* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"UTTARAKAANDA" IS AN ATTEMPT TO LOOK AT RAMA’S STORY FROM SEETHA’S PERSPECTIVE AND EXPERIENCE. THIS IS THE SECOND TIME THAT MR. BHYRAPPA IS TACKLING AN EPIC. FORTY YEARS AGO, HE WROTE ‘PARVA’, A RETELLING OF THE MAHABHARATA. PARVA IS IN THE FORM OF PERSONAL REFLECTIONS OF SOME OF THE PRINCIPAL CHARACTERS OF THE EPIC.
‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#उत्तरकांड #एस.एल. भैरप्पा # उमाकुलकर्णी#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#UTTARKAND #SLBHYRAPPA #UMAKULKARNI
Customer Reviews
  • Rating StarSandeep Jadhav

    पुस्तक परिचय... "उत्तरकांड" एस. एल. भैरप्पा यांचं प्रत्येक साहित्य वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं, वाचत असताना वाचक एका वेगळ्याच विचारचक्रात हरवून जातो आणि याचाच प्रत्यय मला पुन्हा एकदा आला त्यांची रामायणावर आधारित कादंबरी "उत्तरकांड" वचत असताना! "साक्षी" आणि "आवरण" या कादंबऱ्या वाचल्यानंतर "उत्तरकांड" ही त्यांची तिसरी कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. प्रत्येक कादंबरीचा विषय जरी वेगळा असला तरी भैरप्पांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साहित्य हे मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. "उत्तरकांड" ही रामायणावर आधारित कादंबरी रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहत असताना सीतेच्या निवेदनातून उलगडत जाते. रामायणात घडलेल्या घटनांसोबत बरेच चांगले-वाईट प्रसंग सीतेच्या दृष्टिकोनातून उलगडत असताना सीतेचा वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधे वाचकाला गुंतवून ठेवत ही कादंबरी पुढे सरकत राहते. रामाची पत्नी म्हणून सीतेच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण भैरप्पांनी या कादंबरीत केलेलं आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाबरोबरच रामायणातील इतरही पात्रांचे जे वर्णन भैरप्पा यांनी केलं आहे ते वाचत असताना आजपर्यंत ज्या पारंपारिक चौकटींमध्ये आपण या पात्रांना पाहत आलो आहोत त्या सर्व भेदून ही पात्रे आपल्यासमोर उभी राहतात. शिवाय रामायणात घडलेल्या सर्वच घटना कोणताही दैवी मुलामा न देता वर्णन केल्याने आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला मानवी पातळीवर आणून मांडल्यामुळे सीतेच्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे आजच्या समाजात, आपल्या आसपास घडत असणारी एखादी कथाच असल्याचा भास वाचकाला होत राहतो आणि त्यामुळेच सीतेच्या निवेदनातून पुढे सरकत असताना कादंबरीत एकप्रकारचं नाट्य निर्माण झालं आहे जे रामायणाचा एक नवा अर्थ आपल्यासमोर घेऊन येते. `पतिव्रता`, `सोशिकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण` फक्त याच नजरेतून आजपर्यंत सीतेकडे पाहिलं गेलं आणि पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी एक आदर्श म्हणून समाजापुढे त्याचं इतकं उदात्तीकरण केलं गेलं की सीतेवर एक स्त्री म्हणून झालेला अन्याय आपसूकच झाकला गेला, तिचा आवाज दबला गेला. एस. एल. भैरप्पांनी सीतेवर झालेल्या याच अन्यायाला वाचा फोडण्याचा, सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या या "उत्तरकांड" कादंबरीमधून केला आहे. सीतेला एका वेगळ्याच रुपात भैरप्पांनी या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे ज्यामुळे सीता जणूकाही आजच्या काळातली एखादी स्त्रीवादी व्यक्तिरेखाच वाटत राहते. "उत्तरकांड" या कादंबरीमधे भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून स्त्रीची एक तेजस्वी बाजू आपल्यासमोर आणली आहे. रावणाकडून सुटका केल्यानंतर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली परंतु सीता जशी रामापासून दूर होती तसाच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल दबक्या आवाजात अनेकदा केला जातो पण सीता ही एक "स्त्री" असल्या कारणाने रामाने जे केलं ते कसं योग्य होतं असंच आजपर्यंत सांगितलं गेलं. भैरप्पांचं "उत्तरकांड" याला अपवाद आहे, भैरप्पांच्या "उत्तरकांड" मधील सीता नेमका असाच सवाल रामाला भर धर्मसभेत करते - ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर राहतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने रामसारखंच दुटप्पीपणे वागणाऱ्या आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे. त्यामुळेच पौराणिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या वास्तविक जगाला अगदी तंतोतंत लागू होणारी भैरप्पांची ही ३०४ पानी कादंबरी "उत्तरकांड" वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. ...Read more

  • Rating StarUMA NIJASURE

    अप्रतिम पुस्तक

  • Rating StarPratik Yetawdekar

    प्रख्यात भारतीय कादंबरीकार डॉ.एस.एल.भैरप्पा यांनी लिहिलेली २०१५ साली कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेली *`उत्तरकांड`* ही महर्षी वाल्मिकी यांच्या अभिजात असणाऱ्या महाकाव्य रामायणातील सीता या उत्तुंग पात्राभोवती गुंफलेली कलाकृती. राम हे अखिल भारत वर्षाचे हृदय्थ दैवत.राम आणि त्याचे धर्माचरण हे ही एक मिथक च पण प्रत्येक भारतीय लोकमनाचा ठाव व्यापून राहिलेलं गूढ पण लोभस असं सत्य.रामाचा वनवास,सीताहरण,लंकेवर स्वारी त्या नंतर प्राप्त केलेला विजय नन्तर अयोध्येत आल्यावर लोकभिचाराला सामोरं जाऊन रामाने केलेला सीतात्याग.त्यानंतर सीते च्या मनातील विचारांचे काहूर आणि त्यावर तिने केलेली मात, जनकाने भूमीतून सापडलेल्या एका कन्येचा केलेला सांभाळ पण त्या भूमी बद्दल सीतेची असणारी ओढ, त्या ओढीच्या माध्यमातून च कृषक म्हणून केलेली शेतीची कामे. महर्षी वाल्मीकींच्या आश्रमात व्यतीत केलेला काळ,केलेले लव कुशांचे संगोपन, कळते झालेले लवकुश यांनी पकडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा तो सोडून न देता वाल्मिकी नि केलेली मध्यस्थी त्यातून झालेली अयोध्येतील धर्मसभा आणि त्यात सीतेने बजावलेली स्त्री च्या हक्कासाठी ची भूमिका. एक सूंदर अशी पौराणिक पार्श्वभूमीवर आधारलेली पण वास्तवातही सही सही लागू होणारी अशी कलाकृती `उत्तरकांड` ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more