WITH A WEALTH OF EVIDENCE, ARUN SHOURIE SPELLS OUT IMPERATIVES FOR DEFENCE BEYOND THE MILITARY.A MUST FOR OUR TIMES.
चीन, पाकिस्तान आणि बांगला देश, या शेजारी देशांकडून भारताला दिली जाणारी आव्हाने – विशेषत: लष्करी; हा या पुस्तकाचा गाभा आहे. पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या दहशतवादाचा उलगडा करून घेताना, तेथे शालेय शिक्षणामध्ये सुरूवातीपासूनच द्वेषमूलक विचार कसे भिनवले जातात याच्या तपशिलाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीन स्वत:ची प्रगती साधताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाच्या काय, कोणत्या आणि कशा खेळी करतो, चीनची व्यूहरचना कशी असते याचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे. या मोठ्या सत्ता फक्त आपला स्वार्थ कसा पाहतात हे जाणणेही महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहत असताना भारतीय नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काश्मीरसारखे प्रश्न तर उद्भवलेच; पण याशिवाय पंजाबमधील दहशतवाद, लाखो बांगला देशींचा बेकायदा प्रवेश, बिहारमधील कोलमडलेले प्रशासन, नक्षलवाद अशा समस्या उभ्या राहतात; हे सप्रमाण सिद्ध करायचा यात प्रयत्न आहे. सजगपणे अभ्यास करून, सर्व अडचणींचे भान ठेवून, कालस्थान परत्वे आपल्या व्यवहारात बदल करून, लष्करीदृष्ट्या स्वत:ला सुसज्ज करून, सक्षम राष्ट्रीय शक्ती निर्माण करणे हा यावरील उपाय आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्याबद्दल जिव्हाळा असणाया अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त आहे.