयुष्यातले किस्से ऐकवत वाचकाला खिळवून ठेवते. त्यातूनच एका स्त्रीची आयुष्याकडे बघण्याची नर्मविनोदी शैली उलगडत जाते. तिच्या विभक्त पतीराजांना ती चक्क ‘वस्तू १’ आणि ‘वस्तू २’ या नावाने संबोधते. पाळीव प्राण्यांचा ताफाच तिच्याकडे आहे. त्यांच्यासह आकाराला आलेले तिचे कुटुंब हा तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकतीच पदवीधर झालेली तिची तरुण मुलगी फ्रान्सिस्का, सत्तरीतली आई, गे असणारा भाऊ फ्रॅंक आणि हयात नसणारे वडील हे तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याविषयीच्या माहितीतून त्यांच्यातील नातं, भावनिक बंध उलगडत जातात. अमेरिकन लोकही कुटुंबाशी इतके जोडलेले असू शकतात, याचा प्रत्यय तिच्या लेखनातून आपल्याला येतो. तिची मते अनेकदा खट्याळ वाटली तरी प्रामाणिक वाटतात. ‘राष्ट्राध्यक्षांचे व्हाइट हाऊस थोडं अधिक चांगल्या प्रकारे नाही का सजवता येणार’, असं सुचवून सजावटीच्या काही सूचनाही करून ती मोकळी होते. अमेरिकेत न्यक्लिअर कुटुंबाचं इतकं पेव फुटलेलं असताना कुत्र्यांवर प्रेम असलेली माणसे किमान २-३ जातीची कुत्री पाळतात, याला काय म्हणावे? असे तथ्य असणारे प्रश्न ती उपस्थित करते. ‘बाबांची आठवण येते’ या प्रकरणातून तिची वडिलांविषयीची कृतज्ञता, प्रेम, हळवी लिसा समोर येते. तर ‘स्वर्गातला घोटाळा’ मधून फ्रॅंक व आई यांच्यातील लुटुपुटुच्या लढाईचा तिने लावलेला सोक्षमोक्ष पाहून तिच्या लेखनाविषयी कौतुक वाटतं. ‘माझे लाडके प्राणी’ मधील लिटिल टोनी हा किंग कॅव्हॅलिअर जातीचा गोंडस कुत्रा हा माझा रोल मॉडेल असल्याची प्रस्तावना करीत आपल्याला लेखिका धक्का देते. पुढे रुबी ही कॉर्गी जातीची दमदाटी करणारी कुत्री टोनीचा कसा मायेने सांभाळ करते याचे वर्णन करत, लेखिका तिच्या रोल मॉडेल्सचे वेगळेपण विषद करते. पुस्तकातील काही प्रकरणे थोडी पाल्हाळ लावल्यासारखी वाटली तरी लिसाची लेखनशैली वाचकांना खिळवून ठेवते. एकूणच अनौपचारिक गप्पांमधून आपल्याला तिच्या आयुष्यातील घटना, प्रसंग यांविषयी माहिती देत लेखिका तिचे आयुष्याविषयीचे तत्त्वज्ञान आपल्याला समजावू पाहते. अनुभवातून आलेलं शहाणपण, मनाचा मोठेपणा व एकटीने धीराने राहणारी तिची छबी आपल्याला मोहून टाकते. चटकदार तरीही संवेदनशील लेखन असाच उल्लेख या पुस्तकाचा करावा लागेल. या अनुभव कथनाला ‘तिसरा नवरा नको गं बाई!’ हे शीर्षक का, असा प्रश्न वाचकाला सुरुवातीला पडतो. परंतु पुस्तक वाचून झाल्यावर या प्रश्नाचं उत्तर सापडतं. जीवनात आधार शोधताना लिसा लग्नाच्या बंधनात अडकते. परंतु संसार थाटण्याच्या दोन्ही प्रयत्नांमध्ये अपयश आल्यावर ती शहाणी होते आणि एकटी राहण्याचा निर्णय घेते. यावेळी मात्र तिच्या सोबत असतात तिचे लाडके पाळीव प्राणी. त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा व त्यांच्यामुळे होणारा कमी त्रास या दोहोंमुळे तिला तिसऱ्या नवऱ्याची कमतरता अजिबात जाणवत नाही, म्हणूनच हा आगळावेगळा शीर्षकप्रपंच. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more