* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ORIGINALLY A PHILOSOPHER, BUT HE TURNED TOWARDS NOVEL WRITING TO REVEAL THE MEANING OF LIFE THAT HE UNDERSTOOD. THIS IS ONE OF HIS BEST SELLERS. IT REFLECTS THE CONFLICT BETWEEN ORTHODOX AND TRADITIONAL RITUALS AND THE CHANGING LIFE STYLES AND VALUES OF THIS GENERATION.HE HAS SUPERBLY JOTTED DOWN THE FEELINGS AND UPROAR ON A FAMILY LEVEL. THE ORIGINAL WORK IN KANNADA HAS BEEN BESTOWED UPON BY THE KARNATAKA SAHITYA ACADEMY AWARD WHILE THE KANNADA MOVIE BASED ON THIS HAS WON THE NATIONAL AWARD. AFTER THE SAHITYA ACADEMY DECIDED TO CONFER AWARDS TO TRANSLATED BOOKS, THIS WAS THE FIRST BOOK TO GET THE AWARD IN MARATHI.
तत्त्वज्ञानाचा मार्ग सोडून कादंबरी लेखनातून जीवनाचा अर्थ जाणू पाहणाया लेखकाची डॉ. एस.एल. भैरप्पा यांची अत्यंत लोकप्रिय आशयसंपन्न कादंबरी ‘वंशवृक्ष’. सनातन धर्मपरंपरा आणि मन्वंतरकाळातील बदलती जीवनमूल्ये यांतील संघर्षाचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी कलाकृती. मूळ कन्नड कादंबरीला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे तर या कादंबरीवरील कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार लाभला आहे. साहित्यअकादमीने अनुवादासाठी पुरस्कार देण्याची योजना आखल्यावर मराठीत सर्वप्रथम हा मान या अनुवादाला मिळाला आहे. त्याचबरोबर मिळणारा ‘महाराष्ट्र गौरव’ ही या अनुवादाने मिळवला आहे. बीजक्षेत्र न्याय आणि वंशवृक्षाची संकल्पना यांचा उहापोह करणारी कलात्मक कादंबरी.
* साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार १९८९ * राज्य पुरस्कार १९९०

No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarRakesh Sawale

    "वंशवृक्ष" धार्मिक पातळीवरील नात्यांची गुंतागुंत...!! एस्. एल. भैरप्पा यांची वाचलेली तिसरी कादंबरी. (पर्व आणि आवरण नंतरची) सुरवात काहीशी संथ वाटू शकते.. पात्र परीचयाची ती गरज आहे हे नंतर कळतं... पण जेव्हा आपण सगळ्यांना ओळखायला लागतो तेंव्ह हीच गोष्ट इतकी जबरदस्त पकड घेते की आपण त्या त्या व्यक्ती प्रमाणे विचार करायाला लागतो... गोष्ट तशी साधी आहे... श्रीनीवास श्रोत्री.. नेहमी धर्माप्रमाणे वागणारे कथेच्या केंद्रस्थानी आहेत. गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी" च आहे, असं मानणारे. त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या... चढ उतारात आपण पण नकळत ओढले जातो. आणि शेवट नेहमी सारखा अर्धवट सोडल्यासारखा... मन सुन्न करणारा... जर भैरप्पांच्या लेखणीचे चाहते असाल तर जरूर वाचा...!! ...Read more

  • Rating StarPRANAV PATIL

    एस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more

  • Rating StarNiranjan N. Kulkarni

    एखाद्या पुस्तकाविषयी मनन करण्याची माझी पहिली वेळ नाही, मात्र लिहू वाटण्याची पहिलीच वेळ आहे. S L भैरप्पांची आवरण आणि तडा ही 2 पुस्तके वाचून झाली होती गेल्या काही दिवसात आणि आता चाहूल होती बहुप्रतिक्षित वंशवृक्ष ह्या पुस्तकाची. काही पुस्तके अशी असतात क त्याविषयी चर्चा करण्यापेक्षा मनातल्या मनात त्याविषयी चिंतन करावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा. अत्तराची कुपी एखाद्या पेटित ठेवल्यानंतर ती संपून गेल्यावरदेखील त्याचा सुवास त्या पेटीत दरवळत राहावा तशी वंशवृक्ष मनात घर करून राहिली. भैरप्पा यांची पात्र उभी करायची पद्धत इतकी चपखल आहे की तशी हातोटी फार कमी जणांना लाभते. श्रीनिवास श्रोत्री हे धीरोदात्त असं पात्र ह्या कादंबरीभार वावरलंय, सनातन धर्म पद्धती विरुद्ध चिरचेतन चिरनुतन बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व ह्या पुस्तकात रेखाटलं आहे. शेवटी जिंकलं कोण हे दाखवण्याची चूक भैरप्पांनी केली नाही. मंदिरात जाऊन काय मागायचं हा प्रश्न जसा याचकाचा असतो तसं भैरप्पांनी इथे तो वाचकांवर सोडला आहे. ज्याला जे घ्यायचं आहे ते घ्या. उमा कुलकर्णी यांनी ह्या मूळ कन्नड पुस्तकाचा अनुवाद मराठीत केलाय. खरंच हा अनुवाद वाटत नाही हे नक्की. मी पुस्तक परीक्षण करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाही, माझी ती योग्यता नाही. चंदनाच्या झाडाला जर बाभळी चिकटली तर त्या बाभळीलादेखील चंदनाचा वास येतो असं म्हणतात, तशीच काहीशी माझी गत झालीये. म्हणजे इतकं उत्तुंग साहित्य वाचल्यावर माझी ही पोस्ट म्हणजे ती बाभळीच.. कुठल्याही मोहाच्या अथवा कठीण प्रसंगात श्रोत्रीन्नी आपला संयम ढळू दिला नाही, तिरस्कारासारखी नकारात्मक भावना मनात ठेवली नाही, जे होईल ते ब्रम्हउपदेश ह्याप्रमाणे ते पुढे सरकत राहिले. शेवटी ज्या मुळावर वंशवृक्ष उभा होता त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये श्रोत्री मनाचा संयम ढळू ना देता सर्व मालमत्ता दान करून संन्यस्त होतात. खूप कमी घटना आपल्या जीवनाचा मार्गक्रम ठरवतात, हे पुस्तक त्या दुर्मिळ गोष्टीत येतं. ...Read more

  • Rating StarSnehal Sherkar

    डॉ. भैरप्पा यांची अतिशय सुंदर आणि वाचनीय कादंबरी आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more