* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664980
  • Edition : 6
  • Publishing Year : SEPTEMBER 2002
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN IS AN INTELLIGENT MAN CONVERTED INTO SCIENTIST? THE ANSWER IS SIMPLE. IF AN INTELLIGENT PERSON HAS THE HABIT OF ASKING THE REASONS ABOUT THE WORKING OF THINGS AROUND US AND FURTHER IF HE HAS THE ABILITY TO GO TO THE BASE OF EACH AND EVERYTHING, THEN VERY SOON HE REACHES THE ORIGIN OF THE WORKING AND ENDS UP INTO A THEOREM; WHICH FURTHER LEADS HIM TO THE NOBEL AWARD. BEHIND EVERY HAPPENING, THERE IS SOME SCIENTIFIC REASON. IF THAT REASON IS NOT REACHED AT THEN THE HAPPENING REMAINS A MYSTERY. THE PURPOSE OF THIS BOOK IS TO QUENCH THE THIRST OF FINDING OUT THE MYSTERY AT LEAST UP TO CERTAIN EXTENT.
बुद्धिमान मनुष्य शास्त्रज्ञ कसा होतो, याचे उत्तम गमक म्हणजे घटनांवर विचार करून, ‘असे का?’ ‘असे का?’ करता-करता विश्लेषणाचा एक एक पैलू खोदून शेवटापर्यंत जाणे. म्हणजे एक नेत्रदीपक अंतिम सिद्धांत तयार होतो. तो सिद्धांत या भूतलावर ‘नोबेल पारितोषिक’ मिळवून देतो. प्रत्येक घटना घडण्याजोगे काही ना काहीतरी शास्त्रीय कारण असते. ते जर माहीत नसले, ‘तर ती घटना कशी घडली’, याचे गूढ कायम राहते. ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. ही जिज्ञासा काही अंशी पूर्ण व्हावी, म्हणून हा लेखनप्रपंच केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VACHANATUNVIDNYAN #VACHANATUNVIDNYAN #वाचनातूनविज्ञान #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परीक्षा आपल्या सर्वसामान्य ज्ञानाची... या सृष्टीत अनेक घटना सातत्याने घडत असतात आणि आपण त्या तशा घडणारच हे गृहीत धरून त्यांच्याकडे बघत असतो. विज्ञान मात्र या घटनांची कारण परंपरा शोधण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगप्रणालींची योजनाकरीत असते. नवनवे शब्द वा संज्ञा उपयोगात आणत असते. आपल्या मुलामुलींमध्ये जिज्ञासूवृत्ती विकसित झाली तर प्रत्येक गोष्टींच्या मुळाशी जाण्याची प्रवृत्ती वाढीला लागेल, आणि त्यांचे निसर्गाचे आकलन अधिक नेमके व नेटके होऊन, त्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे नवनवे मार्ग सुचतील. मुलांना आपल्या अवतीभवती बघताना अनेक प्रश्न पडले पाहिजेत; आणि त्या प्रश्नांची उत्तरे वडीलधाऱ्यांकडून वा पुस्तकांतून मिळवण्याची जिद्द त्यांच्यात दिसायला हवी. वाचनातून विज्ञान या पुस्तकात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे कलाशिक्षक डी. एस. इटोकर यांनी मुलांना पडणाऱ्या ४३० प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे प्रश्न सामान्य ज्ञान, निसर्ग, यंत्र-उपकरणे, संज्ञापन माध्यमे, प्राणी सृष्टी, शरीरशास्त्र, रसायन शास्त्र, भौतिकशास्त्र वगैरेंशी संबंधित आहेत. ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जेचे नियम काय? सूर्य हा ऊजेचा मोठा स्त्रोत आहे असे का म्हणतात? ऊर्जेची रुपे कोणकोणती आहेत? (यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, विद्युत, प्रकाश, चुंबकीय, ध्वनी, रासायनिक ऊर्जा) अशासारख्या प्रश्नांतून त्या त्या विषयाची वेगवेगळी अंगे स्पष्ट होऊ शकतात. हे प्रश्न एकेक विशिष्ट विभाग पाडून एकत्र न देता, सरमिसळ करून दिले आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तकासारखा कंटाळा येण्याचे कारण नाही. या पुस्तकात दिलेल्या पुढील काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही आधी देण्याचा प्रयत्न करा. ती देता आली तर उत्तमच ! नाहीतर पुस्तकातून शोधून काढा. १. घाबरणे