* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664614
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
COLLECTION OF POEMS
कवितासंग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTSAV #UTSAV #उत्सव #POEMS #MARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 04-07-2004

    नितळ... मनस्वी कवितांचा ‘उत्सव’... कविता म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देईल पण कविता म्हणजे शब्दांचा उत्सव, व्यक्त होणारं नितळ मन. ज्यातून सरळ थेटपणे भावना व्यक्त होतात. थेट हृदयात उतरणारी आणि मनात राहणारी ती ‘कविता’. अशाच मनस्ी कवितांचा सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा संग्रह नुकताच वाचला. कोणताही विशेष आविर्भाव, अभिनिवेश न बाळगता मनगूज सांगणाऱ्या अल्पाक्षरी कविता यांत आहेत. तारुण्यात प्रेमकविता आपसुकच लिहिल्या जातात. आयुष्याचा हा नवथर भर ओसरुन मध्यम वयात प्रवेश केल्यावर मागच्या वळणाकडं पाहिलं की, आपणच आपल्या वर्तनाचं आश्चर्य करू लागतो. त्या वेळच्या बालिश चुका पटतात. अशा वळणावरच्या भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणते- मागे वळून पाहाता येती डोळ्यांपुढे पुसट पुसट चित्रे कोण कोण कुठली भेटलेली पात्रे मागे वळून पाहाता आपली चूक ठळकपणे दिसते पण आज मनात तिचे समर्थनही असते मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे रंग... त्याचे अर्थ मन पक्व झाल्यावर खऱ्या अर्थाने जाणवू लागतात. त्याबाबतच्या जाणिवा विस्तारतात. अशावेळी ते शब्दातून व्यक्त होतात- दु:ख दुसऱ्याचे.. असते शीतल मायाही पातळ तितकीच आत नि बाहेर... वेगळेच रंग आपल्या दंग असे जो तो चोच मारण्यात अवघे टपती कसले सोबती जीवनाचे भूतकाळात अगदी जिव्हारी लागलेल्या घटनांकडे पाहाताना आज ती आर्तता... ती ओढ अनेकदा कुठेच दिसत नाही. काठावरून पाण्याचा तळ निरखण्याचा अलिप्तपण त्यात दिसतो. त्या भावनाप शब्दरूप घेतात- हल्ली असं जाणवतं, त्यांच अस्तित्व मनातून कधीच पुसलं गेलंय तो केवळ निमित्तमात्र... एक माध्यम पुन्हा पुन्हा मनात घुटमळू पाहातं ते त्याच्यात पाहिलेल्या माझ्या पहिल्या कोवळ्या तरल प्रेमाचं निर्माल्य व्यवहाराच्या आधारावर जगणाऱ्या या वास्तव दुनियेत नात्याला आत किती महत्त्व उरलंय हे सांगताना कवयित्री म्हणते- व्यवहार येतो तेव्हा नातं कुठ उरतं? खणखण पैशावरच काय ते ठरतं नैतिक देणं आणि कुठले आलेत बंध चमचम रुपया करतो डोळे बंद ‘हायकू’. हा काव्याचा प्रकारही या संग्रहात कवयित्रीनं चांगल्या पद्धतीने हाताळलाय. व्यवहारी जगाची आपली अशी कक्षा आहे तिथं हळवेपणा ही एक मोठी शिक्षा आहे मुरदाडपणासुद्धा कमावलेला गुण आहे आपलं साधपणं पहिलं बाकी मग गौण आहे आशा-निराशेच्या, निरनिराळ्या अनुभवांच्या हिंदोळ्यावर झुलणारं मन, कधी कधी भूतकाळात सैर करून येणारं कवयित्रीचं मन वर्तमानातल्या आपल्या घरावर खूप प्रेम करतं, त्याबद्दलच्या नैसर्गिक... सहजपणे उमलणाऱ्या प्रेमातून एकरूप होऊन लिहितं... आहे माझं एक शाणंसुरतं घर तिथं नसतो मुळी मला कसला डर माझ्याविना तेही नाही त्याच्यावाचून माही तेही माझ्यासारखी देईल अशी ग्वाही म्हणते म्हणून तर आहे माझं एक... शाणंसुरतं घर नितळ... मनस्वी आणि सोप्या भाषेत मन उलगडून दाखवणारा असा हा संग्रह. -सौ. सुजाता पेंडसे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT

    विविध भावरंगांचा ‘उत्सव’... आपल्या भोवती घडणाऱ्या घटना, अनुभव, निसर्ग, जीवनाचे नित्य नवे रंग यांचे संवेदनशील मनात जे प्रतिबिंब उमटतं त्याचा मुग्ध अविष्कार म्हणजे कविता असते. या प्रतिबिंबातून कविमनाचा जो उद्गार उमटतो तो म्हणजे कविता. अशाच विविध भावरगांनी सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा काव्यसंग्रह सजला आहे. सहज सोप्या भाषेत, भडकपणा, शब्दांचा सोस न करता सुप्रिया वकील यांची कविता अकृत्रिमपणे उलगडत राहते... मनाला भिडते. ‘माझे प्रतिबिंब जिच्यात पाहते तिला मी माझी कविता म्हणते’ असं कवयित्रीने म्हटले आहे. ‘उत्सव’ मध्ये तिच्या भावभावनांचे सच्चेपणाचे, समृद्धतेचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते. त्याचबरोबर आपल्या भोवती सजगपणे पाहणाऱ्या कवयित्रीच्या संवेदनशील मनाने जीवनाचे निसर्गाचे विविध रंग समर्थपणे व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर कवितांतून व्यक्त होणारे कटू अनुभव, सल, बोचसुद्धा वाचकांच्या मनाला भिडतात. कवयित्रीची अस्वस्थता, व्याकुळता ती शांतपणे पचवताना दिसते. पण हे अनुभव वाचकाला अस्वस्थ करतात. ‘उत्सव’मध्ये काही हायकू व चारोळ्यांचाही समावेश आहे. याही रचना मनस्पर्शी व वैशिष्ट्यपूर्ण झाल्या आहेत. या संग्रहातील ‘एक संध्याकाळ’ मध्ये ‘तुझ्या हातांच्या उबदार शिंपल्यात माझे हात मिटून घेतलेस तेव्हा...’ अशी हळुवार स्निग्ध जाणीव व्यक्त होते, तर लाजल्या वेलीला कळ्यांचा मोहर, पिवळ्या उन्हाला पावसाचा बहर’ असं म्हणत ही कविता निसर्गाशी तन्मय होते. ‘दु:ख दुसऱ्याचे असते, शीतल मायाही पातळ तितकीच’ अशा वस्तवाचा चटका देतानाच सुप्रिया यांच्या कवितेतून ‘केवढ्या चुकीचे केवढे भोगणे, त्याचे ठरविणे हाती नाही’ अशी असाह्यताही व्यक्त होते. ‘रात्रीला केशराचा स्वाद’ देणारी कवयित्रीची कविता प्रत्यक्ष पावसालच भिजायला लावण्याइतकी उत्कट होते. चंद्रमोहन कुलकर्णींनी या संग्रहाचे मुखपृष्ठ देखणे केले असून, शुद्ध मुद्रण, सुबक छपाई यामुळे अंतरंगाइतकंच पुस्तकाचं बाह्यरूपही सुंदर आहे. ‘उत्सव’ काव्यरसिकांना आवडेल हे नक्की! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more