* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TO SIR, WITH LOVE
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177668247
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MR. BRAITHWAITE, THE NEW TEACHER. HE BEHAVED VERY DIFFERENTLY WITH THE STUDENTS IN HIS CLASS. HE MADE THEM LOOK DOWN SHAMEFULLY, REALIZING THEIR MISTAKES. HE FOUGHT WITH THEM, SOMETIMES HE ALSO WRESTLED WITH THEM. SLOWLY, YET STEADILY HE BROUGHT THE LIGHT OF KNOWLEDGE INTO THEIR LIVES AND LATER ON STARTED LOVING THEM, IMMENSELY. HIS STUDENTS WHO WERE FAMOUS FOR THEIR HOODLUMS, WHO WERE VERY SHAMELESS, STARTED RESPECTING HIM, CALLING HIM `SIR`. HE WAS THE ONE WHO TAUGHT THEM TO CALL THE GIRLS RESPECTFULLY WITH A `MISS`. HE TAUGHT THEM PERSONAL HYGIENE AND HE SAT WITH THEM TO READ SHAKESPEARE. HE WAS A TEACHER WITH SOME DEFINITE AIM, A TARGET. HE CHANGED THE HATRED, ANGER AND CONTEMPT INTO LOVE. HE TRANSFORMED THE REVOLUTIONARY NATURE OF THESE TEENAGERS INTO CONFIDENT MINDS. HE OPENED THE WAYS TO THINK ABOUT OTHERS, FROM OTHER`S POINT OF VIEWS. THIS WAS HIS SUCCESS, OF A TEACHER, OF HIS FERVOR, OF HIS EARNESTNESS TOWARDS HIS STUDENTS AND OF `THEIR` LOVE.
मि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली. हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले. त्यांच्या वर्गातील गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुलं त्यांना ‘सर’ म्हणून आदरानं हाक मारू लागली. त्या मुलांच्या गलिच्छ वस्तीतल्या पोरींना सन्मानानं ‘मिस्’ म्हणायलाही सरांनीच शिकवलं. त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं. एका ध्येयानं प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाचं, द्वेषाचं, तिरस्काराचं रूपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मविश्वासात केलं. दुस-यांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा असतो, हे त्या मुलांना शिकवलं. हा त्यांचा विजय होता. एका शिक्षकाच्या तळमळीचा, विद्याथ्र्यांविषयी वाटणाऱ्या कळकळीचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा...
`द गोवा हिंदु असोसिएशन`तर्फे सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी जी.ए.कुलकर्णी पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#टू सर, विथ लव्ह #लीना सोहनी TO SIR, WITH LOVE #LEENA SOHONI #E.R. BRAITHWAITE
Customer Reviews
  • Rating StarPradeep Talekar

    पुस्तक परिचय - पुष्प १ ले *टू सर विथ लव्ह* मूळ इंग्लिश लेखक - श्री. इ आर ब्रेथवेट. अनुवादिका - श्रीमती लीना सोहोनी. प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. परिचय कर्ता: प्रदीप तळेकर, पुणे +919850899387 एक छोटीशी कादंबरी म्हणा किंवा आत्मलेखन म्हणावेअसे पुस्तक. पुस्तकाचा नायक म्हणजे स्वतः लेखक, श्री ब्रेथवेट, एक कृष्णवर्णीय तरुण गृहस्थ. इथे कृष्णवर्णीय हे महत्वाचे म्हणून त्याचा उल्लेख आवर्जून केलेला. एक सत्य कहाणी आपण पुस्तक वाचत असताना उलगडते आणि आपण या ओघवत्या अनुवादात या आत्मकथनात गुंतत जातो जसा नायक त्याच्या कथानकात गुंतलेला आढळतो. दुसऱ्या महायुध्दात आपला नायक हा रॉयल एअरफोर्स मध्ये ग्राउंड क्रू मध्ये काम करत असे. स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर. युद्ध संपल्यावर साहजिकच सक्तीची निवृत्ती पत्करावी लागलेली. मग नोकरीसाठी वणवण चालू, त्यावेळच्या युद्धाने उध्वस्त झालेल्या इंग्लंडमध्ये, मुख्यतः लंडनमध्ये. योग्य शैक्षणिक पात्रता आणि एअरफोर्स मधील अनुभव याच्या जोरावर सहज नाही तरी काही प्रयत्नांनी नोकरी मिळेल या आशेवर हा तरुण बाहेर पडतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे लगेच नोकरी मिळेल ही अपेक्षा नसतेच. पण त्याला तो केवळ कृष्णवर्णीय आणि इंग्लंडमध्ये न जन्मलेला इंग्लिश माणूस असल्यामुळे नोकरी मिळणे किती दुरापास्त होते याचे वर्णन म्हणजे ब्रिटिशांच्या वर्णद्वेषाचा धगधगता नमुना आहे. इंग्लंड बाहेरचा म्हणजे लेखकाचा जन्म गयानातील जॉर्जटाऊन येथील निग्रो घरातील. आता आपण मुख्य आशयाकडे वळणार आहोत. अनेक अपमान, शिव्याशाप मूग गिळून प्राप्त केल्यावर नायकाला एक अतिशय सामान्य अशी शिक्षकाची नोकरी मिळते. तीही कुठे, तर अतिशय गलिच्छ, अतिदारिद्री अशा वस्तीत टग्या मुलामुलींच्या शाळेत जिथे जागोजागी दलाल, वेश्या, अमली पदार्थ आणि त्याची जोड म्हणून खून मारामारी करणाऱ्यांचे साम्राज्य असते. याहून कहर म्हणजे, ही शाळा देखील प्रामुख्याने गोऱ्या मुलांची असते आणि हातावर बोटे मोजण्या एवढी कृष्णवर्णीय मुलांची. त्यात परत धार्मिक विघटन असतेच. त्यामुळे एकूणच समाजातील व्यक्ती आणि वर्ण द्वेष येथेही असतो. प्रथमच शिक्षकाची नोकरी करणाऱ्या नायकाला सोपवला जातो सर्वात मोठ्या मुलांचा आणि मुलींचा वरचा वर्ग. सूड, राग, द्वेष, उद्धटपणा, बेशिस्त या भावनांनी भरलेल्या मुलांच्या घोळक्यात आपला नायक येतो तीच आव्हाने घेऊन. शाळेचे हेडमास्तर आणि इतर बरेचसे शिक्षक त्यांच्यातील दोष लक्षात घेतले तरी चांगले असतात आणि या मुलांवरही प्रेम करीत असतात काही ध्येयाने प्रेरित होऊन. पुढे कथानकात या मुलांशी होणारा नायकाचा सामना, त्याचा त्यांच्याशी होणारा विविधतेचा संवाद किंवा विसंवाद यांचा परिचय होत जातो. या मुलांना सर्वसाधरण स्वच्छतेचे, म्हणजे अगदी हात धुणे, आंघोळ करणे ते नीटनेटके राहणे यांचे धडे तो कश्यातर्हेनें देतो, त्यांना धडपडत सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याचे कष्ट घेतो हे वाचण्यासारखे आहे. बंडखोरीचे मुलांच्या आत्मविश्वासात तोच रूपांतर करतो. यातच त्याचा संयत प्रेमाचा प्रवास देखील हळुवारपणे पण कष्टाने उलगडला जातो. अनेकवेळेला वाचताना डोळे भरून येतात आणि नकळत वाहू लागतात. एक सामान्य तरुण ध्येयाने प्रेरित झालेला शिक्षक कसा घडतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास कसा हातभार लावतो याचे हे कथानक म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आणि प्रेरणास्थानच आहे. खूप काही सांगता येईल किंवा लिहिताही येईल. पण तो वेळेचा आणि आशयाचा अपव्यय होईल. त्यामुळे एकच सांगून थांबतो, ते म्हणजे प्रत्येकाने हा अनुवाद किंवा मूळ इंग्रजी पुस्तक जरूर वाचावे. कथानकाचा काळ हा दुसरे महायुद्ध संपल्या नंतरचे असले तरी अजूनही ते संदर्भहीन होत नाही यातच या लेखकाचे यश आहे. लेखन सीमा..... शुभम भवतू 💐 प्रदीप तळेकर, पुणे ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    ही एका कृष्णवर्णी ईंग्लिश शिक्षकाची मि.ब्रेथवेट यानी स्वत: सांगीतलेली कहाणी .रॉयल एअरफोर्स मधील यशस्वी कारकिर्द संपवून ते जेंव्हा नौकरी साठी अर्ज करत होते तेंव्हा त्यांना खरी वर्णद्वेषाची ओळख झाली.वरवर सहानुभुती दाखवून शेवटी नकारघंटाच पदरात पडायला सुूवात होती. ग्रीनस्लेड शाळेत त्यांना शिक्षक म्हणुन रुजु व्हायची संधी आली.ह्या शाळेत समाजाच्या खालच्या आर्थीक स्तरातील मुलेच प्रवेश घ्यायची.सर्व बेशिस्त व कसलाही विधीनिषेध नसलेली,संस्कारहिन. ब्रेथवेट यानी अपार कष्ट घेऊन आपली योग्यता कशी सिध्द केली हे अगदी ह्रदयाला भिडणारे आहे. ...Read more

  • Rating StarRajiv Lute

    ही कहाणी आहे इंग्लंडमधील एका उच्चशिक्षित निवृत्त सैनिकाची जो अपरिहार्य कारणामुळे शिक्षक होतो. नाव एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट! ब्रेथवेट यांनी १९५९ साली शिक्षकी पेशातून आलेल्या अनुभवावर आधारित मूळ पुस्तक लिहले आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा उकृष्ठ मराठी अुवाद केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लडच्या रॉयल एअरफोर्समधून निवृत्त झालेले ब्रेथवेट हे बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. (होते आता त्यांचं निधन झालं आहे.मृत्यू १२ डिसेंबर २०१६) निवृत्ती नंतर उच्चपदाच्या चांगल्या नोकरीस लायक असूनही त्यांना वारंवार डावलले जाते. त्यांचा पदोपदी अपमान केला जातो...कारण ते कृष्णवर्णीय(निग्रो) असणे हाच त्यांचा एकमेव दोष आहे. जगभर वसाहती बनवून आपल्या राज्याचा विस्तार करणारे आणि लोकशीच्या बाता मारणारे गोरे इंग्रज मनाने मात्र काळे होते. इंग्रजांच्या दुटुप्पीपणाचा, खोटारडेपणाचा बुरखा या आत्मचरित्रात फाडला गेला आहे. गोरे इंग्रज कृष्णवर्णीय लोकांचे कसे मानसिक शोषण आणि खच्चीकरण करत होते याबद्दल पुस्तकातून माहिती मिळते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यात अपयश आल्याने निराश होऊन आणि नोकरीची गरज म्हणून ब्रेथवेट लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करतात आणि सुरवात होते त्यांच्या आव्हानात्मक शिक्षकी पेशाला! त्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला…! या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचा वर्ग त्यांना मिळतो. ही मुलं/मुली पौगंडावस्थेतील आहेत. सामन्य मुलांपेक्षा शरीराने मोठी आणि तारुण्यात पदार्पण करणारी आहेत. त्यांचं ओंगळवाणे वागणे, व्यसनं करणे, अस्वच्छ राहणीमान, मुलामुलींचे एकमेकांशी शारीरिक लगट करण्याचे प्रयत्न, कोणत्याही नवीन शिक्षकाला मानसिक त्रास देणे, नवीन शिक्षकाला शाळा सोडून पळून जायला मजबूर करणे अशा त्यांच्या वर्तणुकीचा सामना लेखकाला करावा लागतो. अशा मुलांना सुसंस्कारित करणे, त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी, आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी तयार करणे. ही अवघड कामे लेखक कशी करतो त्यात त्याला कितपत यश येते हा या पुस्तकातील मुख्य विषय आहे. असंस्कृत, असभ्य, वर्णद्वेष मनात बाळगणाऱ्या शाळकरी मुलाबद्दल त्यांच्या शिक्षकांने विश्वास दाखवला; शिक्षक त्यांच्याशी प्रेमाने वागला; त्याने मुलांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला; तर ती मुलं बदलतात. जबाबदारीने वागतात. वर्णद्वेष विसरतात. आचरणात चांगला बदल करून शाळेतील इतर लहान मुलांसमोर आदर्श ठेवतात. अभ्यासात प्रगती करतात. हे एका दिवसात साध्य होत नाही. शिक्षक असणारा लेखक त्यासाठी मेहनत घेतो. मुलांना शिकावण्याची पध्दत बदलतो. पालक आणि मुलांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवतो. वेळप्रसंगी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. यासाठी शाळेच्या प्रेमळ मुख्याध्यापकांची त्यांना सतत साथ मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक खूप सहनशील, प्रेमळ आणि मुलांचं मन समजून घेणारे आहेत. प्रेमाच्या पायावर शाळेची इमारत तोलून धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रेथवेट यांना याच शाळेत त्यांची जीवनसाथी (सहकारी शिक्षिका) मिळते. सूड, द्वेष, राग, हिंसा अशा कोणत्याही भावनेपेक्षा प्रेम ही मोठी शक्ती आहे! एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी लेखक बेथवेट यांच्या शिक्षकी पेशात सुरवातीला आलेल्या अनुभवावर आधारलेली आहे. या पुस्तकावर आधारित हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलेले आहेत. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रेथवेट! त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे आणि समस्त शिक्षकांना आदर्श घालून दिलेला आहे. ब्रेथवेट यांचं #टू_सर_विथ_लव्ह हे पुस्तक दिशा हरवलेल्या सर्व शिक्षकांना दिशादर्शक आहे. पालकांनाही मार्गदर्शक आहे. आपल्याला घायाळ करायला टपलेल्या लोकांपेक्षा आपणाला खूप मोठे व्हायचे असेल तर निरर्थक वाद टाळून प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संयमाने मार्गक्रमण करायला हवे. हे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा ब्रेथवेट हा शिक्षक तरुणांना, तरूणाईकडे वाटचाल करणाऱ्या सर्वांना प्रेरणादायी आहे. ...Read more

  • Rating Starसंदिप रामचंद्र चव्हाण

    ही कहाणी आहे इंग्लंडमधील एका उच्चशिक्षित निवृत्त सैनिकाची जो अपरिहार्य कारणामुळे शिक्षक बनतो. नाव एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट! ब्रेथवेट यांनी १९५९ साली शिक्षकी पेशातून आलेल्या अनुभवावर आधारित मूळ पुस्तक लिहले आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा उकृष्ठ मराठी नुवाद केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लडच्या रॉयल एअरफोर्समधून निवृत्त झालेले ब्रेथवेट हे बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. (होते आता त्यांचं निधन झालं आहे.मृत्यू १२ डिसेंबर २०१६) निवृत्ती नंतर उच्चपदाच्या चांगल्या नोकरीस लायक असूनही त्यांना वारंवार डावलले जाते. त्यांचा पदोपदी अपमान केला जातो...कारण ते कृष्णवर्णीय(निग्रो) असणे हाच त्यांचा एकमेव दोष आहे. जगभर वसाहती बनवून आपल्या राज्याचा विस्तार करणारे आणि लोकशीच्या बाता मारणारे गोरे इंग्रज मनाने मात्र काळे होते. इंग्रजांच्या दुटुप्पीपणाचा, खोटारडेपणाचा बुरखा या आत्मचरित्रात फाडला गेला आहे. गोरे इंग्रज कृष्णवर्णीय लोकांचे कसे मानसिक शोषण आणि खच्चीकरण करत होते याबद्दल पुस्तकातून माहिती मिळते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यात अपयश आल्याने निराश होऊन आणि नोकरीची गरज म्हणून ब्रेथवेट लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करतात आणि सुरवात होते त्यांच्या आव्हानात्मक शिक्षकी पेशाला! त्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला…! या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचा वर्ग त्यांना मिळतो. ही मुलं/मुली पौगंडावस्थेतील आहेत. सामन्य मुलांपेक्षा शरीराने मोठी आणि तारुण्यात पदार्पण करणारी आहेत. त्यांचं ओंगळवाणे वागणे, व्यसनं करणे, अस्वच्छ राहणीमान, मुलामुलींचे एकमेकांशी शारीरिक लगट करण्याचे प्रयत्न, कोणत्याही नवीन शिक्षकाला मानसिक त्रास देणे, नवीन शिक्षकाला शाळा सोडून पळून जायला मजबूर करणे अशा त्यांच्या वर्तणुकीचा सामना लेखकाला करावा लागतो. अशा मुलांना सुसंस्कारित करणे, त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी, आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी तयार करणे. ही अवघड कामे लेखक कशी करतो त्यात त्याला कितपत यश येते हा या पुस्तकातील मुख्य विषय आहे. असंस्कृत, असभ्य, वर्णद्वेष मनात बाळगणाऱ्या शाळकरी मुलाबद्दल त्यांच्या शिक्षकांने विश्वास दाखवला; शिक्षक त्यांच्याशी प्रेमाने वागला; त्याने मुलांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला; तर ती मुलं बदलतात. जबाबदारीने वागतात. वर्णद्वेष विसरतात. आचरणात चांगला बदल करून शाळेतील इतर लहान मुलांसमोर आदर्श ठेवतात. अभ्यासात प्रगती करतात. हे एका दिवसात साध्य होत नाही. शिक्षक असणारा लेखक त्यासाठी मेहनत घेतो. मुलांना शिकावण्याची पध्दत बदलतो. पालक आणि मुलांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवतो. वेळप्रसंगी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. यासाठी शाळेच्या प्रेमळ मुख्याध्यापकांची त्यांना सतत साथ मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक खूप सहनशील, प्रेमळ आणि मुलांचं मन समजून घेणारे आहेत. प्रेमाच्या पायावर शाळेची इमारत तोलून धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रेथवेट यांना याच शाळेत त्यांची जीवनसाथी (सहकारी शिक्षिका) मिळते. सूड, द्वेष, राग, हिंसा अशा कोणत्याही भावनेपेक्षा प्रेम ही मोठी शक्ती आहे! एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी लेखक ब्रेथवेट यांच्या शिक्षकी पेशात सुरवातीला आलेल्या अनुभवावर आधारलेली आहे. या पुस्तकावर आधारित हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलेले आहेत. मला या पुस्तकाबद्दलची माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या बखर शिक्षणाची या पुस्तकातून मिळाली. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रेथवेट! त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे आणि समस्त शिक्षकांना आदर्श घालून दिलेला आहे. भारतात आज खाजगी शिक्षणसंस्थांचे आलेले उदंड पीक, सरकारी/अनुदानित शाळेतील/महाविद्यालयाततील कायम असणाऱ्या शिक्षक/प्राध्यापकांची विद्यार्थ्यांबद्दलची अनास्था; बहुसंख्य काँट्रॅक्ट भरती केलेले शिक्षक व त्यामुळे त्यांना आलेले नैराश्य; प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षकांची समाजाशी-विद्यार्थ्यांशी तुटलेली नाळ; शिक्षकी पेशाचे विसरले गेलेले भान; कुठेच रोजगार नाही म्हणून नाइलाजाने शिक्षक झालेले शिक्षक; संस्था चालकांना लाखों रुपये देऊन व वशिलेबाजी करून मिळवलेली नोकरी; प्राथमिक/माध्यमिक शाळेतील मुलांची मानसीकता त्यांचं निरागस मन समजून घेण्यात आलेलं अपयश इत्यादी अनेक दोष आजच्या बहुसंख्य शिक्षकांमध्ये दिसतात. काही शिक्षक याला अपवाद आहेत; जीव तोडून, पदरच्या खर्चाने, प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कष्टाने आणि नेटाने आपले कर्तव्य पार पाडत आहेत त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. ब्रेथवेट यांचं #टू_सर_विथ_लव्ह हे पुस्तक दिशा हरवलेल्या सर्व शिक्षकांना दिशादर्शक आहे. पालकांनाही मार्गदर्शक आहे. आपल्याला घायाळ करायला टपलेल्या लोकांपेक्षा आपणाला खूप मोठे व्हायचे असेल तर निरर्थक वाद टाळून प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संयमाने मार्गक्रमण करायला हवे. जीवनाचे हे तत्वज्ञान सांगणारा ब्रेथवेट (शिक्षक) प्रत्येक तरुणाला, तरूणाईकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more