* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAYU PRADUSHAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664263
  • Edition : 2
  • Publishing Year : 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHO IS THE CREATOR OF AIR POLLUTION? WHO ELSE, BUT THE HUMANS! MAN HAS THE INTENSE URGE TO RULE OVER EVERYBODY AND EVERYTHING. THIS DESIRE MAKES HIM SO BLIND THAT HE WISHES TO RULE OVER THE EARTH AND THE NATURE. NOT ONLY THIS, HE INTERFERES AT ALL LEVEL IS WITH THE NATURAL HAPPENINGS AND EVENTS. THE TERRIBLE POPULATION GROWTH, THE INDUSTRIALIZATION, THE WANTON FALLING OF THE TREES, AUTOMATIC VEHICLES PUMPING OUT POISONOUS GASES ALL THE TIME, THESE ALL THINGS ARE EQUALLY RESPONSIBLE FOR THE POLLUTION ALL OVER. WE ARE NOT ABLE TO REALIZE THAT THIS POLLUTION IS ENGULFING THE EARTH INTO ITS JAWS AND ONE FINE DAY IT WILL NOT HESITATE TO POISON US ALL, LIVING OUT NOBODY, KILLING EACH AND EVERY LIVING SOUL, MAKING THE EARTH LIFELESS. EACH YEAR, WE COME ACROSS ACCIDENTS WHERE THE AIR POLLUTION HAS CAUSED MORE DEATHS. THE INCIDENT OF BHOPAL GAS ACCIDENT IS STILL FRESH IN EVERYONE`S MIND. CAN WE NOT DO SOMETHING ABOUT THIS? CAN WE NOT OVERCOME THIS PROBLEM? YES, WE CAN! BUT WHAT WE NEED FOR IT IS IMMENSE WILL POWER, AWARENESS ABOUT THE ENVIRONMENT, EDUCATION ABOUT IT, AND PARTICIPATION OF THE EDUCATIONAL, SOCIAL AND SCIENCE INSTITUTIONS; AND LAST BUT NOT THE LEAST IS THE STRICT FOLLOW UP OF THE RULES AND REGULATIONS.
वायू प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व गाजविण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी ढवळाढवळीमुळे! जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे होत चाललेली जंगलांची कत्तल, विषारी वायू आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासूर एक दिवस सा-या सजीवांनाच संपवून टाकील. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी! वायू प्रदूषणाने जगभरातील हजारो निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत. भोपाळ वायुकांडाची साक्ष इतिहास सतत देत राहील. वायू प्रदूषणाच्या भस्मासूराला गाडून टाकता येणार नाही का? थ्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, पर्यावरणाबद्दल लोकजागृती, पर्यावरण शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक संस्थांचा सहभाग आणि कायद्याची कडक अंमलबजावणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VAYUPRADUSHAN #VAYUPRADUSHAN #वायुप्रदूषण #SCIENCE #MARATHI #DR.KISHOR/DR.NALINIPAWAR #डॉ.किशोर/डॉ.नलिनीपवार "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-05-2004

    वायू प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व गाजविण्याचा राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी ढवळाढवळीमुळे! जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लोकसंख्यमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे होत चाललेली जगलांची कत्तल, विषारी वायू आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासुर एक दिवस साऱ्या सजीवांनाच संपवून टाकील. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी! वायू प्रदूषणाने जगभरातील हजारो निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत. भोपाळ वायुकांडाची साक्ष इतिहास सतत देत राहील. वायू प्रदूषणाच्या भस्मासुराला गाडून टाकला येणार नाही का? त्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, पर्यावरणाबद्दल लोकजागृती, पर्यावरण शिक्षणख् सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक संस्थांचा सहभाग आणि कायद्याची कडक अंमलबजावणी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-07-2004

