* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TO CUT A LONG STORY SHORT
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177662948
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE FOURTEEN STORIES SHOW JEFFREY ARCHER`S GREAT SKILLS WITH A WIDE VARIETY OF CHARACTER, OF SUBJECT AND OF SETTING, BUT ALL WITH THAT TRADEMARK TWIST IN THE TAIL. EVERY READER WILL HAVE THEIR OWN FAVOURITES: THE CHOICES RUN FROM LOVE AT FIRST SIGHT ACROSS THE TRAIN TRACKS TO THE CLEVEREST OF CONFIDENCE TRICKS, FROM THE QUIRKS OF THE LEGAL PROFESSION X AND THOSE WHO ARE ABLE TO MANIPULATE BOTH SIDES OF THE BAR X TO THE CREATIVE FINANCIAL TALENTS OF A MEMBER OF HER MAJESTY`S DIPLOMATIC SERVICE X BUT FOR A GOOD CAUSE. THE LAST STORY, `THE GRASS IS ALWAYS GREENER`, IS POSSIBLY THE BEST PIECE ARCHER HAS WRITTEN, AND WILL HAUNT YOU FOR THE REST OF YOUR LIFE.
पात्रयोजना, कथानक, विषय आणि पाश्र्वभूमी या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणा-या जेफ्री आर्चर यांच्या कथांचा हा संग्रह. या सर्वच कथांतून जेफ्री आर्चर यांच्या लेखणीचे कसब आणि लालित्य दिसून येते. प्रत्येक वाचकाला या कथासंग्रहात स्वतःच्या पसंतीची एकतरी कथा हमखास सापडेल. यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर झालेली नजरानजर व त्यातून फुलून आलेली प्रेमकथा आहे; प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे वाकवणा-या कायदेतज्ज्ञाची कथा आहे. तसेच, एका तरुणीची अत्यंत विलक्षण, सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. शेवटची ‘द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ अर्थात ‘दुरून डोंगर साजरे’ ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटाला जेफ्री आर्चर यांनी एक नाट्यपूर्ण कलाटणी दिलेली आहे. म्हणूनच हा शेवट धक्कादायक वाटतो. यातील अनेक विस्मयकारक कथा या सत्यघटनेवर आधारित आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #जेफ्रीआर्चर #JEFFREYARCHER #ANJANINARAVANE #AJITTHAKUR #SUDHAKARLAWATE #LEENASOHONI #NOTAPENNYMORENOTAPENNYLESS #नॉटअपेनीमोअरनॉटअपेनीलेस #SONSOFFORTUNE #सन्सऑफफॉर्च्युन #FALSEIMPRESSION #फॉल्सइम्प्रेशन #APRISONEROFBIRTH #अप्रिझनरऑफबर्थ #KANEANDABLE #केनअँडएबल #CATONINETALES #कॅटओनाइनटेल्स #TOCUTALONGSTORYSHORT #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #ANDTHEREBYHANGSATALE #अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल PATHS OF GLORY पाथ्स् ऑफ ग्लॉरी "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 08-06-2003

    विस्मयकारक ‘सत्य’ कथा... सशक्त कथासूत्र, विषयाची अचूक निवड, समर्पक पात्रयोजना आणि वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी अशा सर्वच बाबतीत उल्लेखनीय ठरणाऱ्या जेफ्री आर्चर यांच्या कथांचा संग्रह ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ १४ उत्कंठावर्धक कथांचा समावेश या संग्रहातअसून ८ कथा सत्यघटनांवर आधारित असल्याचे म्हटले आहे. आर्चर यांच्या खास धक्कातंत्राच्या वैशिष्ट्याने प्रत्येक कथा समृद्ध असून मानवी स्वभावाचे असंख्य कंगोरे या कथासंग्रहातून समर्थपणे अनुभवास येतात. आर्चर यांच्या स्वत:ला भावलेली ‘मृत्यूदेवता बोलते’ ही कथा. अत्यंत साधी व सोपी आणि तरी परिणामकारक कथनशैली हे तिचे वैशिष्ट्य वाचकांना खिळवून ठेवल्याखेरीज राहात नाही. विशेष म्हणजे हे वैशिष्ट्य पुढील प्रत्येक कथेत तेवढ्याच ताकदीने प्रकट होते. ‘नृत्य’ या विषयाबद्दल माणसाच्या मनात असलेली भावना, तिची परिणीती नियती आणि तिचे जीवनातील अनिवार्य स्थान, बुद्धिमत्ता आणि चलाखी, गुण आणि स्वार्थ अशा विविध भावभावनांचा मुक्त आविष्कार या कथासंग्रहातून अनुभवास येतो. अगदी सहज घडणाऱ्या दैनंदिन घटनांच्या मालिकेतून जीवन कसे नाट्यमय वळण घेऊ शकते. याचा जिवंत प्रत्यय आर्चर यांच्या प्रत्येक कथेतून अनुभवास येतो. व्यक्तीच्या जीवनविषयक धारणांचा प्रभाव अपरिहार्यपणे त्याच्या जीवनावर पडत असतो, हे या कथांतील व्यक्तिचित्रणात प्रकर्षाने जाणवते. माणूस विचार एक करत असतो आणि प्रत्यक्षात घडते मात्र वेगळे. कधी कधी तर अगदीच अनपेक्षित! मानवी जीवनतील हे सत्य हेच आर्चर यांच्या लेखनशैलीचेही वैशिष्ट्य आहे, जी वाचकमनावरील आपली पकड कधीच सैल होऊ देत नाही. हे अद्भूताहून अद्भूत असते, प्रत्यंतर देणाऱ्या या कथा म्हणूनच ठरतात. या कथासंग्रहाच्या अनुवादाची जबाबदारी लीला सोहोनी यांनी उत्तम पार पाडली असून जेफ्री आर्चर शैलीची नेमकी नस त्यांना सापढली. विशेष म्हणजे पुस्तकाच्या शीर्षक कथांच्या शीर्षकापर्यंत कशाचेच भांषातर केलेले नाही. सा सर्वच कथांतून जेफ्री आर्चर लेखणीचे कौशल्य आणि स्पर्श करील, आवडेल अशी एकतर प्रत्येक वाचकाला या कथासंग्रहात हा सापडेल हे या कथासंग्रहाचे यश असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही -संतोष ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 08-12-2002

    बेस्ट सेलर लेखक लॉर्ड जेफ्री आर्चर ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ या चौथ्या कथासंग्रहाचा लीना सोहोनी यांनी मराठी अनुवाद केला आहे. या संग्रहातील १५ कथांपैकी ९ कथा सत्यघटनेवर आधारित आहेत, असे प्रस्तावनेत म्हटले आहे. तर पहिली कथा मूळ अरबी भाषेतून अनुवादित ोऊन आलेली आहे. नियतीला चुकविण्याचे मानवी प्रयत्न नियतीचं कसे विफल करते हे या छोट्य कथेचे सार आहे. लेखकाचे वैशिष्ट्य त्याच्या कुतूहलपूर्ण व्यक्तिदर्शनात व कथानकाला शेवटी अनपेक्षित कलाटणी देण्यात दिसून येते. कथेतील पात्रे ज्या वातावरणात असतात त्याला अनुसरून कथेतील प्रसंग घडत असताना त्या व्यक्तीच्या मनातील, कृतीत स्वाभावित वृत्तींना अनुसरून स्वभावचित्रे रेखाटली आहेत. बँक, कोर्ट, पोलिस चौकी, रेल्वे प्लॅटफॉर्म, चित्र प्रदर्शने व घरे ही घटना घडत असल्यावेळीची स्थळे तर उच्चभ्रू समाज, बिझिनेस मन, मध्यमवर्गीय, चोर, पोलिस इन्स्पेक्टर वकील अशा सर्व थरातील व्यक्ती ही पात्रे लेखकाचे खरे चातुर्य लक्षात येते ते कथानकाची गुंफण व कथेला मिळालेली कलाटणी. आयुष्यात येणारे मोहोच प्रसंग (समथिंग फॉर नथिंग) कधी कधी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता त्याकरता कायदेकानूंनची बारकाव्यासह माहिती घेऊन त्यातील पळवाटांच्या आधारे करून घेतलेली सुटका (क्राइम पेज) कधी कधी यातून मोठा फायदाही उदा. मेनी कोईन्सिडन्सेस ही कथा रूक्ष ही अँगस नावाच्या प्रौढ माणसाची पत्नी मॅक्सच्या प्रेमात पडते. अँगसच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्याशी लग्न करते. एक वर्ष तो तिच्या प्रेमात बुडून जातो; पण हळू हळू तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ती कंटाळते. दुसऱ्याशी संबंध जोडण्याच्या कारणास्तव घटस्फोट देते. इथपर्यंत कथा सरळ जाते. पण अचानक मॅक्स जर्सीच्या कायद्यानुसार लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या (प्रथम) पतीच्या इस्टेटीतील तिसरा हिस्सा मिळावा म्हणून अर्ज करतो. त्याला तो मिळतोही आणि मग तिला गेल्या तीन वर्षातील घटना आठवतात. त्यांची लंडनमधील (बोगस) नोकरी. काही