म्हणजे काय ? (३७) २. ग्लासभर पाण्यात किती धुके तयार होईल ? (३३) ३. काकडीचे वरचे टोक कडू का लागते ? (२६) ४. कमळाचे पान जलाशयावर का तरंगते ? (२४) ५. उडणारी खार कशी असते ? (१६) ६. कापूर हवेत उघडा ठेवल्यास उडून जातो का ? (३०) ७. गरम तव्यावर पडलेला पाण्याचा थेंब टणाटण उड्या का मारतो ? (३४) ८. गरम चहा पिण्यासाठी चिनीमातीचा कप का वापरतात ? (३७) ९. घोडा उभ्यानेच का झोपतो ? १०. घुबडाला रात्री का दिसते ? (४२) ११. पाल छतावर उलटी कशी चालू शकते ? (४३) १२. जलचर प्राण्यांना ऑक्सिजन कसा मिळतो ? (४६) १३. डायनोसॉरचे वजन किती होते ? (५०) १४. तापवल्यावर दूध उतू का जाते ? (५४) १५. तेल व पाणी एकमेकात का मिसळत नाहीत ? (५४) १६. थ्री पीन प्लगमध्ये एक पीन मोठी का असते ? (५७) १७. दव व धुके कसे तयार होते ? (६०) १८. दविंबदूतून गवताचे पान मोठे का दिसते ? (६४) १९. धोक्याच्या ठिकाणी लाल रंगाचा दिवा का लावतात ? (६६) २०. नारळात पाणी कोठून येते ? (६८) २१. नालाकृती सरोवरे कशी तयार होतात ? (७२) २२. पोटात दुखते तेव्हा नेमके काय होते ? (७५) २३. पाऊस धाराच्या रुपातच का पडतो ? (७६) २४. पाण्यात बुडालेली व्यक्ती लगेच खाली जाते. पणतीच ७२ तासांनी परत आपोआप वर येते का ? (७९) २५. पाणी कसेही फेकले तरी गोल थेंबांच्या रूपातच खाली का पडते ? (८०) २६. पिवळ्या फॉस्फरसला हाताने स्पर्श का करू नये ? (८६) २७. प्रेक्षकांनी भरगच्च भरलेल्या प्रेक्षागृहात अस्वस्थ का वाटते ? (८८) २८. पातळ काच हवेत कैचीने सरळ कापता येत नाही का ? (८८) २९. फाउंटनपेनच्या टोपणाला एक बारीक छिद्र का असते ? (९१) ३०. काही फळे गोड तर काही आंबट का असतात ? (९२) ३१. मुंग्या रांगेने का चालतात ? (१०३) ३२. म्हातारपणी केस पांढरे का होतात ? (१०२) ३३. रायफलच्या गोळीचा वेग किती असतो ? (१०८) ३४. रात्री झाडाखाली का झोपू नये ? (१११) ३५. शिंका का येतात ? (१२७) या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे शास्त्रीय परिभाषेत देता यायला हवे. गोळाबेरीज उत्तर देणे पर्याप्त नाही... असे ४३० प्रश्न या पुस्तकात आहेत. आपल्या सामान्य ज्ञानाचीही त्यामुळे चाचणी होऊन जाईल. विद्यार्थ्यांना एकमेकांना या पुस्तकातील प्रश्न विचारून आपल्या ज्ञानाचा टेंभा मिरवता येईल. कौन बनेगा करोडपतीसारख्या कार्यक्रमामुळे विशिष्ट प्रश्नांची बरोबर उत्तरे देण्याची क्षमता ही आर्थिक लाभही देऊ शकते. त्यासाठी वाचनातून विज्ञानसारखी पुस्तके उपयुक्त ठरतील. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 10-11-2002

    वैज्ञानिक जिज्ञासा पूर्ण करणारे पुस्तक... जगात सुंदर असे जर काही असेल तर ते म्हणजे शास्त्रीय ज्ञान. एखाद्याला त्याच्या सर्व हयातभर विज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली तर त्याला लाभलेली ती एक अमोल अशी देणगीचं म्हणावी लागेल, असे आइनस्टाइनने महटले आहे. विज्ञाननिष्ठ युगात मुलांना लहानपणापासूनच विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने विज्ञानाची अधिकाधिक ओळख करून देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगानेच वाचनातून विज्ञान हे डी. एस. इटोकर यांचे पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, आपल्या भोवती अनेक घटना घडत असतात. प्रत्येक घटना घडण्यामागे काहींना काही शास्त्रीय कारण असते, ते जर माहित नसेल तर ती घटना कशी घडली याचे गूढ कायम राहते. ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. ही जिज्ञासा काही अंशी पूर्ण व्हावी हाच या लिखाणामागील उद्देश आहे. सामान्य ज्ञान, उपयुक्त व्याख्या, जिज्ञासा या तीन विभागांमुळे हे पुस्तक सर्वसामान्य जनांना, विद्यार्थ्यांना व शास्त्रीय बुद्धी असणाऱ्यांना उपयुक्त ठरेल. अ‍ॅनिमेशन चित्रे कशाला म्हणतात, अन्नसाखळी कशाला म्हणतात, अभिसारी व अपसारी भिंग म्हणजे काय, अ‍ॅक्युपंक्चर म्हणजे काय, अग्निशामक उपकरणाचे कार्य कसे चालते याच बरोबरच अंगावर काटा येतो म्हणजे काय होते, अंधाऱ्या जागी पेटलेली उदबत्ती गोल गोल फिरविली असता लाल वर्तुळ काय दिसते, डायनोसॉरचे वजन किती होते, डॉल्फिन हा कशा प्रकारचा मासा आहे, तापविल्यावर दूध का उतू जाते, काही व्यक्ती डावखोऱ्या का असतात अश गंमतीशीर प्रश्नांची उकलही यात करण्यात आली आहे. बुद्धिमान मनुष्य शास्त्रज्ञ कसा होतो, याचे उत्तम गमक म्हणजे घटनांवर विचार करून, असे कां?, असे का? करता करता विश्लेषणाचा एक एक पैलू खोदून शेवटापर्यंत जाणे. म्हणजे एक नेत्रदिपक अंतिम सिद्धांत तयार होतो. तो सिद्धांत या भूतलावर नोबेल पारितोषिक मिळवून देतो. अशी या विज्ञानातील गंमत. कुतूहलातून निष्कर्षांपत पोहोचविणारी ही आगळी गंमत. लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्यांची जिज्ञासा पूर्ण करणारे पुस्तक केवळ माहितीपूर्णच नव्हे तर वाचनीयही आहे. बाबू उडपी यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तकाच्या संकल्पनेला साजेसे असेच आहे. ...Read more

  • Rating StarDAINK KESARI 02-03-2003

    जिज्ञासूंसाठी उपयुक्त... आपल्या रोजच्या जीवनात नि सभोवती अनेक घटना घडत असतात. ज्यामागे काही ना काही शास्त्रीय कार्यकारणभाव असतो. दूध ऊतू जाते, दुधापासून दही बनते अशा स्वयंपाकघरातील घानांपासून, सूर्यग्रहण, चंद्रग्रहणापर्यंतच्या घानांपर्यंत अनेकविध घाांचा यात अंतर्भाव असतो. गोष्ट रोजची झाली, की सरावाची नि सवयीची होते, हे खरे. पण म्हणून ती का घडते, याची माहिती मिळविण्याची वृत्ती जिज्ञासूंना स्वस्थ बसू देत नाही. अशा जिज्ञासूंसाठी डी. एस. इटोकर या राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी ‘वाचनातून विज्ञान’ हे छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात एकूण चारशे तीस प्रश्नांची थोडक्यात उत्तरे आहेत. प्रश्न आहेत पाकशास्त्रापासून, वनस्पतिशास्त्रापर्यंत नि शेतीपासून अंतराळापर्यंतच्या क्षेत्रातील. अर्थातच सामान्यांना आणि सामान्यत: पडणारे हे प्रश्न. उदाहरणच द्यायचे तर डोळ्यांत अश्रू का येतात? (पृ. ३) किंवा ‘उपग्रह अवकाशात सोडताना उलटी गणना का करतात? (पृ. १४), घोडा उभ्यानेच का झोपतो? (पृ. ३८), दिव्याची ज्योत नेहमी वरच का जाते? (पृ. ६०), प्रकाशवर्ष कशाला म्हणता? (पृ. ७४), शाई भरण्याचा ड्रॉपर कोणत्या तत्त्वावर काम करतो? (पृ. १२९), आवाज घुमतो कसा? (पृ. १५१)... इत्यादी. प्रश्नांची उत्तरे, थोडक्यात आहेत. जिज्ञासूंची जिज्ञासा तात्पुरती शमविण्यापुरती ती पुरेशी आहेत. कदाचित ही माहिती वाचून अधिक माहिती मिळविण्याकडे वाचकाने वळावे, हाही हेतू असेल. विविध समर्पक चित्रांनी पुस्तकांची लज्जत वाढविली आहे. मात्र, पुस्तकात काही उणिवा भासल्या, त्यांचाही उल्लेख करावयास हवा. काही प्रश्नांची द्विरुस्ती झाली आहे. ती टाळावयास हवी होती. दुसरे म्हणजे प्रश्नांची सरमिसळ आहे. एखाद्या विशिष्ट विषयातील प्रश्नांचा गट तयार केला, तर वाचकाला आपल्याला भेडसावणाऱ्या नेमक्या प्रश्नाचे उत्तर त्वरित मिळू शकेल. असे विविध गट करणे नि त्यानुसार सूची करणे. याने पुस्तक जास्त सुटसुटीतही झाले असते. या उणिवा पुढील आवृत्तीत दूर केल्यास पुस्तकाची उपयुक्तता वाढेल. एरवी, इटोकर यांनी संकलित केलेली माहिती जिज्ञासूंच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे, यात शंका नाही. भाषेत अनावश्यक क्लिष्टता नाही आणि शास्त्र विषयाचे अध्ययन न करणाऱ्यांनाही कळू शकेल, अशी सोपी भाषा आहे. -डॉ. राहूल गोखले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more