UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADTALANI IS A COLLECTION OF CRITICAL ARTICLES WRITTEN BY A. V. KULKARNI. IN THE PREFACE OF THIS BOOK HE HAS DISCUSSED PLANNED CRITICISM WITH ITS DEFINITION AND EXAMPLES. THE SUMMARY OF CRITISISM ABOUT GANGADHAR GADGIL’S LITERATURE INCLUDED IN THIS COLLECTION. CRITISISING FAMOUS PLAYS, HE TOUCH THE ENDS LIKE GADKARI AND TENDULKAR. IN THE NOVEL SEGMENT, HE ANALYSE THE NOVELS OF DIFFERENT FORMS. FOR EXAMPLE, `ZOMBI` (DR. ANAND YADAV), `SHAPIT` (ARUN SADHU) ETC. IN THE SECTION OF STORY HE HAS INTERPRETED THE STORY ‘SATARAVE VARSH’ WRITTEN BY P.B. BHAVE. DISCUSSING ABOUT ARTISTIC ESSAYS, HE TAKES A DETAIL REVIEW OF ‘SAY’ WHICH IS WRITTEN BY V. S. PARGAONKAR. HE ALSO CRITISISE DEEPLY THE AUTOBIOGRAPHY OF SUNITA DESHPANDE ‘AHE MANOHAR TARI.’ IN THE ARTICLE ‘VINDA KARANDIKARANCHI GAZALRACHANA’ HE HIGHLIGHTS THE GAZAL ACCORDING TO PRESENTATION. HE MENTION THE CHARACTERISTICKS OF KESHAVKUMAR’S POETS IN ARTICLE ‘KESHAVKUMARANCHE KAWYLEKHAN.’ IN ALL, THIS COLLECTION IS USEFUL FOR STUDENTS OF LITERATURE AND ALSO READABLE FOR GENERAL READERS.
’उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी’ हा अ. वा. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. या संग्रहाला त्यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकात उपयोजित समीक्षेच्या व्याखेसह तिची सोदाहरण चर्चा त्यांनी केली आहे. गंगाधर गाडगीळांच्या साहित्यकृतींवर झालेल्या समीक्षेचा आढावा घेणारा लेख या संग्रहात आहे. प्रसिद्ध नाटकांची समीक्षा करताना ते गडकरी आणि तेंडुलकर, या दोन टोकांना भिडताना दिसतात. तर कादंबरी विभागात भिन्न बाजाच्या कादंबर्यांचं विश्लेषण करतात. जसे ’झोंबी’ (डॉ. आनंद यादव, ’शापित’(अरुण साधू) इ. कथा या साहित्य प्रकारात ’सतरावे वर्ष’ या पु. भा. भावे यांच्या कथेचं आकलन ते मांडतात. ’सय’ या वि. शं. पारगावकरांच्या ललित निबंध संग्रहाचा अभ्यासपूर्ण धांडोळा ते घेतात, तर ’आहे मनोहर तरी...’ या सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राची सखोल चिकित्सा करतात. ’विंदा करंदीकरांची गझलरचना’ या लेखात गझलचा रचनेच्या दृष्टीने ते विचार करतात आणि ’केशवकुमारांचे काव्यलेखन’ या लेखांतून केशवकुमारांच्या विडंबनात्मक काव्याची वैशिष्ट्ये नोंदवतात. तर असा हा संग्रह अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त तर आहेच, पण सर्वसामान्य वाचकांनीही वाचावा असा आहे.
उत्तम साहित्य कृती साठी म.सा.प - प्रा.रा.श्री जोग पुरस्कार २००२-०३