काळ हिच्याच घरी वास्तव्य संबंधित लोकांच्या ओळखी ह्यावरून तिची खात्री पटते की हा प्लॅनपे त्याने पूर्वीच शिजवला व योजनाबद्धतेने पार पाडून ६२ हजार पौंड मिळवले. मॅक्सचे चातुर्य रूथची भावनाप्रधानता व कायद्याचे अज्ञान या सर्वांचा मोठा सुरेख परिणाम लेखकाने साधला आहे. बँकेतील शेवटच्या कर्मचाऱ्यापासून चेअरमनपर्यंत प्रत्येकाला आपल्याला वरची जागा कशी मिळेल. ती किती सुखाची असेल असे वाटत असते. खालपासून वरपर्यंत सगळेच असंतुष्ट - मनुष्य स्वभावातील असे काही कंगोरे लेखकाने ‘ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ या कथेत दाखवून कथा एका वेगळ्याच अंगाने फुलवत नेली आहे. एकूणच हा संग्रह केवळ वाचनीय नव्हे तर बुद्धीला खाद्य पुरवणारा आहे. कथांची शीर्षके व पात्रांची नावे इंग्रजी नसती तर कथा मराठीतीलच आहेत. इतका अनुवाद सुरेख झाला आहे. -मधुमालती कोटिभास्कर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-11-2002

    खिळवून ठेवणारी नाट्यमय कलाटणीची मालिका... वाचकाला खिळवून ठेवून शेवटपर्यंत शेवटाचा पत्ता न लागू देता गुंगवत ठेवायचे आणि अचानक संपूर्ण प्रसंगाला कलाटणी देऊन धक्कादायक शेवट करायचा, हे रहस्यमय कथा आणि चित्रपटाचे वैशिष्ट्य. या सूत्रावर कादंबरीकारांच्या ित्येक पिढ्या पोसल्या गेल्या आणि पोसल्या जात आहेत. या परंपरेतील एक ज्येष्ठ लेखक आणि रहस्यमयतेला ज्यांनी एक नवा आयाम दिला असे जेफ्री आर्चर यांचा ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ हा कथासंग्रह लीना सोहोनी यांनी त्याचा अनुवाद केला आहे. जेफ्री आर्चरची लिखाणाची पद्धत आणि वाचकांना खिळवून ठेवायची त्याची लकब ही जुनी नाही; त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्यांचे मराठीत विविध लेखकांनी धेडगुजरी अनुवाद आपल्या नावावर खपविले आहेत. स्थळ-काळाचे बंधन झुगारून कोणत्याही प्रकारच्या वाचकांपर्यंत पोहोचण्याची त्याची हातोटी असल्याने जगभरातील अनेक नव्या जुन्या रहस्यकथा लेखकांना त्याच्या कथांनी मोहिनी घातली आहे. हे ‘डुप्लीकेट’ आणि भाषा-संस्कृतीचा संकर करून केलेले वाचण्यापेक्षा लीना सोहोनी यांनी मराठी वाचकांना त्याच्या मूळ कथा वाचरृयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जाता जाता एवढेच सांगता येईल की जेफ्री आर्चरच्या ‘केन अँड एबल’सारख्या कादंबऱ्यांनी अनेक चित्रपटांनाही कथानके पुरविली असल्याने भारतीय वाचकाला त्याचे लिखाण नवे नाही. ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्टमध्ये आर्चरच्या चौदा निवडक कथांचा समावेश आहे. थोडीशी ओहेन्री आणि सॉमरसेट मॉम यांच्या अंगाने जाणारी शैली त्याने विशेषत: गुन्हेगारी कथानकांच्या अंगाने विकसित केली. ही शैली आज रहस्यमय कथांच्या जगातील माईल स्टोन झाली आहे. आर्चरची नसलेली कथा पहिल्यांदाच या संग्रहात त्याने घेतली आहे. याचा अनुभव देऊन जाते. सॉमरसेट मॉम यांच्या शेपी नाटकात आलेली ‘डेथ स्पिक’ ही कथा आर्चरने दिली आहे. एखादी कथा किती साध्या आणि सोप्या शैलीत परिणामकारक ठरू शकते, याचे उदाहरण त्याने या कथेवरून दिले आहे. त्याच्या पुढील साऱ्या कथा याच शैलीचे द्योतक ठरतात. क्राइम पेजसारखी कथा ज्यात प्रचंड आत्मविश्वास असलेल्या आणि दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये हे आव्हान स्वीकारून खेळलेल्या एका तरुणाच्या जिगरबाजीची कथा आहे. थंड डोक्याने केलेली गुन्हेगारी कृत्येही एखाद्याला कसे हीरो बनवितात, त्याचे हे उदाहरण आहे. ‘चॉक अँड चीझ’ सारखी संपूर्ण कौटुंबिक वळणाने जाणारी कथा, स्थलकाळाने बंध तोडून आपल्या मुलावर विद्वतेचा आरोप त्याचे जीवन दु:खदायी