IT HAS NOTHING TO DO WITH TODAY`S SYMBOLISM AND THE MYSTICISM IT CREATES. SIMILARLY, ONE MORE THING I LIKED IN THAT POEM. IT IS THAT THE POET DOES NOT WANT TO TEACH THE READER ANYTHING. ONE MORE THING TO BE MENTIONED IS THAT THE GROTESQUE WORSHIP THAT HAS CREPT INTO MARATHI LITERATURE HAS NOT YET HAD ANY EFFECT ON THIS POEM. ALTHOUGH THERE IS A LOT OF LOOSE DECORATION IN THIS POEM, THERE IS NO NEW GENDER SECT IN IT. IT IS, IT IS ONLY, STRAIGHT, PURE, INNOCENT SOUL-SEARCHING!...`
‘...शांताबाईंची कविता मला आवडते; आणि मनापासून आवडते. तिच्यामध्ये जी सहजता आणि प्रसन्नता आहे, ती आजकालच्या इतर काव्यात क्वचितच पाहावयास मिळते. तीमध्ये त्यांच्या मनातील अर्थ अगदी स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला असतो. तो मजावून घेण्यासाठी तिजबरोबर झटापट करावी लागत नाही. आजकालचा प्रतीकवाद आणि त्यामुळे निर्माण होणारे गूढगुंजन तीमध्ये मुळीच नाही. त्याचप्रमाणे आणखीही एक गोष्ट मला त्या कवितेमध्ये आवडली. ती अशी, की कवयित्रीच्या मनात वाचकाला काहीही शिकवावयाचे नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे प्रेषिताचे अवसान तिने आणलेले नाही. तिसरी समाधानाची गोष्ट अशी, की शांताबाईंना आपल्या कवितेमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रांतिकारकत्वाचा अधिकार सांगावयाचा नाही, की वाचकाला धक्के देऊन त्याला जागृत करण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी धरलेली नाही. आणखीही एका गोष्टीचा उल्लेख करावयाचा, म्हणजे मराठी वाङ्मयात डोकावू पाहणाया विकट (GROTESQUE) पूजेचा या कवितेवर काहीही परिणाम अद्यापि झालेला नाही. या कवितेत मोकळा शृंगार पुष्कळच असला, तरी नव्याने येऊ पाहणारा लिंगसंप्रदाय तीमध्ये मुळीच नाही. आहे, तो केवळ, सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार!...’ –रा. श्री. जोग