    वायुप्रदूषणाची समस्या... जगाला भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार केला तर वायुप्रदूषणाचा क्रमांक फार वरचा लागेल. सध्या ‘औद्योगीकरण म्हणजे देशाची प्रगती’ हे समीकरण रूढ झाल्यामुळे त्याच्या अनेक अपरिहार्य परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते आहे. अशा परिणामंची प्रत्यक्ष झळ बसत नाही, तोपर्यंत आपण जागे होत नाही. वस्तुत: आपण स्वत: सिगारेट ओढत नसलो, तरी त्या धुरानेही आपल्याला जसा त्रास होत असतो, तसा कळत-नकळत होणारा वायुप्रदूषणाचा त्रास मानवी आरोग्याची हानी करतो आहे. नेमकी हीच जाणीव ‘वायुप्रदूषण’ या पुस्तकातून डॉ. किशोर पवार व सौ. नलिनी पवार यांनी आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केला आहे. वायुप्रदूषण ही जागतिक समस्या असल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांना वाटणारी जगबुडीची भीती निराधार म्हणता येणार नाही. या भूतलावर वनस्पती, प्राणी व मानव अशा घटकांमधील संतुलन बिघडले की, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होऊन सजीवांना धोका पोहोचतो. यालाच प्रदूषण म्हणतात. या प्रदूषणाची कारणे प्रामुख्याने मानवनिर्मित व क्वचित नैसर्गिक असतात. अमर्याद औद्योगीकरण, वाढती लोकसंख्या, निसर्गदत्त जंगलाचा विनाश स्वयंचलित वाहनांची गर्दी, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर यामुळे पाणी, हवा आणि जमीन तिन्हींचे प्रदूषण होते. वायुप्रदूषणाची नैसर्गिक कारणे म्हणजे वनस्पतीचे परागकण विषाणू, जिवाणू व बुरशीचे बीजाणू आणि ज्वालामुखीचा उद्रेक अशी आहेत. वायुप्रदूषणाची अशी अनेक कारणे असली आणि या प्रदूषणाच्या व्याख्या जरी अनेकांनी केलेल्या असल्या तरी त्यापेक्षा त्याचे भयावह परिणाम जास्त महत्त्वाचे आहेत. कारण ते समस्या मानवजातीला भोगावे लागतात. जगात अनेक ठिकाणी वायुप्रदूषणामुळे घडलेल्या दुर्घटनांची जंत्री फार मोठी आहे. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे ३ डिसेंबर १९८४ ला भोपाळ वायुकांडात जवळपास विकलांग, अपंग झाले. विकृत बालते जन्माला आली. संबंधितांना जरी नुकसानभरपाई मिळाली तरी त्यामुळे लाखमोलाचा जीव कधी परत येत नाही. जगातली आधुनिक काळातली अशा प्रकारची पहिली दुर्घटना बेल्जियममध्ये डिसेंबर १९३० मध्ये घडली. त्यानंतर अमेरिका, लंडन, मेक्सिको, जपान आदी देशांमध्येही अशा दुर्घटना वेळोवेळी घडल्या. तरीही माणसाला पुरते शहाणपण आल्याचे दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यामुळेच लेखकाने वायुप्रदूषणाच्या उगमापासून त्याच्या नियंत्रणापर्यंतची साद्यंत माहिती दिलेली आहे. स्वयंचलित वाहने, कीटकनाशके, विविध धातू, रासायनिक खते, किरणोत्सर्गी पदार्थ, औष्णिक विद्युत केंद्रे, पर्जन्य, प्रकाश, रासायनिक धुरके आदी गोष्टींपासून प्रदूषण कसे फैलावते व त्याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात ते सविस्तर स्पष्ट केले आहे. मानवाच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा, नैराश्य, कर्करोग, दमा, अंधत्व, त्वचारोग, श्वसनाचे विकार, जन्मजात विकृती, मूत्रपिंड तसेच मेंदूचे विकार, विषबाधा असे अनेक दुष्परिणाम संभवतात. वनस्पती तर बोलूही शकत नाहीत आणि पळूनही जाऊ शकत नाहीत. पण त्यांची वाढ खुंटणे, पाने, पाकळ्या गळणे अशा प्रकारचे परिणाम त्यांच्यावर होतात. निर्जीव गोष्टीही यातून सुटत नाहीत. इमारतींचा रंग, फर्निचर, कपडे, गालिचे, विविध शिल्पे यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ताजमहाल, चारमिनार, काही सुप्रसिद्ध मंदिरे अशा ऐतिहासिक स्मारकांवरही वायुप्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम होतो. आर्थिक नुकसानही प्रचंड प्रमाणात होते. फक्त न्यू यॉर्क शहरात १९५५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दरवर्षी ६० लाख डॉलरचे नुकसान झाल्याचे आढळते. पश्चिम बंगालमध्ये धुरामुळे गंजणाऱ्या वस्तूंचे नुकसान पाच कोटी रुपये इतके झाले. एकूण या सजीव आणि