* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`TRIVENI` A CONFLUENCE OF THREE RIVERS, THESE POEMS ARE UNIQUE IN THEIR STYLE. NO ONE HAS EVER TRIED THIS FORM. GULJAR IS THE FIRST TO DO SO. THE FIRST TWO LINES OF EACH OF HIS POEM MEET EACH OTHER GIVING COMPLETE MEANING TO THE POEM, BUT THE THIRD LINE? IT SECRETLY MEETS THIS CONFLUENCE, UNDERGROUND; AWAY FROM OUR SIGHT. ALL THESE POEMS MARK THE PROMINENT SILENCE IN GULJAR`S POETRY. THIS SILENCE HAS IMMENSE POWER. IT IS EXPRESSED VERY STRONGLY. HIS POETRY HAS VERY FEW WORDS, BUT EACH HAS TONS OF MEANINGS. EACH ONE IS VERY SUBTLE. IT SOMETIMES IS AGITATED WITH THE PARTING OF THE NEAR AND DEAR, IT SOMETIMES REGRET THE CONTROVERSIES IN THE SOCIETY. KEEPING IN TOUCH WITH IT IS THE ETERNAL TRUTH AND THE UNDERSTANDING.
हेलन केलर हे आजच्या जगाला सर्वपरिचित असलेले केवळ एक व्यक्तिनाम नाही. माणसाच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि अपराजित, विजिगीषु वृत्तीचे ते एक सुंदर प्रतीक आहे. निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियांच्या साह्याने माणूस परस्परांशी, भोवतालच्या जगाशी संवाद साधतो. हेलनची तर तीन ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली होती. ती आंधळी होती. बहिरी होती. मुकीही होती. परस्परांशी संपर्वÂ जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन तिला लाभले होते. पण आशावादी मनोवृत्ती, विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता यांच्या बळावर तिने या साया उणिवांवर मात केली. आपले स्वत:चे जीवन तर तिने अर्थपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूकबधिर यांनाही तिने प्रगतीच्या, विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरची ही जीवनगाथा. जितकी वेधक, रोमांचकारक, तितकीच स्फूर्तिदायक...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDhananjay Gore

    हे त्रिवेणी पुस्तक छान आहे. अगदी बेलाच्या पानासारखे आहे. जपान मध्ये याला `हायकू` असे संबोधीले जाते. मेघना साने यांचा त्रिवेणी काव्यसंग्रह वीस वर्षांपूर्वी आणि गुलजार यांचा काव्यसंग्रह पाच वर्षांपूर्वी माझ्या खजिन्यात दाखल झाले. वात, पित्त आणि कफ यासाखे मनातील त्रिदोष हरण करणा-या त्रिवेणी संगमातील या काव्यसरीता असतात जणु! छोट्या पण आशय मोठा असतो अन् त्यामुळे वाचतांना कंटाळा येत नाही. ...Read more

  • Rating StarTanmay Keluskar

    लेखनाची पद्धत भन्नाट आहे ह्यात आणि गर्भितार्थ तर अफलातून

  • Rating StarNitin Lokhande

    अप्रतिम ......तीन ओळींत पूर्ण कविता ...म्हणुन त्रिवेणी ....पहील्या दोन ओळी म्हणजे गंगा आणि यमूनेचा संगम तर ....तीसरी ओळ म्हणजे सरस्वती प्रमाणे गुप्त आणि सुप्त विचारानीं समांतर वाहत जाणारी .....

