THESE STORIES ARE TOTALLY DIFFERENT THAN WHAT WE READ USUALLY. THESE ARE THE STORIES OF MOTHERS AND THEIR OFFSPRINGS, WHICH ARE IMPRISONED. THESE ARE THE STORIES OF THEIR ANGUISH AND THEIR AGONIES. THE AUTHOR HAS PERSONALLY VISITED MANY OF THE JAILS IN INDIA. HE HAS INTERVIEWED THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN. THE INTERVIEWS WITH THE JAIL OFFICERS, SOCIAL WORKERS AND THE ADVOCATES ARE ALSO VERY THRILLING. THIS BOOK BRINGS THE CLEAR PICTURE OF THE JAIL WITH ITS CONDITIONS, ITS INSECURITY, THE EFFORTS OF THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN, THEIR HAPPINESS, THEIR SORROWS, THEIR DREAMS, EVERYTHING THAT A NORMAL HUMAN MIND FEELS. THE AUTHOR TOUCHES HIS WRITING WITH A MILD HUMOUR IN BETWEEN, WITH A GENUINE CONCERN FOR THEM. THIS JOURNEY TO THE DEEP CORES OF THE PRISON WILL SURELY BRING TEARS IN OUR EYES AND SOFT FEELINGS IN THE CORE OF OUR HEART.
तुरुंगातील कैदी स्त्रिया आणि जीवंतपणीच नरकयातना भोगणारी त्यांची मुलं यांच्या कल्पनातील आयुष्याचं अक्षरश: चित्र... भारतीय तुरुंगात
राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतीप्रमाणेच तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक, तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, आनंद, आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल. आपल्या हळुवार, नाजूक व क्वचित नर्म विनोदाची झालर असलेल्या शौलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो. पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या हृदयात कळ आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात.