IN 1879 TILAK AND AGARKAR STAYED IN THE SAME ROOM WHILE IN THE DECCAN COLLEGE HOSTEL. WHILE TALKING ABOUT THOSE DAYS HE SAYS;
“BOTH OF US WERE COMPLETELY CAPTIVATED. WE COULD THINK OF NOTHING ELSE BUT THE CONDITION OF OUR COUNTRY. AFTER MUCH BRAIN STORMING WE BELIEVED THAT ONLY EDUCATION COULD RESCUE US FROM THE BAD SITUATION.”
THIS BRAIN STORMING LATER RESULTED INTO A SCHOOL PROJECT. THE NEW ENGLISH SCHOOL WAS ESTABLISHED ON 1ST JANUARY 1880 UNDER THE ABLE LEADERSHIP OF VISHNU SHASTRI CHIPLUNKAR. THE DECCAN EDUCATION SOCIETY WAS ESTABLISHED ON 24TH OCTOBER 1884 WHILE FERGUSSON COLLEGE CAME INTO EXISTENCE ON 2ND JANUARY 1885. FERGUSSON COLLEGE COMPLETED 125 YEARS ON 2ND JANUARY 2005.
FERGUSSON COLLEGE HAS ALWAYS BEEN ONE OF ITS OWN TYPES. IT WAS A COMPLETELY NEW VENTURE. IT IS A COMBINATION OF CONTRARY ASPECTS. IT ALLOWS FREEDOM OF THOUGHTS. IT HAS AIMED AT SELFLESSNESS. PERSISTENCE HAS BEEN AT ITS CORE. SINCE, IT WAS FIRST IN THE ROW, THERE WERE MANY TYPES OF PROBLEMS AND HURDLES LIKE IN ANY OTHER INSTITUTION. DIFFERENCE OF OPINION, GOVERNMENT OPPOSITION, ECONOMIC AND ADMINISTRATIVE CHALLENGES, EXTREME EFFORTS TAKEN IN AN ATTEMPT TO RUN THE INSTITUTION, THE TEACHERS’ CONTRIBUTION TO TAKE THE EDUCATION TO DEFINITE HEIGHTS, THE HONEST EFFORTS BY THE STUDENTS, THEIR LOVE FOR THE INSTITUTION, THEIR CONTRIBUTION IN DIFFERENT AREAS OF LIFE INCLUDING POLITICS, ECONOMICS, SOCIAL COMMITMENT, LITERATURE AND ART AND THE CONTINUOUS SUPPORT FROM THE SOCIETY HAD ALWAYS BEEN A PART AND PARCEL OF THE INSTITUTION. THIS BOOK TRIES TO FATHOM THESE VARIOUS ASPECTS.
THIS BOOK IS DIVIDED INTO THREE PARTS: ESTABLISHMENT TO GOLDEN JUBILEE YEAR: 1885-1935; GOLDEN JUBILEE TO CENTURY: 1935-1985 AND CENTURY TO POST CENTURY SILVER JUBILEE: 1985-2010.
‘पूर्वपीठिका’ या प्रकरणात कोणत्या पाश्र्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची, न्यू इंग्लिश स्कूलची आणि फग्र्युसनची स्थापना झाली त्याचा तपशील दिला आहे आणि ‘फग्र्युसनचा शुभारंभ’ या प्रकरणात फग्र्युसनचा शुभारंभ कधी आणि कुठे झाला, ‘फग्र्युसन’ हे नाव का दिलं गेलं, याचा उल्लेख आहे. तसेच फग्र्युसनचा शुभारंभ सोहळा, त्याला उपस्थित असलेले मान्यवर, त्यांनी केलेली भाषणे, डेक्कन कॉलेजच्या विलीनीकरणाचा सरकारकडून आलेला प्रस्ताव, फग्र्युसनचे नवीन जागेत झालेले स्थलांतर, फग्र्युसनची पहिली दहा वर्षे, फग्र्युसनच्या संदर्भातील आर्थिक बाबी, पदवी परीक्षेचा व्यापक केलेला अभ्यासक्रम, वसतिगृह योजना, फग्र्युसनचे पहिले विद्यार्थी संमेलन, टिळकांचा राजीनामा इ. महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश या प्रकरणात आहे.
‘प्लेगच्या आपत्तीचे दशक’ या प्रकरणात फग्र्युसन कॉलेजच्या नव्या मुख्य इमारतीचे झालेले उद्घाटन, आगरकरांचे निधन, सोसायटीच्या घटनेत झालेल्या महत्त्वाच्या दुरुस्त्या, प्लेगची भयानक वर्षे, र.पु. परांजपे रँग्लर झाल्याची घटना इ. बाबींची नोंद आहे. ‘फग्र्युसनचा नवा अध्याय’ या प्रकरणात रँग्लर परांजपे यांचा सुवर्ण कालखंड, इमारतींची भर, शास्त्रशाखेच्या प्रयोगशाळा, वसतिगृहांचा विस्तार, विद्यार्थिनींचे वसतिगृह, फग्र्युसनमधले निवासी बंगले, फग्र्युसन आणि डेक्कन यांची तुलना, मुंबई विद्यापीठाशी बदलते संबंध, फग्र्युसनचे नियामक मंडळाशी संबंध, शिक्षकवर्ग, फग्र्युसन आणि ब्रिटिश सरकार, फग्र्युसन आणि जनमत इ. मुद्द्यांचा अंतर्भाव आहे. ‘वादळी वाटचाल – सुवर्णमहोत्सवाकडे’ या प्रकरणात ज्येष्ठांचे निधन, आजीव सदस्यांत मतभेद, हॉटसन प्रकरण आणि फग्र्युसनमधले महाभारत, सरकारबरोबरील मतभेद, विद्यार्थी परीक्षांमधील उज्ज्वल निकाल, फग्र्युसनच्या सुवर्ण महोत्सवाचा मुख्य समारंभ इ. मुद्द्यांचे विवेचन केले आहे. ‘फग्र्युसनचे काही सेवक’ या प्रकरणात वामन शिवराम आपटे, बाळ गंगाधर टिळक इत्यादींसह फग्र्युसनच्या काही सेवकांचा अल्प परिचय दिला आहे. ‘माजी विद्याथ्र्यांच्या काही आठवणी’ या प्रकरणातून आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, विठ्ठल रामजी शिंदे, शवुंÂतला परांजपे इ. विद्याथ्र्यांनी फग्र्युसनमधील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला आहे. हे पहिल्या भागातील शेवटचे प्रकरण असून, ‘फग्र्युसन कॉलेजच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी आलेले संदेश,’ ‘शास्त्र विषयांचे शिक्षण’, ‘ग्रंथालयाचा विकास’, ‘फग्र्युसन कॉलेज मॅगेझीन’, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व तिच्या परिषदेचे अध्यक्ष (१८८४ – १९३५) अशी पाच परिशिष्टं जोडण्यात आली आहेत.
दुसNया विभागातील पहिलं प्रकरण आहे ‘सुवर्णमहोत्सव ते हीरकमहोत्सव’. या प्रकरणात सुवर्णमहोत्सव ते हीरकमहोत्सव या दरम्यानच्या ठळक घटनांची नोंद घेतली आहे. जसे रँग्लर परांजपे यांचा ६१वा वाढदिवस, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या पुतळ्याचे अनावरण इ. तसेच फग्र्युसनच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याचे वर्णन यांचा समावेश आहे. दुसNया विभागातील दुसNया, तिसNया, चौथ्या, पाचव्या प्रकरणात १९३५ ते १९८५ पर्यंत जे जे प्राचार्य फग्र्युसनला लाभले त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या कारकिर्दीदरम्यान फग्र्युसनच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना, तसेच त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घटनांचा आढावा घेतला आहे. या विभागातील दुसNया प्रकरणाच्या शेवटी ‘विद्यापीठाचे नवीन अभ्यासक्रम (१९४७)’ हे विस्तृत परिशिष्ट जोडले आहे.
तिसNया विभागातील पहिल्या ते पाचव्या प्रकरणात १९८५ ते २०१० दरम्यान फग्र्युसनला लाभलेले प्राचार्य, त्यांची कारकीर्द आणि त्यांच्या कारकिर्दीदरम्यान फग्र्युसनच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना, तसेच त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घटनांचा आढावा घेतला आहे. या विभागातील दुसNया प्रकरणाच्या शेवटी ‘कलांचे आविष्करण (आविष्कार, इनसिंक, स्पीकमॅके)’ हे परिशिष्ट जोडले आहे. ग्रंथाच्या शेवटी निवडक संदर्भ-साहित्य सूची जोडली आहे.
तर फग्र्युसनची १२५ वर्षांची वाटचाल उलगडणारा हा गं्रथ आहे. फग्र्युसन कॉलेज हे पुण्याच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या कॉलेजची उज्ज्वल शिक्षक, प्राचार्य, विद्यार्थी परंपरा या ग्रंथातून अधोरेखित होते. तसेच फग्र्युसनच्या संदर्भातील महत्त्वाच्या आणि छोट्या घटनांची नोंद घेतल्याने हा ग्रंथ बNयाच अंशी परिपूर्ण वाटतो. ग्रंथातील छायाचित्रे, जोडलेली परिशिष्टे आणि संदर्भग्रंथ सूची यामुळे या ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचाही बोध या ग्रंथातून होतो. एवूÂणच फग्र्युसनची वाटचाल उलगडणारा हा ग्रंथ फग्र्युसनसाठी एक आदर्श संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे नेटक्या आणि साक्षेपी संपादनाचं एक आदर्श उदाहरण ठरावं.