* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOT WATER THERAPY
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184980967
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DO YOU SUFFER FROM: *TENSION HEADACHES FROM STRESS? *CHRONIC BACKACHE FROM HOURS OF DESK-WORK? *SPRAINS AND STRAINS FROM WEEKEND SPORTS? *INJURIES FROM ACCIDENTS? JOINTS AND MUSCLES DUE TO OVER-EXERTION, AGING OR INACTIVITY? *PAINFUL. HOT WATER THERAPY CAN HELP. THIS BOOK WILL INTRODUCE YOU TO SIMPLE, EFFECTIVE TECHNIQUES YOU CAN USE WHILE RELAXING IN YOUR SHOWER, BATH, OR HOT TUB TO RELIEVE PAIN AND STRENGTHEN ACHING MUSCLES. AND THEY TAKE ONLY A FEW MINUTES TO DO! YOU WILL LEARN THAT YOU CAN SAVE YOUR "BAD BACK` BY USING A COMBINATION OF GENTLE MASSAGE, EXERCISE AND STRETCHING. WHEN YOU BLEND THESE ROUTINES WITH THE SOOTHING, HEALING QUALITIES OF HOT WATER, YOU`LL ENJOY THE AGE-OLD BENEFITS OF SPA TREATMENT - RIGHT IN YOUR OWN BATHROOM!
तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे? अपघातामुळे इजा? अतिश्रमानी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे? गरम पाण्याच्या उपचारपद्धाीची मदत होऊ शकते. दुखऱ्या स्नायुंना आराम देऊन सशक्त करण्याच्या, सोप्या पण परिणामकारक पद्धातींची या पुस्तकात ओळख करून देण्यात आलेली आहे. हे सर्व, गरम पाण्यानी अंघोळ करतांना, टबात डुंबत असतांना करता येत आणि करायला फक्तकाही मिनिटच लागतात ! हलकस मालीश, व्यायाम आणि ताण देण्याचे प्रकार करून, तुम्ही `` वाईट पाठीला सरळ करु शकता. गरम पाण्याच्या औषधी व दु:खशामक गुणांची, या व्यायामाशी सांगड घालून, तुम्ही घरबसल्याप्रसिद्ध स्पा उपचारपद्धाीचा आनंद घेऊ शकता, तेही स्वत:च्या बाथरुममध्ये ! डॉ. पॅट्रिक होरे हे स्नायू आण् अस्थींचे उपचारतज्ञ असून, ते त्यांच्या उपचारपद्धतीत, सुलभ जीवन शैली आणि स्व-संगोपन यावर भर देतात. ते बर्वले, कॅलिफोर्नियामधे कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या नॉर्दन व्हरमॉन्टच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या पाठीसाठी गरम पाण्याचे उपचार घेऊन, ते तंदुरुस्त राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50 #USHNAJALPOCHAR #HOTWATERTHERAPY #उष्णजलोपचार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUBHASHJOSHI #सुभाषजोशी #DAVIDHARPDR.PATRICKHORAY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 18-06-2010

    गरम पाण्याचा शेक घ्या!... सध्याच्या गतिमान आयुष्यात थोडी विश्रांती घेऊन म्हटले तरी आसपासचे जग आपल्याला ती घेऊ देत नाही. त्यातून वेगवेगळे तणाव निर्माण होत आहेत. रोजच्या ताणामुळे शरीरात व मनात तणाव निर्माण होतात. त्यातून डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी कध मागे लागते, हे नेमके कळत नाही, तर कधी कमरेत लचक भरलीय का, ही शंका येते. फ्रोजन शोल्डरचा कुणाला त्रास होऊ लागतो, तर कुणाचे गुडघे कुरकूर करू लागतात. एखाद्या वेदनाशामक मलमाने मालिश करून आपण तातडीचा आराम मिळवतोही; पण या दुखण्यातून पूर्ण सुटका होत नाही. आपल्याला माहीत असलेले उपचार घ्यावेत, तर ते महागडे तरी असतात किंवा ते करून घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य नसतात आता एक आणखी पर्याय आपल्यापुढे आला आहे, तो म्हणजे ‘उष्ण जलोपचार’! गरम पाण्यात पंचा बुडवून दुखऱ्या ठिकाणी शेक घ्यायची आपली पद्धत होतीच की! पण आजीच्या पद्धतीना अशास्त्रीय ठरवून आपण त्या बाद केल्या आहेत. आता त्या पद्धतीची परदेशी आवृत्ती आली आहे : ‘हॉट वॉटर थेरपी’, डॉ. पॅट्रिक होरे व डेव्हिड हार्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सुरेख अनुवाद सुभाष जोशी यांनी केला आहे. अगदी अंघोळ करता करता दहा मिनिटे राखून ठेवायची आणि उपचार घ्यायचे, हे सोपे सूत्र यामागे आहे. एकीकडे गरम पाण्याचा दुखऱ्या भागाला होणारा स्पर्श आणि त्या भागाला दिलेला थोडासा ताण यामुळे हे उपचार होतात. ही पद्धत सोपी आहे. ती खूप परिणामकारक असल्याचा डॉ. होरे यांचा दावा आहे. या उपचारपद्धतीची खूप चांगल्या रीतीने या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे. ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? तिचे वेगळेपण कशात आहे? गरम पाण्याने नेमके काय साधते? याविषयी सुरवातीला निवेदन आहे. भारतीयसंस्कृतीने, आयुर्वेदाने पाण्याला अंतर्गत व बाह्यउपचारात महत्त्व दिलेले आहेच. गरम पाण्याची कुंड ही तीर्थक्षेत्रे बनतात, हा आपला अनुभव आहे. आयुर्वेदातील स्वेदनाची आपल्याला माहिती आहे. याचाच वेगळा उपयोग डॉ. होरे यांनी करून घेतलेला आहे. आपल्या प्रभावी कथनशैलीत सोपेपणाने ते शरीराची माहिती करून देतात आणि आपल्याला विश्वासात घेतात. नेमके कुठे दुखते हे कसे ओळखायचे? तिथे आपल्या आपण मसाज कसा करायचा? हे समजावून सांगतात. मग गरम पाण्यात व्यायाम कसा करायचा,शरीराला ताण कसा द्यायचा, हे सांगतात. आपल्या नेहमीच्या शरीरिक क्रियाच व्यायाम म्हणून किंवा ताण देण्यासाठी उपयोगात आणलेल्या असल्याने आपण काहीतरी वेगळे करायचे आहे, ही भवनाच दूर होते व रुग्णांना आत्मविश्वास मिळतो. त्यांनी दैनंदिन सरावाची आखणीही करून दिली आहे. गरम पाण्याच्या उपचारपद्धतीत जसे आयुर्वेदाचे वेगळे रूप तुम्हाला दिसेल, तसे त्यानंतर शरीराला देण्याच्या पद्धतीतही जाणवेल. प्राणायाम, ध्यानधारणा हे उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत. शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात. या पद्धतीत थोडा बदल करून अमेरिकन रीतीने मोजणी करीत ध्यानधारणा करण्यास डॉ. होरे सुचवतात. ऐकूण भारतीयांना सहज स्वीकारता येईल, आपल्या जीवनशैलीत असलेलीच अशी ही उपचारपद्धती आहे. ती मुळात अमेरिकनांना सांगितली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अमेरिकन जीवनशैलीनुसार तपशील येतो. भाषांतराच्या वेळी हा तपशील सुधारून घेता आला असता खरा; पण मग कदाचित आपणच म्हणालो असतो, हे तर आपल्याला आजीने आधीच सांगितललेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more