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा सारस्वत अनुवाद... गुलजार संवेदनशील कवी, तर शांता शेळके भावग्राही अनुवादक. या सुरेख संगमामुळेच साकारली उर्दू, हिंदी नि मराठीची त्रिवेणी. त्रिवेणी हा गुलजारांनी घडवलेला त्रिपदी छंद. तीन दशकांच्या निरंतर रियाजानंतर तो समृद्ध झला. शांता शेळके यांना हिंदी, उर्दूची चांगली जाण होती, हे गुलजारांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या ‘त्रिवेणी’ या त्रिपदी गझल संग्रहाचा मराठी अनुवाद वाचत असताना लगेच लक्षात येते. त्यात त्यांचा पिंड कवयित्रींचा त्यामुळे भाव नि भाषेचा सुरेख संगम या अनुवादात पदोपदी लक्षात येतो. हा अनुवाद हिंदी-मराठीस जोडणारा दुग्धशर्करा योग होय. फाळणीनंतर जी माणसं पाकिस्तान सोडून भारतात आली, त्यापैकी गुलजार एक होत. फाळणीच्या वेदनांनी त्यांचं काव्य ओथंबलेलं आहे. ते अशा त्रिपदी गझल वाचताना तीव्रतेनं जाणवतं. मी आपले सारे समान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच माझ्यापासून अलग होणे रुचले नसेल तिला कदाचित! गुलजारांची त्रिवेणी नामक त्रिपदी अल्पाक्षरी गझल होय. पहिल्या दोन ओळींचा शेर असतात गंगा-यमुना. हा असतो विषय विस्तार. तिसरी ओळ असते सरस्वती. तीत गझलचा आशय अमूर्त, अव्यक्त असतो. सरस्वतीसारखा गुप्त. काव्य वाचकांनी स्वानुभवांच्या समृद्धीवर स्वविवेक नि स्वतर्क इत्यादीच्या बळावर तो जाणून घ्यायचा त्यामुळे ‘त्रिवेणी’ समजायची तर कवी नि वाचक यांच्यात अद्वैत भाव, भाषा, भंगिमांचा त्रिवेणी संगम होणं पूर्वअट असते. गुलजारांची कविता अनुभवाच्या समृद्धीसह भाषांतरित करायची तर अनुवादकामध्ये ते सारस्वत कौशल्य ती साहित्य प्रतिभा असणे अनिवार्य. ती शांता शेळकेमध्ये होती. ज्या मराठी वाचकांना त्यांच्या कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावर नवा पाऊस! सारख्या हायकूचं त्रिपदीचं सौंदर्य पेलता आलं, त्यांना या त्रिवेणी म्हणजे नवी पर्वणीच वाटल्याशिवाय राहणार नाही. त्रिवेणी अनुभवजन्य तशीच भावसमृद्ध! मराठी अनुवाद करताना शांता शेळके यांनी मूळ त्रिवेणीतील आशयास धक्का लावू न देता त्यांचा अनुवाद केला आहे. काही ठिकाणी तर हा अनुवाद मूळ रचनेच्या बरहुकूम झालेला आढळतो. वह जिससे साँस का रिश्ता बंधा हुआ था मेरा दबा के दाँत तले साँस काट दी उसने कटी पतंग का माझा मुहल्ले भर ते लुटा! सारख्या या हिंदी त्रिवेणीचा शांता शेळकेंनी केलेला खालील मराठी अनुवाद याचा ठळक पुरावा म्हणून सांगता येईल. जिच्याबरोबर श्वासाचे धागे जोडले होते मी ते नातेच, दातांनी धागा तोडावा तसे तोडले तिने! आणि... आता काटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्यात! ही गोष्ट अलाहिदा की ‘जोडले’च्या ठिकाणी ‘जडले’ नि ‘मोहल्ल्यात’च्या ठिकाणी ‘गल्लीत’ शब्दांची रचना चपखल ठरली असती. ‘त्रिवेणी’ या गुलजारांच्या नवरचित छंदांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद ही शांता शेळके यांनी मराठी साहित्यास दिलेली शेवटची देणगी नि म्हणून तिचं ऐतिहासिक मूल्य राहिल. हा अनुवाद गुलजारना इतका भावला की, त्यांनी तो खालील शब्दांत शांताबार्इंना समर्पित केला. शान्ताबाई, आप सरस्वती की तरह मिली। और सरस्वती की तरह गुम हो गयी। ये ‘त्रिवेणी’ आप ही को अर्पित कर रहा हूँ। - गुलजार मूळ रचनाकरानं अनुवादकाचा केलेला असा सन्मानही माझ्यासारख्या अन्य अनुवादक, अभ्यासकास वैश्विक घटना वाटल्यावाचून राहणार नाही. अशी दर्दी कलाकारच देऊ जाणे! सरस्वतीच्या प्रतीकात्मक चिन्हाचं साधं परंतु आशयघन मुखपृष्ठ लाभलेला हा मराठी भाषांतरित काव्यसंग्रह मूळ हिंदी ग्रंथाच्या एक तृतीयांश किमतीत मराठी काव्यरसिकांना त्यांच्या बोलीत उपलब्ध करून देऊन मराठी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘मराठी पुस्तके महाग असतात’ हा आरोप अपवादाने खोटा ठरवला आहे. तो नियम होईल. तर मराठी साहित्याचा प्रसार होण्यास साह्य होईल. ‘त्रिवेणी’ या भाषांतरित गझल संग्रहात विषय वैविध्य आहे. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणं, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण सारे विषय समावून घेण्याची कुवत असलेल्या या त्रिपदीत मनुष्य निसर्ग व जीवनसंघर्षाचा त्रिवेणी संगम आहे. उर्दू, अरबी, फारसी शब्दांजागी समर्पक मराठी शब्दरचना करून शांता शेळके यांनी मराठी त्रिवेणी मूळ हिंदी इतक्याच दर्जेदार बनवल्या आहेत. या त्रिवेणीत जीवनाचा सुस्कारा जसा आहे, तशी जीवन सुसह्य करण्याची शक्तीपण. जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक सारख्या ओळीतून शांताबार्इंच्या मनातील अनुवादकाचा आत्मविश्वासच एका अर्थाने प्रकट झाला आहे. हा आत्मविश्वासच या अनुवादाचं आत्मबळ होय. हिंदी ‘त्रिवेणी’चा मराठी अनुवाद मात्र शब्दांची टांकसाळ नसून भावनेनं गुंफलेली ती मोहनमाळ होय! गुलजार नि शांता शेळके यांच्या काव्यातील भावबंधांचा धांडोळा घेणाऱ्यांना हा अनुवाद भाव नि भाषा सेतू ठरल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो. -सुनीलकुमार लवटे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more