ON NOVEMBER 20, 1962, YASHWANTRAO CHAVAN WENT TO DELHI TO ASSUME THE POST OF `DEFENCE MINISTER` OF INDIA.
MARATHI PEOPLE BID FAREWELL TO HIM WITH THE WORDS `SAHYADRI FOR THE PROTECTION OF HIMALAYAS`. BUT THE PUBLIC DID NOT REALIZE THE MENTAL AGONY SAHYADRI HAD TO ENDURE AFTER ENTERING DELHI. YASHWANTRAO ENDURED ALL THE PAINS AND WITHIN A YEAR EARNED THE TRUST OF PANDIT NEHRU AND ESTABLISHED HIS SPECIAL PLACE IN DELHI.
AFTER THE DEFEAT IN THE WAR AGAINST CHINA IN 1962, YASHWANTRAO MADE SPECIAL EFFORTS TO RAISE THE STRENGTH AND MORALE OF THE ARMY, AND ALSO SET UP FACTORIES AT VARIOUS PLACES TO MANUFACTURE MILITARY EQUIPMENT, AUTOMATIC GUNS, AMMUNITION AND ALL THESE.
२० नोव्हेंबर, १९६२ला यशवंतराव चव्हाण भारताचे `संरक्षण मंत्रिपद` भूषविण्यासाठीच दिल्लीला गेले.
`हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री` या शब्दांत मराठी जनतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रीला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले.
चीनविरुद्ध १९६२मधील युद्धातील पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचलित बंदुका, दारूगोळा व हे सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले. त्यामुळे १९६५च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये जे काही घडले आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला, यांची उत्तरे यामध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडींचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.
.......
`यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होते....`
– पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
(‘१९६५ : WAR INSIDE STORY’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात)