* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TUKAYACHI AAWALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668933
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TUKARAM IS ONE OF THE GREATEST SAINTS OF MAHARASHTRA, WHO CONTINUOUSLY SANG PRAISES OF THE LORD THROUGH HIS DEVOTIONAL COMPOSITIONS. THE PERSONAL LIFE OF THE POET SEER WAS SAD. ECONOMIC HARDSHIP PLAGUED HIM FROM THE CHILDHOOD AND HE NEVER ENJOYED MARITAL BLISS FROM HIS FIRST WIFE. AVALI WAS HIS SECOND WIFE WHO FED UP WITH TUKARAM’S TOTAL INDIFFERENCE ABOUT HIS MUNDANE DUTIES AS THE HEAD OF THE FAMILY ALWAYS NAGGED HIM. SHE DISLIKED AND HATED FROM THE BOTTOM OF HER HEART LORD VITTHAL, ONE OF THE GODS FROM THE HINDU PANTHEON TUKARAM WAS FOND OF. IN MARATHI LITERATURE, PLAYS AND FILMS, AVALI HAS BEEN PORTRAYED AS BEING SOMEONE WHO DID NOT ALLOW TUKARAM TO LIVE IN PEACE. ONE WOULD FEEL THAT SHE IS TO TUKARAM WHAT XANTIPPE WAS TO SOCRATES. TUKYACHEE AVALI PRESENTS AVALI AS A LOVING WIFE WHO IS AWARE HOW WELL RESPECTED HER HUSBAND IS IN THE SOCIETY. SHE ALWAYS STANDS BY HIM IN HIS DIFFICULT TIMES. BUT IT THE CARING MOTHER IN HER WHO CANNOT PUT UP WITH THE SUFFERING THE FAMILY HAS TO GO THROUGH DUE TO HER HUSBAND. THE DISPLAY OF CONFLICT BETWEEN THE ROLES OF THE WIFE AND THE MOTHER MAKES INTERESTING READING. INCIDENTALY, AVALI OUTLIVED TUKARAM. MANJUSHRI GOKHALE IS A COLLEGE TEACHER. SHE HAS TACKLED VARIOUS FORMS SUCH AS NOVEL, SHORT STORY, POETRY AND HAS WRITTEN THE SCRIPT AND DIALOGUES FOR A FILM.
आवलीला त्या घटनेचा पुरता अर्थ कळला. ती विलक्षण चरकली. बुवांच्या टाळचिपळ्या बुवांशिवाय? आवलीनं टाहो फोडला. धनी ऽ ऽ ऽ! धनी ऽऽऽऽ! आणि ती बुवांच्या बैठकीवर कोसळली. बुवा ज्यांना आपले श्वास आणि उच्छ्वास म्हणत होते, त्याच टाळचिपळ्या आज बुवांपासून वेगळ्या, अनाथ होऊन बुवांच्या बैठकीवर पडल्या होत्या. करपलेल्या काळजानं आणि चरकलेल्या मनानं त्या टाळचिपळ्या उराशी धरून आवली आकांत करत होती. तिचा आकांत सगळ्या गावकऱ्यांचं काळीज चिरत गेला. विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवत गेला. त्याच्या पायाखालची वीट थरारली. इंद्रायणी क्षणभर वाहायचं विसरली. विठ्ठल मंदिराच्या कळसाला छेदत आवलीचा टाहो आकाश फाडत गेला. नंतर कितीतरी वेळ त्याचे पडसाद आकाशातून येत राहिले. वाळवंटात कोसळत राहिले. विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यावर आदळत राहिले.
* तूका म्हणे साहित्य पुरस्कार २००८, बुलडाणा * भारताच्या राष्ट्रपती महामहिन्न श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार २००८, अमरावती * बुलडाणा साहित्य संघाचा `ताराबाई शिंदे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarMadhuri Kajave

    वारकरी संप्रदायाचा `कळस` म्हणजे तुकाराम महाराज तर सर्व परिचित आहेतच. पण त्यांची पत्नी `आवली` हिचा परिचय आपल्यासमोर येतो तो काहीशा नकारात्मक स्वरूपातच! साक्रेटीसची बायको झांटिपी आणि तुकारामाची बायको आवली यांची तुलना करण्याचा मोहही बऱ्याच लोकांन झाल्याचं आठवतंय. कजाग, तोंडाळ ,भांडखोर अशी काहीशी आक्रमक प्रतिमा अवलीच्या वाट्याला आलीय. मंजूताईनी तिची ही उपेक्षा जाणून घेतली आणि तिला त्यात न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या ` आवली` या चरित्रात्मक कादंबरीतून केला आहे. कर्तबगार पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री उभी असते, असं कौतुकानं म्हटलं जातं. संतपदाला जाण्याचं जे अफाट कर्तुत्व तुकाराम महाराजांनी केलं, त्या पाठीमागे आवलीचे संसार सावरणारे हात होते. तिची उपासमार होती. तिचे कष्ट होते. तुकाराम महाराजांच्या मऊ मेणाहुनी स्वभावा विरोधात ती कर्तव्यकठोर होती पण ही कठोरता निश्चीतच समर्थनीय आहे हे मंजूताईनी दाखवून दिलंय. मंजुताई, तुम्हाला पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा! अतिशय वाचनीय आणि बांधून ठेवणारं पुस्तक आहे. ही कादंबरी एका कवियत्रीनं लिहिलींय हे मात्र क्षणोक्षणी जाणवतं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य! आपला ग्रूप हा पुस्तकप्रेमींचा आहे. लेखकाशिवाय आणि कवींशिवाय नवीन पुस्तके लिहिली जाणार नाहीत. जुन्या आणि प्रस्थापित लेखक,कवींचं आपल्याला कौतुक आहेच पण त्याचबरोबर आपण नव्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं. जशी वाचक चळवळ आहे, वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आपण प्रयत्न करतो तशीच लेखनसंस्कृती जोपासण्याचे प्रयत्नही व्हायलाच हवेत. आपल्यातल्या नवनिर्माणाचा अंकुर आपणच सांभाळला, मोठा केला पाहिजे. मंजुताईंचं हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवं, असा माझा आग्रह आहे. ...Read more

  • Rating StarRahul Lale

    तुक्याची आवली... मंजुश्री गोखले यांचं फार अप्रतिम पुस्तक... त्यावरून सुचलेलं... राहुल आवली गाती सारे देवा, तुक्याचे तुझ्या गोड अभंग आवलीच्या भाबड्या जीवाला मिळेना त्याचा संग भक्ती तुक्याची अपरंपार , शब्दातनही वाहे अमृत अश्राप आवलीला मात्र घरादाराची लागे खंत चूल पेटेल का हो कधी वाचून नुसती गीता एकल्या आवलीला पोराबाळांची सदा चिंता विठूनामात रमला रंगला आवलीचा धनी संसारगाडा ओढताना डोळ्यात येई तिच्या पाणी कटीवर हात विठूचे, पर्वा त्याला साऱ्या जगाची चंद्रभागेतून वाचले अभंग, भिजली आवलीची ओझी तुक्या विठूचा भक्त, त्याची एक आवली जिथे जातो तिथे, , तीच त्याची सावली राहुल लाळे ०२-०२-२०२१ ...Read more

  • Rating StarVinod Dhapale

    खूप सुंदर कादंबरी आहे. आवली माई विषयी असलेलं मत परिवर्तित होत अन् आपुलकी निर्माण होते. कादंबरीचा शेवट मनाला चटका लावून जातो..नक्की वाचा....

  • Rating Starप्रा. डॉ. कमला हार्डीकर

    आवली आणि तुकाराम यांच्या संसारातला विठ्ठल हा जणू खलनायक आहे. कादंबरीत एकूण वीस प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विठ्ठलाचं स्वगत म्हणजे त्या प्रकरणाचा कळस आहे. आवली-तुकारामाचं लग्न ठरल्यानंतर सर्वांत आनंद या विठ्ठलाला होतो कारण तुकारामच्या संतदाची इमारत नेटकेपणानं, मजबुतीनं आवलीच्या आधारावरच उभी राहणार होती. आवलीचा मृत्यू इतका वेगळ्या प्रकारे दर्शवला आहे, की या आवलीला न्याय मिळाला असं वाटतं. नशिबासारखा खरखरीत असलेला हात तुकारामाच्या हाती देऊन ही तुकयाची आवली मृत्यूला सामोरी जाते. संत तुकाराम हे देणे ईश्वराचे. केवळ आवलीमुळेच तुम्हाला, मला, आपण सर्वांना मिळालं. आई आणि पत्नी म्हणून आवलीनं आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलंच पण केवळ तिच्यामुळेच तुकोबाराय भक्तीमार्गात तल्लीन होऊ शकले. कादंबरीची भाषा, सर्व प्रसंगांची भावस्पर्शी मांडणी यामुळे एक वेगळ्याच उंचीवर ही कादंबरी वाचकाला नेते. एका ऐतिहासिक पण दुर्लक्षित स्त्रीच्या कल्पकतेने रेखाटलेल्या चरित्ररूपी कादंबरीला तेवढेच यथार्थ, समर्पक आणि विलक्षण बोलकं मुखपृष्ठ मिळणं हा ही एक शिरपेचच होय. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more