* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO DEVELOP A SUPER MEMORY
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788177660562
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VERY FEW PEOPLE ARE BLESSED WITH A SHARP MEMORY. THEY REMEMBER THE LESSONS AND POEMS FROM THEIR CHILDHOOD; THEY REMEMBER THE MINUTEST DETAILS LIKE FIGURES, NAMES, NUMBERS OR SUCH OTHER THINGS. DO YOU ENVY SUCH PEOPLE? DO YOU NOT WISH TO HAVE AN EQUALLY SHARP MEMORY? DO YOU NOT WISH TO REMEMBER ALL PAST THINGS WITH THEIR MINUTEST DETAILS? THIS BOOK WILL HELP YOU TO TRUDGE ALONG THE PATH OF HOW TO REMEMBER! THERE ARE A FEW GUIDELINES IN THIS BOOK WHICH WILL SURELY HELP TO TRAIN YOUR MIND TO REMEMBER THOSE THINGS WHICH YOU WANT TO REMEMBER.THIS BOOK IS BASED ON THE CONCEPTION THAT NOTHING LIKE BAD OR WEAK MEMORY REALLY EXISTS. WE OFTEN COME ACROSS PEOPLE CURSING THEIR WEAK MEMORY. THE FACT IS MEMORY IS NOT BAD OR WEAK, IT JUST NEEDS ENOUGH TRAINING IN A CERTAIN WAY. PAI UNCLE HERE, WHOM WE KNOW AS THE ORIGINATOR OF `AMAR CHITRA KATHA`, THE MYTHOLOGICAL STORIES HAS ESPECIALLY COME UP WITH THIS BOOK TO HELP US TO KNOW THE WAYS TOWARDS A BETTER MEMORABLE LIFE. THE OTHER BOOKS IN THIS SERIES; `YASHACHA KAANMANTRA` AND `ATMAVISHWACHA KANMANTRA` ARE EQUALLY READABLE.
काही काही माणसांची स्मृती इतकी विलक्षण असते, की ती मोठमोठ्या कविता न अडखळता घडाघड म्हणू शकतात; किंवा वेगवेगळे तपशील, आकडे, नावं त्यांच्या अगदी चपखल लक्षात राहतात. या माणसांचा तुम्हांला हेवा वाटतो का? आपलीही स्मृती चांगली असावी, सगळ्या गोष्टी आपल्या अगदी छान, दीर्घकाळ आणि स्पष्ट स्मरणात राहाव्यात, असं तुम्हांलाही वाटतं का? या पुस्तकात तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणाया अशा काही झटपट, पण हमखास पद्धतींचा कानमंत्र सांगितलेला आहे. माणसाला जीवनात ज्या गोष्टी स्मरणात ठेवणं आवश्यक असतं, त्या स्मरणात ठेवण्यासाठी आणि स्मृतीला सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी या पद्धती हमखास यशस्वी ठरतात. वाईट किंवा कमकुवत स्मृती नावाची चीजच अस्तित्वात नसते, या विश्वासाच्या पायावर हे पुस्तक आधारलेलं आहे. अनेक लोक आपल्या स्मृतीला दोष देतात; परंतु त्यांची स्मृती वाईट नसते, तर तिला योग्य प्रशिक्षण दिलं गेलेलं नसतं, हे त्याचं मूळ कारण आहे. अनंत पैज्यांना आपण पैकाका म्हणून ओळखतो, त्यांनी आपल्या ‘अमर चित्रकथा’ या हास्यकथामालिकेतून आपल्या देशातील अनेक प्राचीन दंतकथा जिवंत केल्या आणि मुलं आणि पालकदोघांनाही मंत्रमुग्ध केलं. व्यक्तिमत्त्वविकासाला प्रेरणा देणारं लेखन करणारे लेखक म्हणूनही यांची ख्याती आहे. ‘यशाचा कानमंत्र’ आणि ‘आत्मविश्वासाचा कानमंत्र’ ही याच मालिकेतील त्यांची पुस्तकंही संग्राह्य आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-02-2002

    दहावी वा बारावीच्या परीक्षा जवळ आल्या की, विद्यार्थी तयारी करू लागतात. काल वाचलेलं लक्षात राहात नाही. मगाशी काही मुद्दे काढले आणि आता आठवायचा प्रयत्न केला तर काही आठवत नाही. साधारणत: घरोघरी असा सूर ऐकू येतो, यात चिंता करण्यासारखी बाब नाही. स्मृती ही ांगली अथवा वाईट असा भाग नसतो. लक्षात राहावे यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, मात्र मनाची ठेवण वेगळया पद्धतीने तयार करावी लागते. ही ठेवण कशी असावी किंवा त्याची तयारी कशी करावी यासंबंधी माहिती देणारे ‘उत्तम स्मृतीचा कानमंत्र’ हे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. उत्तम स्मरणशक्ती हा गुण आपण नेहमी अभ्यासाच्या संदर्भात वापरतो. दैनंदिन जीवनात वावरताना आपल्याला अनेक गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. स्मृती म्हणजे दुसरे असते तरी काय? दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची बाब. काही माणसे मोठमोठ्या कविता न अडखळता म्हणू शकतात. वेगवेगळे तपशील, आकडे, नाव वगैरे गोष्टी चटकन त्यांच्या लक्षात राहतात. अशा माणसांचा प्रसंगी आपणाला हेवा वाटतो. आपल्या स्मृतीचा विकास कसा करावा याची आखणी या पुस्तकात केली आहे. या पुस्तकात एक उत्तम उदाहरण दिले आहे. उत्तम शरीरसंपदा राखावयाची असल्यास रोजच्या रोज व्यायाम करण्याला श्रेय दिले जाते. स्मृतीच्या बाबतीतही असेच आहे. त्यादृष्टीने जॉर्ज जॉन्सन या तरुणाची कथा पाहण्यासारखी आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक अनंत पै आहेत. त्याचा अनुवाद चारुलता पाटील यांनी सोप्या मराठीत केला आहे. स्मृती विकसित होण्यासाठी आनंददायक गोष्टींची सांगड घालणे, स्मरणाचे सूत्र विकसित करणे, निरीक्षण, सेकंत पद्धत, मनाचा समतोल ठेवणे आणि त्याला साहचर्याची जोड देणे या गोष्टी स्मृती चांगली राहण्यासाठी उपयुक्त आहेत. याच साऱ्या गोष्टी जीवनात वावरताना कशा सांभाळायच्या याचे विवरण पै यांनी केले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more