THIS IS A TRUE STORY BASED ON THE INCIDENT THAT TOOK PLACE FAR AWAY, IN MI-LAI NEAR THE VILLAGE QUANG-ANGAI IN VIETNAM ON THE FINE MORNING OF 16TH MARCH 1969. AMONG THE MANY PERSONALITIES PICTURED IN THE ABOVE INCIDENT, SOME ARE STILL ALIVE. SOME ARE THOUGH THE RESULT OF A CREATIVE LITERARY MIND. THE DIALOGUES AND THE BEHAVIOUR IS SKETCHED IN THE WAY IT WAS THEN. THE HARMONIOUS BLEND OF THE FACT AND FICTION MAKES IT DIFFICULT TO TELL THEM APART. THIS COMBINATION HAS CREATED A WONDERFUL CHAPTER FOR THE BELIEVERS OF HUMANITY. AN INQUISITIVE MIND MAY FIND IT DIFFICULT TO BELIEVE THE TRUTH YET IT CANNOT DISREGARD THE BEAUTY AND CAPTIVITY OF THE STORY.
‘उद्ध्वस्त’मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली वाचकांना भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच चित्रित केल्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्फित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यफूर्ण रीतीनं मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बलाढ्य, हेकेखोर अमेरिकेची काळी बाजू उजेडात आणून, दुर्बलांवर राज्य गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी माणूसपणा टाचेखाली कसा चिरडला जातो, याचं विदारक वर्णन म्हणजे ’उद्ध्वस्त.’