* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE FAKIR
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981032
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A HIPPLE WITH AN INCLINATION FOR SUICIDE, A FAKIR WITH A QUAINT SENSE OF HUMOUR, A JOURNEY THAT MIGHT CHANGE YOUR LIFE FOREVER... THE FAKIR, IS A BREATHTAKING SPIRITUAL ODYSSEY TO YOUR INNER SELF, WHERE GOD AND MASTER DWELL. EXPERIENCE THE JOY OF BEING ALIVE, LEARN THE SIMPLE YET LIFE ALTERING PHILOSOPHY OF COMPASSION TOWARDS ALL, AND HEAL YOURSELF BY TAKING THAT FIRST STEP TOWARDS CHANGE. A FASCINATING STORY THAT EXPLORES COMPLEX ISSUES IN A SIMPLE, VERY EASY-TO-UNDERSTAND ACCESSIBLE WAY - KARMA, DIVINE ACTION, LIFE AFTER DEATH, SPIRIT COMMUNICATION, THE POWER OF PRAYER, FAITH AND FORGIVENESS, ENERGY AND HEALING; THE SEARCH FOR GOD IN GOODNESS AND MOST IMPORTANTLY BEING CONSTANTLY ATTUNED WITH YOUR MASTER. THE FAKIR, SHOWS YOU NOT ONLY HOW TO LIVE... BUT ALSO HOW TO DIE.
आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुद्धी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल.... जिथं देव आणि गुरू वास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, ‘फकीर’ हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा ‘अक्षर’ नजराणा आहे. जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्त्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा. ही आहे एक चित्तवेधक कहाणी. कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्कं, प्रार्थनेतली शक्ती, श्रद्धा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सतत गुरूशी सुसंवाद साधून राहाणं, यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं हाताळते. ‘द फकीर’ फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही... पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEFAKIR #THEFAKIR #दफकीर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #RUZBEHBHARUCHA
Customer Reviews
  • Rating Star स. राठी

    नुकतेच ‘द फकीर’ मराठीतून वाचले. उत्कृष्ट भाषांतराबद्दल मनस्वी अभिनंदन. अध्यात्मिक विषयाचे भाषिक रूपांतर करणे खूप कठिण असते, ते एक अध्यात्मिक कामच आहे. मी जरी मारवाडी असलो तरी, मराठी माझी मानसिक भाषा आहे. दीर्घ कालानंतर आवडीचा प्रसाद चवीचवीने हळूहळू खतो, तसे १९० पानाचे ‘द फकीर’ आठ दिवस निवांत पचेल त्या वेगात वाचत होतो. मी मागील ५५ वर्षापासून पुस्तक, स्टेशनरी वितरण व्यवसायात आहे. ...Read more

  • Rating Starसुरेंद्र देशपांडे

    आपण अनुवाद केलेले ‘द फकीरा’ हे पूस्तक वाचण्यात आले. पुस्तक वाचताना खूप आनंद येत होता. परत परत पुस्तक वाचले. अजूनही त्या आनंदाचा आस्वाद घेत आहे. पुस्तकाच्या प्रथम पृष्ठावर श्री रुझबेह एन. भरुचा यांच्या इतर पुस्तकांविषयी माहिती मिळाली. सुंदर पुस्तक अुवाद केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 08-08-2010

    तत्त्वज्ञान जगणारा आणि मानवता जागविणारा ‘फकिर’… द फकीर’ ही रुझबेह एन् भरूचा या तरुण लेखकाची तत्त्वज्ञान सांगणारी वाचनीय कादंबरी. विनोद बुद्धीचं दैवी वरदान लाभलेला एक फकीर. तो तत्त्वज्ञान जगता जगता मानवता जागविण्याचं महत्कार्य करतोय. जीवनाला कंटाळलेलया आणि जीव देऊ पाहणाऱ्या एका हिप्पी तरुणाशी त्याची अचानक गाठ पडते. उभयतांचा परस्परांच्या जोडीनं जीवनाचा प्रवास सुरू होतो. फकीराचं जगणं पाहताना आणि त्याचे विचार ऐकताना हिप्पी तरुणाचं जीवनच पार बदलून जातं. त्या बदललेल्या जीवनाचा साहित्यिक प्रवास या कादंबरीत तंतोतंत आणि आकर्षक पद्धतीनं रेखाटलेला आहे. पूर्वसंचित, कर्म, दैव, प्रार्थना, दया, पूजा, क्षमा, शांती, मरणोत्तर जीवन इत्यादी अनेक गहन प्रश्नांचा वेध इथं लेखकानं अत्यंत सहज सोप्या भाषेत आणि कथानकाच्या ओघात लीलया घेतलाय. जगावं कसं आणि मरावं कसं याचे पाठही कादंबरी प्रभावीपणानं देते. सुनीति काणे यांनी मराठी अनुवाद करताना मूळ कथानकाचा आत्मा जाणून घेऊन न्याय दिलाय. - अप्पा सलागरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more