निर्जीव सृष्टीचे सर्व प्रकारचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही ठोस उपाय आवश्यक आहेत. या उपायांची चर्चाही लेखकाने केलेली आहे. सरकारने प्रतिबंधक कायदेही केलेले आहेत. प्रगत देशात त्याची कडक अंमलबजावणी केली जाते, पण मागासलेल्या किंवा विकसनशील देशात मात्र त्याबाबत आजही अनास्था दिसते. कायद्यातूनही पळवाटा काढल्या जातात. काही स्वयंसेवी संस्था पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम आजही करतात. पण दुर्दैवाने आपल्या देशात गंभीर प्रश्नांना दुय्यम स्थान दिले जाते. या परिस्थितीत आमूलाग्र बदल होऊन एकूण समाजात पर्यावरणविषयक जाणीव निर्माण झाली, तर लेखकाचे श्रम सार्थकी लागले, असे म्हणता येईल. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-06-2004

    जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकीकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, आमनुषपणे होत चाललेली जंगलाची कत्तल, विषारी वायू, आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हाभस्मासूर एक दिवस साऱ्या सजीवांनाच संपवून टाकेल. मग उरेल ती फक्त पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी. प्रस्तुत पुस्तकात पृथ्वीचा हा ऱ्हास थांबवता यावा यासाठी पर्यावरण लोकजागृती, पर्यावरण शिक्षण आणि कायद्याची कडक अंमलबजावणी याविषयी चर्चा आढळते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-09-2004

    वायू प्रदूषणाची जाणीव... झपाट्याने होणारे शहरीकरण व वाढती कारखानदारी यांचा एकत्र परिणाम म्हणजे प्रदूषण. विशेषत: शहरी भागामध्ये नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी विपरीत परिणाम घडवून आणण्याची क्षमता असणारे वायू प्रदुषण’ ही एक जागतिक गंभीर समस्या आहे. वाय प्रदूषणाची व्याप्ती फार मोठी आहे व याविषयी शास्त्रीय माहिती एकत्र मिळवणे ही जिज्ञासू नागरिकांची मोठी गरज आहे. ‘वायू प्रदूषण’ या पुस्तकाच्या रूपाने याविषयीची सर्वंकष व शास्त्रीय माहिती एकत्रित परंतु सुलभ रीतीने मांडून डॉ. पवार यांनी ही गरज पूर्ण केली आहे. वायू प्रदूषणाचे प्रकार कोणते, त्यांची कारणे काय, त्यांचे आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम होतात याची शास्त्रीय माहिती लेखकांनी दिलेली आहे. वाहनांचे प्रदूषण, कीटकनाशके, धातू, किरणोत्सर्ग, औष्णिक विद्युत केंद्रे, कारखाने अशा विविध स्रोतामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा गोषवारा घेणारी सोळा प्रकरणे म्हणजे याविषयीच्या उत्तम माहितीचा संकलित खजिनाच आहे. याबरोबरच वायू प्रदूषणामुळे होणारे आम्ल पर्जन्य, हरितगृह परिणाम, ओझोन थराचे विरळीकरण व एकूण पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम यांची उत्तम चर्चा या पुस्तकात आढळते. या माहितीबरोबरच वायू प्रदूषणामुळे ऐतिहासिक स्मारकांवर होणारे परिणाम, आर्थिक नुकसान, सजिवांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम यांचीही माहिती येथे दिली आहे. वायू प्रदूषण प्रतिबंधक कायदे व वायू प्रदूषण नियंत्रण करण्याची उपकरणे व उपाययोजना यांची चर्चाही लेखकाने केलेली असल्यामुळे ‘वायू प्रदूषण’ हे एक परिपूर्ण पुस्तक बनले आहे. उत्तम छपाई व विषय सुलभ करण्यास व रंजक करण्यास विविध छायाचित्रे, आकृत्या व तक्ते यांचा मोठा सहभाग आहे. लेखकाने संदर्भसूची दिली असती तर जिज्ञासूंना त्याचा अधिक उपयोग झाला असता. पर्यावरण या विषयाचे वाढते महत्त्व व त्याचा शालेय शिक्षणात केलेला समावेश या पार्श्वभूमीवर ‘वायू प्रदूषण’ या पुस्तकाचे स्वागत केले पाहिजे व लेखकांनी हा महत्त्वाचा विषय उत्तम रीतीने हाताळून पर्यावरण शिक्षण व जनजागृतीच्या प्रयत्नांना चांगला हातभार लावला आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये उपयोगी पडेल व जिज्ञासूंना शास्त्रीय माहिती देणारे ‘वायू प्रदूषण’ हे पुस्तक निश्चितच संग्राह्य आहे. -डॉ. भूषण पटवर्धन ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more