बनविणाऱ्या कोणत्याही आई-बापाला आपली वाटते. तर वर्णद्वेषाचा नाजूक विषय हाताळणारी ‘अ चेंझ् ऑफ हार्ट’ ही कथा जागतिक लढ्यात एका माणसाचा खारीचा वाटा कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतो. याचे दर्शन घडविते. ‘टू मेनी कोईन्सिडन्सेस’सारखी कथा सुष्ट आणि दुष्ट संघर्षात नियोजनबद्धपणे काम करून दृष्ट कशाप्रकारे एखाद्याचे आयुष्य नासवून टाकतो, याचे विदारक चित्रण घडविणारी, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणाचा हे सूत्र सांगणारी ‘अ विक टू रिमेंबर’ ही कथा, प्रेमासाठी काल हे परिमाण नाही हे सांगणारी. धक्कादायक आणि कलाटणींच्या शेवटाचा परिपाक असणारी ‘समथिंग फॉर नथिंग’ सारखी कथा तर अविस्मरणीय. आर्चरच्या कथांविषयी खरे तर त्यातील तपशील सांगून त्याची मजा घालविण्यासारखे आहे. पात्रयोजना, कथानक, विषय आणि पार्श्वभूमी या सर्वच बाबातीत जगभरातील लेखकांनी ज्याचे पाय धरावेत, अशा या कथा मुळातून वाचण्यातच खरी गंमत आहे. केवळ शेवटाला नाट्यपूर्ण कलाटणी द्यायची म्हणून ‘आणि अखेर पडदा फाडून तो बाहेर आला’ अशाप्रकारचा शेवट पाहण्याची सवय असणाऱ्या मराठी वाचकांना रहस्यमयतेमध्येही लालित्य असू शकते, याचा प्रत्यय या कथा देतात. लीना सोहोनी यांनी अत्यंत समजून उमजून केलेल्या अनुवादात भाषेचे सौंदर्य आणि रहस्यमयतेची नजाकत कोठेही हरविली नाही, हे या अनुवादाचे वैशिष्ट्य आहे. -अविनाश थोरात ...Read more

  • Rating StarDAINIK GOMANTAK SHABDSOHALA 22-06-2014

    सत्यघटनांना कथेत गुंफण्याचा जेफ्री आर्चर यांना नादच. ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ या कथासंग्रहातील पंधरा कथापैकी आठ कथा अशा सत्यघटनांवर आधारित आहेत. कमी अधिक लांबीच्या या कथा पात्रयोजना, कथानक विस्तार, कथाबीज, पार्श्वभूमी सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठणाऱ्या आहेत. अर्थातच त्या वैशिष्ट्यांत जेफ्री आर्चरच्या लेखणीचे कसब, लालित्य, ओघवतेपणा यांचा सिंहाचा वाटा निश्चितच आहे. विषयांचे वैविध्य वाचकाला खिशवून ठेवण्यात पूर्णतया यशस्वी होते. यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर झालेली नजरानजर व त्यातून फुलू आलेली प्रेमकथा आहे, प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे वाकवणाऱ्या कायदेतज्ज्ञाची कथा आहे, तसेच एका तरुणीची अत्यंत विलक्षण, सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. शेवटची ‘द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी, विख्यात लेखक ‘ओ हेन्री’प्रमाणे धक्कातंत्र वापरले आहे. या अचानक कलाटणीपायी नाट्यपूर्णता चरमसीमेवर पोचते. यातील सर्वांत छोटी व पहिली कथा ‘डेथ स्पीक्स’ - लेखकाच्या काळजाला असा काही स्पर्श करून गेली की तिला या कथासंग्रहात अग्रक्रम मिळाला. अर्थात ही कथा त्याची स्वत:ची नाही. ही कथा मूळ अरबी भाषेतून अनुवादित करण्यात आली आहे. सखोल संशोधानानंतर सुद्धा या कथेच्या मूळ लेखकाचा नाव व पत्ता सापडू शकलेला नाही. (हीच कथा सॉमरसेट मॉमच्या ‘----’ नाटकात व नंतर जॉन ओहारा यांच्या ‘---’च्या प्रस्तावनेत व जी. ए. कुलकर्णी यांच्या एका कथेत सुवर्णगरूडाच्या माध्यमातून आलेली आहे.) एकूणच मेहता पब्लिशिकेशनने प्रकाशित केलेला व लीना सोहोनींनी उत्कृष्ट अनुवाद केलेला हा संग्रह विदेशी पात्रं-पार्श्वभूमी व कथानकं असूनही खूपच मनोरंजक झाला आहे. प्रत्येकाच्या आवडीची किमान वाटतो यातच या कथासंग्रहाचे यश व वैशिष्ट्य लपलेले आहे. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ नावीन्यपूर्ण व प्रभावित करणारे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more